Pani Puri Recipe in Marathi पाणी पुरी रेसिपी मराठी पाणी पुरी हा पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ला जाणारा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे आणि पाणीपुरीला भारतीय स्ट्रीट फूडचा राजा म्हणून ओळखले जाते. यामध्ये छोट्या छोट्या तळलेल्या कुरकुरीत पुऱ्यांचा माडला भाग तोडला जातो आणि त्यामध्ये वाफवलेले मुग किंवा पांढरा वाटणा घातला जातो. त्याचबरोबर त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, तिखट पाणी पुरी चटणी आणि चिंचेची गोड चटणी घालून ते सर्व्ह केले जाते. पाणी पुरे हे एक चाट स्नॅक आहे जे खूप लोकांचे प्रिय आहे. पाणी पुरी या पदार्थाची विशेषता म्हणजे याला तिखट, गोड आणि आंबट चव देखील असते आणि या तिन्ही चवीमुळे पाणी पुरी तोंडात टाकताच एक वेगळेच भाव आपल्या चेहऱ्यावर येतात.
पाणी पुरी हि रेसिपी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये बनते त्यामुळे हि रेसीपी आपण स्नॅक म्हणून खाऊ शकतो, किंवा छोट्याश्या पार्टी साठी किंवा मित्रांच्या साठी देखील हा पदार्थ आपण बनवू शकतो. चला तर आज आपण या लेखामध्ये पाणी पुरी रेसिपी कशी बनवायची.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
पाणीपुरी म्हणजे काय ?
पाणीपुरीमध्ये गोलाकार किंवा छोट्या बॉलच्या आकाराची पोकळ पुरी वापरली जाते आणि ती तिखट पाण्याच्या मिश्रणाने भरलेली (हिरवी चटणी आणि लाल किंवा चिंच चटणी) असते, तसेच मिरची पावडर, चाट मसाला, बटाटा, कांदा आणि चणे पुरीमध्ये घालून ती सर्व्ह केली जाते.
राज्य किंवा शहर किंवा देश | पाणी पुरी नाव |
दिल्ली, हरियाना, पंजाब आणि पाकीस्थान | गोल गप्पा |
महाराष्ट्र आणि कर्नाटक | पाणी पुरी |
पश्चिम बंगाल आणि बांगला देश | पुचका |
मध्य प्रदेश | पानी पताशी |
उत्तर प्रदेश | पानी के बताशे |
पाणी पुरी बद्दल सांगितली जाणारी पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार असे म्हंटले जाते कि महाभारतात द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला होता. पांडव भाऊ, द्रौपदी आणि त्यांची आई कुंती फासे खेळण्यात आपले राज्य गमावून वनवासात असताना कुंतीने द्रौपदीला आव्हान दिले. तिने तिला थोडी उरलेली बटाट्याची भाजी आणि थोडेसे कणिक दिले आणि पाचही भाऊ तो पदार्थ खाऊन तृप्त होतील असे काहीतरी बनवण्याची आज्ञा दिली.
तेव्हा ते आव्हान द्रौपदीने स्वीकारले आणि तिने उरलेल्या भाजीपासून आणि कानिकेपासून एक पदार्थ बनवला जो पाणी पुरी सारखा होता आणि म्हणूनच म्हंटले जाते कि पाणी पुरीचा शोध द्रौपदीने लावला. त्यावेळी कुंतीने आपल्या सुनेच्या कुशलतेने प्रभावित होऊन या पदार्थाला अमरत्वाचा आशीर्वाद दिला.
पाणी पुरी म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी येते आणि पाणी पुरी हि अनेकांची आवडती डिश आहे. पाणी पुरी हा भारतातील आवडता स्ट्रीट फुड आहे आणि हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. आता आपण घरच्या घरी पाणी पुरी कशी बनवायची आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
पाणी पुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी थोडी जास्ती आहे पण हे सर्व साहित्य घालून जर आपण पाणी पुरी बनवली तर पाणी पुरी खूप उत्तम आणि स्वादिष्ट होते आणि आपण वापरलेल्या साहित्याचे चांगले मोल मिळते. पाणी पुरी बनवण्यासाठी लागणारे सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते काही साहित्य आपल्याला बाजारामधून देखील आणावे लागते त्यासाठी पाणी पुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खाली दिलेली आहे.
- १ वाटी रवा.
- ३ चमचे मैदा
- १/४ चमचा बेकिंग सोडा.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- अर्धी वाटी चिंच कोळ.
- २ वाटी पाणी.
- ३ हिरवी मिरची.
- २ चमचे भाजलेले जिरे किंवा जीरा पावडर.
- २ चमचे गुळ.
- १/२ वाटी पुदिन्याची पाने.
- १/२ वाटी कोथिंबीर पान.
- १ चमचा बुंदी.
- १/२ मोठा चमचा लिंबू रस.
- मीठ ( चवीनुसार ).
पुरीमध्ये भरण्यासाठी लागणारे साहित्य
- हिरवी चटणी
- लाल चिंचेची चटणी
- २ उकडलेले बटाटे
- १/२ वाटी उकडलेले छोटे चणे किंवा मुग ( आवडीनुसार )
- मीठ ( चवीनुसार ).
- कांदा ( बारीक चिरलेला ).
- सर्व प्रथम ब्लेंडरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि हिरव्या मिरच्या आणि २ चमचा जिरे घालून त्याची बारीक पेस्ट बनवा.
- आता एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये हिरवी पेस्ट, चिंच कोळ, बुंदी, गुळ, लिंबू रस आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते चांगले एकत्र करून घ्या आणि गुळ विरघळूपर्यंत ढवळत रहा.
- मग ते चांगले एकत्र केल्यानंतर ते चांगले गाळून घ्या आणि ते २ ते ३ तास फ्रीजमध्ये ठेवा.
- सर्व प्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा, रवा, सोडा आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि त्यानंतर त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले घट्ट मळून घ्या.
- मग त्यावर झाकण घालून ते पीठ २५ ते ३० मिनिटे चांगले भिजू द्या.
- २५ ते ३० मिनिटाने ते पीठ परत चांगले मळून घ्या आणि त्याचे चपाती बनवण्यासाठी जेवढे आपण गोळे बनवतो त्या आकाराचे गोळे बनवा आणि ते कोरडा मैदा वापरून चपातीच्या आकारा एवढी लाटून घ्या.
- आणि मग पाणी पुरीच्या आकाराच्या पुऱ्या छोट्या वाटीने किंवा टोपनाणे पाडून घ्या.
- आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करा आणि एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये पुऱ्या लालसर रंगावर टाळून घ्या.
कृती ३ : पाणी पुरीचे सर्व्हिग कसे करावे
- सर्वप्रथम एका बाऊल मध्ये बटाटे मॅश करा आणि त्यामध्ये मीठ घालून ते चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा.
- मग आपण तयार केलेल्या पुऱ्या घ्या आणि त्यांना एका बाजूने हलक्या हाताने छिद्र पाडा आणि मग त्यामध्ये खुस्करलेला बटाट, कांदा आणि उकडलेले चणे घाला मग त्यामध्ये हिरवी चटणी, चिंच चटणी आणि पाणी पुरीचे पाणी घाला आणि ते सर्व्ह करा.
टीप ( tips )
- पुऱ्या तळतेवेळी तेल चांगले गरम झालेले असावे त्यामुळे पुऱ्या चांगले तळल्या जातील आणि फुगतील.
- वाळलेल्या मटारचा रगडा पाणीपुरी मसाला म्हणून वापरला तरी चालतो.
- पाणी पुरी बनवण्याच्या अगोदर पाणी पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करा.
- तुम्ही उकडलेले चणे, मटार किंवा मुग यामधील कोणतेही एक पाणी पुरी स्टफिंगसाठी वापरू शकता.
आम्ही दिलेल्या pani puri recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पाणीपुरी बनवण्याची रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या panipuri recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pani puri kashi banvaychi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pani puri kashi banavtat Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट