rajiv gandhi jeevandayee arogya yojana information in marathi राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना माहिती आज आपण आय लेखामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना या विषयावर माहिती घेणार आहोत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हि एक महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे ज्यामध्ये राज्यामध्ये जे लोक आर्थिकदृष्ट्या विकलांग आहेत म्हणजेच जे लोक गरीब आहेत. अशा लोकांच्यासाठी हि योजना काम करते. राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचे राहणीमान आणि जीवनमान सुधारण्यासाठी केशरी कार्ड धारकांना म्हणजेच जे लोक दारिद्र्य रेषे खालील आहेत.
अशा लोकांच्यासाठी हि योजना हा आणि या योजनेमध्ये दीड लाख पर्यंत विमा कव्हर दिला जातो आणि आरोग्य सेवेसाठी मदत केली जाते म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना त्यांच्या उपरांच्यासाठी, निदानासाठी आणि औषधांच्यासाठी सरकार कडून आर्थिक लाभ मिळतो. या योजनेसाठी विमाधारकाला ३३३ रुपये विमा भरावा लागतो आणि या विमा योजनेमध्ये एका व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला एकूण विमा कव्हरेज मिळू शकतो.
या योजनेद्वारे आपण छोटे मोठे उपचार करूच शकतो पण या योजनेद्वारे आपण मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया तसेच मोठ्या आजारांच्यावर देखील उपचार करू शकतो. तसेच या योजने अंतर्गत असणाऱ्या दवाखान्यामध्ये देखील दारिद्र्य रेषेखालील लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्य सेवा मिळू शकतात.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे जी २०१२ मध्ये राज्याच्या ८ जिल्ह्यामध्ये सुरु केली होती मग त्यानंतर हि योजना २०१३ मध्ये संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात आली. हि योजना सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून ओळखली जायची पण २०१७ मध्ये या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले असे नाव देण्यात आले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना माहिती – Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana Information in Marathi
योजनेचे नाव | राजीव गांधी जीवनदायी योजना ( RGJY ) किंवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ( RGJAY ) |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
केंव्हा सुरु केली | २०१२ मध्ये |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्रातील केशरी कार्ड धारकांना म्हणजेच जे लोक दारिद्र्य रेषे खालील लोकांना |
भरावा लागणारा प्रीमियम | ३३३ रुपये. |
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (RGJAY) म्हणजे काय ?
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हि एक महराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे ज्यामध्ये राज्यामध्ये जे लोक आर्थिकदृष्ट्या विकलांग आहेत म्हणजेच जे लोक गरीब आहेत अश्या लोकांच्यासाठी हि योजना काम करते म्हणजेच या योजने मार्फत लोकांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत केली जाते त्यामुळे ते आजारांवर चांगल्या प्रकारे उपचार घेतील.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ( RGJAY ) हि महाराष्ट्र सरकारने गरीब आणि विकलांग लोकांच्यासाठी आरोग्य सेवा घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून २०१२ मध्ये सुरु केली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून मिळणारे फायदे – Benefits of RGJAY
सरकार अनेक प्रकारच्या योजना ह्या गरिबांना तसेच असहाय्य लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ मिळावा आणि त्या लोकांचे जीवन हे सोयीचे आणि सुलभ व्हावे म्हणून अनेक प्रकारच्या योजना सुरु करते आणि हि एक त्यामधील योजना आहे जी दारिद्र्य रेषे खालील लोकांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत देते. चाल तर मग पाहूयात या योजनेचे काय काय फायदे आहेत ते.
- या योजनेमध्ये गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत करते.
- तसेच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला या योजनेच्या अंतर्गत असणारे रुग्णालय हे कॅशलेस सुविधा पुरवतात.
- एखाद्या पात्र व्यक्तीला या सेवेतून उपचार घेण्यासाठी दीड लाखापर्यंत आर्थिक सेवा दिली जाते त्याचबरोबर एकाद्या व्याकायीने किडनी प्रत्यारोपण केले असेल तर त्या व्यक्तीला अडीच लाख पर्यंत आर्थिक मदत मिळते.
- या योजनेमार्फत पात्र व्यक्ती निदाब, उपचार, प्रक्रिया, शस्त्रक्रिया आणि औषधे या सारख्या अनेक वैद्यकीय सोयी विनामूल्य घेवू शकतो.
- या योजनेमार्फत मोफत शिबिरही दिले जाते.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे पात्रता निकष – eiligibility
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित व्यक्तीला खाली दिलेल्या पात्रता निकषासाठी पात्र व्हावे लागते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे पात्रता निकष खाली दिले आहेत.
ग्राहकांच्यासाठी पात्रता निकष
- योजनेचा लाभार्थी हा महारष्ट्रातील नागरिक असला पाहिजे.
- लाभार्थी दारिद्रय रेषेखालील किंवा गरीब असेल तरच त्या व्यक्तीला आरोग्य सेवा आणि उपचार घेण्यासाठी आर्थिक लाभ मिळतो.
- योजनेच लाभ घेण्यासाठी संबधित व्यक्तीकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे गरजेचे असते.
दवाखान्यांच्यासाठी पात्रता निकष
- पुरुष आणि महिलांच्यासाठी स्वातंत्र्य जनरल वॉर्ड असावेत.
- दवाखान्यामध्ये पुरेसे कर्मचारी असावेत.
- तसेच अंतरासह किमान ४० ते ५० आंतररुग्ण बेड असावेत.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नोंदणी कशी करावी – how to apply for RGJAY
- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी नोंदणी करताना प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखाण्यामध्ये जाऊन तेथील आरोग्य मित्राला भेटले पाहिजे.
- तेथे गेल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला तेथे हेल्थ रेफरल कार्ड दिले जाईल हे अश्या दवाखान्यांना जोडलेले असेल ज्या दवाखान्यांच्या मध्ये या योजनेमार्फत वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
- मग त्या रेफरल कार्डसोबत त्या व्यक्तीला त्याचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडावे लागते आणि जर हि कार्ड नसल्या अन्न पूर्णा कार्ड जोडावे लागते.
- पडताळणीनंतर दवाखाण्यामध्ये उपचार सुरु करण्यासाठी भरती करून घेतले जाईल.
- विमा कंपनीकडून ई – ऑथरायझेशन विनंती पाठवली जाईल आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेद्वारे मग त्याची पुन्हा पडताळणी केली पाहिजे.
- विनंती मंजूर झाल्यानंतर उपचार सुरु होतील.
- आता ह्या विम्याच्या कव्हर मिळण्यासाठी दवाखाना बिले, कागदपत्रे विमा कंपनीला पाठवला जातो आणि मग त्या विमा कंपनी कडून परत कागदपत्रांची तपासणी होते आणि मग मंजुरी देऊन दवाखान्याला पैसे देते.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनसाठी लागणारी कागदपत्रे – documents
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- पॅन कार्ड.
- चालक परवाना.
- मतदान ओळखपत्र.
- अधिकृत अधिकाऱ्याने जारी केलेली इतर पुरावा.
- केशरी कार्ड.
आम्ही दिलेल्या rajiv gandhi jeevandayee arogya yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rajiv gandhi jeevandayee yojana information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of rajiv gandhi jeevandayee arogya yojana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट