प्रिंटर ची माहिती मराठी Printer Information in Marathi

printer information in marathi प्रिंटर ची माहिती मराठी, सध्याच्या आधुनिक जगामध्ये वेगवेगळे नवीन शोध लागले आणि त्यामुळे मानवाचे काम खूप सोपे आणि सुलभ बनले. तसेच संगणकाचा शोध इ.स १८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी लावला आणि आणि संगणकाच्या शोधामुळे अनेक कामे सोपी झाली जसे कि मोठ्या प्रमाणात माहिती साठवणे, दुसऱ्यांना साठवलेली माहिती पाठवणे, डेटा प्रोसेसिंग कार्ये, नागरिकांच्या डेटाबेसची देखभाल करणे आणि पेपरलेस वातावरणाचा प्रचार करणे हे संगणकामुळे शक्य झाले.

आपण संगणकामध्ये साठवलेली माहिती जर एखाद्या व्यक्तीला हार्ड कॉपीच्या स्वरुपात किंवा कागद स्वरुपात प्रिंट करायची असेल तर प्रिंटर देखील संगणकाशी जोडलेले असते.

आणि प्रिंटर मार्फत माहिती किंवा चित्रे कागदावर हस्तांतरित करते. आज आपण या लेखामध्ये प्रिंटर कसे काम करते तसेच प्रिंटरचे कोणकोणते प्रकार आहे या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

printer information in marathi
printer information in marathi

प्रिंटर ची माहिती मराठी – Printer Information in Marathi

प्रिंटर विषयी महत्वाची माहिती – information about printer in marathi

प्रिंटर हे एक असे उपकरण आहे जे संगणकाशी जोडलेले असते आणि संगणकाकडून मिळालेला मजकूर, माहिती आणि ग्राफिक आऊटपुट स्वीकारते आणि मग ते एका रिकाम्या कागदावर हस्तांतरित करण्यास मदत करते ज्या कागदाला आपण प्रिंट म्हणून ओळखतो. प्रिंटर हे असे उपकरण आहे.

जे त्याला पाठवलेली कोणत्याही प्रकारची माहिती मुद्रित करू शकतात मग ती प्रतिमा, संख्या किंवा माहिती असो. कागदावर मुद्रित केलेली माहित, प्रतिमा किंवा संख्या हि कोणत्या दर्ज्याची असते हे प्रिंटरच्या प्रकारावर अवलंबून असते.

प्रिंटरचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, लाईन प्रिंटर, लेझर प्रिंटर, इंकजेट प्रिंटर आणि इतर अनेक प्रिंटर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंटरमध्ये अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. रंगीत प्रिंटर हे माहिती, प्रतिमा आणि सख्या रंगीत मुद्रित करण्यास सक्षम असतात. प्रिंटर हा संगणकाशी जोडलेला असतो आणि हा संगणकाशी जोडण्यासाठी वाय फाय (Wi-Fi) किंवा युएसबी (USB) चा वापर केला जातो.

प्रिंटर म्हणजे काय – printer meaning in marathi

प्रिंटर हे एक असे उपकरण आहे जे संगणकाशी जोडलेले असते आणि संगणकाकडून मिळालेला मजकूर, माहिती आणि ग्राफिक आऊटपुट स्वीकारते आणि मग ते एका रिकाम्या कागदावर हस्तांतरित करण्यास मदत करते ज्या कागदाला आपण प्रिंट म्हणून ओळखतो.

प्रिंटरची वैशिष्ठ्ये – features 

  • प्रिंटर हा संगणकाकडून माहिती, प्रतिमा आणि संख्या स्वीकारतो आणि मग त्याचे एका रिकाम्या कागदावर हस्तांतरित करण्यास मदत करते.
  • प्रिंटर हा चांगल्या प्रकारे आणि वेगवान माहिती कागदावर प्रिंट करू शकतो.
  • प्रिंटरची चांगली मेमरी हा देखील महत्वाचा भाग आहे कारण चांगली आणि पुरेशी मेमरी हि चांगली गती आणि चांगली कामगिरी करण्यास सक्षम असते.
  • रंगीत प्रिंटर हे काळ्या तसेच रंगीत माहिती, प्रतिमा आणि सख्या मुद्रित करू शकतात त्यामुळे रंगीत प्रिंटरच्या किमत्ती जास्त असतात.

प्रिंटरचे प्रकार – different types of printers

प्रिंटर हे संगणकामधील माहित कागदावर मुद्रित करण्यासाठी मदत करतात आणि मुद्रित होणाऱ्या माहितीचा वेग आणि गुणवत्ता हि प्रिंटरच्या प्रकारावर अवलंबून असते. चला तर आता आपण प्रिंटर चे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया.

प्रिंटरचे मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर आणि खाली आपण या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

इम्पॅक्ट प्रिंटर – impact printer information in marathi 

इम्पॅक्ट प्रिंटर हे मुद्रित प्रतिमा किंवा ग्राफिक्सशी विसंगत असतात आणि तसेच ते कार्य करत असताना इलेक्ट्रोमॅकॅनिकाल घटक वापरतात. या प्रकारच्या प्रिंटरचा खूप आवाज येतो आणि या प्रिंटरचा कार्य करण्याचा वेग हा  आधुनिक प्रिंटरच्या तुलनेने खूप हळू असतो त्यामुळे हे प्रिंटर सध्या अप्रचलित आहेत.  

डेझी व्हील प्रिंटर 

डेझी व्हील हा एक इम्पॅक्ट प्रकारातील प्रिंटर आहे आणि याचा उपयोग मुखत्वे करू टाईप रायटर मधील गुणवत्ता आणि वैशिष्ठ्ये पप्राप्त करण्यासाठी केला जातो. विशेषता या प्रकारच्या प्रिंटर मध्ये चाकासारखी एक डिस्क असते ज्यामध्ये प्रिंट हेड समाविष्ट असतात आणि याच्या टोकांना मोल्ड मेटल कॅरक्टर असते आणि या प्रिंटरची मांडणी किंवा रचना हि डेझी पाकळ्यांच्यासारखी दिसते. हे प्रिंटर ग्राफिक्स किंवा प्रतिमेशी सुसंगत नाहीत आणि या प्रिंटरचा मुद्रित करण्याचा वेग हा साधारणपणे २५ ते ५५ प्रती सेकंद असतो.

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर – dot matrix printer information in marathi

डॉट मॅट्रिक्स प्रिंटरला पिन प्रिंटर या नावाने देखील ओळखले जाते आणि हा सर्वात प्रसिध्द इम्पॅक्ट प्रिंटर आहे. या प्रिंटर मध्ये अक्षरे किंवा ग्राफिक्स तयार करण्यासाठी त्यांच्या प्रिंट हेड वर पिनचा मॅट्रिक्स असतो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमध्ये सामान्यता प्रिंट हेड मध्ये ९ ते २४ पिन असतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर मध्ये जितके अधिक पिन असतात तितकी जलद पप्रिंट आणि मुद्रण गुणवत्ता देखील चांगली असते डॉट मॅट्रिक्स प्रिंटर चा मुद्रण करण्याचा वेग १०० ते ६०० वर्ण प्रती सेकंद असतो.

नॉन इम्पॅक्ट प्रिंटर – non impact printer information in marathi

नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये लेसर, झेरोग्रफिक, इंकजेट किंवा केमिकल यासारख्या वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर एकाच वेळी पूर्ण मजकूर, प्रतिमा आणि सख्या प्रिंट तयार करण्यासाठी सक्षम यंत्रणा वापरतात त्यामुळे नॉन इम्पॅक्ट प्रिंटरला पेज प्रिंटर म्हणून देखील ओळखले जाते.

लेझर प्रिंटर – laser printer information in marathi

लेझर प्रिंटर हे नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचा प्रकार आहेत म्हणजेच हे प्रतिमा, संख्या, मजकूर मुद्रित करण्यासाठी लेसर किंवा नॉन इम्पॅक्ट तंत्रज्ञान वापरले जाते. लेझर प्रिंटर अत्यंत उच्च रेझोल्युशन प्रिंट मुद्रित करू शकतात. या उपकरणाची क्षमता आणि मेमरी उपलब्धतेनुसार ३०० डीपीआय ते १२०० डीपीआय पर्यंत बदलू शकते. ज्या प्रिंटरचा डीपीआय जास्त असतो त्या प्रिंटरची मुद्रण गुणवत्ता चांगला असतो.

इंकजेट प्रिंटर – colour printer information in marathi

इंकजेट हे नॉन इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये मोडतात आणि हे घरगुती वापरकर्ते आणि लहान व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हे प्रिंटर नोझल किंवा जेट मदतीने प्रिंट तयार करतात. इंकजेट प्रिंटर हे काडतुसे मध्ये शाईची साठवण करतात  आणि या प्रिंटरच्या मदतीने कलर प्रिंट देखील तयार करतात येते. रंगीत प्रिंट काढण्यासाठी वैयक्तिक काडतुसे प्रिंटर मध्ये एकत्र केली जातात जे वेगवेगळे रंग संग्रहित करू शकतात.

आम्ही दिलेल्या printer information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रिंटर ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या printer  meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!