पर्यावरण विषयी माहिती Environment Information In Marathi

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे | आळविता ||

येणे सुख रुचे एकांताचा वास | नाही गुणदोष | अंगी येता ||”

साडे तीनशे वर्षापूर्वी संत तुकारामांनी निसर्गाचे, पर्यावरणाचे आणि झाडांचे महत्व सांगितले आहे,

environment information in Marathi आपल्या सर्वांना माहीतच आहे कि आपले जीवन हे पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहे. स्वच्छ पर्यावरण आपल्याला चांगले आणि निरोगी आयुष्य देते. पर्यावरणच आपल्याला शुध्द हवा, पाऊस, ऊन, चांगले अन्न, हिरव्या वनस्पती आपल्याला पर्यावरणाकडून मिळतात. पण आत्ताच्या जगात आपल्या स्वार्थासाठी जंगलांचा नाश तसेच झाडे तोडणे तसेच भौतिक सुखाच्या नैसर्गिक स्तोत्रांची शोषण करीत आहेत पण पर्यावरण म्हणजे आपले जीवन, आपला श्वास आहे म्हणून पर्यावरणचा समतोल राखून ठेवणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे आणि जर आपण पर्यावारानाचा समतोल राखला तरच आपण चांगके जीवन जगू शकेन आणि म्हणूनच पर्यावरण बद्दल लोक्कांना जागृत करण्यासाठी आणि आणि पर्यावरणाचे महत्व paryavaran marathi information काय आहे सांगण्यासाठी दरवर्षी ‘५ जून’ ला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. या सदरात आपण paryavaran mahiti marathi मध्ये पाहणार आहोत.

‘पर्यावरणाची सुरक्षा

हीच

जगाची सुरक्षा’

environment-information-in-marathi
environment information in marathi/paryavaran marathi information/paryavaran in marathi/environment in marathi

पर्यावरण मराठी माहिती environment information in marathi

पर्यावरण म्हणजे काय ? (what is environment) paryavaran marathi information

पर्यावरण (paryavaran in marathi) म्हणजे आपल्या सभोवताली असणारे मनुष्य, प्राणी, पक्षी, सूक्ष्म जंतू, कीटक, पाणी माती, पर्वत आणि आजूबाजूला असणारी लहान झाडे आणि मोठी झाडे या सर्वांना मिळून पर्यावरण बनते.

पर्यावरणाचे महत्व (importance of environment in marathi)

या जगातील प्रत्येक जीव हा पर्यावरणावर अवलंबून आहे. आपल्या सर्वांच्या जीवनासाठी एक चांगले पर्यावरण खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे. सर्व मनुष्य, प्राणी, पक्षी, सूक्ष्म जीव, नैसर्गिक वनस्पती, झाडे आणि हवामान या सर्व गोष्टी पर्यावरणावर निर्भर आहेत. पर्यावरण हे फक्त हवामान संतुलित ठेवत नाही तर हे आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रदान करते जसे कि आपण हवा, अन्न, पाणी आणि इतर गरजांसाठी पर्यावरणावर अवलंबून आहे. आज बघितले तर विज्ञान हे खूप पुढे गेले आहे  आणि जगामध्ये बरीचसी प्रगती झाली असली तरी वाढत्या प्रदूषणाला माणूसच जबाबदार आहेत कारण वेगवेगळ्या प्रकारचे मोठे उद्योगधंदे चालू करण्यासाठी झाडे तोडणे, जंगलांचा नाश करणे, नैसर्गिक संसाधनांशी खेळत राहणे तसेच आधुनिकीकरण, आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर या मुळे पर्यावरणावर दुषित परिणाम होत आहेत आणि या सर्व कारणांमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे आणि आपल्यासमोर ग्लोबल वार्मिंगची समस्या उद्भवली आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरील मानवाचे आयुष्य धोक्यात आले आहे. आणि म्हणूनच आपल्यासर्वांना हे पर्यावरणाचे महत्व जाणून घेवून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.

‘पर्यावरण वाचले

तर

 प्राण वाचतील.’

पर्यावरण प्रदूषण  environmental pollution 

आज आपण जगभरामध्ये पाहतोच आहोत कि पर्यावरण प्रदूषणाल सर्वजन तोंड देत आहेत. मनुष्याने त्वरित लाभाच्या लोभाने आपले दीर्घकालीन आयुष्य धोक्यात टाकले आहे. औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे माणसाला वाटत आहे कि त्याचे आयुष्य खूप सुखकर आणि सोयीस्कर झाले आहे परंतु माणसाला हे माहित नाही कि आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या हवेचे प्रदूषण किती झाले आहे, आपल्याला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रदूषण किती झाले आहे आणि माती प्रदूषण झाले आहे तसेच औद्योगीकरणसाठी जंगलांचा नाश झाला आहे म्हणजेच पर्यावरण प्रदूषण वाढतच चालले आहे आणि या वाढत्या प्रदूषणामुळे मनुष्याला वाढत्या तापमानाला, हवेतील बदलला, हवामानातील बदलामुळे होणारे आजार, भूकंप, दुष्काळ, पूर, जमीनीच्या उत्पादन क्षमते मध्ये घट आणि ओझोनचा थर कमी होवून उष्णता वाढणे यासारख्या समस्यांना मनुष्याला तोंड द्यावे लागत आहे.

पर्यावरणाचे घटक  components of environment environment in marathi

पर्यावरणाचे घटक प्रामुख्याने दोन प्रकारात विभागलेले आहेत ते म्हणजे जैविक घटक आणि        अजैविक घटक.

  • जैविक पर्यावरण : जैविक पर्यावरनामध्ये प्राणी, पक्षी, कीटक, जंगल, एकपेशीय वनस्पती, सरपटणारे प्राणी, जीवाणू, विषाणू, बुरशी आणि सूक्ष्म जीव यासारख्या सजीव घटकांचा  समावेश होतो.
  • अजैविक पर्यावरण : अजैविक पर्यावरणामध्ये जमीन, माती, ढग, हवा, धूळ, पर्वत, जंगल, पाणी, नदी, तापमान, पाण्याची वाफ, वाळू यासारख्या निर्जीव घटकांचा समावेश होतो.

परीसंस्थेचे प्रकार types of ecosystem 

paryavaran marathi information
paryavaran marathi information/paryavaran in marathi

परीसंस्था म्हणजे काय?  what is ecosystem ?

‘परिसंस्था म्हणजे जीव आणि त्यांचे वातावरण यामधील परस्पर संवादाची साखळी.’ 

‘परिसंस्था हि एक पर्यावरणाची रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहेत जे जिवंत प्राणी एकमेकांसोबत आणि आजूबाजूच्या वातावरनासोबत संवाद साधतात.’

परीसंस्थेचे दोन प्रमुख प्रकार आहेत आणि जे संक्षिप्तपणे खाली मांडले आहेत

  1. स्थलीय परिसंस्था.
  2. जलीय परिसंस्था.

1. स्थलीय परीसंथा:

हि केवळ जमिन आधारित पर्यावरणातील आहे. विविध भौगोलिक प्रदेशांभोवती वितरीत विविध प्रकारच्या स्थलीय परिसंस्था आहेत त्या खाली दिल्या आहेत

  • वन प्रदेश /जंगले
  • गवताळ प्रदेश
  • टुंड्रा प्रदेश
  • वाळवंटी प्रदेश

1.वन परिसंस्था  /जंगले :

वन परिसंस्थेमध्ये अनेक प्राणी, सूक्ष्म जीव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात आणि त्या पर्यावरणाच्या अजैविक घटकांशी समन्वय असतात. वन किवा जंगले पृथ्वीवरील तापमान नियंत्रित राखण्यास मदत करतात आणि पर्यावरणा मधील कार्बन शोषून घेतात आणि ऑक्सिजनहवे मध्ये सोडतात.

2.गवताळ परिसंस्था :

गवताळ परीसंस्थेमध्ये गवत आणि औषधी वनस्पतींचे वर्चस्व असते सवाना गवताळ प्रदेश किवा समशीतोष्णगवताळ प्रदेश हि काही गवताळ परीसंस्थेची उत्तम उदाहरणे आहेत.

3.टुंड्रा परिसंस्था :

टुंड्रा परिसंस्था हि जेथे झाडे नाहीत आणि ज्या ठिकाणी अतिशय थंड हवमान आहे त्याला टुंड्रा प्रदेश म्हणतात. या प्रदेशमध्ये पाऊस कमी पडतो आणि तेथे बहुतेकदा बर्फाच्छादित प्रदेश असतो. उदाहरण – आर्क्टिक प्रदेश किवा माउंटन हे टुंड्रा परीसंस्थेचे उदाहरणे आहेत.

4.वाळवंटी प्रदेश :

वाळवंट प्रदेश हि अशी ठिकाणे आहेत जेथे खूप कमी पाऊस पडतो या भागामध्ये दिवसा वातावरण गरम असते आणि रात्री थंडी असते. जगामध्ये वाळवंटी प्रदेश सगळीकडे आढळतात.

2.जलीय परिसंस्था

जलीय परिसंस्था प्रणाली म्हणजे जी पर्संस्था पाण्याच्या शरीरामध्ये असते त्याला जलीय परिसंस्था म्हणतात किवा पाण्यात जे जीव वास करतात त्या परीसंस्थेला जलीय परिसंस्था म्हणतात या मध्ये दोन प्रमुश प्रकार पाडले गेले आहेत.

  • गोड्या पाण्याची परिसंस्था
  • सागरी परिसंस्था

1.गोड्या पाण्याची परिसंस्था:

गोड्या पाण्याची परिसंस्था हि एक जलीय परिसंस्था असून या परीसंस्थेमध्ये तलाव, नदी, नाले, ओढे या सारख्या जलाशयांचा समावेश असतो ज्यामध्ये मिठाचे प्रमाण नसते आणि म्हणून याला गोड्या पाण्याची परिसंस्था म्हणतात.

2.सागरी परिसंस्था :

सागरी परीसंस्थेमध्ये समुद्र आणि महासागराचा समावेश असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि जी आर चा समवेश असतो. या परीसंस्थेमध्ये गोड्या पाण्याच्या परीसंस्थेच्या तुलनेत भक्ष जैव विविधता असते.

पर्यावरण व्यवस्थापण संरक्षणाचे उपाय /पर्यावरण समस्या व उपाय  

  • कारखान्यांमधून येणारा धूर सोडण्यासाठी उंच चिमण्या बसवाव्यात तसेच कारखान्यातील मळीचे पाणी नदीमध्ये सुदू नये त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट करावे.
  • शेतीमध्ये शेन खत, ऑर्गॅनिक खते किवा जैविक खतांचा उपयोग करावा.
  • प्लास्टिक वस्तूंचा जास्त वापर टाळा.
  • मोठ्या प्रमाणावर झाडे लावा आणि झाडे तोडण्यावर निर्बंध घालणे.
  • पर्यावरणाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे.
  • पाण्याचा वापर लागेल ठेवाधाच करणे.
  • आपल्या घरातील बल्ब, फॅन आणि टीव्ही विनाकारण चालू ठेवू नका.
  • गाड्यांचा उपयोग जास्त गरज असेल तरच करणे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला paryavaran marathi information पर्यावरण म्हणजे काय? पर्यावारांचे महत्व किती आहे पर्यावरणातील घटक कोणते आहेत तसेच परिसंस्थांची माहिती व पर्यावरण संरक्षणाचे उपाय कोणते आहेत. environment information in Marathi download हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच paryavaran in Marathi / environment in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पर्यावरण या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या paryavaran mahiti Marathi madhe माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!