संदीप सिंग यांची माहिती Sandeep Singh Hockey Player Information in Marathi

sandeep singh hockey player information in marathi संदीप सिंग यांची माहिती, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि हा खेळ भारतामध्ये खूप आवडीने खेळला जातो आणि या खेळाबद्दल भारतामध्ये लोकांच्या मनामध्ये लोकप्रियता वाढवणारे व्यक्ती म्हणजे मेजर ध्यानचंद (major dhyanchand) हे होते. ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा सुवर्ण पदक आणि सलग अनेक सामने जिंकले आहेत आणि या मध्ये खेळणारे खेळाडू हे हा खेळ खेळण्यासाठी पारंगत असतात आणि आपल्या भारतीय हॉकी टीममध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक खेळाडू आहेत.

आणि त्यामधील एक म्हणजे “संदीप सिंग” ज्याला हॉकी खेळाडू म्हणून ओळखले आणि आज आपण या लेखामध्ये हॉकी खेळाडू संदीप सिंग यांच्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. संदीप सिंग हा हॉकी खेळाडू असून तो फुलबॉल प्रकारामध्ये खेळत होता आणि त्यांने त्याच्या या खेळाच्या मालिकेमध्ये १३८ गोल बनवले आहेत.

संदीप सिंग याची या खेळातील ओळख सांगायची म्हटली तर हा दोन वेळा ऑलिम्पियन, कॉमनवेल्थ खेळाचे रौप्य पदक विजेता आणि जगातील सर्वोत्तम ड्रॅग फ्लीकर्सपैकी एक म्हणून त्याला पहले जाते.  

sandeep singh hockey player information in marathi
sandeep singh hockey player information in marathi

संदीप सिंग यांची माहिती – Sandeep Singh Hockey Player Information in Marathi

नावसंदीप सिंग
टोपण नावफ्लीकर्स सिंग
जन्म२७ फेब्रुवारी १९८६
जन्म ठिकाणहरियाना राज्यातील शहाबाद
ओळखहॉकी खेळाडू
पालकगुरुचरण सिंग भिंदर आणि आई दलजित कौर भिंदर 

संदीप सिंग याचे वैयक्तिक आणि प्रारंभिक जीवन – early life

संदीप सिंग हे सध्या जरी एक प्रसिध्द हॉकी खेळाडू असले तरी त्यांचा जन्म मध्यमवर्गिय कुटुंबामध्ये झाला आहे. संदीप सिंग यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९८६ मध्ये भारतातील हरियाना राज्यातील शहाबाद या ठिकाणी झाला आहे आणि हे सिख धर्मातील जाट कुटुंबातील आहेत.

त्यांच्या वडिलांचे नाव गुरुचरण सिंग भिंदर आणि आईचे नाव दलजित कौर भिंदर  असे होते आणि त्यांना एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव बिक्रमजीत भिंदर  असे आहे आणि त्यांचा भाऊ देखील हॉकी खेळाडू आहे.

संदीप सिंग यांच्या शिक्षणाविषयी सांगायचे मातले तर त्यांनी पटियाला या ठिकाणी खालसा महाविद्यालया मध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि पुढे त्यांनी बी.ए (B.A) चे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

संदीप सिंग यांना त्यांच्या प्रारंभिक जीवनामध्ये खेळाबद्दल फारसे महत्व नव्हते आणि ते सुरुवातील खूप आळशी होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना वाटत नव्हते कि संदीप सिंग पुढे जाऊन देशामध्ये कुटुंबाचे नाव उंचावतील.

पुढे त्यांना त्यांच्या भावाकडे पाहून खेळाची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी खेळाचा सराव सुरु केला आणि ते हॉकी खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि पुढे त्यांनी त्यांच्या भावाकडून खेळाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांनी २००४ मध्ये क्वालालंपूर या ठिकाणी झालेल्या सुलतान अफझल शाह चषकादरम्यान अंतरराष्ट्रीय हॉकी खेळामध्ये पदार्पण केले.

संदीप सिंग यांची खेळातील कामगिरी – career

 • त्यांनी २००४ मध्ये क्वालालंपूर या ठिकाणी झालेल्या सुलतान अझलन शाह चषकादरम्यान अंतरराष्ट्रीय हॉकी खेळामध्ये पदार्पण केले तसेच त्यांनी त्याच वर्षी ऑलिम्पिकमध्ये देखील पदार्पण केले.
 • २००४ या वर्षी ज्युनियर आशिया कप मध्ये देखील खेळले आणि त्यांनी या कपमध्ये १६ गोल बनवले आणि तो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल बनवणारा खेळाडू बनला तसेच पाकिस्तानविरुध्द खेळत असताना त्याने ५-२ या विजयात २ गोल बनवले आणि भारताला प्रथम विजेतेपद मिळाले होते.
 • २००६ मध्ये देखील ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग होते आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण ७ गोल बनवले होते आणि हा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल बनवणारा खेळाडू होता.
 • २००६ मध्येच ते जर्मनमध्ये विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्याकडून चुकून गोळी लागली आणि हि गोळी त्यांच्या तीन महत्वाच्या अवयवांना लागल्यामुळे त्यांना अर्धांगवायू झाला आणि यातून बरे होण्यासाठी त्यांना २ वर्ष लागली.
 • पुढे त्यांनी राष्ट्रीय संघामध्ये परत प्रवेश घेतला.
 • २००८ मध्ये त्यांना सुलतान अझलन शहा चषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि या स्पर्धेमध्ये आठ गोल बनवले आणि त्याने टॉप गोल पुरस्कार मिळाला.
 • पुढे त्यांना २००९ मध्ये त्याला राष्ट्रीय संघामध्ये कर्णधार म्हणून नियुक्त केले आणि त्याला प्रथमच सुलतान अझलन शहा चषक स्पर्धेमध्ये प्रथमच नेतृत्व केले होते.
 • २०१२ च्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेमध्ये पाच गोल बनवले आणि यामुळे उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यास मदत मिळाली.
 • तसेच त्याने क्लब हॉकी खेळामध्ये देखील खेळला.

संदीप सिंग यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • भारतीय हॉकी संघातील प्रेरणादायी कर्णधार आणि एक प्रसिध्द आणि दिग्गज खेळाडू म्हणून संदीप सिंग ला ओळखले जाते.
 • संदीप सिंग यांच्या पत्नीचे नाव हरजींदर कौर असे आहे.
 • संदीप सिंग यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
 • सोहेल अब्बास आणि धनराज पिलाय हे त्यांचे हॉकी मधील आवडते खेळाडू आहेत.
 • संदीप सिंग यांची कुटुंबाची पार्श्भूमी हि हॉकी खेळातील होती म्हणजेच त्यांचे मोठे भाऊ हॉकी खेळाडू होता तसेच त्यांची वहिनी देखील हॉकी खेळाडू होती.
 • संदीप सिंग हे त्यांच्या लहान वयापासूनच हॉकी या खेळाचा सराव करत होते आणि हा सराव त्यांना पुढे त्यांचे करियर बनवण्यास उपयोगी आला.

आम्ही दिलेल्या sandeep singh hockey player information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संदीप सिंग यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hockey player sandeep singh information in marathi या sandeep singh information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sandeep singh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!