panchavati nashik history in marathi नाशिक पंचवटी मंदिर, आज आपण या लेखामध्ये नाशिक शहरातील पंचवटी या विषयी माहिती आणि याचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. पंचवटी हे नाशिक शहरामध्ये आहे आणि हे गोदावरी नदीच्या परिसरामध्ये डाव्याबाजूला आहे आणि हे प्रभू श्री रामांच्या संबधित ठीकानापैकी एक आहे आणि हे श्री रामांच्या भक्तांच्यासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पंचवटी बद्दल असे मानले जाते कि प्रभू श्री राम आणि सीता हे वर्षासाठी याच ठिकाणी वास्तव्यासाठी होते आणि हा काळ त्यांचा वनवासाचा काळ होता. संपूर्ण पंचवटी परिसरामध्ये सुमारे ५ कि.मी वर पाच वटवृक्ष आहेत आणि हे प्राचीन वटवृक्ष हे आजही या परिसरामध्ये आहेत.
पंचवटी म्हणजे या ठिकाणी पंच म्हणजेच पाच आणि वटी म्हणजे वादाचे झाडे आहेत आणि म्हणून या परिसराला पंचवटी म्हणून ओळखले जाते. या परिसरामध्ये सीता गुहा आणि पेशवे यांनी बांधलेले काळाराम हे मंदिरे आहे तसेच पंचवटी च्या परिसरामध्ये अनेक मंदिरे आहेत जसे कि काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, काट्यामारुती मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, राजकुंड, भद्रकाली मंदिर, दुतोंड्या मारुती मंदिर आणि मुरलीधर मंदिर अशी अनेक मंदिरे पंचवटी परिसरामध्ये आहेत.
पंचवटी हे भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्रा पैकी एक आहे आणि या ठिकाणी अनेक मंदिरे असल्यामुळे याला भारतातील पश्चिमेकडील कशी म्हणून ओळखले जाते. चला तर आता आपण पंचवटी विषयी आणखीन माहिती खाली जाणून घेवूया.
नाशिक पंचवटी मंदिर – Panchavati Nashik History in Marathi
ठिकाणाचे नाव | पंचवटी |
शहराचे नाव | नाशिक (पंचवटी हे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी आहे). |
ओळख | प्रभू श्री राम आणि सीता यांनी १४ वर्ष याच ठिकाणी वास्तव्य केले होते आणि तो त्यांचा वनवासाचा काळ होता. |
मुख्य आकर्षण | सीता गुहा आणि काळाराम मंदिर |
Nashik Panchavati Information in Marathi
पंचवटी मधील मुख्य मंदिरे
पंचवटी हे प्रभू श्री राम आणि सीता यांनी १४ वर्ष याच ठिकाणी वास्तव्य केले होते आणि तो त्यांचा वनवासाचा काळ होता आणि या ठिकाणी सीता गुहा आणि काळाराम मंदिर हि पवित्र ठिकाणे आहेत तसेच या ठिकाणी गोराराम मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, काट्यामारुती मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, राजकुंड, भद्रकाली मंदिर, दुतोंड्या मारुती मंदिर आणि मुरलीधर मंदिर अशी अनेक मंदिरे या परीसरामध्ये आहेत.
पंचवटी इतिहास – history of panchavati nashik
जेव्हा प्रभि श्री राम आणि सीता मा यांनी राम यांची प्रिय सावत्र माता कैकयीने तिची दासी मंथरा हिच्या सांगण्यावरून श्री रामांना अयोध्या सोडून जाण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी आणि सीता म यांनी अयोध्या सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी प्रभू श्री रामानाचे भाऊ लक्ष्मण सुध्दा अयोध्या सोडण्यास तयार झाले आणि त्यांनी १४ वर्ष वनवासासाठी अयोध्या सोडली.
आणि त्यांनी पंचवटी या परिसरामध्ये आपले घर बांधले म्हणजेच त्या ठिकाणी पाच झाडे आणि गोदावरी नदी आहे या ठिकाणी १४ वास्तव्य केले आणि म्हणून पंचवटीला देखील खूप महत्व आहे कारण त्या ठिकाणी १४ वर्ष श्री रामांनी वास केला होता आणि तसेच त्या ठिकाणी एक सीता गुहा देखील आहे ज्या मध्ये सीता मा ध्यान साधना करत होत्या. अशा प्रकारे पंचवटीचा इतिहास आहे.
सीता गुहा
सीता गुहा याला एक मंदिर म्हणून ओळखले जाते आणि हि गुहा प्राचीन गुहा आहे. हि गुहा तशी फार मोठी नाही परंतु हि उर्जा अध्यात्मिक उर्जेने परिपूर्ण भरलेली आहे. असे म्हटले जाते वनवासाच्या काळामध्ये सीता मा या गुहेमध्ये तपश्चर्या करत होत्या त्यामुळे या ठिकाणी एक वेगळीच अध्यात्मिक उर्जा आहे. या गुहेच्या आत मध्ये जाण्यासाठी २० मिनिटे लगतात.
सीता गुहेच्या आता काय आहे ?
सीता गुहा अध्यात्मिक उर्जेणी भरलेली आहे आणि या गुहेमध्ये जाताना वाकून जावे लागते आणि या गुहेची उंची २.५ ते ३ फुट इतकी आहे.
- गुहेमध्ये दोन लहान जागा आहेत किंवा खोल्या आहेत आणि पहिल्या मध्ये राम लक्ष्मण यांची मूर्ती आहे आणि दुसर्यामध्ये सीता म यांची मूर्ती आहे.
- या परिसरामध्ये छायाचित्रन करण्यास मनाई आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपले कॅमेरे देखील बंद करावे लागतात.
- गुहेमाधीक शिवलिंग देखील आहे.
पंचवटी परिसरातील प्रमुख आकर्षणे – attractions of panchavati
काळाराम मंदिर
पेशवेकालीन सरदार ओढेकर याने १७९० मध्ये हे मंदिर बांधले आहे आणि हे मंदिर ७० फुट उंचीचे आहे आणि या मंदिरामध्ये काळ्या पाषाणामध्ये श्री राम, सीता आणि श्री रामाचे भाऊ लक्ष्मण यांची मूर्ती आहे.
गोदावरी नदीचा किनारा : गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अनेक मंदिरे आहेत तसेच हे ठिकाण कुंभमेळ्यासाठी देखील खूप प्रसिध्द आहे त्यामुळे त्या ठिकाणाचे दृश्य बघण्यासारखे असते.
सीता गुहा : सीता गुहा हे पंचवटी परिसरातील मुख्य ठिकाण आहे आणि सीता गुहेमध्ये सीता मा ध्यान करत बसत होत्या.
रामकुंड : पंचवटी परिसरामध्ये रामकुंड आहे ज्यावेळी श्री राम आणि सीता या परिसरामध्ये वास्तव्यासाठी होते त्यावेळी याच कुंडामध्ये स्नान करत होते आणि ते आज देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते.
इतर ठिकाणे : गोराराम मंदिर, बालाजी मंदिर, विठ्ठल मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, काट्यामारुती मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, राजकुंड, भद्रकाली मंदिर, दुतोंड्या मारुती मंदिर आणि मुरलीधर मंदिर.
आम्ही दिलेल्या Panchavati Nashik History in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नाशिक पंचवटी मंदिर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nashik panchavati information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट