चार्ल्स बॅबेज मराठी माहिती Charles Babbage Biography in Marathi

Charles Babbage Biography in Marathi – Charles Babbage information in marathi चार्ल्स बॅबेज मराठी माहिती आजचे युग हे संगणक युग आहे. संगणकाने संपूर्ण जग व्यापल आहे. संगणकाचा वापर जगातील कानाकोपरऱ्या मध्ये केला जातो. संगणकाने मानवी जीवन अधिक सुखद बनवल आहे आणि याचं संपूर्ण श्रेय चार्ल्स बॅबेज यांना जातं. कारण चार्ल्स बॅबेज संगणकाचे जनक आहेत. संपूर्ण विश्वाला संगणकाची कल्पना चार्ल्स बॅबेज यांनी दिली. चारलेस बॅबेज यांनी पहिला संगणक बनवला. संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला आहे. आजच्या लेखामध्ये आपण चार्ल्स बॅबेज यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

charles babbage biography in marathi
charles babbage biography in marathi

चार्ल्स बॅबेज मराठी माहिती – Charles Babbage Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)चारलेस बॅबेज
जन्म (Birthday)२६ डिसेंबर १७९१
जन्म गाव (Birth Place)लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)संगणकाचे जनक
मृत्यू (Death)१८ ऑक्टोंबर १८७१

Charles Babbage Information in Marathi

जन्म

चार्ल्स बॅबेज यांचा जन्म १७ व्या शतकातील आहे. २६ डिसेंबर १७९१ मध्ये लंडन, इंग्लंड येथे चार्ल्स बॅबेज यांचा जन्म झाला. चार्ल्स यांचे वडील बेंजामिन बॅबेज बँकेत कर्मचारी होते. तर त्यांच्या आईचे नाव बेट्सी होतं. चार्ल्स यांना तीन भावंडं होती. त्यातली दोन लहानपणीच वारली. चार्ल्स हे हुशार विद्यार्थी होते त्यांना गणिताची भरपूर आवड होती. इतकंच नव्हे तर त्यांनी बीजगणिताचा अभ्यास कोणत्याही शिक्षका विना केला होता. चार्ल्स बॅबेज उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून होते आणि त्यांनी आपलं प्रारंभिक शिक्षण घरीच शिक्षक बोलावून पूर्ण केलं.

सन १८१० मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये चार्ल्स यांनी दाखला नोंदवला. चार्ल्स बॅबेज यांना गणिताची प्रचंड आवड होती. या विद्यापीठांमध्ये त्यांनी समकालीन गणिताचा अभ्यास केला आणि रॉबट बोर्ड हाऊस, जोसेफ लुईस लैंग्रेंज आणि मेरी ऍग्रेसी यांचे वाचन केले ज्यामुळे केंब्रिज येथे उपलब्ध गणिताचे मर्यादित शिक्षण त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते.

सन १८१२ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी आपल्या मित्रपरिवारास सोबत अनालीटिकल सोसायटी ची स्थापना केली. सन १८१२ मध्ये त्यांना पीटर हाऊस केंब्रिज येथे पाठवण्यात आलं. आणि तिथूनच त्यांनी आपली बॅचलर ची पदवी सन १८१४ पर्यंत पूर्ण केली. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अनेक पदांवर नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु बऱ्याच ठिकाणाहून अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत.

संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज

“फादर ऑफ कम्प्युटर” उर्फ “संगणकाचे जनक” म्हणून ओळख असणारे चार्ल्स बॅबेज हे गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि यांत्रिक अभियंता होते. चार्ल्स यांना पहिलं संगणकाचा शोध लावल्याबद्दल आणि आधुनिक स्वयंचलित संगणकांना आधारभूत असलेली तत्त्वे विकसित करण्याचे श्रेय दिलं जातं.‌ चार्ल्स बॅबेज यांनी सर जॉन हर्शेल व जॉर्ज पीकॉक यांच्यासह अनालीतिकल सोसायटीची स्थापना केली.

युरोपात होणाऱ्या गणिता संबंधीच्या प्रगतीचा इंग्लंडमधील गणितज्ञांना परिचय व्हावा आणि कलन शास्त्रात रूढ असलेल्या न्यूटन यांच्या संकेतन पद्धती पेक्षा जी डब्ल्यू लायपिनटस् या जर्मन गणितज्ञांची अधिक सुलभ पद्धत वापरली जावी या उद्देशातून या सोसायटीची स्थापना करण्यात आली. सन १८१५ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये संभाषण दिलं होतं.

या भाषणांमध्ये चार्ल्स बॅबेज यांनी सखोल विज्ञानाबद्दल लोकांना माहिती दिली होती. सन १८२० मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची स्थापना केली. ज्योतिषशास्त्रीय गणना सुलभ करणे हा त्या सोसायटीचा मुख्य उद्देश होता. पुढे चार्ल्स बॅबेज यांनी गणितीय आणि खगोल शास्त्रीय शाळांची गणना करण्यासाठी एक इंजिन तयार केलं. त्याला त्यांनी डिफरन्स इंजिन असं नाव दिलं.

चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेलं हे इंजिनच पहिलं प्रोटोटाइप लंडन येथील सायन्स म्युझियम मध्ये आजही प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. चार्ल्स बॅबेज यांनी दिफ्फेरेन्शियल इंजिन नावाचा एक उपकरण सन १८२२ मध्ये तयार केलं. या यंत्राद्वारे गणितीय आकडेमोड केली जाऊ शकत होती व तसेच त्याचे प्रदर्शन देखील करता येत होते म्हणून या उपकरणाला असं नाव दिलं. यामध्ये एकूण २५ हजार धडे होते आणि त्याच वजन १३ हजार ६०० किलो होतं.

चार्ल्स बॅबेज हे काहीतरी आधुनिक गोष्टीचा शोध लावत आहेत याची सरकारला जाणीव होते आणि म्हणूनच सरकारने त्यांच्या डिवाइस मध्ये रस घेऊन त्यांच्या संशोधनासाठी आर्थिक सहाय्यता करण्याचं ठरवलं. त्यामुळे चार्ल्स बॅबेज यांना संपूर्ण मशीन तयार करण्यास प्रोत्साहन मिळालं. त्यासाठी देखील त्यांना दहा वर्ष वाट बघावी लागली होती. एखादी मशीन तयार करणे जेवढ सोप्प दिसतं तितकं सोप्पं असतं असं नव्हे आणि चार्ल्स बॅबेज यांच्या बाबतीतही तेच झालं.

इंजिनची चाके, ‌गिअर्स आणि क्रॅन्क्स ची निर्मिती करण्यासाठी इतर विविध मशीन व उपकरणांची कमतरता भासू लागली होती. म्हणून चार्ल्स बॅबेज आणि त्यांच्या कारागिरांनी ही उपकरणे स्वतः तयार करण्याचे ठरविले परंतु त्यासाठी आर्थिक अडचणी मध्ये आल्या. आणि त्यामुळे हा प्रकल्प काही पूर्ण झाला नाही. आणि अखेरीस तो बंदच करावा लागला. प्रत्यक्षात तयार करायला लागणाऱ्या या अभियांत्रिकी तंत्रात बरेच बदल घडवून आणणे गरजेचे होते आणि त्यासाठी चारलेस बॅबेज यांनी प्रचंड प्रयत्नदेखील केले.

परंतु इतक्या सहज चार्ल्स बॅबेज शांत बसणारऱ्यातले नव्हते त्यांना हे इंजिन कस तरी बनवायचं होतं म्हणून त्यांनी दुसरे इंजिन बनवायला सुरुवात केली. सन १८४७-१८४९ दरम्यान यांनी डिफरन्स इंजिन टू मशीन तयार केली. परंतु पुन्हा एकदा पैशांचा तुटवडा पडल्यामुळे हा प्रकल्प काही पूर्ण करता आला नाही. एक इंजिन बनवण्यासाठी त्यांना भरपूर वेळा अपयश आले. परंतु यातूनही त्यांनी हार न मानता अनालीतिकल इंजिन या इंजिनची निर्मिती केली.

हे इंजिन पंच कार्ड करू शकत होतो आणि पुढे हाच जगातील पहिला संगणक ठरला. हा संगणक जवळपास एका मोठ्या बंगला इतका मोठा होता.. मानवाच्या आयुष्यात संगणकाच असणारं महत्त्वाची नव्याने ओळख करून देण्याची काहीच गरज नाही. संगणक ही एक अशी यंत्रणा आहे जिच्या मदतीने आपण अशक्य नसलेली गोष्ट सुद्धा कमी वेळात पूर्ण करू शकतो.

संगणक आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करतो. संगणकाचा उपयोग हा शैक्षणिक, वैज्ञानिक, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रांमध्ये केला जातो. संगणकामुळे आपण अतिशय कमी वेळात व सोप्या पद्धतीने काम करतो. आज-काल ज्याला संगणक वापरता येत नाही त्याला नोकरी देखील मिळत नाही यावरून संगणकाचे महत्त्व समजतं. आज प्रत्येक घरामध्ये एक संगणक किंवा एक लॅपटॉप नक्कीच असतो.

ज्यावेळी चार्ल्स बॅबेज यांनी पहिला संगणक निर्माण केला त्यावेळी तो जवळपास तीन मजली इमारती इतका मोठा होता परंतु आज संगणकामध्ये बरीच प्रगती झाली आहे. संगणकामध्ये देखील अनेक क्रांती घडून आली आहे. आता नवीन लॅपटॉप, टॅबलेट तयार झाले आहेत आपण सहज आपल्या बागेमध्ये घालून कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि वापर करू शकतो. पूर्वी फक्त मोठ्या कंपनीमध्ये बघायला मिळणार संगणक आता प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतो.

चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेला संगणक फक्त गणिती आकडेमोडीसाठी वापरला जात होता. परंतु आज वापरला जाणारा संगणक आपण कुठेही कसाही आणि कोणत्याही कामासाठी वापरू शकतो. संगणकावरून आपण घरबसल्या विज बिल ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो‌. त्यासोबतच मोबाईलचा रिचार्ज करू शकतो. मनोरंजनासाठी गेम बघू शकतो तर संगणकावर आता सिनेमे देखील पाहणं अतिशय सोपं झालं आहे.

कोविड सारख्या महामारी च्या काळामध्ये घरातून बाहेर पडणं मुश्कील झालं होतं त्यामुळे ज्यांच्याकडे संगणक आहे अशा लोकांची तर मजाच झाली. घर बसल्या वर फ्रॉम होम घरातूनही आपण काम करू शकत होतो. संगणकाने प्रत्येक क्षेत्र व्यापले आहेत. संगणकाचा उपयोग अगदी वैद्यकीय क्षेत्रात देखील होतो. आधी संगणक फक्त गणिती आकडेमोडीसाठी वापरला जायचा परंतु आता वैद्यकीय क्षेत्रात देखील संगणकाचा वापर झपाट्याने वाढला आहे. उलट वैद्यकीय क्षेत्रासाठी संगणक एक योगदान ठरल आहे.

पूर्वी सर्व रुग्णांची माहिती कागदपत्रावर लिहिली जायची कधीकधी ती कागदपत्रे गहाळ व्हायची परंतु आता संगणकामुळे रुग्णांची माहिती संगणकावर नोंद करून ठेवता येते. जर चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाची कल्पना मांडलीच नसते जर संगणकाची निर्मिती झालीच नसती तर कदाचित आज मनुष्य इतकी प्रगती करत आहे ति प्रगती देखील झाली नसती. एकविसावं शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगणक आहे.

मृत्यू

१८ ऑक्टोंबर १८७१ रोजी चार्ल्स बॅबेज यांचे निधन झालं. लंडन येथे चार्ल्स बॅबेज यांचे निधन झालं. तंत्रज्ञानाचे महत्व आणि त्याचे फायदे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु त्याची सुरुवात करुन देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे चार्ल्स बॅबेज. त्यांनी संगणकाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. त्यांनी निर्माण केलेल्या संगणकामध्ये पुष्कळ सुधारणा बाकी होत्या आणि तो अपूर्ण होता. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये संगणकामध्ये क्रांती घडून आली. संगणका सारख्या आधुनिक यंत्रांची कल्पना जगाला देणारे चारलेस बॅबेज हे संगणकाचे जनक मानले जातात.

आम्ही दिलेल्या charles babbage biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चार्ल्स बॅबेज मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या charles babbage information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of charles babbage in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!