pradhan mantri suraksha bima yojana information in marathi प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती आज आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या विषयावर माहिती घेणार आहोत म्हणजेच हि योजना काय आहे याचे लोकांना काय फायदे होतात तसेच हि योजना केंव्हा आणि कोणी सुरु केली अशा प्रकारची माहिती आपण पुढे लेखामध्ये घेणार आहोत. भारताचे केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी काही ना काही त्यांच्या फायद्यासाठी योजना राबवत असते आणि त्यामधील हि एक महत्वाची योजना म्हणजे प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरु केली आणि हि योजना अशा लोकांना मिळते ज्यांचा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा मग काही कारणास्तव त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आलेले असेल तर अशा व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ होतो.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) योजना हि केंद्र सरकारे सुरु केलेली योजना आहे आणि हि योजन २०१५ – २०१६ मध्ये सुरु झाली होती. ज्या व्यक्तींनी या योजनेची नोंदणी केली आहे त्यांना फक्त १२ रुपये प्रीमियम द्यायला लागतो आणि या योजनेतून ज्या व्यक्तीने विमा केला आहे अश्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचा कव्हर मिळतो जर एखाद्या व्यक्तीला कायमचे आले तर त्या व्यक्तीला या योजनेतून १ लाख कव्हर रक्कम मिळते. १८ ते ७० वय असणारे लोक या योजनेचा लाभ घेवू शकतात.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती – Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Information in Marathi
योजनेचा नाव | प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ( PMSBY ) |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
केंव्हा सुरु केली | २०१५ – २०१६ |
योजनेचा प्रीमियम | १२ रुपये |
लाभ | १ ते २ लाख |
वयोमर्यादा | १८ ते ७० वर्ष |
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) काय आहे ?
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) हि एक केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे जी अशा लोकांना मिळते ज्यांचा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा मग काही कारणास्तव त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आलेले असेल तर अश्या व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ होतो. या योजनेत अपघाती मृत्यू झाल्यानंतर २ लाखांची कव्हर रक्कम मिळते आणि अपंगत्व आल्यावर या योजनेतून १ लाख रुपये कव्हर रक्कम मिळते.
प्रधान मंत्री सुरक्षा योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ( PMSBY ) सुरक्षा योजना हि केंद्र सरकारने २०१५ -२०१६ मध्ये सुरु झाली आणि या योजनेचा लाभ अपघाती मृत्यू झाल्यास आणि कायमचे अपंगत्व आल्यानंतर दिला जातो.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी – how to apply online for PMSBY
प्रधान मंत्री सुरक्षा विमा सुरक्षा योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन नोंदणी करता येते आणि ह्या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते आता आपण खाली पाहूयात.
- प्रधान मंत्री सुरक्षा विमा सुरक्षा योजनेची निवड करण्यासाठी ग्राहक त्याचे पूर्वीपासून ज्या बँकेमध्ये खाते आहे. अशा बँकेमध्ये किंवा मग कोणत्याही विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो.
- अशा अनेक बँका आहेत ज्या ग्राहकांन इंटरनेट बँकिंगद्वारे नोंदणी करण्याची परवानगी देतात.
- परवानगी मिळाल्या नंतर ग्राहकाला इंटरनेट बँकिंग खात्यामध्ये लॉगीन करावे लागेल आणि इंटरनेट बँकिंग खात्यामध्ये लॉगीन केल्यानंतर त्यामध्ये या योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.
- आता ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे बँक आणि विमा कंपन्यांना टोल फ्री क्रमांकावर संदेश पाठवू शकतात.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी लॉगीन कसे करावे – how to login for PMSBY
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ऑनलाईन लॉगीन करताना प्रथम तुम्हाला तुमच्या इंटरनेट बँकिंग ला लॉग इन करावे लागते.
- इंटरनेट बँकिंग ला लॉग इन केल्यानंतर विमा विभागावर क्लिक करा.
- आता त्या पेज वरील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना निवडा.
- मग त्यानंतर ज्या खात्याद्वारे तुम्ही विमा प्रीमियम भरणार आहात ते खाते निवडा.
- सबमिट वर क्लिक करा.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्रता निकष – eiligibility for pradhan mantri suraksha bima yojana
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हि भारत सरकारने अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या लोकांच्यासाठी सुरु केली आहे यामध्ये अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला किंवा मग अपंग झालेल्या व्यक्तीला आर्थिक मदत दिली जाते पण ह्या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत त्यासाठी योजनेची नोंदणी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला यासाठी पात्र व्हावे लागते. चला तर खाली आपण या योजनेसाठी असणारे पात्रता निकष पाहूया.
- प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी नोंदणी करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
- या योजनेसाठी इच्छुक असणारा व्यक्ती हा १८ ते ७० या वयातील असावा.
- अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला किंवा मग अपंग झालेल्या व्यक्तीला आर्थिक मदत दिली जाते.
- ३१ मे या तारखेला ग्राहकाला प्रीमियम रक्कम देय करावी लागते.
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे – benefits of pradhan mantri suraksha bima yojana
सरकारने सुरु केलेल्या सर्व योजना ह्या लोकांच्या फायद्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणूनच सुरु केलेल्या असतात आणि हि देखील अशीच योजना आहे ज्यामुळे ग्राहकांना यापासून फायदा होतो.
- या योजनेमधी विमाधारकांना त्यांच्या इच्छेनुसार प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना सुरु ठेवता येते किंवा मग बंद करता येते.
- या योजनेची प्रक्रिया हि खूप सुरक्षित असते आणि सतत कव्हरेज देते.
- अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला किंवा मग अपंग झालेल्या व्यक्तीला आर्थिक लाभ मिळतो.
- आपल्याला या विम्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागत नाहीत आणि खूप कमी पैसे खर्च करून आपण अपघात विम्याचा लाभ घेवू शकतो.
- प्रीमियमची रक्कम हि लिंक केलेल्या बचत बँक खात्यातून स्वयं डेबिट केली जाते.
- हि योजना ग्राहकाला अनेक कर लाभ देते.
आम्ही दिलेल्या pradhan mantri suraksha bima yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pradhan mantri suraksha bima yojana in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट