पी व्ही सिंधू माहिती PV Sindhu Information in Marathi

PV Sindhu Information in Marathi – PV Sindhu Chi Mahiti Marathi Madhe पी. व्ही. सिंधू संपूर्ण माहिती मराठी भारतात सर्व क्षेत्रात आपली उत्कृष्ट, अलौकिक कामगिरीने देशाचे नाव गाजवणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यामधील एक नाव म्हणजे पी.व्ही.सिंधू. यांनी आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने बॅडमिंटन खेळामध्ये मोलाची कामगिरी करून स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.

जागतिक क्रमवारीत भारतीय महिला बॅडमिंटन पटू असणारी पी.व्ही.सिंधू ऑलिंपिक मध्ये भारताला एकेरी बॅडमिंटन मध्ये रौप्य पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला ठरली.

पी. व्ही. सिंधू यांच्या अलौकिक कामगिरीमुळे २०१५ ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री प्राप्त करणाऱ्या पहिल्या कमी वयाच्या खेळाडू ठरल्या.

pv sindhu information in marathi
pv sindhu information in marathi

पी व्ही सिंधू माहिती – PV Sindhu Information in Marathi

जन्म नावपुसारला वेंकटा सिंधू
जन्मदिनांक आणि स्थळ५ जुलै, १९९५

हैद्राबाद, आंध्रप्रदेश, भारत

उंची५ फुट १० इंच (१.७९ मीटर)
वजन६५ किलो (१४० पौंड)
खेळाचा प्रकारबॅडमिंटन
कार्यकाळ२००८ पासून
हातउजवा
स्पर्धा३४९ विजयी, १४९ हार
प्रशिक्षकपुल्लेला गोपीचंद
आईपी.विजया
वडीलपी.व्ही.रमण
पुरस्कारपद्मश्री पुरस्कार (२०१३)

अर्जुन पुरस्कार (२०१५)

राजीव गांधी खेलरत्न (२०१६)

पद्मभूषण (२०२०)

बालपण आणि शैक्षणिक जीवन

पीव्ही सिंधू हिचा जन्म आंध्रप्रदेश मधील हैद्राबाद (सध्याचा तेलंगणा) येथे मध्ये ५ जुलै १९९५ ला एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पीव्ही रमण आणि आईचे नाव पी विजया असे आहे. हे दोघेही राष्ट्रीय स्तरावरील माजी व्हॉलीबॉल पटू आहेत. पी.व्ही.रमण यांनी १९८६ मध्ये साउथ कोरिया मध्ये झालेल्या आशियन स्पर्धेत कास्य पदकावर आपल्या नावाचा ठसा उमठवला होता.

पी.व्ही रमण यांना त्यांच्या व्हॉलीबॉल खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन २००० मध्ये भारत सरकारने खेळातील प्रतिष्ठीत आणि सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. सिंधू यांच्या आई पी विजया या मुळच्या आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथील आहेत.

पीव्ही सिंधू यांचे आई वडील राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांच्या अंगीही लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती होती. पण पीव्ही सिंधू यांनी करियर व्हॉलीबॉल पेक्षा बॅडमिंटन मध्ये करण्याचे ठरवले. सिंधूचे शालेय शिक्षण हे ओक्ज़िलिअम हायस्कूल हैद्राबाद (Auxilium high school hyderabad) मधून पूर्ण केले. आणि त्यानंतरचे शिक्षण एसटी. अन्स कॉलेज ऑफ वुमेन हैद्राबाद (St. Ann’s College of Women Hyderabad) मधून पूर्ण केले.

खेळातील कारकीर्द

त्यांना लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळायला आवडायचे. बॅडमिंटन मधील राष्ट्रीय लेवल चे खेळाडू तसेच २००१ ऑल ईंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन पुल्लेला गोपीचंद यांचा प्रभाव तिच्यावर पडला होतं. त्यामुळे पीव्ही सिंधू यांनी वयाच्या ८ व्या वर्षापासून खेळायला सुरुवात केली. सिंधू यांना बॅडमिंटनचे प्राथमिक प्रशिक्षक म्हणून मेहबूब अली हे लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधू यांनी बॅडमिंटन खेळातील सर्व मुलभूत माहिती शिकून घेतली. त्यानंतर सिकंदराबाद मधील भारतीय रेल्वे इन्स्टीट्युट मधून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे पीव्ही सिंधू यांनी पुल्लेला गोपीचंद अॅकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधू ने  प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.  

वयाच्या १४ व्या वर्षापासून म्हणजेच वर्ष २००९ पासून खऱ्या अर्थाने बॅडमिंटनमधील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.२००९ ला श्रीलंका मधील कोलंबो येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये पीव्ही सिंधू सहभागी झाल्या आणि त्यामध्ये त्यांना कास्यपदक मिळाले.

२०१० – २०११

 • वर्ष २०१० च्या इराण फजर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज मध्ये एकेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले.
 • वर्ष २०१० मध्ये मेक्सिको मध्ये आयोजित केलेल्या BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती.

२०१२ – २०१५

 • २०१२ मध्ये पी.व्ही.सिंधू यांनी जगातील टॉप ट्वेन्टी वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग मिळवली होती. जगाच्या टॉप ट्वेन्टी मध्ये येणारी पी.व्ही.सिंधू हि पहिली सर्वात कमी वयाची ठरली.
 • वयाच्या १६ व्या वर्षी ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही.सिंधू या सहभागी झाल्या होत्या.
 • ७ जुलै २०१२ ला आशियन जुनिअर चॅम्पियनशिप मध्ये जापनीज खेळाडू नोझोमी ओकुहारा यांच्यावर मात करून आशियायी कनिष्ठ चॅम्पियनशिप जिंकली होती.
 • श्रीनगर मध्ये आयोजित ७७ सिनिअर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये भारतीय बॅडमिंटन पटू ‘सायली गोखले’ यांचा पराभव केला होता.
 • २०१३ ला आशियन चॅम्पियनशिप मध्ये यांच्या खेळीचे उत्कृष्ट प्रदर्शन उपांत्य फेरीत पोहोचल्या. आणि त्यांनतर त्यांना जपानच्या एरीको हिरोसे कडून हार मानावी लागली. त्यावेळी पी.व्ही.सिंधू यांनी  त्यांच्या करीयरमधील सर्वोत्तम क्रमवारी १५ गाठली.
 • मलेशियन टायटल मध्ये सिंगापूरच्या गु जुआनचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मलेशिया ओपन ग्रा प्री गोल्ड स्पर्धेत पी.व्ही. सिंधू यांनी सुवर्णपदक मिळविले.
 • २०१३ मध्ये त्यांनी बीडब्लूएफ जागतिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. बीडब्लूएफ जागतिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या. सिंगल मॅच मध्ये कास्यपदक १९८३ मध्ये प्रकाश पदुकोन यांनी मिळविले होते, त्यांच्यानंतर पी.व्ही. सिंधू यांचे नाव घेतले जाते.
 • २०१४ ला पी.व्ही. सिंधू या इंडियन ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड मध्ये वरिष्ठ प्रतिस्पर्धी ‘सायना नेहवाल’ यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
 • त्यांना २०१४ च्या “राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा” मध्ये पराभव स्वीकारावा लागला.
 • २०१४ मध्ये पी.व्ही.सिंधू यांनी मलेशियन बॅडमिंटनपटू टी जिंग यी यांना पराभूत करून कास्यपदक जिंकले होते.
 • डेन्मार्क येथे आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पी.व्ही.सिंधू या पहिल्या भारतीय महिला खेळाडू होत्या ज्यांनी स्पेन च्या खेळाडू कॅरोलिना मरीन यांना पराभूत करून भारताला कास्यपदक जिंकून दिले होते.
 • २०१५ च्या आशियायी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, पण त्यांना हार स्वीकारावी लागली.
 • नोव्हेंबर २०१५ मध्ये macau open grand prix स्पर्धेत सिंधूने जापनीज खेळाडू मिनातु मितानी यांचा पराभव करत सुवर्णपदक (तिच्या कारकिर्दीतील तिसरे पदक) मिळविले.

२०१६ आणि २०२० च्या ऑलिंपिकमधील कामगिरी  

वर्षस्पर्धेचे ठिकाणप्रतिस्पर्धीगुणपदक
२०१६रिओ डे जनेरिओ, ब्राझीलकॅरोलिना मरीन२१-१९, १२-२१,१५-२१रौप्य
२०२०मुसाशिनो फोरेस्ट स्पोर्ट्स प्लाझा, टोकयो, जपानहे बिन्ग्जिओ२१-१३, २१-१५कास्य

BWF जागतिक स्पर्धा

वर्षठिकाणपदक
२०१३चीनकास्य
२०१४डेन्मार्ककास्य
२०१७स्कॉटलंडरौप्य
२०१८चीनरौप्य
२०१९स्विझर्लंडसुवर्ण

 आशियायी स्पर्धा

वर्षठिकाणपदक
२०१८इंडोनेशियारौप्य

आशियन चॅम्पियनशिप

वर्षठिकाणपदक
२०१४साउथ कोरियाकास्य

पुरस्कार आणि सन्मान

साल पुरस्कार
२०१३अर्जुन पुरस्कार
२०१५पद्मश्री
२०१६राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२०२०पद्मभूषण पुरस्कार
 • २०१४ – इंडियन ऑफ द इअर सन्मान.
 • २०१५ – मकाऊ ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे १० लाख रोख व प्रशस्ती पत्रक.
 • २०१६ – मलेशिया मास्टर्स जिंकल्याबद्दल असोसिएशन ऑफ इंडिया ने ५ लाख रोख व प्रशस्ती पत्रक.
 • २०१६ – रिओ ऑलिंपिक मध्ये शानदार कामगिरीबद्दल तेलंगणा सरकारने ५ करोड चे रोख बक्षीस आणि १० एकर जमीन पुरस्कार स्वरूपात दिली.
 • दिल्ली सरकारने २ करोड चे रोख बक्षीस दिले.
 • मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर अँड स्पोर्ट्स कडून ५० लाख रोख बक्षीस.
 • हरियाणा आणि मध्यप्रदेश सरकारतर्फे प्रत्येकी ५० लाख रुपये बक्षीस.
 • बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा ५० लाख रोख बक्षीस.
 • इंडियन ऑलिंपिक असोसिएशन द्वारा ३० लाख रोख.
 • ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन तर्फे ५ लाख रोख बक्षीस.
 • हैद्राबाद डीस्ट्रीक्ट बॅडमिंटन असोसिएशन द्वारा १ कार बक्षीस.

वैयक्तिक जीवन

पी.व्ही सिंधू जुलै २०१३ पासून भारत पेट्रोलियमच्या हैद्राबाद कार्यालयात सहाय्यक क्रीडा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. ऑलिंपिक मध्ये रौप्य पदक मिळविल्यानंतर तिची उप क्रीडा व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०१७ मध्ये पी.व्ही सिंधू यांना ब्रिजस्टोन इंडिया च्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. याचा पदभार त्यांनी ऑगस्ट मध्ये स्वीकारला.

२०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पी.व्ही.सिंधू या भारतीय दलाची ध्वजवाहक होती. मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात नमूद केले आहे कि, प्रत्येक दिवसाच्या अनुमोदनाच्या कमाईच्या बाबतीत पी.व्ही.सिंधू हि भारतीय क्रिकेटर विराट कोहली नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पी.व्ही.सिंधू यांनी जेबिएल, ब्रिजस्टोन टायर्स, स्पोर्ट्स ड्रिंक गेटोरेड, पेन रिलिव्हर मलम मूव, नोकिया, मिंत्रा, इत्यादी कंपन्यांशी अनुमोदन करार केले आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये तिने चीनी क्रीडा ब्रँड ली निंग सोबत ५०० दशलक्ष चा चार वर्षाचा क्रीडा प्रायोजक करार केला आहे. आणि तिचा हा करार बॅडमिंटन मधील जगातील सर्वात मोठा करार आहे.

आम्ही दिलेल्या pv sindhu information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पी. व्ही. सिंधू संपूर्ण माहिती मराठी pv sindhu chi mahiti बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pv sindhu information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about pv sindhu in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pv sindhu chi mahiti marathi madhe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!