कुरकुरीत कांदा भजी रेसिपी Kanda Bhaji Recipe in Marathi

Kanda Bhaji Recipe in Marathi कुरकुरीत कांदा भजी रेसिपी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पारंपारिक पदार्थ आज देखील खूप आवडीने आणि प्रेमाने बनवले जातात त्यामधील एक स्वादिष्ट आणि भारतातील बहुतेक माणसांना आवडणारा पदार्थ म्हणजे कांदा भजी. कांदा भजी हा असा पदार्थ आहे जो आपण स्नॅक्स, नाश्ता किंवा जेवणामध्ये देखील बनवू शकतो आणि हा पदार्थ आपल्या घरातील लोक तिन्हीही वेळी आवडीने खातात. कांदा भजी हे डाळीचे पीठ, रवा, कांदा, तिखट – मीठ, ओवा, कोथिंबीर या मिश्रणापासून बनवले जाते या सर्व साहित्याचे मिश्रण पाणी लावून ओले केले जाते आणि ते तेल गरम करून पीठाचे भजी तेलामध्ये सोडून ते लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि ते चांगले तळले कि तेलामधून बाहेर काढून घ्यावे लागतात.

कांदा भजी हा पदार्थ जदेशभरामध्ये खाल्ला जात असला तरी या पदार्थाला महाराष्ट्रामध्ये विशेष महत्व आहे. कांदा भजी ही डिश घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि घरामध्ये उपलब्ध ( मोजक्या साहित्यामध्ये ) असलेल्या साहित्यामध्ये बनू शकते. आज या लेखामध्ये आपण खमंग आणि कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते पाहणारा आहोत.

kanda bhaji recipe in marathi
kanda bhaji recipe in marathi

कुरकुरीत कांदा भजी रेसिपी – Kanda Bhaji Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारे साहित्य१५ मिनिटे
टाळण्यासाठी लागणारे साहित्य१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

कांदा भजी म्हणजे काय ?

कांदा भजी हा असा पदार्थ आहे जो आपण स्नॅक्स, नाश्ता किंवा जेवणामध्ये देखील बनवू शकतो. कांदा भजी हे डाळीचे पीठ, रवा, कांदा, तिखट – मीठ, ओवा, कोथिंबीर या मिश्रणापासून बनवले जाते या सर्व साहित्याचे मिश्रण पाणी लावून ओले केले जाते आणि ते तेल गरम करून पीठाचे भजी तेलामध्ये सोडून ते लालसर रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि ते चांगले तळले कि तेलामधून बाहेर काढून घ्यावे लागतात.

कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • कांदा : कांदा हा कांदा भजी बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे कारण कांदा उभा चिरून तो स्वच्छ धुवून तो सुट्टा करून त्यामधील सर्व पाणी काढून त्याला मीठ लावून ५ ते १० ठेवले जाते आणि त्याला पाणी सुटले कि मावेल तेवढे पीठ घातले जाते.
  • डाळीचे पीठ : कांदा भजी बनवण्यासाठी कांदा जसा महत्वाचा आहे तसेच डाळीचे पीठ देखील महत्वाचे आहे कारण यामुळे मिश्रणाला घट्ट पणा येतो आणि भजी चांगले बनतात.
  • तिखट आणि मीठ : तिखट आणि मीठ हे कोणत्याही रेसिपी मधील महत्वाचा घटक आहे कारण तिखट आणि मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही.

कांदा भजी कशी करायची – how to make kanda bhaji recipe in marathi

कांदा भाजी हा पदार्थ सर्वांना आवडणारा आणि भारतीय स्वयंपाक घरामध्ये वारंवार बनवला जाणारा एक अगदी चविष्ट पदार्थ आहे. कांदा भजी हा असा पदार्थ आहे जो आपण स्नॅक्स, नाश्ता किंवा जेवणामध्ये देखील बनवू शकतो. आणि म्हणूनच आता आपण कांदा भाजी रेसिपी कशी बनवायची आणि हि रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारे साहित्य१५ मिनिटे
टाळण्यासाठी लागणारे साहित्य१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kanda bhaji recipe 

  • ३ वाटी उभा चिरलेला कांदा.
  • १ वाटी डाळीचे पीठ.
  • २ ते ३ चमचे रवा.
  • १ ते २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा ओवा.
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • १/४ चमचा खायचा सोडा.
  • २ चमचे लिंबू रस.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( तळण्यासाठी ).

कांदा भजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kanda bhaji recipe 

  • सर्वप्रथम चिरून २ वाटी होईल इतके कांदे घ्या आणि बारीक उभे चिरून घ्या आणि ते एका भाड्यात घालून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यामधील पाणी काढून घ्या. ( टीप : भाडे थोडे मोठे असावे कारण त्यामध्ये आपण इतर साहित्य देखील मिक्स करायचे असते आणि मोठे भांडे असले कि सर्व मिश्रण चांगले एकत्र करता येते ).
  • चिरलेला कांदा धुतल्यानंतर सुट्टा होतो त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि आणि ते मिक्स करून कांदा १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • तोपर्यंत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  • आता मीठ लावून ठेवलेले कांद्याचे भांडे घ्या, त्या कांद्याला पाणी सुटले असेल आता डाळीचे पीठ घ्या आणि त्या कांद्यामध्ये मावेल तेवढे पीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या. मावेल तेवढे पीठ घालूनही जर कांदा थोडा सुट्टा वाटत असेल तर त्यामध्ये अनखील थोडे पीठ घाला.
  • आता त्यामध्ये रवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, रस, लाल तिखट, हळद, ओवा आणि थोडे मीठ घालावे लागत असेल तर ते सर्व घालून ते चांगले एकत्र करून आणि थोडे पाणी लावून मिश्रण एकत्र करून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
  • आता त्या पिठामध्ये सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा.
  • आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
  • कुरकुरीत कांदा भाजी खाण्यासाठी तयार झाले.

कांदा भजी कश्यासोबत खातात – serving suggestion

कांदा भजी जर तुम्ही स्नॅक्स म्हणून खात असाल तर या पदार्थाची मजा संध्याकाळच्या चहा सोबत घेतली तरी चालते. तसेच तुम्ही जर भजी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार असाल तर शिरा आणि भजी यांचे कॉम्बिनेशन नाश्त्यामध्ये खाण्यासाठी छान लागते. तसेच जर तुम्ही भजी जेवणामध्ये बनवले असतील तर ते पुरी किंवा चपाती सोबत खूप छान लागत किंवा भजी आपण तसेच खाल्ले तरी चालतील. 

टिप्स ( Tips ) 

  • जर तुम्हाला खूप तिखट खायला आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर यापैकी कोणतेतरी एक साहित्य नाही घातले तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार हिरवी किंवा लाल तिखट घातले तरी चालतील.
  • भजी मध्यम आचेवरच तळा ते मोठ्या आचेवर तळले तर जास्त काळपट होतील आणि ते आतून चांगले तळले जाणार नाहीत.
  • भजीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये थोडीशी चवीसाठी साखर देखील घातली तरी चालेले.

आम्ही दिलेल्या kanda bhaji recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुरकुरीत कांदा भजी रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gol kanda bhaji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kanda bhaji in marathi recipe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kanda bhaji maharashtrian style Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!