owl information in marathi – ghubad information in marathi घुबड पक्षी माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये घुबड ज्याला इंग्रजी मध्ये owl या नावाने ओळखले जाते या पक्ष्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. घुबड हे स्ट्रीगिडे कुटुंबातील असून घुबडांच्या एकूण २१६ प्रजाती आहेत आणि या पक्ष्याचा आकार, रंग, शरीर रचना हि त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. सामान्य घुबडाचा आकार हा लहान असतो त्यांना दोन पाय, दोन मोठे डोळे, आकडी चोच आणि लांब असे पंख असतात. घुबड हा पक्षी इतर पक्ष्यांच्यासारखे डोळे इकडे तिकडे फिरवू शकत नाही तर तो इकडे तिकडे पाहण्यासाठी आपली मान फिरवत असतो आणि या पक्ष्याची मान हि १८० अंशांनी फिरू शकते.
तसेच शरीर हे त्यांच्या पंखांनी झाकलेले असते. घुबड या पक्ष्याची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता हि इतर पक्ष्यांच्या पेक्षा जास्त असते आणि हा पक्षी दिवसभर विश्रांती घेतो आणि रात्री सक्रीय असतो म्हणजेच हा पक्षी आपला शिकार हा रात्रीच करतो. घुबड या पक्ष्याला पिंगळा या नावाने ओळखले जाते त्याचबरोबर त्याला हिंदी मध्ये उल्लू म्हणून ओळखले जाते.
घुबड पक्षी माहिती मराठी – Owl Information in Marathi
नाव | घुबड किंवा पिंगळा |
इंग्रजी नाव | owl |
हिंदी नाव | उल्लू |
प्रजाती | २१६ |
कुटुंब | स्ट्रीगिडे |
घुबड पक्ष्याची माहिती – information about owl in marathi
घुबड हा एक लहान आकाराचा पक्षी आहे आणि या पक्ष्याला इतर पक्ष्यांच्यापेक्षा पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता जास्त असते आणि हे पक्षी रात्रीचे सक्रीय असतात म्हणजेच हे पक्षी रात्री आपले अनेक शोधतात आणि हे साप, सरडे, कीटक, बेडूक, उंदीर आणि लहान पक्षी या सारखा शिकार करून आपले पोट भरत असतात.
घुबड हा स्ट्रीगिडे कुटुंबातील असून घुबडांच्या एकूण २१६ प्रजाती आहेत आणि या पक्ष्याचा आकार, रंग, शरीर रचना हि त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. या पक्ष्यांच्या गटाला किंवा समूहाला संसद म्हणून ओळखले जाते. परंतु या पक्ष्याला समूहामध्ये किंवा गटामध्ये राहण्यास आवडत नाही तर ते एकटे राहणे पसंत करतात. ते स्वताचे घरटे स्वता बांधत नाहीत तर आणि ते क्वचितच स्वताचे घरटे बांधतात. सामान्यता सर्व घुबडांना सरळ मुद्रा आणि समोरचे डोळे असतात जे मानवांच्यासारखी दृष्टी देतात आणि यांना लांब अंतरावरून शिकार पाहण्यास मदत होते.
घुबड पक्ष्याचा आहार – food
घुबड हा पक्षी दिवसभर विश्रांती घेतो आणि रात्री आपले अन्न शोधतो आणि या पक्ष्याचा आहार हा साप, बेडूक, कीटक, सरडे, लहान पक्षी, छोटे सस्तन प्राणी आणि उदीर या प्राण्याचा शिकार करतो आणि आपले पोट भरतो आणि हा पक्षी मांसाहारी पक्षी आहे.
घुबड या पक्ष्याचे वर्तन – behavior
घुबड हा पक्षी वेगवेगळ्या आवाजांच्या विस्तृत श्रेणी काढू शकतात जसे कि ओरडणे, शिट्टी घालणे , गुरगुरणे आणि खडखडाट करणे या सारखे आवाज करतात. घरटे बांधण्याच्या काळामध्ये ते अनेकदा आवाज करतात आणि हा आवाज खूप दूर पर्यंत जाऊ शकतो. मादी घुबडांचा आवाज हा नर घुबडांच्या आवाजापेक्षा मोठा असतो.
त्याबरोबर बहुतेक घुबडांच्या प्रजातीमध्ये मादी घुबड ह्या नर घुबडांच्या प्रजातीपेक्षा मोठ्या, जड वजनाच्या आणि अधिक आक्रमक असतात. घुबडांच्या सर्वच प्रजाती ह्या निशाचर नसतात म्हणजेच घुबडांच्या काही प्रजाती ह्या दिवसा देखील सक्रीय असू शकतात. हे पक्षी त्यांच्या प्रजनन काळामध्ये १४ ते १५ अंडी घालू शकतात.
घुबड पक्ष्यांचा राहण्याचे ठिकाण – habitat
बहुतेक घुबड हे स्तलांतरित होत नाही पण त्यांचे राहण्याचे ठिकाण हे अन्न पुरवठा, अंधार आणि चांगले निवासस्थान यावर अवलंबून असते आणि या पक्ष्यांची राहण्याची ठिकाण हि त्यांच्या प्रजाती नुसार बदलत असतात जसे कि बर्फाच्छदित घुबडे हि बर्फाच्या प्रदेशमध्ये राहतात. घुबड हा पक्षी स्वताचे घरटे कधीच बनवत नाही तर तो दुसऱ्या पक्ष्यांनी सोडलेल्या घरट्यामध्ये राहतात आणि क्वचीताचे ते स्वताचे घरटे स्वता बनवतात. घुबड हा पक्षी जंगले, पर्वत, वाळवंट आणि इतर कोणत्याही ठिकाणी आढळू शकतात.
घुबड या प्राण्याविषयी काही महत्वाची आणि मनोरंजक तथ्ये – facts
- घुबड हे फार प्राचीन काळापासून सांस्कृतिक चिन्ह आहे आणि हे इजिप्शियन चित्रलिपी, फ्रान्समधील गुहेतील चित्रामध्ये आणि माया कलामध्ये आढळले आहे.
- घुबड हा पक्षी रात्रीच्या वेळी जास्त सक्रीय असतो म्हणजेच हा पक्षी दिवसा विश्रांती घेतो आणि रात्रभर आपले शिकार शोधण्यास वेळ घालवतो.
- घुबड हा पक्षी आपले डोके हे ३६० अंश फिरवू शकतात असा समाज आहे आणि हे त्यांची मान दोन्ही बाजूंनी १३५ अंश वळवू शकतात.
- घुबडांचे पाय हे त्यांच्या पंखांच्याखाली लपलेले असतात.
- घुबड या पक्ष्याबद्दल आपल्या सामाज्यामध्ये एक नकारात्मक भावना आहे ती म्हणजे घुबड हा पक्षी भूतांचे प्रतिक आहे आणि घुबडाला भूतांचे वाहन म्हणून देखील ओळखले जाते.
- घुबड हा पक्षी मांसाहारी प्राणी आहे म्हणजेच हा पक्षी साप, सरडे, बेडूक, कीटक, लहान सस्तन प्राणी आणि लहान पक्षी या सारख्या जीवांचा शिकार करतात.
- घुबडांच्या एकूण २१६ प्रजाती आहेत आणि या पक्ष्याचा आकार, रंग, शरीर रचना हि त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते.
- मादी घुबड हे नर घुबडापेक्षा आकाराने मोठे असते त्याच बरोबर मादी घुबडाचा आवाज देखील नर घुबडा पेक्षा मोठा असतो.
- घुबडाच्या एकूण २१६ वेगवेगळ्या प्रजाती आहेत.
आम्ही दिलेल्या owl information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर घुबड पक्षी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about owl in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि ghubad information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट