शहामृगाची माहिती Ostrich Information In Marathi

Ostrich information in Marathi शहामृग shahamrug हा एकमेव पक्षी आहे जो आकाराने जगातील सर्व पक्ष्यांपेक्षा मोठा आहे आणि या पक्ष्याची एक विशेषता म्हणजे ते पक्षी कुळातील असून सुद्धा उडू शकत नाहीत. (ostrich in marathi) शहामृग या पक्ष्याचे वर्णन करायचे म्हंटले तर ते आकाराने इतर पक्ष्यान पेक्षा मोठे असतात. या पक्षायची उंची साधारण २.४ मीटर ते २.८ मीटर इतकी असते, लांब मान, आखूड चोच, पाय लांब आणि खूप मजबूत असतात शहामृग त्यांच्या लांब पायामुळेच उंच दिसत्तात आणि त्यांच्या पायामध्ये एवडी शक्ती असते कि त्यांनी पायाने दीलेल्य एका फटक्याने प्राणी किवा मनुष्य जखमी होवू शकतात. या पक्ष्यांचे डोळे तपकिरी रंगाचे असतात आणि ते खूप तीक्ष्ण असतात ते २ किलोमीटर लांबचे अगदी सहजपणे पाहू शकतात त्याचबरोबर हे पक्षी तासाला ६४ किलोमीटरचे अंतर पार करू शकतात. हे पक्षी आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतात.

ostrich information in marathi
Ostrich-information-in-Marathi/ostrich in marathi/ostrich meaning in marathi

शहामृग पक्षाची माहिती Ostrich information in Marathi 

नावशहामृग ( ostrich meaning in marathi )
कुळस्त्रुथिओनिफ़ोर्मेस
वैज्ञानिक नावस्त्रुथिओ कॅमेलस
रंगनर : काळा आणि पांढरा, मादी : तपकिरी
आयुष्य४० ते ४५ वर्ष
उंची२.४ ते २.८ मीटर
वजन६० ते १४० किलो
वेगतशी ६४ किमी

शहामृग पक्ष्याचा आहार ( ostrich diet )

शहामृग पक्षी हे सर्वभक्षक आहेत ते शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न खातात. हे पक्षी गवत, फळे, वनस्पतीची पाने, धान्य, वनस्पतींची मुळे आणि सरडे या प्रकारचे अन्न खातात.

राजहंस पक्षाची माहिती 

शहामृग कुठे राहतात ( ostrich habitat )

आफ्रिकेमध्ये शहामृग हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी शक्यतो वाळवंट, सवाना किवा अर्ध शुष्क मैदान त्याचबरोबर वूडलॅंड या प्रकारची त्यांची निवासस्थाने असतात. हे पक्षी उडताना कळपामध्ये उडतात आणि त्यांचा १० ते ५० जणांचा कळप असतो. हे पक्षी शिकार करताना मृग किवा झेब्रा या सारख्या प्राण्याशी जुळवून घेतात. या पक्ष्याचे घरटे ३ मीटर लांब असते.

या पक्ष्याला कोणकोणत्या प्राण्यापासून धोका असतो ?

शहामृग या पक्ष्याला वेगवेगळ्या भक्षक प्राण्यांचा सामना करावा लागतो त्यामध्ये सिंह, बिबट्या आफ्रिकन शिकारी कुत्री आणि चित्ता.

शहामृग हा पक्षी किती वर्षे जगतो?

जंगलामध्ये शहामृग पक्ष्यांचे आयुष्य सुमारे ३० ते ४० वर्ष असते.

शहामृग पक्ष्याचे प्रकार (types of ostrich in marathi)

शहामृग पक्षी हा फक्त आफ्रीकेमध्येच आढळतो. शहामृग या पक्ष्याच्या एकूण ९ जाती आहेत पण त्यामधील ६ ते ७ जाती नामशेष झाल्या आहेत. यामधील काही जाती खाली दिल्या आहेत.

रेड नेक्ड ऑस्ट्रीच ( red necked ostrich information in Marathi )

रेड नेक्ड शहामृग पक्ष्याला उत्तर आफ्रिके मध्ये आढळतात . रेड नेक्ड शहामृग हि जात आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळयाची पण आता यांच्या संख्यांमध्ये घट पडली आहे. शहामृग पक्ष्यांमध्ये या जातीचा पक्षी खूप उंच असतो या पक्ष्याची उंची ७ फुट असते. या पक्ष्याची मान साधारण गुलाबी रंगाची असते आणि नर शहामृग काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असते आणि मादी शहामृग राखाडी रंगाचे असते.

सोमाली ऑस्ट्रीच ( somali ostrich )

सोमाली शहामृग पूर्व आफ्रीकामध्ये आढळतात त्याचबरोबर हे पक्षी इथिओपिया, सोमालिया आणि केनिया मधेही आढळतात. या जातीमध्ये नर शहामृग पेक्षा मादी शहामृग आकाराने मोठे असते या पक्षाचे पंख पांढऱ्या रंगाचे असतात आणि मादा शहामृग चे पंख पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यावर तपकिरी रंगाच्या छटा असतात.

अरेबिअन ऑस्ट्रीच ( arabian ostrich information in Marathi )

अरेबिअन शहामृग या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव स्त्रुथिओ कॅमेलस स्य्रिअकस असे आहे. हे पक्षी १९६६ सिरीया आणि अरेबिअन द्वीपकल्प मध्ये आढळले होते. हे शहामृग आफ्रिकन शहामृग पेक्षा लहान असतात. या पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे हि जात नामशेष झाली आहे.

सावुथ आफ्रिका ऑस्ट्रीच ( south africa ostrich )

सावुथ आफ्रिका शहामृग ला ब्लॅक नेक्ड शहामृग या नावानेही ओळखले जाते. ह्या प्रकारचे पक्षी  आफ्रिका, नामिबिया, झिंबाब्वे, अंगोला आणि झांबिया या भागामध्ये आढळतात. नर शहामृग काळ्या रंगाचा असतो आणि मादी शहामृग तपकिरी रंगाचे असते . या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव स्त्रुथिओ कॅमेलस ऑस्ट्रालिस आहे.

नॉर्थ आफ्रिका ऑस्ट्रीच ( north africa ostrich information in Marathi )

 नॉर्थ आफ्रिका शहामृग हे आफ्रिकामध्ये तर आढळतातच पण हे पक्षी इथिओपिया, ईजिप्त, सोडन आणि मोरोक्को या देशामध्ये हि आढळतात. या पक्ष्याची उंची ९ फुट असते आणि वजन १५० ते १५५ किलो असते. या पक्ष्यांची मान गुलाबी लालसर असते आणि नर पक्ष्याचा पंखाचा रंग काळा पांढरा असतो आणि मादी पक्ष्याचा पंखाचा रंग राखाडी असतो.

मसाई ऑस्ट्रीच ( masai ostrich )

मसाई शहामृग हे शक्यतो आफ्रिकेमध्ये पूर्वेकडील भागात आढळतात तसेच हे पक्षी टांझानिया, इथिओपिया, केनिया आणि सोमालिया मध्येही आढळतात. मसाई शहामृग चे शास्त्रीय नाव स्त्रुथिओ कॅमेलस मास्सैकस आहे. या पक्ष्याचे पंख लहान असतात आणि ते पूर्ण काळ्या रंगाचे असतात आणि या पक्ष्याची मान गुलाबी रंगाची असते.

ससाना पक्षाची माहिती 

शहामृग पक्ष्याची अनोखी आणि मनोरंजक तथ्ये ( facts of ostrich )

  • या पक्ष्यांना पायाला दोन बोट असतात आणि दोन नखे असतात आणि त्यातील एक नख खूप शक्तिशाली असते.
  • या पक्ष्यांचे पाय एवढे बळकट असतात कि ते मनुष्य किवा शिकारी प्राण्याचा जीव घेवू शकतात.
  • या पक्ष्यांचे पंख २ मीटर लांब असता. जरी ते उडत नसले तरी ते आपल्या पंखांचा उपयोग पळते वेळी दिशा बदलण्यासाठी करतात.
  • शहामृग या पक्ष्याला दात नसतात.
  • शहामृग हे पक्षी कळपात राहतात ज्यामध्ये १० ते ५० पक्षी असतात आणि या कळपाला ‘फ्लोक’ असे म्हणतात.
  • या पक्ष्याचा मेंदू खूप लहान असतो बहुतेक तो आकाराने अक्रोड एवढा असतो.
  • या पक्ष्यांची अंडी खूप मोठी असतात आणि त्या अंड्यांचे वजन कमीत कमी २ किलो इतके असते ( १५ सेंटी मीटर लांब असतात ).
  • शहामृग पक्ष्याचे पंख खूप सुंदर असतात लोक या पक्ष्यांच्या पंखांचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी करतात.
  • नर शहामृग ला रुसटर म्हणतात तर मादी शहामृग ला हेन म्हणतात.
  • जंगलामध्ये या पक्ष्यांचे आयुष्य ३० ते ४० वर्ष असते.
  • मादी शहामृग हा पक्षी एका वेळी १ ते २ अंडी देतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा शहामृग (shahamrug) हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. ostrich information in Marathi language  हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच ostrich in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही शहामृग या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about ostrich bird in Marathi/ ostrich meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!