Mudra Loan Information in Marathi – Mudra Loan Scheme in Marathi प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती मध्यम आणि लघु व्यवसाय सहसा बँकिंग संस्थांकडून कर्ज घेण्यास असमर्थ असतात कारण त्यांचा व्यवसाय लहान असल्यामुळे त्यांच्याकडे बँकिंग संस्थांचे व्याज भरण्यासाठी अपुरा निधी असतो आणि हेच लक्षात घेवून मुद्रा योजना सुरु करण्यात आली असावी. मुद्रा हि एक संस्था आहे जिचे पूर्ण स्वरूप मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड (micro units development and agency ltd) असे आहे. आणि हि संस्था लघु उद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी मदत करते.
म्हणजेच हि लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी आणि उद्योगांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केलेली एक वित्तीय संस्था आहे. हि संस्था ज्या लघु उद्योगांना ९ ते १० लाखापर्यंत कर्जाची आवश्यकता असते त्या उद्योगांना कर्ज देण्यासाठी मुद्रा बँका, एनबीएफसी आणि एमएफआय या संस्थांच्याकडून आर्थिक मदत करते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती – Mudra Loan Information in Marathi
प्रधान मंत्री मुद्रा योजना – pradhan matri mudra yojana
प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या तत्वा खाली लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी मुद्रा या संस्थेने काही योजना तयार केल्या आहेत.
योजनेचे नाव | प्रधान मंत्री मुद्रा योजना (pradhan matri mudra yojana) |
योजनेचा उद्देश | या योजनेचा मुख्य उद्देश हा लघु उद्योगांचा आणि व्यवसायांचा विकास करण्यासाठी केला जातो तसेच उद्योगांचा विस्तार आणि क्षमता वाढवण्यासाठी या योजनेतून कर्ज दिले जाते. |
लक्ष्य गट | वयपर आणि सेवा क्षेत्रातील व्यवसाय आणि कृषी उत्पादन उपक्रम |
कर्जाची रक्कम | दहा लाखापर्यंत १.५०००० पर्यंतच्या कर्जाचे शिशु म्हणून वर्गीकरण केले आहे. २.५०००१ ते ५००००० पर्यंतच्या कर्जाचे किशोर म्हणून गीकरण केले आहे. ३.५००००१ ते १०००००० पर्यंतच्या कर्जाचे तरुण महणून वर्गीकरण केले आहे. |
प्रक्रिया शुल्क | शिशु आणि किशोर एमएसई युनिट्ससाठी कोणताही प्रक्रिया शुल्क आकाराला जात नाही परंतु तरुण एमएसई युनिट्ससाठी कर्जाच्या ०.५० टक्के शुल्क लागू केला जातो. |
परत फेड कालावधी | तीन ते पाच वर्ष |
मुद्रा ह्याचे पूर्ण स्वरूप काय – MUDRA Full form in Marathi
मुद्रा (mudra) ह्याचे पूर्ण स्वरूप मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड (micro units development and agency ltd) असे आहे.
मुद्रा म्हणजे काय – what is mudra
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड या संस्थेची स्थापना भारत सरकारने लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी आणि उद्योगांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केलेली एक वित्तीय संस्था आहे. मुद्रा कॉर्पोरेट नसलेल्या लघु उद्योगांना बँका, एनबीएफसी आणि एमएफआय या सारख्या विविध वित्तीय संस्थांच्याकडून निधी पुरवण्याचे काम करते.
निधी सहाय्य प्रकार – types of funding support
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड (मुद्रा) या संस्थेकडून दिले जाणारे सहाय्य निधी हे २ प्रकारचे असतात ते खाली दिलेले आहेत.
- एमएफआय द्वारे १ लाख पर्यंतच्या कर्जासाठी असणारी योजना महणजे सूक्ष्म कर्ज योजना.
- व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नॉन बँकिंग वित्तीय संस्था आणि लघु वित्त बँका यासाठी पुनर्वित योजना.
मुद्रा कर्जाचे उद्देश
- मुद्रा कर्ज हे विविध कारणांसाठी दिले जाते ज्यामुळे उत्पन्न वाढते आणि रोजगाराची निर्मिती देखील होते. मुद्रा कर्ज हे मुख्यता खालील कारणांसाठी दिले जाते.
- मुद्रा कार्डद्वारे कार्यरत भांडवली कर्ज दिले जाते त्यामुळे उद्योजकांना आपला व्यवसाय कोणत्याही अडचणी शिवाय चालवणे सोपे पडते.
- कमी उत्पन्न गटांना त्यांच्या व्यवसायाची उभारणी आणि विस्तार करण्यासाठी मदत करणे.
- मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड या वित्तीय संस्थे द्वारे विक्रेते, व्यापारी, दुकानदार आणि इतर सेवा क्षेत्रासाठी व्यवसाय कर्ज दिले जाते.
- काही व्यवसायामध्ये व्यवसाय करण्यासाठी वाहनांची सुध्दा गरज असते आणि हे लक्षात घेवून मुद्रा संस्था वाहतूक वाहन कर्ज देते जे केवळ व्यावसायिक वापरासाठी असते.
- मुद्रा हि वित्तीय संस्था लघु उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरी घेण्यासाठी कर्ज देते.
- कृषी संबधीत बिगरशेती उत्पन्न निर्मिती उपक्रमांसाठी हि संस्था कर्ज देते, उदाहरणार्थ – कुकुटपालन आणि मत्स्य पालन.
- सर्व लघु उद्योग वित्त संस्था आणि संबधित घटकांची नोंदणी करणे आणि नंतर त्यांचे नियमन करणे.
- ट्रक्टर, टिलर आणि दुचाकी वाहन घेण्यासाठी कर्ज जे व्यावसायिक हेतूने घेतले जाते.
मुद्रा योजनेद्वारे घेतलेले कर्ज कशासाठी वापरली जातात
मुद्रा योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज कशासाठी वापरले जावू शकते ते खाली दिलेले आहे.
- कार्यरत भांडवल कर्ज.
- व्यावसायिक वाहन कर्ज.
- व्यापारी आणि व्यवसाय दुकादारासाठी कर्ज योजना.
- वनस्पती आणि यंत्र सामग्रीसाठी कर्ज.
कर्जदाराची पात्रता – eligibility
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅंड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड या संस्थेची स्थापना भारत सरकारने लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी आणि उद्योगांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केलेली एक वित्तीय संस्था आहे. ज्या लघु उद्योगांना १० लाखांपर्यंतची मदत हवी आहे.
त्या उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका आणि शहरी सहकारी बँका कर्ज देतात. ज्या उद्योजकांना आपल्या लघु उद्योगासाठी १० लाखापर्यंत कर्ज हवे आहे. अशा उद्योजकांना मुद्रा कर्ज मिळू शकते. मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिले कागदपत्रे गरजेची असतात.
मुद्रा लोन कागदपत्रे – Mudra Loan Documents in Marathi
- ओळखीच पुरावा (identity proof).
- सहा महिन्याच्या खात्याचे विवरण (statement of accounts).
- मागील दोन वर्षाच्या ताळेबंदासह आयकर परतावा.
- व्यवसाय ओळख पुरावा किंवा पत्ता पुरावा (address proof).
- व्यवसायाच्या श्रेणीचा पुरावा (category proof)
- व्यवसायाचा अस्तित्वाचा पुरावा (मेमोरंडम ऑफ असोसियेशन किंवा पार्टनरशिप डीड).
मुद्रा लोन व्याजदर – interest rates
बँकेचे नाव | व्याज दर | कर्जाची रक्कम | परतफेडीचा कालावधी |
स्टेट बँक ऑफ इंडिया | ९.७५ टक्के पुढे | १० लाखापर्यंत | १ ते ५ वर्ष |
बँक ऑफ बरोडा | ९.६५ टक्के च्या पुढे | १० लाखापर्यंत | १ ते ५ वर्ष |
आम्ही दिलेल्या mudra loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mudra loan scheme in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of mudra loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mudra loan details marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट