सानिया मिर्झा यांची माहिती मराठी Sania Mirza Information in Marathi

Sania Mirza Information in Marathi सानिया मिर्झा यांची माहिती मराठी सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसपटू आहे. जिने संपूर्ण जगभरात भारताचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं करून ठेवल आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस महिला पटु म्हणून सानिया मिर्झा यांचे नाव पुढे केलं जातं. सानियाने तिच्या उत्कृष्ट कौशल्याने आज पर्यंत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची आणि एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी असे एकूण चार अजिंक्य पदक पटकावली आहेत. सानिया मिर्झा ही डब्ल्यू.टी. ए या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आजच्या लेखामध्ये आपण सानिया मिर्झा यांच्या आयुष्याविषयी व तिने दिलेल्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

sania mirza information in marathi
sania mirza information in marathi

सानिया मिर्झा यांची माहिती मराठी – Sania Mirza Information in Marathi

पूर्ण नाव (Name)सानिया मिर्झा
जन्म (Birthday)१५ नोव्हेंबर १९८६
जन्म गाव (Birth Place)मुंबई
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आंतरराष्ट्रीय टेनिसपटू

जन्म

मुंबईत १५ नोव्हेंबर १९८६ रोजी सानिया मिर्झा हिचा जन्म झाला. परंतु ती लहानाची मोठी हैदराबाद मध्ये झाली हैदराबादच्या नसर या खैरताबाद जवळच्या खाजगी शाळेतून सानियाच प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. तिचं महाविद्यालयीन शिक्षण हैदराबादच्या सेंट मेरी कॉलेजमधून पूर्ण करण्यात आलं.

सन २००८ मध्ये सानियाने चेन्नईच्या एमजीआर शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. सानियाला गाणी ऐकण्याची, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याची व पोहण्याची फार आवड आहे. सहा वर्षाची असल्यापासून सानिया टेनिस या खेळाच प्रशिक्षण घेत आहे. तिची टेनिस खेळाची सुरुवात हैदराबादच्या निजाम क्लबमधून झाली.

सानियाचे वडील इम्रान मिर्झा हे एक सपोर्ट्स जर्नलिस्ट होते. पत्रकारितेचा व्यवसाय होता. सानिया मिर्झा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी क्रीडाक्षेत्राला संबंधित आहे सानियाचे वडील आपल्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये टेनिस खेळायचे तर घरातील इतर सदस्य क्रिकेट क्षेत्रामध्ये होते.

सन २०१० मध्ये सानिया मिर्झा यांनी शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटपटू सोबत विवाहगाठ बांधली. सन २०१८ मध्ये सानिया मिर्झा यांना पुत्र प्राप्ती झाली. मुलाचं नाव इझान असे ठेवण्यात आले.

सानिया मिर्झा यांच टेनिस खेळातील योगदान

सानिया मिर्झा यांची टेनिस खेळातील कारकीर्द फार मोठी आहे. कमी वयामध्ये सानिया आणि यशाचं शिखर गाठलं. त्याचं कारण म्हणजे सानिया सहा वर्षाची असल्यापासून टेनिसच प्रशिक्षण घेत आहे. आज सानिया मिर्झा जगातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंच्या यादीमध्ये येते. याचा सर्वच भारतीयांना फार अभिमान आहे. क्रिकेट हा खेळ खूप मनोरंजक व त्याचे बरेच चाहते असल्यामुळे त्याला भरपूर प्राधान्य दिलं जातं.

परंतु सानियाने तिच्या उत्कृष्ट कलांनी दाखवून दिलं की हा खेळ देखील तितकाच मनोरंजक होऊ शकतो. लहानपणापासून सानियाला टेनिस खेळाची प्रचंड आवड होती म्हणूनच अगदी सहा वर्षांची असल्यापासून ती या खेळांचं प्रशिक्षण घेत आहे. सानियाचे वडील देखील आवड म्हणून टेनिस खेळायचे.

त्यांच्यातूनच प्रेरित होऊन सानियाने पुढे टेनिस या खेळाला आपलं करिअर ऑप्शन म्हणून नीवडण्यास सुरुवात केली. सानियाची टेनिस खेळाबद्दल असणारी प्रामाणिकता आणि गुण कौशल्य जाणून तिच्या वडलांनी तिला चांगलं प्रशिक्षण मिळाव म्हणून देशविदेशातले कोच प्रशिक्षण देण्यास बोलावले. इतकच नव्हे तर सानिया मिर्झा यांनी टेनिस खेळातील उत्तम खेळाडू आणि कोच महेश भूपती यांच्याकडे देखील प्रशिक्षण घेतलं आहे.

सानियाने १९९९ साली जकार्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदार्पण करत वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये देखील भारताच उत्कृष्ट प्रतिनिधित्व केलं. अथक परिश्रम आणि सराव करून सानियाने आपले उत्कृष्ट कलागुण दाखवून २००३ मध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिप गर्ल्स विजेतेपद पटकावलं होतं. याच दरम्यान सानियाला युएस ओपन गर्ल्स डंबेल्स च्या उपांत्य फेरीत सहभाग घेण्याची संधी चालून आली.

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये भारताचं नाव मोठं करण्यात सानियाने कोणतीही कसर ठेवली नाही. २०१३ साली झालेल्या एशियन गर्ल्स मध्ये तब्बल चार सुवर्ण पदक सानियाने पटकावले. टेनिस हा खेळ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. परंतु बरेच प्रेक्षक या खेळाकडे आकर्षित नाहीत परंतु सानियाने टेनिस क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी यामुळे आज आपण सर्वजण अगदी कौतुकाने व अभिमानाने सानियाने टेनिस क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी तिचा आदर करतो.

आज टेनिस खेळाचे नाव ऐकलं की आपल्या भुवया उंचावतात आणि डोळ्यासमोर चित्र उभे राहते सानिया मिर्झा यांचं. त्यांनी तशी ख्याती जगभर पसरवली आहे. न थांबता न जुमानता सानिया मिर्झा यांनी आपला खेळाचा सराव सुरूच ठेवला. आणि सन २००४ मध्ये सहा आयटीएफ स्पर्धेच एकेरी विजेतेपद पटकावलं. सानियाला टेनिस खेळताना जे कपडे परिधान करावे लागायचे त्यावरून देखील समाजातील काही लोकांनी त्या गोष्टीवरून वाद विवाद उभे केले.

२००५ साली ऑस्ट्रेलियन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत पेट्रो मंडूला आणि दुसरऱ्या फेरीत सिंडी वॉटसन या दोन खेळाडूंचा पराभव करून सानियाने २००५ च्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या व चौथ्या फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळवून इतिहास रचला. टेनिस विश्वामध्ये सानिया ची प्रसिद्धी वाढू लागली.

सानिया मिर्झा यांना चाहत्यांकडून भरपूर प्रेम, आदर-सत्कार, पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली. २००६ मध्ये सानिया मिर्झा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये दुहेरी विजेत पदक देखील जिंकलं. २०१० मध्ये झालेल्या दिल्ली येथील राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले तर महिला दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. आशियाई खेळांमध्ये देखील सानियाने फार मोठी कारकीर्द करून ठेवली आहे.

२०१४ साली‌ ईचाॅंन येथे झालेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक तर २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावलं. २००६ मध्ये दोहा येथील एकेरी स्पर्धेत रौप्यपदक आणि संघ स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. सानिया मिर्झाने २०१० च्या कांगच्चौ येथील मिश्र दुहेरी स्पर्धेत रौप्यपदक तर एकेरी स्पर्धेत कांस्यपदक आणि २००२ बूसान येथे झालेल्या टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक पटकावल होत.

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सानिया मिर्झा यांची ही वाटचाल कौतुकास्पद आहे. प्रत्येक खेळा मध्ये विजय प्राप्त करून सानिया मिर्झा यांनी भारताचे नाव प्रत्येक क्षणाला मोठं केलं. संपूर्ण जगाला कौतुक वाटेल असं अशी कामगिरी सानिया मिर्झा यांनी करून ठेवली आहे. २०१५  मधील विम्बल्डन महिला दुहेरी स्पर्धेच विजेतेपद आणि २००९ ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी.

२०१२ च फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेतील विजेते पद आणि २०१४ चे यूएस ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेतील विजेतपद असे तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद आणि एका ग्रँड स्लॅम महिला दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद अशी चार अजिंक्यपदे मिळवून सानिया मिर्झा यांनी नवीन विक्रम तयार केला. आज सानिया मिर्झा या ३४ वर्षांच्या आहेत.

परंतु त्यांनी करून ठेवलेली कामगिरी भरपूर मोठी आहे. त्यांचं टेनिस विश्वातील योगदान शब्दात मांडण्यासारखा नसलं तरी आज अनेक या क्षेत्रातील महिलांना त्यांनी प्रोत्साहित केलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्याशी विवाह केल्यामुळे त्यांना समाजाच्या बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला यामध्ये भारताच्या नागरिकत्वाच्या प्रश्नांवर ही बरेच वाद विवाद झाले.

पुरस्कार

टेनिस क्रीडा क्षेत्रामध्ये सानिया मिर्झा यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून जी अव्वल कामगिरी बजावली आहे याच्यासाठी त्यांचा गौरव करणे अत्यंत आवश्यक आहे. सानिया मिर्झा यांनी कौशल्याने स्वतःच्या हिमतीवर अनेक सामने जिंकले अनेक सुवर्णपदके मिळवली परंतु त्यासोबतच त्यांना वेगवेगळे नागरिक व क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्यातीलच काही पुरस्कार म्हणजे २००४ मध्ये सानिया मिर्जा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००५ मध्ये डब्ल्यू. टि.ए. न्यू कमर ऑफ द इयर हा अवॉर्ड सानिया मिर्झा यांना प्रदान करण्यात आला. सन २००६ मध्ये भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जाणारा “पद्मश्री” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

२०१५ मध्ये सानिया मिर्झा यांना राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार प्राप्त झाला. २०१६ मध्ये सानिया मिर्झा यांना “पद्मभूषण” यासारख्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. २०१६ मध्ये त्यांना एन आर आय ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. तेलंगणा सरकारनेदेखील २०१४ साली सानिया मिर्झा यांना आपल्या राज्याची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं. टाईम मासिकाद्वारे २०१६ मध्ये १०० सर्वाधिक प्रेरणादायक लोकांच्या यादी मध्ये सानिया मिर्झा यांना सहभागी करून घेण्यात आलं होतं.

आम्ही दिलेल्या sania mirza information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सानिया मिर्झा यांची माहिती मराठी sania mirza mahiti बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about sania mirza in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of sania mirza in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sania mirza information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!