pratiksha bagdi information in marathi प्रतीक्षा बागडी माहिती, कुस्ती हा महाराष्ट्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रसिध्द खेळांपैकी एक आहे. कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून म्हणजेच महाराज्यांच्या काळा पासून खेळला जाणारा खेळ आहे बहुतेक हा खेळ मुघलांचे राज्य होते तेव्हापासून आज तागायत हा खेळ महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खेळला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी हि एक कुस्ती स्पर्धा आहे, जी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कुस्ती स्पर्धा आहे आणि हि स्पर्धा १९६१ पासून सुरु झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फक्त पुरुष पैलवान सहभागी होत होते.
परंतु गेल्या काही काळामध्ये या स्पर्धेमध्ये स्त्रिया देखील सहभागी होत आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली, सध्या चर्चेत असलेली आणि महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू बनणारी प्रतीक्षा बागडी हिच्याविषयी आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत.
प्रतीक्षा हि सांगली जिल्ह्यातील एक पैलवान म्हणून ओळखली जाते आणि तिने कुस्तीच्या अनेक स्पर्धेमध्ये सहभाग घेवून अनेक पदके जिंकली आहेत तसेच तिचे वय हे खूप कमी असले तरी तिने खूप कमी वयामध्ये चांगली बाजी मारली आहे म्हणजेच तिने महाराष्ट्र केसरी जिंकून ती महाराष्ट्र केसरी जिंकणारी पहिली महिला बनली आहे आणि खाली आपण तिच्याविषयी आणखीन माहिती पाहणार आहोत.
प्रतीक्षा बागडी माहिती Pratiksha Bagdi Information in Marathi
नाव | प्रतीक्षा बागडी |
वडिलांचे नाव | रामदास |
वय | २१ वर्ष |
गाव | महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तुंग या गावातील आहे |
वजन | ७६ किलो |
ओळख | महाराष्ट्र केसरी जिंकणारी पहिली महिला कुस्तीपट्टू |
प्रतीक्षा बागडी हिच्याविषयी माहिती आणि ओळख
प्रतीक्षा बागडी हि एक कुस्तीगीर असून हि महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तुंग या गावातील आहे आणि तिचे संपूर्ण नाव प्रतीक्षा रामदास बागडी आहे आणि सध्या तिचे वय हे फक्त २१ वर्ष इतके आहे आणि तिचे वजन ७६ किलो इतके असून ती सध्या देखील कुस्तीचा सराव आणि प्रशिक्षण हे वसंत कुस्ती केंद्र जे सांगली मध्ये आहे.
या ठिकाणी घेत आहे आणि तिने २३ आणि २४ मार्च रोजी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यत आली होती.
त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि तिने अंतिम फेरीमध्ये कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा पराजय करून महाराष्ट्र केसरी जिंकणारी पहिली महिला हा मान आपल्या नावावर करून घेतला आहे आणि या विजयामुळे प्रतीक्षा बागडी हिची महाराष्ट्र राज्यामध्ये तर एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे परंतु महाराष्ट्र राज्याच्या काही सीमा भागामध्ये देखील तिला एक नवीन ओळख मिळाली आहे.
पहिली महिला महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यत आली होती आणि स्पर्धा मिरजमधील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये घेण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ४५० गुस्तीगीर सहभागी झाले होते आणि त्यामध्ये प्रतीक्षा बागडी देखील एक होती.
आणि तिने सध्या मिरज जिल्हा संकुल या ठिकाणी झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवून ती पहिला महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू बनली आणि तिच्या या विजयाचे कौतुक करण्यासाठी तिला चांदीची गदा देण्यात आली आणि हि गदा तिने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिचा पराभव करून मिळवली आहे.
प्रतीक्षा बागडी हिच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts
- प्रतीक्षा बागडी आणि तिची प्रतिस्पर्धी कल्याणाची वैष्णवी पाटील हि हरियाणा राज्यातील इसार मध्ये एका रूम मध्ये राहत होत्या आणि त्या ५ ते ६ महिने रूम पार्टनर होत्या म्हणजेच त्या दोघी एकमेकीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या दोघींना देखील खेळातील एकमेकींच्या सवयी विषयी चांगली माहिती होती.
- प्रतीक्षा बागडी हि ४ विरुध्द १० गुण बनवून महाराष्ट्र केसरी जिंकणारी पहिली महिला ठरली.
- सांगलीची पैलवान म्हणून प्रतीक्षा बागडी हिची ओळख आहे.
- तिने कुस्तीसाठी खूप लवकरच सराव सुरु केला होता आणि ती सध्या देखील वसंत कुस्ती केंद्रा, सांगली या ठिकाणी कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.
- प्रतीक्षा बागडीला महाराष्ट्र केसरी पहिला महिला हा खिताब मिळाल्यानंतर आणि तिला चांदीची गदा मिळाल्यानंतर ती चाडीची गदा घेऊन तिची हलगीच्या निनादात मैदानातून फेरी काढण्यात आली होती आणि तिच्या विजयाचा जल्लोष साजरा केला होता.
- या स्पर्धेमधील उपांत्य फेरीमध्ये प्रतीक्षा बागडीची लढत हि अमृता पुजारी हिच्याशी झाली होती जी कोल्हापूरची पैलवान आहे आणि प्रतीक्षा बगाडीने ९ विरुध्द दोन असे गुण बनवून अमृताचा पराभव केला आणि ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.
- प्रतीक्षा रामदास बागडी हि सांगलीच्या वसंत कुस्ती केंद्रामध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रतीक्षा बागडी हिला मिळालेली पदके आणि विजय
- प्रतीक्षा हिचा व्यवसाय हा कुस्ती असून तिने अनेक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि तिने या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.
- तिने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये चांदीचे ( रौप्य ) पदक पटकवले होते आणि त्याचबरोबर तिने खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून या स्पर्धेमध्ये देखील चांदीच्या ( रौप्य ) पदकाची कमाई केली होती.
- सध्या २३ ते २४ मार्च २०२३ मध्ये मिरज जिल्हा संकुलामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तिने महिला विभागामध्ये सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये तिने अंतिम फेरीमध्ये वैष्णवी पाटीलला हरवून तिने महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान आपल्या नावावर बनवून घेतला आणि तिला या साठी चांदीची गदा देखील देण्यात आली आहे.
आम्ही दिलेल्या pratiksha bagdi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर प्रतीक्षा बागडी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pratiksha bagdi story in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pratiksha bagdi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट