पोस्ट ऑफिस निबंध Post Office Essay in Marathi

Post Office Essay in Marathi – Visit to a post office essay in Marathi पोस्ट ऑफिस निबंध आज आपण या लेखामध्ये पोस्ट ऑफिस किंवा डाकघर या विषयावर निबंध लिहिणार आहोत. पूर्वीच्या काळी लोकांना संपर्क करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने नव्हते तसेच मोबईल नव्हता आणि म्हणून पूर्वीच्या काळी लोक पत्राद्वारे संपर्क करायचे किंवा काही संदेश पाठवायचा असल्यास पत्राद्वारे पाठवत होते आणि पत्र आपल्या घरी पोस्टमन काका घेवून येत होते पण हे पत्र कोणत्याही दुसऱ्या लांबच्या गावातून आले तर ते पोस्ट ऑफिस मध्ये यायचे आणि मग तेथून ते पत्र पोस्टमन काका आपल्या घरापर्यंत घेवून यायचे. पोस्ट ऑफिस किंवा डाकघर हे एक केंद्रीय संस्था आहे आहे.

जी लोकांनी दिलेले पत्र, मनी ऑर्डर, पोस्ट कार्ड हे संबधित पत्त्यावर पोहोचवण्यासाठी मदत करते तसेच पोस्ट ऑफिसचे इतकेच काम नाही कि ते पत्रे आणि पोस्ट कराड लोकांच्या पर्यंत पोहचवते तर हि केंद्रीय संस्था पेन्शन सेवा, बचत योजना, लॉकर सेवा या सारख्या अनेक सेवा पुरवण्याचे काम देखील करते. सध्या पोस्ट ऑफिस द्वारे पत्र व्यवहार करणे बहुतेक ठिकाणी बंध झाले आहे. कारण आताच्या आधुनिक जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची साधने आणि मोबाईल संपर्क करण्यासाठी वापरली जातात.

post office essay in marathi
post office essay in marathi

पोस्ट ऑफिस निबंध – Post Office Essay in Marathi

Essay on Post Office in Marathi

सध्या पोस्ट ऑफिस चा जास्तीत जास्त उपयोग हा पेन्शन सेवा, बचत योजना, लॉकर सेवा या सारख्या अनेक सेवा पुरवण्यासाठी केला जातो. पोस्ट ऑफस हे एक सरकारी कार्यालय आहे ज्याच्याद्वारे पूर्वीच्या काळामध्ये पत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जातात. पोस्ट ऑफिस हे सरकारी कार्यालय प्रत्येक शहरामध्ये तसेच प्रत्येक गावामध्ये आढळतात कारण बहुतेक होणारे पत्रव्यवहार हे गावातील पोस्टाद्वारे केले जातात आणि हे पत्रव्यवहार करण्यासाठी प्रत्येक गावाचे पोस्टमन देखील असायचे.

पूर्वीच्या काळी म्हणजेच आमच्या आजोबांच्या काळामध्ये किंवा आमचे बाबा देखील अनेक व्यवहार हे पत्राद्वारे करायचे तसेच कोणत्याही नातेवाईकांना जर पत्र पाठवायचे असल्यास पोस्टाद्वारे पत्रे पाठवली जायची. पूर्वी पत्रे हि पोस्ट ऑफिसच्या बाहेर असणाऱ्या लेटर बॉक्स मध्ये टाकली जायची मग ती पत्र पोस्टमन गोळा करून जी पत्र ज्या पत्त्यावर पाठवायची आहेत त्या पत्त्यावर पाठवत होते. आजकाल दळणवळणाच्या अनेक नवीन पद्धती निर्माण झाल्या असल्या तरी पोस्ट ऑफिस अजूनही खूप महत्त्वाचे आहे.

सुट्टीच्या दिवशी मित्राकडून पोस्टकार्ड किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे कार्ड मिळाल्यावर आपल्याला जो आनंद वाटतो त्याच्याशी  कोणत्याही मोबईल वरून केलेल्या संदेशाशी तुलना होऊ शकत नाही. भारतातील पोस्ट ऑफिस मुख्यालय हे देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली ( नवी दिल्ली ) या शहरामध्ये आहे आणि इंडिया पोस्ट हे भारतातील सर्व ठिकाणी असणारे पोस्ट ऑफिस चालवते आणि भारतामध्ये असणारी पोस्ट ऑफिस सेवा हि जगातील सर्वात मोठी पोस्टल प्रणाली आहे.

भारतामधील पोस्ट ऑफिस सेवा हि जगातील सर्वोत्कृष्ट पोस्ट प्रणाली असण्याचे कारण भारतामध्ये पूर्वीच्या काळी अनेक प्रकारचे पत्र व्यवहार हे पोस्टाद्वारे केले जातात तसेच आजही पोस्ट ऑफिस द्वारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी सेवा राबवल्या जातात.

जरी सध्या आपल्याला ह्या आधुनिक जगामध्ये आपल्याला कोठूनही आपल्या प्रिय व्यक्तीला, नातेवाईकांना किंवा काही कामाचे बोलणे असेल तर ते लगेच शक्य होते परंतु पूर्वीच्या काळी असे नव्हते तर लोकांना संदेश पाठवण्यासाठी पत्र पाठवली जायची.

भारतीय पोस्टल सेवा किंवा भारतीय डाकघर सेवा हि १.५५ लाख टपाल कार्यालयांच्या सोबत जगातील सर्वात मोठी टपाल व्यवस्था. अशा म्हणून ओळखली जाते कारण हि भरतील तापल सेवा हि एक प्रभावी सेवा आहे. तापल सेवा हि आपल्या देशामध्ये खूप पूर्वीच्या काळी सुरु झाली ज्यावेळी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवणे महत्वाचे वाटू लागले.

भारतीय पोस्टल सेवेची किंवा डाकघर सेवेची स्थापना हि १६८ वर्षांपूर्वी म्हणजेच १  एप्रिल १८५४ रोजी झाली आणि येथूनच पोस्टाचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर तत्कालीन भारतीय व्हाईसरॉय लॉर्ड डलहौसी यांनी या सेवेचे केंद्रीकरण केले आणि त्यावेळी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत ७०१ टपाल कार्यालयांचे विलीनीकरण करून भारतीय टपाल विभागाची स्थापना केली गेली. पण त्या अगोदर लॉर्ड क्लाइव्हने १७६६ मध्ये आपल्या स्तरावर भारतात टपाल व्यवस्था सुरू केली होती.

यानंतर, बंगालचे गव्हर्नर, वॉरन हेस्टिंग्स यांनी १७७४ मध्ये कोलकाता येथे मुख्य पोस्ट ऑफिस बांधले होते. ब्रिटिशांनी त्यांच्या सामरिक आणि व्यावसायिक हितासाठी ही सेवा सुरू केली होती. पण नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर पोस्ट ऑफिस कार्यालयाचा खूप उपयोग होऊ लागला तसेच पोस्टाद्वारे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार होऊ लागले त्यामुळे पोस्ट ऑफिस चे कामकाज हे मोठ्या प्रमाणात वाढले आणि भारतीय पोस्त ऑफिस सेवा हि जगातील सर्वात मोठी व्यवस्था बनली.

पोस्ट ऑफिस द्वारे सध्या अनेक सेवा राबवल्या जातात आणि त्यामधील मोठ्या प्रमाणात राबवली जाणारी योजना म्हणजे पोस्त ऑफिस बचत योजना आणि यामध्ये पोस्ट ऑफिस वेळ ठेव, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते ( हि योजना ५ वर्षासाठी असते ), किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आणि सुकन्या समृध्दी खाते हे काही बचत योजनेचे काही प्रकार आहेत.

तसेच पोस्ट ऑफिस द्वारे राबवल्या जाणाऱ्या अनेक स्कीम्स देखील आहेत. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेचा मुख्य हेतू हा लोकांना रोजच्या बचतीसाठी प्रवृत्त करणे म्हणजे त्यांना पैसे बचत करण्याची सवय लागेल. पोस्ट ऑफिस हे एक महत्वाचे ठिकाण आहे कारण हे पैसे पाठवण्याचे सर्वात स्वस्त आणि सामान्य माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण मनी ऑर्डर करू शकतो तसेच पोस्ट ऑफिस द्वारे बचत योजना चालवली जाते यामुळे लोकांना बचत करण्याची सवय लागते.

पोस्टल सेवांच्या उपलब्धतेमुळे अंतर्गत तसेच बाह्य व्यापाराची वाढ आणि विस्तार सुलभ झाला आहे. या द्वारे व्यापारविषयक चौकशी केली जाते आणि पत्रव्यवहाराद्वारे व्यावसायिक सौदे अंतिम केले जातात. पोस्टल मेल सेवा संपर्काच्या इतर कोणत्याही साधनांपेक्षा तुलनेने खूपच कमी दरात उपलब्ध आहेत. अश्या प्रकारे पोस्ट ऑफिस हे आजच्या आधुनिक जगामध्ये देखील खूप लाभकारक आहे.

आम्ही दिलेल्या Post Office Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पोस्ट ऑफिस निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Visit to a post office essay in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay on Post Office in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!