Chatrapati Sambhaji Maharaj Information in Marathi छत्रपती संभाजी महाराज हे एक यशस्वी राजे आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या कारकीर्दमध्ये अनेक पराक्रम गाजवून खूप मोठे यश मिळवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांचा जीवन देखील त्यांच्या वडिलांसारखच देशाला आणि हिंदूधर्माला समर्पित होतं. महाराजांनी लहानपणीच मिळालेल्या शिक्षणातून राज्याच्या समस्यांचा निवारण करनं शिकल होतं. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये संघर्ष आणि शूरतेने शत्रूंना लढा देऊन त्यांची शंभुराजे पासून शूर संभाजी अशी ओळख निर्माण झाली.

(img Sambhaji Maharaj balapan)
छत्रपती संभाजी महाराज माहिती – Sambhaji Maharaj Information in Marathi
नाव (Name) | संभाजीराजे शिवाजीराजे भोसले |
जन्म (Birthday) | १४ मे १६५७ |
जन्मस्थान (Birthplace) | पुरंदर किल्ला |
वडील (Father Name) | शिवाजीराजे शहाजीराजे भोसले |
आई (Mother Name) | सईबाई शिवाजीराजे भोसले |
पत्नी (Wife Name) | येसूबाई |
मुले (Children Name) | शाहूमहाराज |
मृत्यू (Death) | ११ मार्च १६८९ |
लोकांनी दिलेली पदवी | छत्रपती, छांवा |
संभाजी महाराज जन्म:

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ मध्ये पुरंदरच्या किल्ल्यावर झाला आणि महाराष्ट्राला दुसरे छत्रपती लाभले. संभाजी महाराजांना छावा आणि शंभूराजे असे देखील म्हटले जाते. परंतु त्यांच्या जन्मानंतरच दोन वर्षांत त्यांची आई सईबाईंचे निधन झालं. त्यानंतर पुण्यातील कापूरहोळ गावातील धाराऊ पाटील या त्यांच्या दूध आई झाल्या.
संभाजी महाराजांचा पालनपोषण शिवाजी महाराजांच्या आईने म्हणजेच संभाजी महाराजांच्या आजी जिजाबाई यांनी केलं. संभाजी महाराज लहानाचे मोठे जिजाबाईंच्या हाती झाले. सगळ्यांचं संभाजी महाराजांवर खूप प्रेम होतं सोबतच त्यांची सावत्र आई पुतळाबाई यांनीदेखील महाराजांवर अतिशय प्रेम केल.
परंतु त्यांची दुसरी सावत्र आई सोयराबाई यांनी महाराजांना पोरक्या प्रमाणे वागवले त्यांना नेहमी त्यांचेच मूल पुढे जावं असं वाटायचं म्हणून त्यांनी महाराजांच्या शासकीय कारकिर्दीत देखील खूप वेळा ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. महाराजांचे वडील शिवाजी राजे आणि आजी जिजामाता असल्यामुळे लहानपणापासूनच संभाजी महाराजांना राजकारणाचे आणि युद्ध लढाईचे प्रशिक्षण दिले मिळत होते.
तसेच महाराज अतिशय हुशार आणि देखणे होते. संभाजी महाराजांना संस्कृत आणि आठ इतर भाषा देखील येत होत्या. महाराजांना राजकारण अतिशय लहान वयातच कळायला लागल होत. प्रत्येक गोष्ट ते पटापट आत्मसात करत होते. महाराजांना मोगलांच्या कारभार, रणनीती आणि घडामोडी समजाव्यात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना त्यांची प्रसिद्ध आग्रह भेट मध्ये सोबत नेले तेव्हा संभाजी महाराज फक्त नऊ वर्षाचे होते.
संभाजी महाराज विवाह:
छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्य वाढीसाठी जास्तीत जास्त गड-किल्ले त्यांच्या हाताखाली हवे होते. त्यातलाच एक गड जिंकण्यासाठी म्हणजेच प्रचितगड जिंकण्यासाठी महाराजांना पिलाजीराव शिर्के यांची मदत झाली आणि प्रचितगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. या गटात पिलाजीराव शिर्के यांच्या झालेल्या मदतीमुळे एक तह झाला होता.
त्या तहानुसार शिवाजी महाराजांना त्यांच्या मुलाचं लग्न (म्हणजेच संभाजी महाराज) पिलाजिराव यांच्या कन्येशी करून द्यायचं होतं. त्याच नुसार महाराजांनी संभाजीराजांचे लग्न पिलाजीराव यांची कन्या जीवाबाई यांच्याशी करून दिलं. लग्नानंतर मराठी चालीरीती नुसार जीवाबाई यांचे नाव येसूबाई असं ठेवण्यात आलं.
संभाजी महाराज यांनी लिहलेले ग्रंथ:

लहानपणी शिवाजी महाराजांच्या सोबत आग्र्याला पोहोचलेले संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटले, तेव्हा ते शिवाजी महाराजांचे दूरचे मंत्री रघुनाथ कोरडे यांच्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी काही काळ थांबले होते. तिकडे संभाजी महाराज एक ते दीड वर्ष थांबले होते. त्या काळामध्ये महाराज एक ब्राह्मण बालक म्हणून जीवन जगत होते.
त्यामुळे मथुरेमध्ये त्यांचा उपनयन सोहळा ही करण्यात आला आणि त्यांना संस्कृतहि शिकवण्यात आले. नेमकं त्याच दरम्यान संभाजी महाराजांची ओळख कवी कलश यांच्याशी झाली. कलश यांच्या संपर्कात आल्यामुळे संभाजी महाराजांची साहित्य रचनेतील आवड वाढू लागली होती. याच ज्ञानाचा वापर करून संभाजी महाराजांनी काही ग्रंथ आणि पुस्तके लिहिली.
संभाजी महाराजांनी त्यांचे वडील शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ संस्कृत मध्ये बुद्ध चरित्रही लिहिले होते. त्या शिवाय संभाजी महाराजांनी मध्ययुगीन संस्कृत वापरून शृंगारिका देखील लिहली. त्यासोबतच संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी लिहिला. यावरूनच संभाजी महाराज संस्कृत या भाषेमध्ये किती उच्चशिक्षित होते हे दिसून येतं.
नायिकाभेद, सातसतक, नखशिख हे ब्रिज भाषेतील ग्रंथ लिहिले. नखशिखा हा ग्रंथ संभाजी महाराजांनी त्यांची पत्नी येसूबाई यांना श्री सखी राज्ञी जयती महाराणी ही पदवी देऊन हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणेतून लिहिला. लहानपणापासूनच संभाजी महाराज कवी कलेश, महाकवि भूषण, गागाभट्ट शिवाय त्यांचे स्वतःचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान विद्वानांच्या सानिध्यात असल्यामुळे महाराजांना ग्रंथ लिहीण्यासाठी प्रेरणा मिळायची.
त्याशिवाय संभाजी महाराजांना मराठी, संस्कृत, फारसी, ब्रज, उर्दू, अरबी, इंग्रजी यासारख्या अनेक भाषा बोलता वाचता लिहिता येत होत्या. महाराज लहानपणापासुनच अतिशय हुशार आणि धाडसी होते.
संभाजी महाराज राज्याभिषेक:

छत्रपती संभाजी महाराज जे शंभुराजे म्हणून देखील ओळखले जातात. हे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच दुसरे राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्तराधिकारी देखील होते. त्यावेळी मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे औरंगजेब आणि विजापूर आदिलशहा होते. आणि संभाजी महाराजांना यांनाच मुळापासून उखडून टाकायचे होते.
संभाजी महाराजांनी एकूण २१० युद्ध लढली आणि सर्वात मुख्य आणि कौतुकाची बाब म्हणजे यातलं एकाही युद्धात त्यांना कधीच पराभव आला नाही. प्रत्येक युद्धामध्ये ते नेहमीच यशस्वी झाले. म्हणूनच त्यांना शिवबाचा छावा असे देखील म्हटले जाते. परंतु शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आता स्वराज्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर आली होती. आणि सर्व मोठे निर्णय राज्याभिषेका शिवाय घेण थोड अवघडच होत.
त्यातच संभाजी महाराजांना अष्टप्रधान मंडळाकडून देखील विरोध होता. म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं. आणि १६ जानेवारी १६८१ मध्ये महाराज यांचा राज्याभिषेक पार पडला आणि ते सिंहासनावर विराजमान झाले. ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून नावाजले जाऊ लागले. महाराजांच्या राज्याभिषेकाला अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे यांचा नकार होता परंतु महाराजांनी यांना अगदी मोठ्या मनाने माफ करून पुन्हा त्यांची अष्टप्रधान मंडळांमध्ये नेमणूक केली.
संभाजी महाराज इतिहास माहिती – Sambhaji Maharaj History in Marathi

छत्रपती संभाजी महाराज एक धाडसी आणि ताकदवान, शक्तिशाली राजे होते. महाराजांच त्यांच्या छोट्याशा जीवन काळामध्ये देखील मराठा साम्राज्याच्या विस्तारात त्यांचं खूप मोठं श्रेय आहे. मोगलांच्या जुलमापासून महाराजांनी त्यांच्या जनतेला नेहमीच लांब ठेवले आणि यासाठी प्रत्येक हिंदू त्यांचे खूप आभारी आहेत. महाराजांनी औरंगजेबाच्या जवळपास आठ लाख सैन्याचा पराभव केला आणि त्यासोबतच बाकी मुगलांचा देखील पराभव केला.
औरंगजेब महाराष्ट्रातील युद्धांमध्ये व्यस्त असताना. उत्तर भारतातील हिंदू राज्यकर्त्यांना त्यांचे राज्य परत मिळवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी बराच वेळ मिळाला. यामुळे फक्त दक्षिणेतीलच नाही तर संपूर्ण राष्ट्राचे हिंदू शूर मराठ्यांचे ऋणी आहेत.
कारण जर त्यावेळी संभाजी महाराज औरंगजेबाला शरण गेले असते किंवा त्यांच्याशी कुठलाही प्रकारचा तह केला असता तर औरंगजेबाने पुढच्या दोन-तीन वर्षांमध्ये उत्तर भारतातील राज्य पुन्हा ताब्यात मिळवून घेतले असते आणि मग तिकडच्या सामान्य जनता आणि तिकडच्या राजांना त्याचा त्रास झाला असता. महाराजांचा पराक्रम दिवसेंदिवस वाढू लागला होता.
महाराज प्रत्येक युद्धामध्ये त्यांची शूरता दाखवत होते. महाराजांनी गनिमी काव्याचा अगदी पुरेपूर वापर केला त्यांनी आपल्यापेक्षा २० पट जास्त असलेल्या मोगल सैन्याशी एकट्याने लढा दिला. त्यांनी आतापर्यंत १२० युद्ध लढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातल्या एकाही युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला नाही आहे. इतिहास घडवणारा हा पहिलाच राजा आहे म्हणूनच जो सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजतो तो संभाजी असं त्यांना उगाचच म्हटलं नाही जात.
तर हि घटना अगदी खरी आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याच्या शत्रूंना असे वाटले म्हणजेच औरंगजेबाला असे वाटले की आता मराठा साम्राज्य मातीस मिळेल किंवा स्वराज्याची घडी विस्कटली परंतु संभाजी महाराजांनी ते चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवलं. त्यांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी, म्हैसूरचा चिक्कदेवराय या सगळ्या शत्रूंना पाणी पाजले. हे पाहून औरंगजेब अत्यंत तापला होता. महाराजांचा सगळीकडे धाक बसला होता.
त्यामुळे एकानेही संभाजी महाराजां विरुद्ध औरंगजेबाला मदत करण्याची चुकी केली नाही. महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी शत्रूंच्या डोळ्यात धूळ फेकली. पराक्रमी असूनही त्यांना अनेक युद्धांन पासून दूर ठेवण्यात आले. संभाजी महाराज अत्यंत संवेदनशील होते. ते आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोगलांमध्ये सामील झाले जेणेकरून मोगलांची दिशाभूल करता यावी.
त्याच वेळी मराठा सैन्य दक्षिण दिग्विजय पार करून आले होते आणि त्यांना पुढच्या लढाईसाठी थोडा वेळ हवा होता. म्हणून शिवाजी महाराजांनी मोगलांची दिशाभूल करायला संभाजीराजांना तिकडे पाठवले होते ही त्यांची रणनीती होती. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोगलांपासून मुक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर (३ एप्रिल १६८०) काही लोकांनी संभाजींचे दुसरे भाऊ राजारामराजे यांना सिंहासनावर आणण्याचा प्रयत्न केला.
परंतु सेनापती हंबीरराव मोहिते राजारामराजे यांचे सख्खे मामा होते त्यांनी या गोष्टीमध्ये अडथळा आणला. आणि १६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजी महाराजांचा विधीवत राज्याभिषेक पार पडला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्याच वर्षी औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर दक्षिणेस पळून गेला आणि त्याने धर्मवीर श्री संभाजी महाराजांचा आश्रय घेतला.
मुघल, पोर्तुगीज, ब्रिटीश आणि इतर शत्रूंबरोबर एकटे लढाई करण्याशिवाय त्यांना आतल्या शत्रूंशीही लढावे लागले. राजाराम राजे यांच्या काही समर्थक राजाराम राजे यांना छत्रपती बनवण्यात अपयशी ठरले. त्यांनी अकबरला पत्र पाठवून आपल्या राज्यावर हल्ला करण्याची आणि मुघल साम्राज्याचे चिन्ह बनण्याची विनंती पत्र लिहिले.
परंतु अकबार छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाशी परिचित असल्याने व त्यांच्यावर अवलंबून असल्याने त्याने तेच पत्र संभाजी महाराज यांना पाठवले. या देशद्रोहामुळे संतप्त झालेल्या संभाजी महाराजांनी आपल्या सामंत्यांना फाशीची शिक्षा सुनावली. तथापि, त्यापैकी एकाने बालाजी आवजी या नावाची समाधी देखील बांधली, ज्यांचे माफी पत्र श्री सामंत राज्यकर्त्यांच्या निधनानंतर श्री छत्रपती संभाजीने प्राप्त केले.
महाराजांना राज्याच्या खजिन्यात भर करायची होती म्हणून त्यांनी सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोबत मोगलांचे राज्य असलेल्या बुऱ्हाणपूर शहरावर लूट टाकायचं ठरवलं. आधी तर महाराजांनी मोगलांची दिशाभूल करण्यासाठी सुरत वर लुट टाकण्याची अफवा पसरवली. आणि हंबीरराव मोहिते यांच्याकडे या लुटेच नेतृत्व सोपवलं हंबीरराव मोहिते यांनी ३० जानेवारी १६८१ रोजी बुऱ्हाणपूर हल्ला केला. आणि तीन दिवस ही लूट चालूच होती या मोहिमेतून मुबलक लूट मिळाली. या प्रकरणामुळे औरंगजेब अतिशय चिडला होता.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय स्वारी मध्ये व्यस्त होते. तेव्हा औरंगजेबाने पंधरा हजाराच सैन्य मराठा साम्राज्यावर चाल करून दिलेरखानास सोबत पाठवून दिल होत, मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी. आता इतक्या मोठ्या फौजेला छत्रपती शिवाजी महाराजां शिवाय लढा देन थोडा अवघडच होतं.
त्यावेळी संभाजी महाराजांनी जनतेची होणारी हेळसांड बघून दिलेरखानास सोबत मैत्रीचा हात पुढे करून त्याच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू केला. त्या पत्र व्यवहारांमध्ये महाराजांनी त्यांची स्वराज्यात होणारी हेळसांड बोलून दाखवली होती. त्यामुळे दिलेरखान अतिशय खुश झाला आणि महाराजांससोबत मैत्री करण्यास तयार झाला. महाराज आणि दिलेरखान यांच्यामध्ये जवळपास सहा वेळा पत्रव्यवहार झालेत.
या पत्रव्यवहार मध्ये महाराज दरवेळी दिलेरखानाला वेगवेगळे प्रश्न विचारायचे जसं की, महाराज दिलेरखान यांची युती झाल्यावर महाराजांना कोणत पद मिळणार, किती मनसबदारी मिळणार आणि यासाठी औरंगजेबाची परवानगी आहे का औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी दिलेरखानाला त्याची माणसे औरंगजेबाकडे पाठवावी लागायची आणि ह्यामध्ये महिने निघून जायचे. महाराजांनी अशाप्रकारे दिलेरखानाला त्यांच्या पत्र व्यवहारांमध्ये गुंतवून ठेवलं होतं.
संभाजी महाराज कविता:
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा आणि इतिहास सांगणारी ही कविता-
अमावस्येच्या अंधारातुनी तेजपुरुष हा लखलखला
यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला
सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील वाघाचा हा छावा
मर्दानी या छातीमधूनी वाहतो लाल ल्हवा
एक एक शब्द शंभूचा जणू तरवार झुंजावी रणी
त्याहुनी तीक्ष नजर ती जडली जखमी वाघावानी
चकित झाली औरंगशाही पाहुणे शंभूचा रोष
तख्तच सुटले औरंग्याचे झाला तो बेहोश
औरंग्याचा माज उतरला ऐकुनी शंभू वाणी
म्हणे धर्मासाठी प्राण देण्या का हे उतावीळ सेनानी
जीभ छाटली डोळे फोडले केले अनंत अत्याचार
परी न हरलं मृत्यूलाही हे सह्याद्रीच निधडं वारं
खोळंबला तो यमही थकला, ताटकळला काळ
दिवस सरले बारा न हरला सह्याद्रीच बाळ
मृत्युंजय झाली रात्र, झाली अमावस्या मृत्युंजय आज
मृत्युंजय झाले शंभू , उमटला तुळापुरी निनाद
ज्योत मालवली अंतरीची आई, चिंता तुझं जगाची
शिवशंभु ने वाट दाविली, आम्हाला शक्ती दे म्लेंछ वधाची.
संभाजी महाराज इतिहास मृत्यु – Sambhaji Maharaj Death Information in Marathi

१६८९ पर्यंत परिस्थिती बदलली होती. महाराज संगमेश्वर येथे त्यांच्या सरदारांन सोबत प्रमुख बैठक पार पाडत होते. बैठक संपल्यावर १ फेब्रुवारी १६८९ रोजी महाराज रायगडाकडे जाणार होते. तेव्हा त्यांच्यासोबत २०० ते ३०० सैनिक होते. मराठ्यांचे राज्य संगमेश्वर हे शत्रूच्या आक्रमणांना पासून अपरिचित होते. अशा परिस्थितीत मुकर्रबखानच्या अचानक हल्ल्यामुळे मोगल सैन्य राजवाड्यात पोहोचले आणि त्यांच तीन हजाराचा सैन्य घेऊन मराठ्यांशी लढाई केली.
मराठ्यांचे सैन्य अतिशय कमी असल्यामुळे आपल्याला तिथे अपयश आलं आणि त्यांनी संभाजी महाराजांन सकट कवी कलश यांना बंदिवान करून तुरुंगात टाकले. त्यांना वेदां विरुद्ध इस्लाम यांचा स्वीकार करण्यास भाग पाडले. परंतु म्हणतात ना मोडेल पण वाकणार नाही याची प्रचिती तिथे आली. महाराज त्यांना शेवटपर्यंत नाहीच म्हणत सर्व अत्याचार स्वतः सोसत राहिले.
औरंगजेबाच्या कारकीर्दीचा अधिकृत इतिहासकार आणि काही मराठा सूत्रांच्या द्वारे महाराज आणि कवी कलश यांना अकलूज येथील औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. ही बातमी आधीपासूनच मोगल शासका पर्यंत पोहोचली होती आणि म्हणूनच त्यांनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करायचं ठरवलं. विजयीसेना, सेनापतींसाठी त्याने उत्सव साजरा केला आणि त्यांचे जंगी स्वागत केले.
रस्त्यावरून येणारे-जाणारे मोगल पुरुष आणि खिडकीतून बुरखा घालून पाहणाऱ्या स्त्रिया मराठ्यांचा पराभव पाहण्यासाठी उत्सुक झालेल्या. वाटेत येणाऱ्या प्रत्येक मुगल त्यांची चेष्टा उडवत होता. आणि काही जण तर त्यांच्या चेहऱ्यावर अपमानात थुंकत होते. मोगलांमध्ये भेटलेल्या राजपुर सैनिकांना संभाजी महाराजां विरुद्ध सहानुभूती होती.
म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना म्हंटले एक तर मला सोडून माझ्याशी आमने-सामने लढाई करा किंवा मला ठार मारून टाकून मला या अपमानातून मुक्त करा. परंतु सरदारांना औरंगजेबाची भीती होती म्हणून ते गप्प बसले हे सगळं असंच पाच दिवस सुरू होत. आणि पाच दिवसानंतर शेवटी मोगल सैनिक महाराज आणि कवी कलश यांना घेऊन औरंगजेबाच्या छावणीत पोहोचले. औरंगजेब संभाजी महाराजांना पाहून स्वतः सिंहासनावरून खाली उतरला आणि म्हणाला की शिवाजी महाराजांचा वीर पुत्र माझ्या डोळ्यासमोर जिवंत उभा आहे.
हे माझ्यासाठी खूप मोठं यश आहे आणि याच यशासाठी तो देवाला धन्यवाद म्हणण्यासाठी महाराजांन समोर गुढग्यावर बसला. तेव्हा साखळीला बांधलेल्या कवी कलेश, म्हणाले हे माझे राजे, बघा तुमच्या श्रद्धे साठी औरंगजेब सिंहासनावरून उठून स्वतः गुडघ्यावर बसून तुमच्या समोर नतमस्तक होत आहे. इतक्या वाईट प्रसंगांमध्ये देखील कवी कलश यांनी शूरता दाखवत औरंगजेबाची खिल्ली उडवली.
यामुळे औरंगजेब फार चिडला फार क्रोधीत झाला आणि त्याने सैनिकांना संभाजी महाराज आणि कवी कलेश यांना तळघरात बंदी करून ठेवण्याचे आदेश दिले. औरंगजेब महाराजांना त्यांची सर्व मालमत्ता आणि गड-किल्ले परत देण्यास सांगत होता तसेच त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करत होता. परंतु इतकेच नव्हे तर महाराज आणि कवी कलश यांना तुळापूरच्या रस्त्यावरून त्यांची धींड काढून त्यांना घासपटत नेऊन त्यांना विदूषकाचे कपडे घालण्यात आले.
प्रत्येक मुगल त्यांच्यावर क्रूरतेने हसत होता. पण तरीही महाराज धर्मनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ राहिले. महाराजांवर हा अत्याचार तब्बल ४० दिवस सुरू होता. त्यानंतर औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे केला औरंगजेबाला तुळापूरच्या मातीत महाराजांना हलाल करायचे होते. महाराज गड किल्ले देण्यास नकार देत होते. व त्यासोबतच इस्लाम धर्म देखील स्वीकारण्यास नकार देत होते. म्हणून औरंगजेब संतापला आणि त्याने सैनिकांना महाराजांचे डोळे काढण्यास सांगितले आणि लाल दर्ज सळ्या शंभू महाराजांच्या डोळ्यातून फिरल्या.
सारी छावणी भीतीने थरथरत होती, परंतु महाराजांच्या तोंडातून एकही आवाज आला नाही त्यामुळे कवी कलशांचे देखील डोळे काढण्यात आले. परंतु देखील महाराज डगमगले नाही. महाराजांची पुढची शिक्षा म्हणून त्यांची जीभ कापण्यात आली आणि ११ मार्च १६८९ रोजी भीमा इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदी जवळच्या तुळापूर येथे महाराजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली.
इतके अत्याचार करून सुद्धा महाराज औरंगजेबा समोर कधीच झुकले नाही. याचीच औरंगजेबाला नेहमीच सळसळ भासत राहिली. महाराजांची हत्या करण्याआधी त्याने महाराजांसारखा पुत्र त्याच्या पोटी यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला देखील संभाजी महाराजांसारखा एक शूरवीर, धाडसी पुत्र हवा होता. म्हणतात ना शत्रूलाही हेवा वाटेल असेच होते संभाजी महाराज.
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन:
औरंगजेबाच्या तावडीत सापडल्या नंतर औरंगजेबाने महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली तसेच त्यांच्याकडून ही सर्व मालमत्ता मागितली. परंतु महाराजांनी असं वागण्यास नकार दिल्यावर औरंगजेब भडकला आणि त्याने महाराजांचा अत्यंत छळ केला. त्याने महाराजांचे डोळे काढले, महाराजांची जीभ कापली, महाराजांवर अतोनात वार करण्यात आले.
हे सगळं महाराज गेले ४० दिवस सहन करत होते. तरीही महाराज आपल्या मराठा साम्राज्या साठी लढत राहिले. मराठा साम्राज्याचा राजा मोगलांचे आतोनात हाल सोसत होता. आणि एक दिवशी तो दिवस उजाडलाच. ११ मार्च १६८९ रोजी महाराजांचे हात-पाय आणि त्यांचे सर्व देह शरीरापासून वेगळे करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली.
त्यादिवशी हिंदू धर्माचं नवीन वर्ष होतं म्हणजेच गुढीपाडवा होता. महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करुन तुळापूरच्या नदीमध्ये फेकण्यात आले आणि मग तिकडच्या ग्रामीण लोकांनी ते तुकडे एकत्र करून त्यांना जोडून महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराजांचं हे बलिदान मराठ्यांसाठी नेहमीच श्रेष्ठ आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केलं आणि त्यांनी स्वतःच्या प्राणाच दिलेलं बलीदानामुळे आपण सगळेच त्यांचे ऋणी आहोत.
आज आपण जे स्वातंत्र्य जगतोय त्याचं सर्व श्रेय शिवशंभु यांनाच जातं. मराठा साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा राजा पुन्हा लाभने नाही.
संभाजी महाराज मालिका:

संभाजी महाराज हे मराठ्यांचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. महाराजांचं व्यक्तिमत्व अतिशय धाडसी आणि ध्येयवान होतं. महाराजांनी त्यांच्या छोट्याशा जीवन काळामध्ये अनेक पराक्रम गाजवले आणि याच पराक्रमांचे संपूर्ण महाराष्ट्राला दर्शन व्हावे म्हणून महाराजांवर एक मराठी मालिका सुद्धा निघाली होती.
मालिकेचे नाव “स्वराज्यरक्षक संभाजी” होतं. मालिकेच्या नावाप्रमाणेच महाराजांनी त्या काळी स्वराज्याच संरक्षण केलं. या मालिकेमध्ये महाराजांच बालपण ते महाराजांनी गाजवलेले सर्व पराक्रम शिवाय त्यांचा इतिहास देखील दाखवला आहे. महाराजांची भूमिका या मालिके मध्ये मराठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी साकारली होती. तसाच मालिकेमध्ये काही गोष्टी छोट्या-मोठ्या करून दाखवल्या आहेत. या मालिकेमध्ये महाराजांच्या मृत्यूचे चित्रीकरण दाखवायचा की नाही यावरून थोडे वाद विवाद झाले होते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा कशी होती. sambhaji maharaj information in marathi त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? त्यांनी स्वराज्याची स्थापना कशी केली त्यासाठी त्यांनी काय काय केले अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. sambhaji maharaj mahiti हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच chatrapati sambhaji maharaj in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या sambhaji maharaj marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट