Beti Bachao Beti Padhao in Marathi लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी नमस्कार मित्रहो आजच्या या लेखात आपण बेटी बचाव बेटी पढाव माहिती तसेच यावर निबंध beti bachao beti padhao nibandh marathi देखील पाहणार आहोत. ती जन्माला आली असती, तर निवडणुकीला चार पाच सिट तिच्यासाठी राखीव असतात हे तिला कळलं असत. पण, इथे निवडणुकीला उभ रहायचा प्रश्नच येत नाही, कारण इथ समाज तिला तिच्या पायावरदेखील उभ राहू देत नाही. हा निबंध व माहिती आपण विविध इयत्ते करिता तसेच स्पर्धापरीक्षा व भाषणे यामध्ये देखील याचा वापर करू शकतो. याचा वापर करून आपण परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवू शकता.
बेटी बचाओ, बेटी पढाओ…..
लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते.
नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते
वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते.
तरीही,गर्भातली चिमुकली जन्माआधीच का मरते ?
beti bachao beti padhao in marathi
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ निबंध मराठी – Beti Bachao Beti Padhao in Marathi
लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी – beti bachao beti padhao nibandh marathi
सावित्रीच्या लेकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजात आज मुलींचच अस्तित्व धोक्यात आल आहे. विविध क्षेत्रात महिला आघाडी करताना दिसतात तर, दुसरीकडे स्त्रीभ्रूणहत्येचे वाढते प्रमाण आपल्याला दिसून येते. खरंच, किती विदारक चित्र आपल्या समाजात निर्माण झालंय.
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानाच्या कित्येक मोहिमा गेल्या दहा वर्षात भारतभर राबवण्यात आल्या.पण, तरीही दर हजारो मुलांमागे मुलींचे घटत असलेले प्रमाण आपल्याला दिसून येते आणि याला कारणीभुत आहे, जबाबदार आहे ती म्हणजे आपली पुर्वापार चालत आलेली परंपरा आणि संस्कृती. नारी ही देवतेसमान आहे, तिची पुजा केली पाहिजे अस मनुस्मृतीमध्ये लिहलेल आहे.
- नक्की वाचा: भारतीय शेतकरी निबंध
अगदी भरभरून कौतुक केल्यासारख वाटत,पण लगेचच मनुस्मृतीमध्येच “नारी नर्कशा दिपीका” अस म्हटलंय.याचा अर्थ असा की नारी म्हणजे नरकाचा दरवाजा आहे, आता ज्या स्त्रीच्या पोटी आपला जन्म झाला ती स्त्री म्हणजे नरक ? धन्य धन्य अशी ही महान संस्कृती…
काही ठिकाणी तर मुलींच्या जन्माला आळा बसावा म्हणुन मुलींची नाव ‘नकोशी’ अशी ठेवली जातात, कायतर म्हणे अशी नाव ठेवली की मुली जन्माला येत नाहीत. मला प्रश्न पडतो, आज विज्ञानात इतकी मोठी प्रगती झालेली असताना, आपल्या या २१ व्या शतकात अशा खुळचट समजुती नांदतातच कशा ?
लहानपणापासुन तर आई-वडील आपल्या मुलीला ओझचं मानत आलेले आहेत. जितक्या लवकर तिची रवाणगी सासरी करता येईल तितकं बरं अस त्यांना वाटत. मग सासरच्या त्रासाला कंटाळून या बिचाऱ्या मुलीनं आत्महत्या केली की मग हीच मंडळी स्वतःच्या नशिबाला दोष देऊन गप्प बसतात.
- नक्की वाचा: माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध
आता पच्छाताप करण्यापेक्षा ,स्वतःला न झेपणाऱ्या, अधिक संपत्तीची मागणी करणाऱ्या अशा लोकांकडे आपली मुलगी द्यावीच का ? तिच्या लग्नात हुंड्यासाठी जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा जर तोच पैसा तिच्या शिक्षणासाठी, तिला स्वावलंबी बनवण्यासाठी खर्च केला, तर तुमची मुलगी जिवानिशीही जाणार नाही, शिवाय तीच आयुष्य देखील सार्थक होईल.
आपण आज हे विसरतोय की मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे .ज्या प्रकारे आपल्या मुलामुलींचे पालन करणे हे पालकांचे कर्तव्य आहे तसेच, मुलांसोबत मुलींनाही शिकवणे हे देखील आता प्रत्येक पालकाचे मुलभूत कर्तव्य व्हायला हवे, तरच मुली शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील, स्वतःच संरक्षण करतील .
वंशाचा दिवा म्हणजे मुलगा या रानटी अंधश्रद्धेमुळे दरवर्षी एक कोटीच्या घरात मुलींची त्यांच्या जन्माआधीच क्रुरहत्या केली जाते. पण, मंडळी तुम्हाला माहितेय का ? हा जो तुमचा वंशाचा दिवा आहेना, या दिव्यातील वात जी स्वतः जळून या दिव्याला प्रकाशित करते ती दुसरी-तिसरी कुणी नसून मुलगीच आहे .
- नक्की वाचा: माझी आजी निबंध मराठी
आपल्या समाजामध्ये दोन बाजू आहेत. एकीकडे मंदिरातील स्त्रिरुपी देवीच्या मूर्तीवर आपण भरजरी शालू चढवतो आणि दुसरीकडे मात्र भरचौकात त्याचं स्त्रीची आबरू लुटतो. एकीकडे आपण या स्त्रिरुपी देवीच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक घालतो आणि दुसरीकडे याच स्त्रीवर पेट्रोल, रॉकेल ओतून जाळून टाकतो.
एकीकडे आपण तिच्या पायावर नतमस्तक होतो,तर दुसरीकडे त्याचं स्त्रीला लाथा मारून, आपण तिचा अपमान करतो. स्त्री ही देवतेचे रुप आहे .अस म्हटलं जातं की देवाला प्रत्येकाजवळ, प्रत्येकासोबत राहणं शक्य नव्हतं म्हणून त्यानं आई ही संकल्पना तयार केली, ती आई म्हणजे स्त्रीचं ना !
गावच्या शेजारी नदी असणं हे जस गावच्या विकासाच प्रतीक आहे. तसच,घरात मुलगी असणं हे सुख – समृद्धीच, आनंदाचं, भरभराटीच आणि नाविण्याच प्रतीक आहे.
” लई झाल्या लेकी, नको म्हणू बापा
उडूनिया जाईल तुझ्या जीवनाचा थापा ||१||
अहो,कशाला करता मुलाचा अट्टाहास
मुलगीच भरवेल ना सोन्याचा घास ||२||
आज आपल्या समाजात शंभर टक्के मुलांपैकी, दहा टक्के मुल अशी असतील जी आई-वडिलांची काळजी करतात, त्यांचा सांभाळ करतात, त्यांची सेवा करतात. पण, बाकीच्या मुलांचं काय ? जे आपल्या आई-वडिलांची साधी विचारपूसही करत नाहीत. तसही, आता पूर्वीचे श्रावणबाळ राहिलेतच किती ?
- नक्की वाचा: आवडता सण दिवाळी निबंध
त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की हे दृष्य जाणवत देखील. पण, एक मुलगी, एक स्त्री जी नेहमी तुमच्यासोबत असते, आई-वडिलांची सेवा करते, ते आजारी असतील तर रात्रंदिवस जागरण करते. मग, इतकं असताना देखील स्त्रीभ्रूणहत्या थांबत का नाहीय ? का तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो ?
का आजही तिला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं ? पण, जर ही मुलींची हत्या अशीच चालू राहिली तर, तुमच्या मुलांसाठी मुली आणायच्याच कुठून हा यक्षप्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही .
मी खूप दिवसांपूर्वी एका मुलीची गोष्ट वर्तमानपत्रात वाचली होती. आता, त्या मुलीचं नाव काय ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, काय करणार अशा नाव मिळण्याआधीच मारल्या गेलेल्या कितीतरी मुली आहेत. कितीही आवर घालायचा प्रयत्न केला तरी, कायदा व सुव्यवस्था यांना धारेवर धरणारया अशा घटना घडतातच.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
अशीच एक घटना आहे, मुंबईच्या जे. जे. इस्पितळात घडलेली. एका मातेन दोन सुंदर गोंडस बाळांना जन्म दिला, त्यातील एक मुलगा तर दुसरी मुलगी होती. देवानंदेखील एकाच वेलीवर दोन तऱ्हेतऱ्हेची फुल फुलवली होती. पण, काय करणार त्यातील एकच फुल त्या मातेला हवंहवंसं वाटत होत.
अर्थातच, ते फुल म्हणजे मुलगा, तर दुसऱ्या फुलाचा तिला किळस वाटू लागला, ते फुल म्हणजे न उमललेली कळी म्हणजे मुलगी होती. त्या मातेन क्षणाचाही विचार न करता त्या मुलीला उचललं आणि इस्पितळाच्या ४ थ्या मजल्यावरून फेकून दिलं. किती भयानक !
काय वाटलं असेल त्या अर्भकाला ? किती सोसल्या असतील त्या पराकोटीच्या वेदना ? काय वाटलं नसेल त्या मातेला ?
जन्माला देणारी ही स्त्रीचं आणि मारणारी ही स्त्रीचं !
आज आपण म्हटलं, मुलींचं प्रमाण कमी होत चाललंय. तर, समाज लगेच म्हणेल मग मुलांचं कस होणार ? त्यांच्याशी लग्न कोण करणार ? त्यांचा संसार कोण थाटनार ? म्हणजे, या मुलांचं लग्न व्हावं , त्यांचा संसार व्हावा यासाठी आपल्याला मुली वाचवायच्या आहेत ! मुळीच नाही. त्या कशा सुरक्षित राहतील ? कशी त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल ? यासाठी प्रयत्न करायचा आहे. आज महिलांना आरक्षण तर हवच पण, सगळ्यात महत्वाचं आहे ते संरक्षण.
भर रस्त्यात त्यांच्यावर अन्याय – अत्याचार होत असेल, त्यांच्या लग्नासाठी जर त्यांच्या आई – वडिलांना आपली जमीन गहाण टाकावी लागत असेल, तिच्या आबरूच्या चींतेपायी जर त्यांना रात्रंदिवस जागाव लागत असेल, तर कोणत्या आई – वडिलांना आपल्या मुलीला जन्म द्यावा अस वाटेल. मुलगी जिवंत राहण्यापेक्षा पहिला ती सुरक्षित राहील का? याचा आधी आपण विचार केला पाहिजेत .
- नक्की वाचा: भारत माझा देश मराठी निबंध
काही डॉक्टर्स आजही स्त्रीभ्रूणहत्या करतात. त्या अर्भकाच्या आई – वडिलांनी, या डॉक्टर्सनी कधी विचार केलाय का, की काय वाटतं असेल त्या अर्भकाला, अशीच एका अर्भकाची मनोकविता आहे ….
” देवा सांगणं मला ,मुलगी का बनवलं
बिनबुडाच खेळणं बनवलं ||१||.
दिल अमूल्य रुप,पण कावळ्यांची मात्र शिकार बनवलं
सुवासिनीचा मान दिला , संसाराचा गुण दिला
पण,स्वतःच्या स्वाभिमानाला तेवढं कोड बनवलं
देवा सांगणं मला मुलगी का बनवलं ||२||
आज आपण जर स्वतःच्या घरापासून मुलगा – मुलगी दोघे समान, अस ठरवल. तर, मुली जन्माला येतील, हे सुंदर जग पहायचं भाग्य त्यांनाही मिळेल आणि नक्कीच एक दिवस असा येईल की तेंव्हा आपल्याला “बेटी बचाओ ,बेटी पढाओ ” असा नारा द्यायची गरज पडणार नाही…
– तेजल तानाजी पाटील
बागीलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या beti bachao beti padhao in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “बेटी बचाओ बेटी पढ़ाओ निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या beti bachao beti padhao nibandh marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि beti bachao beti padhao in marathi speech माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण beti bachao beti padhao form pdf download in marathi या लेखाचा वापर beti bachao beti padhao in marathi form असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट