Rasgulla Recipe in Marathi रसगुल्ला रेसिपी मराठी रसगुल्ला हा गोड पदार्थ असून हा पदार्थ भारतातील असून या पदार्थाला भारतातील बंगाली डिश म्हणून लोकप्रिय आहे. हा बंगाली पदार्थ ताज्या पनीरपासून बनवला जातो म्हणजेच पनीर चांगले फोडले जाते आणि त्यामध्ये थोडासा मैदा घातला जातो आणि ते चांगले मऊसर मळून घेवून त्याचे गोळे बनवून ते साखरेच्या पाण्यामध्ये शिजवले जातात. हा गोड आणि मऊ रसगुल्ला हे दुधापासून बनणारे एक मिष्ठान आहे जे पाककृती मधील लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. रसगुल्ला या रेसिपीला रोसोगोल्ला, रोशोगोल्ला किंवा रासबरी या नावांनी देखील म्हणतात आणि हे लोकप्रिय बंगाली मिष्टान्न दक्षिण आशियाई डायस्पोरामध्ये प्रिय आहे.
रसगुल्ला रेसिपी जरी बनवण्यास अवघड आणि बनवण्यासाठी खूप वेळ लागत असला तरी ती खाल्ल्यानंतरचे समाधान हे वेगळेच असते. आज या लेखामध्ये आपण रसगुल्ला रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची याबद्दल पाहणार आहोत.
रसगुल्ला रेसिपी मराठी – Rasgulla Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | ३० ते ४० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ५५ मिनिटे |
पाककला | बंगाली ( भारतीय ). |
बनवण्याचा प्रकार | सोपा |
रेसिपी प्रकार | गोड |
रसगुल्ला हि डिश कुठली आहे ?
रसगुल्ला किंवा स्थानिक बोलीभाषेत रोसोगोल्ला म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ मूळचे बंगाली मिष्टान्न आहे जे दक्षिण आशियाई डायस्पोरामध्ये प्रिय आहे आणि भारताच्या इतर भागामाद्गे देखील हे खूप लोकप्रिय आहे.
- नक्की वाचा: गुलाब जामून रेसिपी
रसगुल्ला हा पदार्थ बहुतेक सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे आणि हा पदार्थ आपण आनंदाच्या वेळी, सणांमध्ये, समारंभाच्या वेळी बनवतो. रसगुल्ला बनवताना ३ ते ४ स्टेप्स वापरल्या जातात त्या आपण घाली पाहूयात.
- घरगुती पनीर बनवणे.
- रसगुल्ल्याचे गोळे बनवणे.
- साखरेचा पाक तयार करणे.
- रसगुल्ला शिजवणे.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | ३० ते ४० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ५५ मिनिटे |
पाककला | बंगाली ( भारतीय ). |
बनवण्याचा प्रकार | सोपा |
रेसिपी प्रकार | गोड |
रसगुल्ला हि रेसिपी बनवण्यासाठी खुपच मोजके साहित्य लागते आणि ते अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. रसगुल्ला बनवण्यासाठी दुध , लिंबू रस आणि साखर हे मुख्य साहित्य लागते. चला तर मग रसगुल्ला रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- १ लिटर दुध ( ताजे आणि घट्ट ).
- दीड वाटी साखर.
- २ लिंबूचा रस.
- १ ते २ चमचे मैदा ( आवश्यकतेनुसार ).
- १/२ चमचा वेलची पावडर.
- सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि ते भांडे थोडे पाण्याने धुवून घ्या आणि दूध घातल्यावर गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यावर दूध गॅसवरून खाली उतरा आणि थोडे थंड होऊ द्या.
- हे दुध ८० ते ७० टक्के गार झाले कि त्यामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा म्हणजेच एक एक चमचा घाला आणि मिक्स करा,
- दूध चांगले वेगळे होईपर्यंत लिंबाचा रस घाला आणि मिक्स करत रहा, दूध चांगले फुटले की लिंबाचा रस घालणे थांबवा आणि घट्ट झालेल्या दुधातील पाणी गाळून घ्या.
- आता एक स्वच्छ पांढरे कापड घ्या आणि चाळणीवर कापड पसरून खाली एक भांडे ठेवा, फाटलेले दूध कापडावर ओता. फाटलेल्या दुधाचे पाणी खाली ठेवलेल्या भांड्यात येईल आणि पनीर / पनीर कपड्यातच राहील.
- आता त्यावर चेन्यावर थोडेसे पाणी ओता म्हणजे त्यामधील लिंबूच्या रसाचा चव देखील कमी होईल.
- मग तो पनीर कापडामध्ये बांधा आणि तो हाताने पिळा त्यामुळे चेण्यामध्ये असणारे पाणी निघून जाईल.
- पनीर एका प्लेटमध्ये काढा आणि हाताने आणि बोटांनी पनीर चांगला फोडून घ्या आणि मग आपल्या तळ हाताने पनीर चांगला एकत्र करा आणि त्याला एकदम मऊ आणि गुळगुळीत करा.
- पाणी इतके मऊ करा कि त्याचा गोळा केल्यानंतर त्याला कोठेही क्रॅक्स दिसू नयेत.
- आता त्यामध्ये थोडासा मैदा घाला आणि ते चांगले मिक्स करून मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला वरून थोडे प्रेस करा.
- मग एक भांड्यामध्ये २ वाटी पाणी, १/२ चमचा वेलची पावडर आणि १/२ वाटी साखर घाला आणि ते मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा. हे मिश्रण उकळले कि त्यामध्ये रसगुल्ले गोळे घालून ते अर्धा तास शिजवून घ्या ( टीप : भांड्यामध्ये जितके गोळे मावतात तितकेच गोळे शिजवून घ्या जास्त गोळे असतील तर २ ते ३ बॅच मध्ये शिजवून घ्या ).
- आता हे गोळे शिजेपर्यंत १ वाटी साखरेमध्ये २ वाटी पाणी घालून त्याचा पाक बनवून घ्या. त्यानंतर रसगुल्ल्याचे गोळे थोडे गार झाले कि त्यामधील पाणी थोडे पिळून ते पाकामध्ये टाका.
- बंगाली रसगुल्ला रेसिपी तयार झाली.
- नक्की वाचा: बालुशाही रेसिपी
रसगुल्ला सर्व्ह कसा करावा – how to serve rasgulla recipe
सर्व्ह करताना प्रत्येक सर्व्हिंग बाऊलमध्ये आवश्यक प्रमाणात रसगुल्ला घाला आणि त्यावर काही चमचे साखरेचा पाक घाला आणि जर तुम्हाला वादात असेल तर त्यावर काजू, बदाम आणि पिस्ते याचे काप घाला आणि सर्व्ह करा.
रसगुल्ला रेसिपी उत्तम बनण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही टिप्स – tips to make rasgulla recipe
- पाणी खूप घट्ट असेल तर रसगुल्ला देखील खूप कडक होतो तो मऊ होत नाही त्यामुळे पाणी चांगले मऊ करून घ्या.
- पनीर बनवण्यासाठी दूध थोडे ( ७० ते ८० टक्के ) थंड करणे आवश्यक असते.
- जर आपण घरगुती पद्धतीने बनवलेले पनीर जर रसगुल्ला बनवण्यासाठी वापरले तर आपले रसगुल्ले मऊ होतात.
- रसगुल्ला आपण बनवल्यावर लगेच देखील सर्व्ह करू शकतो किंवा हवाबंद डब्यात झाकून ते आपण २ ते ३ तास फ्रीजमध्ये गार करून सर्व्ह करू शकतो.
- रसगुल्ला हि रेसिपी रेफ्रिजरेटरमध्ये साधारण आठवडाभर चांगला राहतो.
आम्ही दिलेल्या rasgulla recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रसगुल्ला रेसिपी मराठी माहिती bengali rasgulla recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rasgulla recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि easy rasgulla recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rasgulla recipe in marathi madhurasrecipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट