पेटीयम मनी द्वारे गुंतवणूक करा Paytm Money Information in Marathi

Paytm Money Information in Marathi पेटीयम मनी विषयी माहिती भारतातील लोकांना भविष्य काळासाठी जमापुंजी जमवून ठेवण्याची खूप सवय असते आणि म्हणून ते आपले पैसे अनेक प्रकारे गुंतवणूक करून ठेवतात आणि हे पैसे गुंतवणूक करण्यासाठी बँका वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग उपलब्द करून देतात. त्याचप्रकारे आपल्या सर्वांच्यामध्ये लोकप्रिय असणारे पेमेंट (पेटीयम) कंपनीने लोकांना ऑनलाईन मार्गाद्वारे गुंतवणूक करण्यासाठी एक ॲप उपलब्द करून दिल ते म्हणजे पेटीयम मनी (paytm money) ज्यामुळे लोकांना थोडे थोडे पैसे जमा करून म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणूक करणे सोपे होऊ लागले.

पेटीयम मनी (paytm money) हे ॲप ऑनलाईन मार्गाद्वारे गुंतवणूक करू पाहणाऱ्या ग्रहांकांच्यासाठी ४ सप्टेंबर पासून सुरु झाले आहे. पेटीयम मनी या ॲपद्वारे गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा शुल्क अकरावा लागत नाही तर फक्त आपल्याला ॲप डाऊनलोड कराव लागत आणि हे पेटीयम मनी (paytm money) हे अँड्रॉइड (android) किंवा आयओएस (ios) या दोन्ही सिस्टम वर चालू शकते.

पेटीयम मनी (paytm money) हि एक डिस्काउंट ब्रोकिंग फर्म आहे आहे ज्याची सुरुवात २० सप्टेंबर २०१७ मध्ये बेंगळूरू या ठिकाणी झाली आणि या फर्मचे मुख्यालय हे बेंगळूरू मधेच आहे तसेच हि फर्म आरबीआय कडून मान्यता मिळालेली एक भारतीय ई कॉमर्स पेमेंट सिस्टम आहे.

paytm money information in marathi
paytm money information in marathi

पेटीयम मनी द्वारे गुंतवणूक करा – Paytm Money Information in Marathi

सुरुवात२० सप्टेंबर
मुख्यालयबेंगलोर
वर्णनपेटीयम मनी (paytm money) हे एक ऑनलाईन मार्गाद्वारे गुंतवणूक करण्यासाठी उपलब्द करून दिलेले ॲप आहे ज्यामुळे म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणूक करणे सोपे होते.
दरदिवसीय नोंदणी मर्यादा२५००
गुंतवणुकीसाठी उपलब्द कंपन्यापेटीयम मनी (paytm money) ॲपवर एकूण २५ कंपन्या उपलब्द असतात.
दरदिवसीय व्यवहार मर्यादा१०००००० पर्यंत

पेटीयम मनी म्हणजे काय ?

paytm money meaning in marathi जरी पेटीयम मनी हे सर्वप्रथम थेट म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यासपीठ म्हणून सुरू झाले असले तरी सध्या पेटीयम मनी (paytm money) हा एक securities and exchange board of india (SEBI) या मार्फत नोंदणीकृत असलेले एक स्टॉक ब्रोकर आणि ग्राहकांना गुंतवणुकीसाठी योग्य तो सल्ला देणारे एक फर्म आहे जी ॲपद्वारे काम करते.

कंपनीकडे central depository services limited (CDSL) चे डिपॉझिटरी सहभागी सदस्यत्व आहे तसेच हि कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे सदस्य देखील आहे.

paytm money information in marathi
paytm money information in marathi

पेटीयम मनी ॲप चा मुख्य उद्देश काय 

कोणतीही गोष्ट सुरु करण्यामागे काही ना काही महत्वाचा हेतू असतोच तसेच पेटीयम मनी  ॲप सुरु करण्यापाठीमाडे देखील एक उद्देश आहे कि भारतातील गुंतवणूक करू इच्छिनाऱ्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात म्युच्युयल फंडामध्ये पेटीयम मनी ॲपद्वारे गुंतवणूक करावी आणि पुढील चार वर्षामध्ये या गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची संख्या दुप्पट व्हावी.

पेटीयम मनी बद्दल माहिती 

पेटीयम मनी (paytm money) हे एक ऑनलाईन मार्गाद्वारे गुंतवणूक करण्यासाठी उपलब्द करून दिलेले ॲप आहे ज्यामुळे म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणूक करणे सोपे होते. २० सप्टेंबर पासून या ॲपची सुरुवात म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या ग्राहकांच्यासाठी झाली आणि या ॲपची दरदिवसाची ग्राहकांची नोंदणी करण्याची मर्यादा २५०० इतकी आहे.

पेटीयम मनी (paytm money) मध्ये गुंतवणूक दारांना ज्या कंपन्या असेट मॅनेजमेंट करतात अश्या प्रकारच्या जवळ जवळ पंचवीस कंपन्यांचा अॅक्सेस मिळू शकेल ज्यामध्ये गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करू इच्छितात आणि जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी कोणती कंपनी निवडावी हे जर समजत नसेल तर मॉर्निंग स्टार किंवा वॅल्यु सर्च या सारख्या एजन्सी मदतीसाठी उपलब्द असतात.

आपण या एजन्सीज ची मदत घेवून योग्य कंपनी निवडू शकतो. जसे आपण वरती पाहिलं कि पेटीयम मनी (paytm money) मध्ये रोज २५०० ग्राहक आपली नोंदणी करू शकतात आणि त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना केवायसी (know your customer) करावी लागते.

जसे कि या मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट यासारख्या सर्व गोष्टींचे व्हेरीफिकेशन करून घेतले जाते. या पेटीयम मनी (paytm money) ॲपद्वारे ग्राहक दिवसाला १०००००० पर्यंत व्यवहार करू शकतात.

पेटीयम मनी मध्ये खाते कसे उघडावे 

paytm money information in marathi
paytm money information in marathi
  • सर्वप्रथम येथे क्लिक करा.
  • जर तुमचे पेटीयम मध्ये जुने खाते असेल तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून प्रक्रिया पुढे चालू ठेवा आणि नसेल तर Sign Up वर क्लिक करून प्रक्रिया पुढे चालू ठेवा.
  • तुमचे आधार कार्ड, पण कार्ड, बँक खाते सर्व माहिती अचूक भरा आणि आणि account ओपन करून घ्या.
  • टीप: नमस्कार, मोठी बातमी!! १७ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत उघडलेली सर्व खाती १५० रु. पर्यंत भेट म्हणून विनामूल्य ईटीएफ मिळविण्यास पात्र असतील.

पेटीयम मनी मध्ये कोणकोणत्या प्रकारची गुंतवणूक करता येते 

  • म्युच्युअल फंड गुंतवणूक.
  • Initial Public Offering (IPO) गुंतवणूक.
  • पेन्शन योजना.
  • exchange traded fund (ETF) गुंतवणूक.
  • इक्विटी ट्रेडिंग.
  • डिजिटल गोल्ड.

पेटीएम मनीची प्रमुख वैशिष्ट्ये 

  • पेटीएम मनीकडून कोणताही देखभाल शुल्क आकाराला जात नाही म्हणजेच त्यांचा देखभाल शुल्क हा शून्य आहे.
  • ज्यावेळी ग्राहक mutual fund मध्ये गुंतवणूक करत असतात त्यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारचे कमिशन द्यावे लागत नाही.
  • प्रत्येक ट्रेडसाठी जास्तीत जास्त ब्रोकरेज आकारले जाते, कमी कमी १० रुपये.
  • ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल खाते उघडण्यास मदत होते.
  • यामध्ये खाते उघडण्यासाठी कोणताही शुल्क आकाराला जात नाही.
  • ग्राहक यामध्ये १०० रुपयापासून गुंतवणूक करू शकतो.
  • ब्रोकरेज न आकारता इक्विटी डिलिव्हरी होण्यास मदत होते.

पेटीएम मनी आणि ब्रोकरेज चार्जेस 

ऑर्डरसाठी आकाराला जाणारा शुल्क१० रुपये
इक्विटी डिलिव्हरीविनामूल्य (० रुपये शुल्क)
इक्विटी इंट्राडे१० रुपये किंवा ०.०५ टक्के
इक्विटी फ्युचरअंमलात आणलेल्या ऑर्डरसाठी १० रु आकाराला जातो.
नेट बँकिंगप्रत्येक निधी जोडण्यासाठी १० रुपये
फिजिकल स्टेटमेंट आणि दस्तऐवजप्रति विनंती ३०० रुपये आणि प्रति कुरिअर ३०० रुपये
वार्षिक प्लॅटफॉर्म शुल्कवार्षिक ३०० रुपये शुल्क आकारला जातो

पेटीयम मनी मधील प्रसिध्द असेट मॅनेजमेंट कंपन्या 

असेट मॅनेजमेंट कंपनीसर्वाधिक परतावा
एसबीआय म्युच्युयल फंड१६६.९३ टक्के
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युयल फंड६१.७८ टक्के
नीपॉन इंडिया म्युच्युयल फंड८४.४४ टक्के
आयसीआयसीआय पृडनशियल म्युच्युयल फंड५५.९९ टक्के
एचडीएफसी म्युच्युयल फंड४७.३ टक्के
कोटक महिंद्र म्युच्युयल फंड४१.५८ टक्के
अॅक्सीस म्युच्युयल फंड४१.८० टक्के
आयडीएफसी म्युच्युयल फंड६४.४५ टक्के
युटीआय म्युच्युयल फंड५८.४७ टक्के
मीराई असेट म्युच्युयल फंड५३.८५ टक्के
टाटा म्युच्युयल फंड३३.२३ टक्के
इंडेलवेईस म्युच्युयल फंड५८.६५ टक्के
इंवेस्को म्युच्युयल फंड५८.४२ टक्के
सुंदरम म्युच्युयल फंड४९.८७ टक्के
कॅनरा रोबेको म्युच्युयल फंड३७.९३ टक्के
मोतीलाल ओस्वाल म्युच्युयल फंड४२.२८ टक्के
बरोडा म्युच्युयल फंड५९.१० टक्के
युनियन म्युच्युयल फंड९२.४३ टक्के
क़्वांट म्युच्युयल फंड८८.३९ टक्के

पेटीयम मनीचे फायदे – Paytm Money Benefits in Marathi

paytm money information in marathi
paytm money information in marathi
  • जे ग्राहक पेटीयम मनी (paytm money) मधून म्युच्युयल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पेटीयम मनीचे या ॲपचे काही फायदे सांगितले आहेत.
  • यामध्ये सर्वात कमी ट्रेडिंग शुल्क आणि मोफत इक्विटी डिलिव्हरी ट्रेडिंग करता येते.
  • सहज रीतीने स्टॉक, डेरिव्हेटिव्ह, डिजिटल गोल्ड यामध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येते.
  • पेटीएम मनीची (paytm money) कडून कोणताही देखभाल शुल्क आकाराला जात नाही.
  • ऑनलाइन initial public offering (IPO) अर्ज करता येतो.
  • पेटीयम मनी (paytm money) मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार सेवा.

आम्ही दिलेल्या paytm money information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पेटीयम मनी द्वारे गुंतवणूक करा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of paytm money in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये paytm money meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पेटीयम मनी द्वारे गुंतवणूक करा Paytm Money Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!