नारायण मेघाजी लोखंडे माहिती Narayan Meghaji Lokhande Information in Marathi

narayan meghaji lokhande information in marathi नारायण मेघाजी लोखंडे माहिती, आज आपण या लेखामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. नारायण मेघाजी हे फुलमाळी शेतकरी कुटुंबांमध्ये ८ फेब्रुवारी १८४८ मध्ये जन्मले होते आणि त्यांचे गाव पुणे जिल्ह्यातील खेड जवळ असणारे कन्हेरसर हे आहे. नारायण मेघाजी लोखंडे हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांची परिस्थिती देखील तशी गरीबच होती त्यामुळे त्यांनी त्या परिस्थितीतून कसे बसे आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी त्यांचे शिक्षण झाल्यानंतर सर्वप्रथम रेल्वे खात्यामध्ये कारकून म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि मग त्यांनतर त्यांनी काही काल पोस्त खात्यामध्ये देखील काम केले.

काही दिवसांनी त्यांनी मुंबई या शहरामध्ये असणाऱ्या मांडवी भागातील एका कापडाच्या गिरणीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी या गिरणीमध्ये भांडारपालची नोकरी करण्यास सुरुवात केली आणि त्यांना त्या कापड गिरणीमध्ये असे दिसून आले कि त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे चांगल्या वातावरणामध्ये काम करत नाहीत म्हणजेच त्यांना दिवसातून १३ ते १४ तास राबवून घेतले जाऊ लागले.

तसेच त्यांना आठवडी सुट्टी किंवा कोणत्याही सणाची सुट्टी दिली जात नव्हती आणि या सर्व गोष्टी पाहून त्यांनी असे ठरवले कि आपण या कामगारांचे हाल कमी करण्यासाठी काही तरी केले पाहिजे आणि म्हणून त्यांनी कामगार चळवळ सुरु करण्याचे ठरवले आणि येथूनच त्यांचा चळवळीतील मुख्य प्रवास सुरु झाला आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना आजही कामगार चळवळीचे जनक किंवा अग्रगण्य नेते म्हणून ओळखले जाते.

narayan meghaji lokhande information in marathi
narayan meghaji lokhande information in marathi

नारायण मेघाजी लोखंडे माहिती – Narayan Meghaji Lokhande Information in Marathi

नावनारायण मेघाजी लोखंडे
जन्म८ फेब्रुवारी १८४८
जन्मठिकाणपुणे जिल्ह्यातील खेड या गावाजवळ असणारे कन्हेरसर
ओळखकामगार चळवळीचे जनक किंवा अग्रगण्य नेते

नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी वैयक्तिक माहिती 

नारायण मेघाजी यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४८ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड या गावाजवळ असणारे कन्हेरसर या गावामध्ये झाले. हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी त्यांचे लहानपण हे गरिबी मध्ये गेले परंतु त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण गरीब परिस्थितीमध्ये देखील कसे बसे पूर्ण केले. त्यांच्या बायकोचे नाव गोपिकाबाई असे होते आणि त्यांच्या मुलाचे नाव गोपीनाथ असे होते. त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रथम रेल्वे खात्यामध्ये आणि पोस्ट खात्यामध्ये नोकरी केली.  

नारायण मेघाजी लोखंडे यांची कामगिरी आणि चळवळ

नारायण मेघाजी हे ज्यावेळी मांडवी भागातील कापड गिरणीमध्ये काम करत होते त्यावेळी त्यांना असे दिसून आले कि तेथील कामगार हे दहशतीच्या वातावरणामध्ये काम करत आहेत आणि हि दहशत मोडून काढण्यासाठी त्यांनी कामगार चळवळ सुरु केली आणि येथूनच त्यांना चळवळीचा प्रवास सुरु झाला. त्यांनी नोकरी सोडून दिली आणि त्यांनी स्वताला चळवळीमध्ये वाहून नेण्याचे ठरवले.

मग त्यांनी २३ सप्टेंबर १८८४ मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोशिएशन हि गिरणी कामगार संघटनेची सुरुवात केली आणि हि कामगार संघटना भारतातील पहिली संघटीत संघटना होती. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुण्यामध्ये बंद पडलेले दीनबंधू या सत्यशोधक समाजाचे प्रथम मुखपत्र चालू केले तसेच त्यांना सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत म्हणून त्यांनी १८७३ मध्ये कामगिरी पार पाडली तसेच १८७५ मध्ये कापड गिरणीच्या कामगारांनी केलेल्या चळवळीमुळे त्यावेळी ब्रिटीश सरकारने कामगारांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी आयोग नेमला आणि हे फक्त नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे शक्य झाले होते.

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आणि कामगारांच्या चळवळीमुळे कापण गिरणीमध्ये अनेक नियम लागू झाले म्हणजेच त्यांना १८९० पासून रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या सुरु झाल्या त्याचबरोबर १८९१ कामगार कायदा मंजूर झाला आणि त्यामध्ये नारायण मेघाजी यांच्या सूचनांचा समावेश होता. तसेच १८९३ – १८९४ मध्ये मुंबई या शहरामध्ये हिंदू मुस्लीम यांची दंगल झाली होती आणि हि दंगल मिटवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर त्यांना भारतातील स्वाभिमानी कामगार चळवळीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते.

बॉम्बे मिल हँड्स असोशिएशनची चळवळ

बॉम्बे मिल हँड्स असोशिएशनने पहिली कामगार सभा १८८४ मध्ये आयोजित केली होती आणि या सभेमध्ये पाच हजार पेक्षा अधिक कामगार उपस्थित होते आणि या सभेमध्ये कामगारांनी एकूण ५ मागनुं केल्या होत्या त्या म्हणजे कामगारांचे कामाचे तास निश्चित करणे म्हणजेच कामगारांनी दिवसातून किती तास काम करावे तसेच कामगारांना आठवड्यातून एकदा सुट्टी मिळवी म्हणजेच त्यांना रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असावा.

कामावर असताना दुपारचे जेवण करण्यासाठी त्यांना जेवणाची सुट्टी असावी, तसेच कामगारांना काम करताना काही दुर्घटना झाली तर त्यांना पगारी रजा द्यावी आणि जर कामगाराच काम करताना अपघाती मृत्य झाला तर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळावी अश्या पाच मागण्या कामगार संघटनेने केल्या होत्या परंतु या मागण्यांच्याकडे ब्रिटीश सरकारने दुर्लक्ष केले आणि त्यामुळे नारायण मेघाजी आणि कामगार संघटना पेटून उटली आणि त्यांनी ठीक ठिकाणी सभा घेतल्या.

तसेच भाषणे केली आणि यामधून ५००० कामगारांची संघटना १०००० कामगारांची झाली परंतु तरी देखील सरकारवर आणि गिरणी मालकांच्यावर काहीच फरक पडला नाही म्हणून त्यांनी संपाचा मार्गावर चालायचे ठरवले. संप केल्यामुळे कापड गीरणी मधील काम देखील बंध झाले त्यामुळे कापड गिरणीच्या मालकांनी माघार घेतली आणि कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे ठरवले आणि मग १८९० पासून रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या सुरु झाल्या त्याचबरोबर १८९१ कामगार कायदा मंजूर झाला आणि त्यामध्ये नारायण मेघाजी यांच्या सूचनांचा समावेश होता.

नारायण मेघाजी यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about narayan meghaji lokhande in marathi

  • नारायण मेघाजी यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४८ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड या गावाजवळ असणारे कन्हेरसर या गावामध्ये झाले.
  • नारायण मेघाजी हे ज्यावेळी मांडवी भागातील कापड गिरणीमध्ये काम करत होते त्यावेळी त्यांना असे दिसून आले कि तेथील कामगार हे दहशतीच्या वातावरणामध्ये काम करत आहेत आणि हि दहशत मोडून काढण्यासाठी त्यांनी कामगार चळवळ सुरु केली
  • त्यांनी २३ सप्टेंबर १८८४ मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोशिएशन हि गिरणी कामगार संघटनेची सुरुवात केली आणि हि कामगार संघटना भारतातील पहिली संघटीत संघटना होती.
  • नारायण मेघाजी लोखंडे यांना आजही कामगार चळवळीचे जनक किंवा अग्रगण्य नेते म्हणून ओळखले जाते.

आम्ही दिलेल्या narayan meghaji lokhande information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नारायण मेघाजी लोखंडे माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या narayan meghaji lokhande date of birth या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about narayan meghaji lokhande in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!