माझे पालक निबंध मराठी My Parents Essay in Marathi

My Parents Essay in Marathi माझे पालक निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये my parents म्हणजेच माझे आई वडील यांच्याविषयी निबंध लिहिणार आहोत. आई आणि वडील हे जगातील अनमोल गोष्ट आहेत आणि त्यांच्या इतके प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही तसेच आपल्या हजारो चुकांना देखील क्षमा करणारे आपले आई वडीलच असतात आणि आई वडिलांचे स्थान आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे असते. आई वडिलांनी त्यांचे जीवन हे आपल्याला घडवण्यासाठी समर्पित केलेले असते तसेच त्यांनी आपल्या भवितव्यसाठी अनेक कष्ट देखील घेतलेले असतात अश्याच माझ्या महान आई वडिलांच्यावर आज मी निबंध लिहिणार आहे.

“ डोळे मिटेपर्यंत जी

प्रेम करते तिला

आई म्हणतात

आणि

पण डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो

प्रेम करतो त्याला

बाप म्हणतात.”

my parents essay in marathi
my parents essay in marathi

माझे पालक निबंध मराठी – My Parents Essay in Marathi

Maze Palak Nibandh

आई वडील हे जगामध्ये सगळ्यांचे असतात आणि ते आपल्या आयुष्यामध्ये खूप किमंती आणि मौल्यवान असतात आणि त्यांचे प्रेम आणि आपल्यासाठी केलेले कष्ट आपल्याला केव्हाच मोजता येत नाही आणि जगामध्ये ते तेवढेच असतात जे आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करतील. आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचे खूप मोठे स्थान असते म्हणून म्हणतात कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आणि आपल्या सुखासाठी जे आयुष्यभर झटतो किंवा कष्ट करतो तो म्हणजे बाबा असतो आणि म्हणूनच आपले जीवन सुरळीत चालते आणि आयुष्यामध्ये आईचे आणि वडिलांचे देखील स्थान खूप महत्वाचे आहे.

त्यांनी जे आपल्याला घडवण्यासाठी तसेच आपले चांगल्या प्रकारे पालन पोषण करण्यासाठी जे कष्ट घेतलेले असतात त्याचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. आई हि अशी व्यक्ती आहे जी आपली काळजी लहानपणी पासून घेते, आपल्यावर चांगले संस्कार करते तसेच आपल्यावर निस्वार्थी प्रेम करते आणि डोळे मितेपारायंत प्रेम करणारी देखील आईच असते तसेच जर बाबांच्या बद्दल सांगायचे म्हटले तर स्वताचे मन मारून कष्ट करणारे शरीर आणि काळजी करणारे मन म्हणजे बाबा’ असतात.

बाबा असले कि आपल्याला कोणतेही कष्ट करावे लागत नाही कारण बाबा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि त्यामुळे आपल्याला कष्टाची किंमत माहित नसते पण ज्यावेळी आपल्या डोक्यावरील छत निघून जाते त्यावेळी आपल्याला बाबांची किंमत कळते, त्यांनी केलेलं कष्ट, केलेलं त्याग, सामोरे गेलेली संकटे ज्यावेळी आपल्यावर पडतात त्यावेळी वाटते कि बाबांनी आपल्यासाठी किती गोष्टी सहन केल्या आहेत आणि त्यांनी आपले आयुष्य घडवण्यासाठी किती कष्ट खाल्ले आहेत.

अश्या प्रकारे आपले आई वडील आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे कष्ट करत असतात, संकटांना सामोरे जात असतात तसेच त्यांना आनंद देणाऱ्या अनेक गोष्टींचा ते त्याग करत असतात आणि ते आपले भविष्य चांगले घडवण्यासाठी सतत जातात असतात आणि त्यांना असे वाटत असते कि आपला मुलगा किंवा मुलगी हिने चांगल्या संस्कारासोबत त्यांनी शिकून चांगल्या नोकरीला लागावे आणि आपले नाव समाजामध्ये उंचवावे आणि त्यांच्या कष्टाचे चीज करावे इतकीच अपेक्षा आपल्या आई वडिलांची असते.

परंतु जगामध्ये असे कित्येक लोक आहेत जे आपण सुशिक्षित झाले कि आपल्या वृद्ध आई वडिलांना सोडून परदेशामध्ये जातात तसेच लग्नानंतर आई वडिलांना वृद्धाआश्रमामध्ये ठेवतात आणि त्यांनी त्यांना घडवण्यासाठी केलेल्या कष्टाचा अपमान करतात तसेच त्यांच्या त्यागाचा अपमान करतात आणि त्यांच्या वृद्ध अवस्थेमध्ये वृद्धाआश्रम मध्ये ठेवतात आणि त्यांना एकटे पडतात.

अशी जगामध्ये अनेक नालायक मुले आहेत जी आपल्या आई वडिलांना वृद्धा आश्रम मध्ये ठेवतात त्यांना एकटे पाडतात, ज्यांनी त्यांचे आयुष्य घडवण्यासाठी कष्ट केले, अनेक गोष्टींचा त्याग केला, लहानपणी आपली काळजी घेतली आणि आपला आधार बनले त्यांचा वृद्धाप काळामध्ये अनेक मुले आधार बनू शकत नाहीत हि लज्जास्पद गोष्ट आहे. आपण आपल्या आई वडिलांचा म्हतारपणी आधार बनला पाहिजे आणि त्यांना जपले पाहिजे.

आता जर माझ्या आई वडिलांच्या बद्दल सांगायचे म्हटले तर मला माझ्या आई वडिलांच्या बद्दल सांगायला शब्द पुरणार नाहीत कारण कोणत्याही आई वडिलांचे आपल्या मुलाचे आयुष्य घडवण्यासाठी केलेले कार्य इतके मोठे असते कि ते शब्दामध्ये मांडता येत नाही. तसेच प्रमाणे माझ्या देखील आई वडिलांचे मला बनवण्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, माझ्यावर केलेलं प्रेम आणि माझी घेतलेली काळजी मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. माझे आई वडील हे जगातील सर्वात चांगले आई वडील आहेत.

माझ्या आई विषयी सांगायचे म्हटले तर माझी हि खूप प्रेमळ आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करते आणि तिने मला लहानपणी पासूनच खूप प्रेम दिले आहे तसेच आम्हाला चांगले संस्कार देखील दिले आहेत. माझी आई जरी प्रेमळ असली तरी जर आम्ही कश्यामध्ये चुकीचे वागलो तर ती आम्हाला फटके द्यायची त्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले तसेच तिने देखील मला जे हवे आहे ते बाबांच्या सारखे लगेच घेतले त्यामुळे आम्हाला कोणतीही वस्तू घेण्यासाठी खूप हट्ट करावा लागत नव्हता.

माझी आई सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे पटापट आवरते आणि तसेच लवकर जेवण बनवून सर्वांचे डबे देते आणि ज्यावेळी आम्ही लहान होते त्यावेळी आम्हाला आवरून, बॅगेमध्ये डबे घालून ती आम्हाला शाळेला पाठवायची आणि शातून आलो कि थोडे फ्रेश झाल्यानंतर आमचा अभ्यास घ्यायची.

त्याचबरोबर आम्ही जर कधी आजारी पडलो तर सर्वात जास्त काळजी तीच घेते आणि काही वेळा तर ती भावूक होते आणि तीच असते जी आपल्यावर निस्वार्थी पणे प्रेम करते आणि म्हणूननच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि जर बाबांच्या विषयी सांगायचे म्हटले तर बाबा आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्यासाठी आपली तहान, भूक सर्व विसरून कष्ट करत असतात आणि आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.

माझे वडील खूप प्रेमळ, गोड स्वभावाचे आणि सतत हसतमुख किंवा राहणारे असे आहेत आणि त्यांच्या या स्वभावामुळे आम्हाला देखील त्यांच्या कडून खूप प्रेरणा मिळते. आमचे बाबा हे आमच्या कुटुंबाचा आधारस्थंभ होते आणि ते कुटुंबाच्या आणि आमच्या सुखासाठी खूप कष्ट करत होतो तसेच ते आपले दुख कधीच कोणाला सांगत नाहीत आणि घरातल्यांना काळजी मध्ये टाकत नाहीत तर ते सर्व संकटांना न डगमगता सामोरे जातात.

आमचे बाबा अपमचे सर्व हट्ट पुरवतात आणि आम्हाला जे हवे आहे ते लगेच आणून देतात. अपमचे बाबा आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि वही, पेन, पुस्तके, बॅग आणि शिक्षणासाठी लागणारे इतर साहित्य न मागता आणून देत होते आणि आजही जे महत्वाचे साहित्य आम्हाला लागते ते न मागता आणून देतात. तसेच आम्ही लहान असतान कोणतेही मोठे मोठे सन असले कि ते आम्हाला नवीन कपडे आणून देत होत.

माझे बाबा हे कुटुंबामध्ये सर्वांचेच प्रिय व्यक्ती आहेत कारण कुटुंबातील सर्वांची काळजी ते करतात आणि ते आमचे देखील खूप आवडते आहेत कारण ते आमच्यावर खूप जीवापाड प्रेम करतात आमच्या इच्छा पूर्ण करतात, आमचे हट्ट पुरवतात तसेच आमचे उज्वल आयुष्य घडवण्यासाठी कष्ट करतात.

अश्या प्रकारे आपल्या आई वडिलांचे आपल्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान असले पाहिजे तसेच जगातील प्रत्येक मुलाने त्यांच्या वृद्धापकाळामध्ये किंवा म्हातारपणी आधार बनला पाहिजे आणि त्यांनी जशी आपण लहान असताना आपली काळजी घेतली तशी त्यांची देखील काळजी घेतली पाहिजे.

आम्ही दिलेल्या my parents essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे पालक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या MAZE PALAK NIBANDH या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!