राजहंसाची माहिती Swan Information In Marathi

Swan information in Marathi मित्र मंडळी आज आपण या लेखात डोलदार अशा रुबाबदार पक्षाची माहिती जाणून घेणार आहोत तो म्हणजे राजहंस पक्षी (swan in marathi) सुंदर असा दिसणारा हा पक्षी वेगवेगळ्या  देशात आपल्याला पहायला मिळतो. राजहंस या पक्ष्याचे नाव घेतले कि ग.दि.माडगुळकरांची लहापनि ऐकलेली कवीता आठवते

“एका तयांत होती बदके पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिलू त्यात एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे

सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे

दावून बोट त्याला, म्हणती हसून लोक

आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दुख भारी, भोळे रडे स्वताशी

भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी

जे ते तयास टोची दावी उगाच धाक

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले

भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले

पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक

त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक.”

राजहंस म्हणटले कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो पांढरा शुभ्र, सुंदर, डौलदार लांब मान आणि पवित्र असा पक्षी ज्याला राजहंस असे म्हणतात. राजहंस हा पक्षी आपण शक्यतो पाण्यामध्ये पोहतानाच बघितला असेल आणि आपण कित्येकदा पांढऱ्या शुभ्र रंगाचा राजहंस पाहतो पण राजहंस हा पक्षी काळ्या रंगाचा हि असतो. पांढऱ्या रंगाचे राजहंस हे भारतामध्ये आढळतात आणि काळ्या रंगाचे राजहंस दुर्लभ आहेत आणि ते फक्त ऑस्ट्रोलिया मध्येच आढळतात. राजहंस पक्ष्यांचा स्वभाव शांत असतो तसेच ते सत्व गुणी, प्रामाणिक आणि थोडे लाजाळू असतात.

गरुड पक्षाबद्दल माहिती 

swan-information-in-marathi
swan information in marathi/swan in marathi

राजहंस या पक्ष्याची माहिती (swan information in Marathi)

कुळअॅनॅटीडी पक्षीकुळ
वैज्ञानिक नावसिग्नस
प्रजातीसात
आयुष्य१० ते १२ वर्ष
वजन१५ किलो
लांबी१.१ ते १.७ मीटर
रंगपांढरा शुभ्र, काळा

राजहंस कुठे राहतात? (swan habitat)

राजहंस हा पक्षी आपण जास्ती जास्त पाण्यामध्ये तरंगताना दिसतात. हे पक्षी पाण्याच्या अवतीभोवती राहतात. जसे कि तलाव, शांत नद्या , नाले, दलदलीच्या ठिकाणी राहतात आणि ते आपले घरटे बनवताना शक्यतो पाण्याच्या जवळच्या ठिकाणी जागा निवडतात. ते नदी काठी असलेल्या बेटावर किवा दाट झुडूप असलेल्या ठिकाणी आपले घरटे बनवतात.

राजहंस पक्षाचा आहार (swan diet)

राजहंस हा शाकाहारी पक्षी असल्यामुळे ते झाडांचा पाला किवा पाण्यामधील छोटी झाडे खातात. तसेच हे पक्षी पाण्याच्या पृष्ठ भागावरील झाडे, मुळे, कोंब  आणि गवत खातात.

कबुतराविषयी माहिती 

राजहंस पक्ष्याच्या विविध जाती(different species of swan)(rajhans pakshi)

राजहंस पक्ष्याच्या एकूण ७ जाती आहेत त्या म्हणजे ब्लॅक राजहंस, ब्लॅक नेक्ड राजहंस, ट्रम्पटर राजहंस, टुंड्रा राजहंस, म्युट राजहंस, ह्युपर राजहंस आणि कॉस्कॉरोबा राजहंस. या सर्व जातीचे संक्षिप्तपणे स्पष्टीकरण खाली दिले आहे.

म्युट राजहंस ( mute swan information in marathi)

म्युट राजहंस ह्या पक्ष्याची जात सर्वात मोठी आणि उंच उडणारी आहे. या पक्ष्याचा रंग पांढरा असतो आणि त्याच्या डोक्यावर पिवळसर नारंगी छटा असते आणि त्यांची चोच नारंगी लाल आहे  आणि त्याला काळ्या रंगाचे टोक असते, काळ्या रंगाचे पाय असे या पक्ष्याचे वर्णन आहे. हा सुंदर पक्षी अमेरिका आणि युरेशियामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. ह्या जातीचा पक्षी माणसांना घाबरात नाही. जर त्याच्या घरट्या जवळ मनुष्य किवा प्राण्याने येण्याचा प्रयत्न केला तर हा पक्षी आक्रमक होतो आणि तो आपल्या पंखांनी त्यांच्यावर हमला करतो. ह्या पक्ष्याचे पंख ७ फुट लांब जावू शकतात. मादी हि नरापेक्षा लहान असते आणि मादी राजहंसाचे पाय सायगनेट राखाडी रंगाचे पाय अस्त आणि चोच तपकिरी रंगाची असते. नर पक्षाला कोब आणि मादी पक्ष्याला पेन म्हणतात.

ब्लॅक राजहंस (black swan information in marathi )

या पक्ष्याच्या नावावारूंचा समजते कि हा पक्षी काळ्या रंगाचा आहे. याचे पंखाही काळ्या रंगाचे असतात आणि त्यावर साधारण पांढर्या रंगाच्या छटा असतात तसेच या पक्ष्याची चोच लाल रंगाची असते आणि चोचीच्या ठोकला बारीक पांढऱ्या रंगाचा ठिबक असतो. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव सिग्नस अट्राटस आहे. ब्लॅक राजहंस पक्षी हे ऑस्ट्रोलिया आणि न्यूझीलंड मध्ये आढळतात. नर आणि मादी हंस दिसायला एकसारखेच असतात पण नर हंस थोडा आकाराने मोठा असतो. या पक्षाचा आकार ४३ ते ५६ इंच असतो तसेच हे पक्षी एक वेळी ८ अंडी देवू शकतात आणि ती हिरव्या रंगाची असतात.

ब्लॅक नेक्ड राजहंस (black necked swan in marathi)

ब्लॅक नेक्ड राजहंस हा पक्षी अमेरिकन जातीचा पक्षी आहे आणि हा पक्षी अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. ह्या पक्ष्याचे शरीर पांढऱ्या रंगाचे असते आणि मानेपासून वरती काळ्या रंगाचा असतो म्हणून या पक्षाला ब्लॅक नेक्ड राजहंस म्हणतात. त्याची चोचीचा अर्धा भाग लाल आणि अर्धा (टोक) भाग राखाडी रंगाचा असतो. या पक्ष्या चे शास्त्रीय नाव सिग्नस मेलनकोरीफूस असे आहे. हा पक्षी आकाराने ४५ ते ५५ इंच लांब असतो. या जातीच्या मादी पक्षी एका वेळी ४ ते ६ अंडी देतात आणि ती पांढऱ्या रंगाची असतात. ब्लॅक नेक्ड राजहंस हा पक्षी शक्यतो आपला वेळ पाण्यामध्येच घालवतात ती चांगल्या प्रकारे चालू शकत नाहीत कारण त्यांचे पाय खूप पाठीमागे असतात.

कॉस्कॉरोबा राजहंस (coscoroba swan information in marathi)

कॉस्कॉरोबा राजहंस हे पूर्ण पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची चोच लाल रंगाची असते आणि थोडी नमुळते असते, तपकिरी ररंगाचे डोळे आणि गडद लालसर गुलाबी रंगाचे डोळे असे या पक्षाचे वर्णन आहे. या पक्षाचा आकार ३५ ते ४५ इंच लांब असतो. हा पक्षी एका वेळी ४ ते ७ अंडी देतात.

ह्युपर राजहंस (whooper swan information in marathi)

हा पक्षी पांढऱ्या रंगाचा असतो आणि चोच पिवळसर असते आणि त्याचे पाय काळ्या रंगाचे असतात. नर आणि मादी पक्षी एकसारखे असतात पण नर पक्षी थोडा मोठा असतो. हे पक्षी पाण्यामधील झाडे, लव्हाळा वनस्पती तसेच छोटे मासे आणि बेडके या प्रकारचा आहार खात्तात. या पक्ष्याची लांबी ५५ ते ६३ इंच असते आणि हे पक्षी ५ ते ६ अंडी देतात.

टुंड्रा राजहंस (tundra swan information in marathi)

टुंड्रा या मध्ये दोन प्रकार आहेत विशलिस्ट आणि बेविक. या प्रकारचे पक्षी पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची चोच काळ्या रंगाची असते आणि चोचीच्या दोन्ही बाजूला पिवळसर गुलाबी रंगाचे पट्टे असतात आणि काळ्या रंगाचे पाय असतात. या टुंड्रा राजहंस पक्ष्याची लांबी ५६ ते ५९ इंच इतकी असते. हे पक्षी अमेरिका, कॅनडा, अलास्का या देशामध्ये आढळतात.

ट्रम्पटर राजहंस (trumpeter swan information in marathi)

ट्रम्पटर राजहंस हे पक्षी पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची चोच काळ्या रंगाची असते. या पक्षाची लांबी साधारण ५७ ते ६४ इंच इतकी असते. ह्या जातीचे पक्षी सुध्दा अमेरिका, कॅनडा, अलास्का या देशामध्ये आढळतात. हे पक्षी एका वेळी ५ ते ७ अंडी देतात आणि ह्या अंड्यांचा रंग पांढरा शुभ्र असतो आणि या पक्षांचा पैदास हंगाम एप्रिल ते मे असतो.

ससाणा पक्षाबद्दल माहिती

राजहंस पक्ष्याची तथ्ये (facts of swan in marathi)

  • हंस हे पक्षी सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यामधील एक आहेत.
  • समूहाने उडणारे राजहंस v आकारामध्ये उडतात.
  • हंसाच्या पिल्लांना ‘cygnet’ म्हणतात .
  • राजहंसाला २५००० अधिक पंख असतात.
  • हा पक्षी ताशी ९५ किलोमीटर वेगाने उडू शकतो.
  • ह्या पक्ष्यांचा प्रजनन काळ ते ३-४ वर्षाचे असताना सुरु होतो.
  • या पक्ष्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते.
  • विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचा वाहन राजहंस होते.
  • आफ्रिका आणि अंटार्क्टीका मध्ये हंस राहत नाहीत.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा राजहंस हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. swan information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच swan in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही राजहंस या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about swan bird in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!