एनजीओ म्हणजे काय ? NGO Information in Marathi

NGO Information in Marathi – NGO Meaning in Marathi एनजीओ विषयी माहिती एनजीओ (ngo) हि अशी संस्था आहे जी लोककल्याणासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे. एनजीओ हि संस्था गरीब लोकांना, वृध्द लोकांना आणि असहाय्य मुलांना सहारा देण्यासाठी काम करते तसेच आपत्कालीन काळामध्ये, गरिबांना अन्न पुरवठा करणे आणि पर्यावरण सुरक्षा यासारख्या गोष्टींच्यासाठी मदत करते म्हणजेच हि संस्था समाजसुधारक किंवा समाजसेवक म्हणून कामा करते. एनजीओ हि संस्था सरकारी नाही तर खाजगी संस्था आहे जे स्वयंसेवक किंवा समाज सेवक म्हणून काम करते.

एनजीओ (ngo) हि संस्था अशी संस्था आहे जी स्वताचा फायदा बघत नाही तर ती समाजाचा काही तरी फायदा व्हावा या साठी काम करत असते आणि संस्थेचे उदिष्ट समाजसेवा करणे किंवा समाजातील गरजू लोकांना मदत करणे हा असतो. एनजीओ या स्वयंसेवी संघटने मध्ये एकूण ७ किंवा ७ हून आधील लोक असू शकतात आणि या जर एकाधि व्यक्ती एनजीओचा सदस्य असेल तर तो कोणत्याही प्रकारची समाज सेवा करू शकतो.

जर आपल्याला एनजीओ (ngo) सारख्या संस्थेमध्ये राहून समाज सेवेचे काम करायचे असेल तर एनजीओ या संस्थेमध्ये नोंदणी करून किंवा बिना नोंदणी करता आपण काम करू शकतो. बहुतेक एनजीओ (ngo) या संस्थेची मुख्य ख्याती हि अमेरिकेमध्ये वाढली असावी कारण अनेरीकेमध्ये गरीब लोकांना, वृध्द लोकांना आणि असहाय्य मुलांना सहारा देण्यासाठी काम करते.

तसेच आपत्कालीन काळामध्ये, गरिबांना अन्न पुरवठा करणे आणि पर्यावरण सुरक्षा यासारखी सामाजिक कार्ये काही खाजगी संस्थांच्या मार्फत केली जात होती त्यामध्ये अमेरिका सरकारचा कोणताही मदतीचा हातभार असत नव्हता आणि या मुळेच येथे एनजीओ (ngo) चा विकास झाला.

ngo information in marathi
ngo information in marathi

एनजीओ म्हणजे काय – NGO Information in Marathi

स्वयंसेवी संस्था याचा अर्थ

What is NGO एनजीओ हि एक अशी संस्था आहे जी लोककल्याणासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे आणि हि एक गैर सरकारी संस्था आहे जी सरकारच्या कोणत्याही मदती शिवाय समाजसेवा किंवा समाज कार्य करते. हि संस्था गरीब लोकांना, वृध्द लोकांना आणि असहाय्य मुलांना सहारा देते तसेच हि संस्था महिलांना मदत करते, अनाथ लोकांना सहारा देते, अनाथ मुलांना शिकवणे, गरिबांना अन्न पुरवठा करते, पर्यावरण सुरक्षा राखते तसेच आपत्कालीन काळामध्ये मदत करते.

एनजीओ पूर्ण स्वरूप – NGO Full Form in Marathi

एनजीओ चे पूर्ण स्वरूप नॉन गवर्नमेंट ऑर्गनायझेशन (non government organization) असे आहे.

एनजीओ विषयी माहिती 

एनजीओ या संस्थेविषयी अनेक व्याख्या जरी सांगितल्या तरी हि एक स्वयंसेवी संस्था आहे जी आपला कोणताही नफा न पाहता समाज सेवा करते आणि हि संस्था खाजगी स्वरूपामध्ये काम करते, आणि सरकारची कोणतीही मदत घेत नाही म्हणजेच हि संस्था सरकारच्या नियंत्रणाखाली नसते. या संस्थेचे मुख्य दोन गात आहेत ते म्हणजे ऑपरेशनल एनजीओ (Operational NGO)आणि दुसरी वकिली स्वयंसेवक संस्था (Advocacy NGO). काही संस्था एका वेळी दोन्ही विभागांमध्ये काम करू शकतात.

  • ऑपरेशनल एनजीओ – Operational NGO

ऑपरेशनल एनजीओ हे एक एनजीओचा एक भाग आहे जो पुढील विकास प्रकल्पांचे डिझाईन तयार करते आणि त्या प्रकल्पावर अंमलबजावणी करण्यासाठी लक्ष केंद्रित करते.

  • वकिली स्वयंसेवक संस्था – Advocacy NGO

वकिली स्वयंसेवक संस्था हा एनजीओ मधील भाग जे एखाद्या विशिष्ठ कारणांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात तसेच सार्वजनीक धोरणांवर प्रभाव पडण्याचा प्रयत्न करतात.

स्वयंसेवी संस्थांच्या उदाहरणांमध्ये समाविष्ट असणारे घटक

सुधारित आरोग्याचे समर्थन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, राजकीय सहभागामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या स्वयंसेवा संस्था किंवा मानवी हक्काचे समर्थन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था.

एनजीओचे प्रकार – types of NGO 

  • इंगो – INGO 

इंगो हा एक एनजीओचा प्रकार आहे आणि हि एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे म्हणजेच या प्रकारच्या एनजीओमध्ये वेगवेगळ्या देशांचा समावेश असतो. उदाहरणार्थ – युरोप मध्ये असलेल्या इंगो (INGO) च्या परिषदेमध्ये ३०० पेक्षा जास्त इंगो (INGO) संस्था सहभागी होतात.

  • क्वांगो – QUANGO 

क्वांगो हि संस्था अर्ध स्वायत स्वयंसेवी संस्था आहे जी सार्वजनिक निधीवर अवलंबून असते आणि या संस्थेचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा सरकारला असतो. क्वांगो (QUANGO) हा शब्द ब्रिटीश शब्द आहे.

  • एन्गो – ENGO 

एन्गो हि संस्था पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी बनवलेली एक संस्था आहे आणि ह्या संस्थेला पर्यावरणीय स्वयंसेवा संस्था म्हणून ओळखले जाते. उदारणार्थ – जागतिक वन्य जीव निधी.

  • गोंगो – GONGO 

गोंगो (GONGO) हि एक सरकारने आयोजीत केलेली संस्था आहे म्हणजेच हि संस्था सरकार द्वारे चालवली जाते.

स्वयंसेवी संस्थेमध्ये निधीचे व्यवस्थापन कसे केले जाते – fund 

एनजीओ हि एक अशी संस्था आहे जी लोककल्याणासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे आणि हि एक गैर सरकारी संस्था आहे जी सरकारच्या कोणत्याही मदती शिवाय समाजसेवा किंवा समाज कार्य करत असली तरी ह्या संस्था निधीसाठी विविध स्तोत्रांवर अवलंबून असतात.

  • स्वयंसेवी संस्थांना खाजगी देणग्यांपासून निधी प्राप्त होऊ शकतो.
  • वस्तू आणि सेवांची विक्री यापासून निधी उभा होऊ शकतो.
  • सदस्यता देयक या पासून निधी मिळू शकतो.
  • या संस्थांचे जरी सरकारपासून स्वातंत्र्य जरी असले तरी काही स्वयंसेवी संस्था सरकारी निधीवर देखील अवलंबून असतात.
  • स्वयंसेवी संस्थेचे निधी प्राप्त होण्याचा अजून एक मार्ग म्हणजे अनुदान.

एनजीओ संस्थेची कार्ये 

NGO Work Information in Marathi एनजीओ हि एक अशी संस्था आहे जी वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये समाज सेवा करते. या संस्थेची काही महत्वाची कार्ये खाली दिलेली आहेत.

  • जे लोक गरीब असतात आणि ज्यांना अन्नाचा तुटवडा बसत असतो अश्या लोकांना एनजीओ हि संस्था अन्न पुरवठा करते.
  • हि संस्था महिलांना मदत करते तसेच महिलांच्या समस्या सोडवते आणि महिलांना घर मिळवून देण्यासाठी काम करते.
  • एनजीओ हि संस्था पर्यावरण संरक्षण विषयक कामे करते, उदाहरणार्थ – संबधित ठिकाणावरील वाढते प्रदूषण रोखणे.
  • अनाथ मुलांना आसरा देणे तसेच त्यांना शिक्षण घेवून आपल्या पायावर उभारण्यासाठी मदत करणे.
  • गरीब आणि वृद्ध लोकांना सहारा देणे आणि आदिवासियांच्या समस्या सोडवणे.
  • हि संस्था आपत्कालीन काळामध्ये मदत करते, उदाहरणार्थ – जर एक ठिकाणी पूर आला असेल आणि लोकांची घरे जर पाण्यामध्ये बुडाली असतील तर त्यांना पुराच्या काळामध्ये राहण्यासाठी आसरा उपलब्ध करून देणे आणि त्यांना अन्न पुरवठा करणे.

एनजीओ विषयी काही तथ्ये – facts about NGO 

  • एनजीओ हि लोककल्याणासाठी काम करणारी एक संस्था आहे.
  • भारतामध्ये स्वयंसेवी संस्थांसाठी २२०० कोटी रुपयांची एकूण देणगी ओलांडली आहे.
  • इ. स २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस पाठवली होती आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये असे दिसून आले कि भारतामध्ये फक्त ५ टक्के स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत आहेत.
  • एकूण ४९.६ टक्के एनजीओ संस्था नोंदणीकृत नाहीत.
  • एनजीओ चे पूर्ण स्वरूप नॉन गवर्नमेंट ऑर्गनायझेशन (non government organization) असे आहे.
  • जगभरामध्ये १.२ दशलक्ष स्वयंसेवी संस्था आहेत त्यामधील ५३ टक्के ह्या ग्रामीण भागावर आधारित आहेत आणि ४७ टक्के शहरी भागावर आधारित आहेत.

 आम्ही दिलेल्या माहितीमध्ये ngo information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of ngo in marathi म्हणजेच “एनजीओ माहिती मराठी” ngo mahiti marathi संस्थेबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या ngo mahiti marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि ngo meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!