Saina Nehwal Information in Marathi सायना नेहवाल बद्दल माहिती भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित बॅडमिंटन खेळाडू पैकी एक म्हणजे सायना नेहवाल. सायना नेहवाल हिचा जन्म १७ मार्च १९९० मध्ये भारतातील हरियानामधील हिसार या शहरामध्ये झाला आणि तिच्या वडिलांचे नाव हरवीरसिंग आणि आईचे नाव उषा राणी असे होते. तिचे पालक देखील बॅडमिंटन खेळाडू असल्यामुळे तिला देखील बॅडमिंटन खेळाची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली आणि तिच्या वडिलांचे देखील स्वप्न होते कि आपली मुलगी देखील एक चांगली बॅडमिंटन खेळाडू व्हावी.
ज्यावेळी सायना नेहवाल हिचे कुटुंब हैद्राबादला स्तलांतरित झाले तेंव्हा ती फक्त १८ वर्षाची होती आणि बहुतेक तिने तेथूनच बॅडमिंटन खेळ खेळण्यास सुरुवात केली. सायना नेहवाल हिने वयाच्या १८ व्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली तिने सर्व प्रथम नानी प्रसाद यांच्याकडे प्रशिक्षण घेतले त्यानंतर तिने एस एम आरिफ आणि पुलेला गोपीचंद यांच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले.
तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चांगली कामगिरी केली त्यामधील काही महत्वाच्या आणि प्रसिध्द कामिगीऱ्या म्हणजे सायना नेहवाल हि ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनसाठी पदक जिंकणारी पहिली महिला आहे तसेच ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणारी ती पहिली महिला, आणि सुपर सीरिज स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय आहे.
सायना नेहवाल यांची माहिती – Saina Nehwal Information in Marathi
नाव | सायना नेहवाल |
ओळख | बॅडमिंटन खेळाडू |
जन्म | १७ मार्च १९९० |
जन्म ठिकाण | भारतातील हरियानामधील हिसार या शहरामध्ये हिंदू जाट कुटुंबामध्ये झाला |
वजन | ६५ किलो |
उंची | ५ फुट ५ इंच |
वडिलांचे नाव | हरवीरसिंग |
आईचे नाव | उषा राणी |
भाऊ | अबू चंद्रांशु नेहवाल |
बालपण आणि कौटुंबिक माहिती
सायना नेहवाल हिचा जन्म १७ मार्च १९९० मध्ये भारतातील हरियानामधील हिसार या शहरामध्ये हिंदू जाट कुटुंबामध्ये झाला आणि तिच्या वडिलांचे नाव हरवीरसिंग आणि आईचे नाव उषा राणी असे होते. तिने तिचे बालपण हिसार शहरामधेच घालवले आणि तिने तिचे शालेय शिक्षण देखील तेथे असणाऱ्या चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाच्या कॅम्पस शाळेत पूर्ण केले.
तिचे पालक देखील बॅडमिंटन खेळाडू असल्यामुळे तिला देखील बॅडमिंटन खेळाची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. ज्यावेळी सायना नेहवाल हिचे कुटुंब हैद्राबादला स्तलांतरित झाले तेंव्हा ती फक्त १८ वर्षाची होती आणि बहुतेक तिने तेथूनच बॅडमिंटन खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर तिने आपले पुढील शैक्षणिक शिक्षण म्हणजेच १२ वी चे शिक्षण सेंट अॅन्स कॉलेजमधून पूर्ण केले.
लहानपणी ती बॅडमिंटन खेळासोबत तिला कराटे खेळाची देखील खूप आवड होती आणि ती कराटे मध्ये ब्राऊन बेल्ट चॅम्पियन आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे.
- नक्की वाचा: मेरी कोम या महिला बॉक्सर खेळाडू विषयी माहिती
खेळाची सुरुवात
सायनच्या वडिलांनी आपल्या मुलगीच्या योग्य प्रशिक्षक आणि संस्थेकडून प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांनी भविष्य बचत निधीमधील सर्व बचत काढून तिला नानी प्रसाद यांच्याकडे बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी पाठवले. नानी प्रसाद हे लाल बहादूर शास्त्री स्टेडीयमवर बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण देत होते जे तिच्या घरापासून २० ते २५ किलो मीटर अंतरार होते.
हे स्टेडीयम घरापासून लांब असल्यामुळे तिचे वडील किंवा आई तिला सोडायला जात होती. थोडे दिवस सायना नेहवाल हिने नानी प्रसाद यांच्याकडे बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण घेतले मग त्यानंतर तिने नाव लौकिक असणाऱ्या एस एम आरिफ आणि पुलेला गोपीचंद यांच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये आपले पुढील प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि ती तेथे आपले पुढील बॅडमिंटन प्रशिक्षण घेवू लागली.
तिच्या जिद्दीने आणि कष्टाने तिला २००३ मध्ये बॅडमिंटनच्या इंडिया सॅटेलाईट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्या तिच्या पहिल्या स्पर्धेत १६ वे स्थान मिळवले आणि ती तिच्या आई वडिलांच्या मदतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाचा भाग बनत गेली.
बॅडमिंटन खेळातील करिअर – career
सायना नेहवाल हि एक भारतातील भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित बॅडमिंटन खेळाडू पैकी एक आहे जी ऑलंपिक खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवणारी पहिला महिला बॅडमिंटन खेळाडू आहे. २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती पहिली महाला होती पण क्वार्टर फायनलमध्ये तिला यश मिळाले नाही.
परंतु तिच्या या कामगिरीमुळे तिच्या करिअरला एक दिशा मिळाली. नंतर २०१० मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुट स्पर्धेमध्ये तिने मेव चू हिला हरवून सुवर्णपदक मिळवले. आता सायना नेहवाल हि भारतीय खेळाडू महिला बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारताचे स्थान उंचावले आहे.
सायना नेहवाल हिची बॅडमिंटन खेळातील कामगिरी – achievements
- सायना नेहवाल हिने बेंडिगो येथे झालेल्या २००४ मधील राष्ट्रकुल युवा खेळामधील रौप्य पदक जिंकले होते.
- २००६ मध्ये पुण्यामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ युवा खेळांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.
- २००६ च्या जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सायनाने मुलींच्या एकेरीत रौप्यपदक मिळवले होते.
- २०१० मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने मेव चू हिला हरवून सुवर्णपदक मिळवले आणि तिने याच स्पर्धेमध्ये मिश्र संघामध्ये रौप्य पदक पटकावले होते.
- पुन्हा एकदा पुण्यामध्ये झालेल्या २००८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक जिंकून ती यशस्वी झाली होती.
- सायना नेहवाल हि २०११ मध्ये झालेल्या बी डब्यु एफ सुपर सिरीज मास्टर अंत्य फेरीमध्ये पोहचणारी पहिली महिला बॅडमिंटन खेळाडू होती.
- लंडन मध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये, सायना नेहवालने कांस्य पदक मिळवले, तसेच ती बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक पटकावणारी ती पहिली भारतीय बनली.
- तसेच तिने २०१४ मधील चीन सुपर सिरीज प्रीमियर जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे.
- २०१५ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत जकार्तामध्ये तिने रौप्य पदक मिळवले.
- २०१५ मध्ये सायना नेहवाल हि बीडब्ल्यूएफ रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आणि ती सध्या जगामधील सहाव्या क्रमांकावरील बॅडमिंटन खेळाडू आहे.
- २०१८ मध्ये तिने आशियन खेळामध्ये आशियन बॅडमिंटन मेडल जिंकून ती हे जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू बनली.
सायना नेहवाल हिला मिळालेले पुरस्कार – awards
सन | पुरस्कार |
२००९ | क्रीडा क्षेत्रातील सीएनएन आयबीएन इंडियन ऑफ द इयर |
२००९ | बॅडमिंटनसाठी अर्जुन पुरस्कार |
२०१० | पद्मश्री |
२०१० | राजीव गांधी खेळ रत्न |
२०१५ | वर्षातील मोठा मनोरंजक खेळाडू |
२०१६ | पद्म भूषण |
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये saina nehwal information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर information of saina nehwal in marathi म्हणजेच “बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांची माहिती” saina nehwal information in marathi pdf यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या महिला खेळाडू सायना नेहवाल या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि saina nehwal information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट