Pizza Recipe in Marathi पिझ्झा रेसिपी मराठी पिझ्झा हा एक असा प्रकार आहे ज्याचे नाव ऐकताच ज्यांना हा पदार्थ आवडतो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो तसेच पिझ्झाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडामध्ये पाणी येते आणि त्यावेळी वाटते की पिझ्झा आपल्याला घरच्या घरी बनवता आला असता तर किती चांगले झाले असते. अश्या लोकांच्यासाठी आज या लेखामध्ये आज आपण पिझ्झा रेसिपी पाहणार आहोत. पिझ्झा हि एक सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्याला आवडणाऱ्या भाज्या आणि जास्त चीझ वापरून चीझी पिझ्झा आपण घराच्या घरी बनवू शकतो. फक्त काही महत्वाच्या टिप्स वापरून आपण रेस्टॉरंट सारखा पिझ्झा घरामध्ये बनवता येतो.

तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बेक करण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
वाढणी | एक पिझ्झामध्ये ८ भाग होतात |
पध्दत | सोपी |
पिझ्झा या पदार्थाचे नाव घेताच अनेक लोकांना असे वाटते कि आपल्याला घराच्या घरी पिझ्झा बनवता आला असता तर किती चांगले झाले असेत अश्या लोकांच्यासाठी खाली आम्ही पिझ्झा कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते याबद्दल माहिती घेणार आहोत.
- नक्की वाचा: पाणीपुरी रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बेक करण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
वाढणी | एक पिझ्झामध्ये ८ भाग होतात |
पध्दत | सोपी |
- १ पिझ्झा बेस ( घरगुती पध्दतीने बनवलेला किंवा बाजारामधून विकत आणलेला ).
- २ ते ३ चमचे टोमॅटो सॉस.
- १ वाटी चीज ( खिसलेले )
- ३ ते ४ चमचे शेझवान सॉस ( घरगुती पध्दतीने बनवलेला किंवा बाजारामधून विकत आणलेला )
- १ चमचा चिली फ्लेक्स.
- १ कांदा ( चिरलेला ).
- १ टोमॅटो ( चिरलेला ).
- २ हिरवी आणि पिवळी शिमला मिरची ( चिरलेली )
- १ मोठा चमचा मक्याचे दाने.
- १/२ चमचा काळी मिरी पावडर.
- मीठ ( चवीनुसार ).
- तुमचा ओव्हन २१५ c ला प्रीहीट करा आणि पिझ्झा ट्रे देखील ओव्हनमध्ये प्रीहीट करा.
- नंतर खाली दिलेल्या पिझ्झा बेस प्रक्रियेवरून पिझ्झा पीठ तयार करून घ्या.
- मग ते पिझ्झा पीठ घ्या आणि पिझ्झा पीठ सुमारे ९ ते ११ इंच वर्तुळात लाटून घ्या. ते खूप पातळ असू नये ते थोडे जाड पाहिजे. आपण ज्यावेळी पिझ्झा ओव्हन मध्ये बेक करतो त्यावेळी ओव्हनमध्ये सुमारे १/२ ते १/२ सेंटीमीटर जाडीपर्यंत फुगतो .
- ओव्हनमधून पिझ्झा ट्रे काढा आणि ट्रेवर तुमचा पिझ्झा बेस ठेवा.
- पिझ्झाच्या बेसवर ऑलिव्ह तेल किंवा साधे तेल ब्रश करा आणि नंतर शेझवान चटणी आणि टोमॅटो सॉस पिझ्झावर पसरवा नंतर अर्धी वाटी चीज पसरा मग त्यावर थोडीशी चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर टाका.
- आता पिझ्झावर सर्व भाज्या घाला जसे कि टोमॅटो, हिरव्या आणि पिवळ्या शिमला मिरची, कांदा. मक्याचे दाने आणि परत त्यावर थोडा शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस लावा.
- पुन्हा चीज घाला आणि नंतर थोडी काळी मिरी पावडर आणि मीठ टाका.
- पिझ्झा ओव्हनमध्ये ठेवा आणि १५ ते २० मिनिटे कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत बेक करा.
- तुमचा पिझ्झा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
- कप मैदा पीठ.
- १/२ कप गव्हाचे पीठ.
- चमचे मध.
- १/२ कप दूध.
- चमचे तेल.
- मीठ (चवीनुसार).
- पाणी (आवश्यकतेनुसार).
- एक मोठा बाऊल घ्या आणि त्यात पिझ्झाच्या पीठाचे सर्व साहित्य घाला (साहित्य: मैदा, गव्हाचे पीठ, मध, दूध, तेल, मीठ आणि पाणी ).
- टीप – पिझ्झा मिक्समध्ये आवश्यक तेवढे पाणी घाला
- नंतर पिझ्झाचे मिश्रण चांगले मळून घ्या.
- मऊ आणि लवचिक पीठ होईपर्यंत ५ ते ६ मिनिटे मळून घ्या
- नीट मळून घेतल्यानंतर भांड्याला हलके तेल लावा आणि पिझ्झा पीठ एका भांड्यात ठेवा आणि प्लास्टिकच्या आवरणाने बंद करा आणि ३० मिनिटे (किंवा आकार दुप्पट होईपर्यंत) बाजूला ठेवा.
शेझवान सॉस झटपट आणि घरी बनवायला सोपा आहे. खालीलप्रमाणे शेझवान सॉस बनवण्यासाठी साहित्य आणि सूचना दिलेल्या आहेत.
शेझवान सॉससाठी साहित्य
- ३० ते ३२ सुक्या लाल मिरच्या.
- ३ मोठे चमचा आले-लसूण पेस्ट.
- २ मोठा चमचा तेल किंवा तिळाचे तेल.
- १ वाटी चिरलेला कांदा.
- २ वाटी पाणी ( सॉससाठी १/२ वाटी आणि राहिलेले पाणी मिरची भिजवण्यासाठी ).
- १ चमचा सोया सॉस.
- १ मोठा चमचा लिंबाचा रस.
- १ चमचा काळी मिरी पावडर.
- २ चमचा टोमॅटो सॉस.
- १ मोठा चमचा साखर.
- मीठ (चवीनुसार).
- लाल मिरच्या कमीत कमी ३० मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.
- ३० मिनिटांनंतर ते मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट बनवा.
- नंतर कढई मध्यम आचेवर गरम करून तेल गरम झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे.
- कांदे घालून ते चांगले लालसर होईपर्यंत भाजा.
- नंतर मिरचीची पेस्ट, साखर आणि मीठ घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या आणि अर्धा वाटी पाणी घाला आणि मिक्स करा.
- आणि झाकण ठेवून शिजवा (तेल वेगळे होईपर्यंत शिजवा).
- नंतर त्यात सोया सॉस, लिंबाचा रस आणि टोमॅटो सॉस घालून मिक्स करा आणि आणखी २ मिनिटे शिजवा.
- होममेड शेझवान सॉस तयार आहे.
- ते पूर्णपणे थंड होईपर्यंत प्रतीक्षा करा आणि काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवा.
पिझ्झा कश्या सोबत खाल्ला जातो – serving suggestions
हे तुमच्या आवडत्या सॅलड, फिंगर चिप्स, भाजलेल्या ब्रोकोली किंवा मॅश केलेल्या बटाट्यांसोबत सर्व्ह करा. तसेच तुमच्या आवडत्या पेयांसह जसे कि कोक किंवा पेप्सी.
आम्ही दिलेल्या pizza recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पिझ्झा कसा बनवायचा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या domino’s pizza recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि homemade pizza recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pizza kasa banvaycha Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट