रॅगिंग वर निबंध मराठी Ragging Essay in Marathi

Ragging Essay in Marathi रॅगिंग वर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये रॅगिंग या विषयावर निबंध लिहिणार आहोत. रॅगिंग म्हणजे एकाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहचवणे आणि रॅगिंग म्हणजे दादागिरी आणि हा प्रकार जास्तीत जास्त कॉलेजे मध्ये किंवा हॉस्टेल मध्ये होते आणि सिनियर मुले हि ज्युनियर मुलांच्यावर दादागिरी करतात आणि त्यांना काही हि करायला लावतात जसे कि आपली कामे लावतात किंवा अनेक प्रकारे त्यांना त्रास देतात आणि त्यांना सतत मानसिक किंवा शारीरिक त्रास देतात. काही मुले हि धैर्यवान असतात ते न घाबरता त्यांचा सामना करतात पण काही मुले हि हि खूप भित्री असतात त्यामुळे ती रॅगिंग या प्रकाराला घाबरत असतात आणि ते त्याविरोधात लढा देत असतात.

आपण अनेक चित्रपटांच्या मध्ये पहिले आहे कि रॅगिंग म्हणजे काय असते आणि सर्वांना माहित असलेला चित्रपट म्हणजे थ्री इडियट्स आणि या चित्रपटामध्ये देखील सुरुवातीच्या भागामध्ये रॅगिंग दाखवले आहे ज्यामध्ये सिनियर मुले ज्युनियर मुलांना काहीपण करायला लावतात आणि जी घाबरत मुले असतात ती सिनियर मुले जे सांगतात ते करतात पण जी हुशार आणि न घाबरणारी मुले आहेत ती त्याचा सामना करून जे रॅगिंग करणारे आहेत त्यांना घाबरवतात आणि थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये असेच दाखवले आहे.

ragging essay in marathi
ragging essay in marathi

रॅगिंग वर निबंध मराठी – Ragging Essay in Marathi

Essay on Ragging in Marathi

रॅगिंग हे प्रत्येक कॉलेजमध्ये केले जाते आणि आणि सिनियर मुले तर ज्युनियर मुलांच्या वर रॅगिंग करतातच परंतु मुली देखील ज्युनियर मुलीन्च्यावर रॅगिंग करतात आणि अश्या प्रकारे कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार हा वाढत चालला आहे. आपण ज्यावेळी कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेतो त्यावेळी आपल्याकडून एक प्रतिज्ञा पत्र लिहीन घेतले जाते.

ज्यामध्ये लिहिले जाते कि मी रॅगिंग करणार नाही तसेच त्या मुलाच्या पालकांच्या कडून देखील प्रतिज्ञा पत्र लिहून घेतले जाते कि माझा मुलगा रॅगिंग करणार नाही पण हे सर्व फक्त एका कागदावर राहते आणि असे अनेक विद्यार्थी असतात जे प्रतिज्ञापत्र देवून देखील रॅगिंग करतात. रॅगिंग हे कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजमधील असणाऱ्या सिनियर मुले त्या विद्यार्थ्याचा वंश. रंग, भाषा, लिंग, ओळख आणि त्याच्या दिसण्यावरून त्या व्यक्तीला टॉर्चर केले जाते किंवा त्यांना त्रास दिला जातो म्हणजेच त्याची वरील विषयांच्यावरून छेडछाड काढली जाते.

रॅगिंग याचा उगम हा जगाच्या पश्चिमेकडील भागामध्ये जरी झाला पण आज हे भारतामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पसरले आहे आणि भारतातील काही कॉलेज मध्ये देखील रॅगिंग होते. रॅगिंग हे जरी आपल्याला काही गंभीर वाटत नसले तरी काही ठिकाणी यांचा प्रभाव हा खूप असतो म्हणजेच काही ठिकाणी मारामारी, गंभीर दुखापती आणि काही वेळा या प्रकारातून विद्यार्थ्यांचा मृत्यू देखील होतो.

रॅगिंग मध्ये काही वेळा चालणाऱ्या विद्यार्थ्यांचा चष्मा काढून घेतला जातो आणि त्यांची खिल्ली उडवली जाते, तसेच काही विद्यार्थ्यांची बॅग काढून घेतली जाते तसेच त्यांच्या वह्या किंवा पुसतके फाडली जातात, तसेच सिनियर मुले ज्युनियर मुलांना आपली वेगवेगळी कामे सांगतात जसे कि आपले बूट पॉलिश करण्यासाठी सांगतात किंवा त्यांची बॅग घेवून चालण्यासाठी सांगतात अश्या प्रकारे सिनियर मुलांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे रॅगिंग केले जाते.

विद्यालयामध्ये आणि वसतिगृहाच्या परिसरामध्ये रॅगिंग होणारा नाही याची खात्री करण्यासाठी सरकारने कठोर अँटी रॅगिंग उपाय योजना जाहीर केली त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी केली आणि जर एकाद्याने काही चुकीचे वर्तन केले तर त्याच्यार प्रतीबंधात्मक आणि कठोर शिक्षेची तरतूद देखील केली आहे.

सध्या रॅगिंग विरोधात असे नियम सुरु केले आहेत जसे कॅन्टीन, कॅम्पस मध्ये. मेसमध्ये, कॅफेटेरीयामध्ये, वस्तीगृहामध्ये, कॉलेजमध्ये, वर्गामध्ये किंवा क्रीडांगणामध्ये एकाद्या व्यक्तीने जर रॅगिंग केले तर त्या संबधित संस्थेद्वारे त्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जातो किंवा त्या संबधित व्यक्तीला निलंबित केले जाते.

जर इखाद्या व्यक्तीने वसतिगृहामध्ये रॅगिंग केले असेल तर त्या व्यक्तीला वस्तीगृहातून निष्काशित केले जाते. तसेच काही वेळा एकाद्या व्यक्तीने गंभीर काही केले असेल तर त्या व्यक्तीबद्दल पोलीस स्टेशन मध्ये एफआरआय दाखल केला जातो किंवा काही ठिकाणी संस्थेद्वारे सामुहिक शिक्षा केली जाते. देशाच्या कायद्यानुसार रॅगिंग करणे हा एक दखलपात्र गुन्हा आहे आहे आणि या गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे कि प्रतिबंधक म्हणून न्यायालयाने दिलेली शिक्षा हि कठोर असे म्हणजेच रॅगिंग केलेल्या व्यक्तीने दंड किंवा तुरुंगवास यासारख्या शिक्षा होऊ शकतात.

कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंग या प्रकाराला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत जसे कि कोणताही विद्यार्थी कॉलेज मध्ये प्रवेश घेत असताना त्याच्याकडून आणि त्यांच्या पालकांच्या कडून रॅगिंग करणार नाही असे प्रतिज्ञा पत्रक लिहून घेतले जाते. त्याचबरोबर कॉलेजमध्ये रॅगिंग होऊ नये म्हणून कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या अध्याक्षतेसाठी एक समिती स्थापन केलेली असते ज्या मध्ये पोलीस, प्राध्यापक आणि कर्मचारी असतात ज्या कमिटीला अँटी रॅगिंग कमिटी म्हणून ओळखले जाते.

तसेच वस्तीगृहा मध्ये देखील रॅगिंग होते त्यामुळे तेथे देखील अँटी रॅगिंग समिती असते आणि या वसतिगृहाच्या अँटी रॅगिंग समितीमध्ये वस्तीगृहामध्ये राहणारे वॉर्डन, कर्मचारी आणि काही विद्यार्थी देखील यामध्ये समाविष्ट असतात. या समितीचे कार्य म्हणजे वसतिगृहाच्या परिसरामध्ये, मेसमध्ये जागृकता ठेवणे आणि रॅगिंग विषयी समस्या सोडवणे किंवा त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे हे या समितीचे काम असते.

काही ठिकाणी अँटी रॅगिंग गस्त घातली जाते आणि हि गस्त कॅम्पस, वस्तीगृह आणि कॉलेजच्या परिसरात २४ तास गस्त घातली जाते. जर एकदा नवीन विद्यार्थी जर एकाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत असेल तर त्याला त्यांच्या पालकांनी रॅगिंग विषयी अनेक माहिती दिली पाहिजे तसेच कॉलेजमध्ये या प्रकारचे काही कृत्य करू नये कारण हा गुन्हा आहे हे सांगितले पाहिजे.

अश्या वेगवेगळ्या उपाययोजना करून रॅगिंग हा प्रकार थांबवला पाहिजे. रॅगिंग हा एक गुन्हा आहे आणि हा गुन्हा कोणत्याही विद्यार्थ्याने करू नये कारण यामुळे अनेक चांगल्या विद्यार्थ्यांना त्रास होतो तसेच जे रॅगिंग करणारे असतात त्यांच्या विषयी समाजामध्ये चुकीची समजूत निर्माण होते.

आम्ही दिलेल्या ragging essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रॅगिंग वर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ragging essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on ragging in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!