सार्क संघटना माहिती Saarc Information in Marathi

Saarc Information in Marathi सार्क संघटना माहिती इ. स. १९७० मध्ये ज्यावेळी बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यासारख्या देशांना एकत्रित येवून व्यापार करण्याची आणि सहकार करण्याच्या गरज वाटू लागली त्यावेळी या सर्व देशांनी मिळून एक संस्था दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) स्थापन केली आणि हि संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करणे त्याचबरोबर सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करणे.

बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी सार्क या संस्थेची स्थापना ८ डिसेंबर १९८५ रोजी ढाका या ठिकाणी केली. सार्क सदस्य देशांचे क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्राच्या ३% आहे आणि जगातील एकूण लोकसंख्येपैकी २१% सार्क देशांमध्ये राहतात. त्याचबरोबर सार्क देशांचा वाटा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ३.८ टक्के इतका आहे.

saarc information in marathi
saarc information in marathi

सार्क संघटना माहिती – Saarc Information in Marathi

नावसार्क (SAARC)
पूर्ण स्वरूपदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (South Asian Association for Regional Cooperation)
स्थापना८ डिसेंबर १९८५
ठिकाणढाका (बांगलादेश)
उद्देशदेशांच्या आर्थिक आणि सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी तसेच विकसनशील देशांशी सहकार्य करण्यासाठी.

सार्कचे पूर्ण स्वरूप काय आहे – SAARC Full Form in Marathi

सार्क या संस्थेचे पूर्ण स्वरूप दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना ( South Asian Association for Regional Cooperation ) असे आहे.

सार्क संस्थेचा मुख्य उद्देश 

हि संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करणे त्याचबरोबर सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करणे.

सार्क सदस्य देशांची नावे

सार्क हि संस्था बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना संस्थेची रचना 

सार्क हि संस्था बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यासारख्या देशांना एकत्रित येवून आपल्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकरण्याच्या उद्देशाने हि संस्था इ.स १९८५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर या संस्थेच्या साचीवालायाची स्थापना नेपाळ मधील काठमांडू येथे १६ जानेवारी १९८७ रोजी झाली.

बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे ८ देश सरकाचे सदस्य आहेत म्हणजेच सार्क हि संस्था ह्या आठ देशांच्या मार्फत चालवली जाते.

सार्क देशांचे महत्व 

सार्क देशांचे महत्व सांगायचे म्हंटले तर ह्या देशांमध्ये जास्त प्रमाणत लोकसंख्या आहे म्हणजेच जगातील सर्वात दाट लोकसंख्येपैकी एक आहे. त्याचबरोबर या देशामध्ये सुपीक जमीन असल्यामुळे या देशांमध्ये शेत पिके मोठ्या प्रमाणत घेतली जातात आणि त्यामुळे या देशांचा आर्थिक फायदा होण्यास मदत होऊ शकते.

सार्क सदस्य देशांचे क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्राच्या ३% आहे आणि सार्क देशांचा वाटा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ३.८ टक्के इतका आहे. तसेच या देशंमध्ये परंपरा, पाककृती, कपडे, सांस्कृतिक आणि राजकीय पैलू या सारख्या सर्व गोष्टी अगदी सारख्याच आहेत.

सार्कचे कामकाज कसे चालते 

 • सार्कच्या सचिवालयामध्ये सर चिटणीस, ७ संचालक आणि सामान्य सेवा करणारे कर्मचारी असतात.
 • सर चिटणीस या पदाची निवड हि मंत्रिमंडळाद्वारे केली जाते आणि सर चिटणीस सार्कच्या सचिवालयाचे नेतृत्व तीन वर्ष करतात.
 • सचिवालयाचे काम संस्थेच्या उपक्रमांच्या अंमलबजावणी करणे आणि त्यावर समन्वय साधने तसेच उपक्रमांची देखरेख करणे.
 • त्याचबरोबर असोसिएशनच्या बैठकांशी संबंधित सेवाआंतरराष्ट्रीय संस्था आणि सार्क यांच्यात संप्रेषण माध्यम म्हणून काम करणे आहे.
 • सार्क या संस्थेच्या सर चिटणीस पदी नियुक्ती सदस्यदेशांमधून आळीपाळीने केली जाते.
 • सदस्यदेशांमधल्या विविध शहरांतून विविध समित्यांमार्फत सार्कचे काम चालते आणि सार्कची दरवर्षी एक वार्षिक परिषद भरते ज्यामध्ये आठ देशांचे पंतप्रधान उपस्थित राहतात.
 • सार्कमधील सहकार्य हे प्रादेशिक अखंडता, राजकीय स्वातंत्र्य, सार्वभौम समानता, सदस्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करता फायद्याच्या तत्वावर चालते.
 • सार्कच्या वार्षिक परिषदेमध्ये ऑस्ट्रेलिया, इराण, जपान, चीन, रिपब्लिक ऑफ कोरिया, मॉरीशस, युरोपियन आणि म्यानमार हे देश देखील सामील होऊ शकतात.

सार्क संघटनेची उद्दिष्टे

 • बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी सार्क या संस्थेची स्थापना काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केली. या संस्थेची काही उद्दिष्टे खाली दिलेली आहेत.
 • दक्षिण आशिया या प्रदेशातील आर्थिक व सामाजिक प्रगती करणे त्याचबरोबर सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करणे.
 • दक्षिण आशिया मध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांच्या कल्याणासाठी काम करणे.
 • परस्पर विश्वास, समज आणि एकमेकांच्या समस्येचे कौतुक करण्यासाठी योगदान देणे.
 • सर्च्क सारखीच उद्दिष्टे आणि हेतू ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्थांना मदत करणे.

सार्क या संस्थेने केलेले करार 

 1. वाद परिषदेच्या स्थापनेसाठी सार्क या संस्थेने पहिला करार केला होता.
 2. सार्कने लोकांच्या कडून घेतले जाणारे दुहेरी कर टाळण्यासाठी एक अंतिम करार केला होता.
 3. सिमाशुल्कावर केलेला अंतिम करार.
 4. सार्कने दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्रावर करार केला.
 5. सार्क या संस्थेने सार्क फूड बँक स्थापन करण्या बाबत करार केले होता.

सार्कची शिखर परिषदे 

देशपरिषदसाल
ढाका (बांगलादेश)पहिली सार्क शिखर परिषदइ.स १९८५
बंगळूरू (भारत)दुसरी सार्क शिखर परिषदइ.स १९८६
काठमांडू (नेपाळ)तिसरी सार्क शिखर परिषदइ.स १९८७
इस्लामाबाद (पाकिस्तान)चौथी शिखर परिषदइ.स १९८८
मालदीवपाचवी सार्क शिखर परिषदइ.स १९९०
कोलंबो (श्रीलंका)सहावी सार्क शिखर परिषदइ.स १९९१
ढाका (बांगलादेश)सातवी सार्क परिषदइ.स १९९३
नवी दिल्ली (भारत)आठवी सार्क शिखर परिषदइ.स १९९५
मालदीवनववी सार्क शिखर परिषदइ.स १९९७
कोलंबो (श्रीलंका)दहावी सार्क शिखर परिषदइ.स १९९८
काठमांडू (नेपाळ)अकरावी सार्क शिखर परिषदइ.स २००२
इस्लामाबाद (पाकिस्तान)बारावी सार्क शिखर परिषदइ.स २००४
ढाका (बांगलादेश)तेरावी सार्क शिखर परिषदइ.स २००५
नवी दिल्ली (भारत)चौदावी सार्क शिखर परिषदइ.स २००७
कोलंबो (श्रीलंका)पंधरावी सार्क शिखर परिषदइ.स २००८
थिंपू (भूतान)सोळावी सार्क शिखर परिषदइ.स २०१०
मालदीवसतरावी सार्क शिखर परिषदइ.स २०११
काठमांडू (नेपाल)अठरावी सार्क शिखर परिषदइ.स २०१४

सार्कची मदत क्षेत्रे 

 • सार्क हि संस्था ग्रामीण आणि कृषी विकासासाठी मदत करते.
 • त्याचबरोबर पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि लोकांची जीवनशैली सुधारण्यास हि संस्था काम करते.
 • आर्थिक, व्यापार आणि वित्त यावर देखील हि संस्था काम करते.
 • हि संस्था मानव संसाधन विकासावर भर देते.
 • देशातील सामाजिक समस्या सोडवण्याचे काम हि संस्था करते त्याचबरोबर गरिबी निर्मुलन, वाहतूक, पर्यटन, तंत्रज्ञान, शिक्षण आणि सुरक्षा या सर्व घटकांवर काम करते.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) बद्दल काही महत्वाची तथ्ये – facts about saarc 

 • सार्क ही प्रादेशिक आंतरसरकारी संस्था आणि दक्षिण आशियातील राज्यांची भू -राजकीय संघटना आहे.
 • बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे आठ देश सार्क या संस्थेचे सदस्य आहेत.
 • सार्क या संस्थेने वेगेवगळ्या कारणांसाठी वेगवेगळी अधिवेशन भरवली आहेत.
 • सार्क या संस्थेची स्थापना देशांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ८ डिसेंबर १९८५ मध्ये ढाका (बांगलादेश) या ठिकाणी झाली.
 • SAARC चे पूर्ण स्वरूप South Asian Association for Regional Cooperation असे आहे.

आम्ही दिलेल्या saarc information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सार्क संघटना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या saarc countries information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about saarc in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये saarc sanghatana information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!