संत एकनाथ महाराजांची माहिती Sant Eknath Information In Marathi

sant eknath information in marathi पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, समुद्राचं मर्यादा सांडेल पण संतांची शांतता कधी भंगणार नाही. असेच शांततेचे सागर असणारे संत एकनाथ महाराजांचं जन्म ई.स. १५३३ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या गावी एका खानदानी ब्राम्हणाच्या (कुलकर्णींच्या ) घरात झाला. संत एकनाथांचा जन्म संत भानुदास यांच्या कुळात झाला. नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्ण देवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत आणली, हा इतिहास आहे. भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते. ते सूर्याची उपासना करीत असत. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव संत एकनाथांचे वडिलांचे नाव सुर्यनारायण ठेवले. संत एकनाथांच्या आईचे नाव रुक्मिणी होते. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे संत एकनाथांचे संगोपन त्यांच्या आजोबानी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. नाथांचा विवाह पैठण जवळच्या वैजापूर येथील गिरिजाबाई हिच्याशी झाला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरीपंडीत झाला. संत एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरीपंडीत यांनी संत एकनाथांच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले.  कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. 

संत नामदेव महाराज माहिती 

sant-eknath-information-in-marathi
sant eknath information in marathi

संत एकनाथ महाराजांची थोडक्यात माहिती (Sant Eknath Information In Marathi)

नाव एकनाथ
जन्म ई.स. 1533 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण (महाराष्ट्र)
गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण
आईरुख्मिणी
वडीलसुर्यनारायण
पत्नीगिरिजाबाई
मुलेगोदावरी, गंगा आणि हरी
मृत्यूफाल्गुन वद्य षष्ठी (26 फेब्रुवारी ई.स. 1599)

संत एकनाथ महाराजांची कथा

संत एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्मज्ञानांची व हरिकीर्तनाची आवड होती. बालपणीच खांद्यावर वीणा म्हणून फळी घेऊन देवापुढे भजन करण्यात एकनाथ तल्लीन होऊन जाई. शान्तिभ्रहम, ‘संत’ पदाला पोहचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ‘ज्ञानाचा एका’ या ब्रीदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ.  

संत एकनाथ महाराज यांनी वयाच्या १२ व्या वर्षी  देवगड (देवगिरी) च्या सद्गुरू जनार्दन स्वामीं यांना आपले गुरु मानले. हे मुळचे चाळीसगावचे रहिवाशी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथ यांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. त्यांच्याकडून संत एकनाथ यांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. संत एकनाथ यांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात.या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरातीमधून केले.

                        त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । 

                   समाधी न ये ध्याना हरली भवचिंता ||

द्वारपाल म्हणून ते नाथांच्या द्वारी उभे असत असे सांगितले जाते. आत्मबोध, पुर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तोत्रय यांचे दर्शन यांमुळे संत एकनाथ यांचे जीवन धन्य झाले. गुरुंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला.

 

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला आणि कर्मकांड, कर्मठपणा असताना एकनाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साध घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारुड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ‘एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

संत एकनाथ महाराजांचे चरित्र

चतुःश्लोकी भागवत ही नाथांची पहिली रचना. सृष्टीच्या आद्यंती असलेल्या नारायणाचे व भागवत धर्माचे निरुपण त्यात आढळते. संत एकनाथ महारांजाच्या साहित्यामध्ये ‘एकनाथी भागवत’ ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय. ही एकादश स्कांदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथ यांनी लिहिल्या आहेत. संत एकनाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणी स्वयंवर हे काव्य लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेली ‘त्रिगुणात्मक त्रेमुर्ति’ ही दत्तात्रयाची आरती आजच्या घडीलाही प्रचलित आहे. संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचे पहिल्यांदा शुद्धीकरण करून लोकांना दिली. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्पुट लेखन संत एकनाथांनी केले. शुकाष्टक,  आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ संत एकनाथांनी लिहिले.  

जातीयतेला विरोध करणारे कृतीशील संत

संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते, असे म्हंटले जाते. त्यांनी संत भारुडे ,अभंगांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. डोळस आणि कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. अमृताहुनी गोड मराठी भाषेला त्यांनी लोकभाषा बनविली.

 आधी आचरण, मग उपदेश

केवळ उपदेश नाही तर आपल्या कृतीतून दाखवून देणे, हीच उक्ती त्यांनी नेहमी प्रत्ययाला आणून दिली. म्हणजे संत एकनाथ होय. अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन हरीजनवाड्यात पोहोचवणे, वडिलांच्या श्राद्धाला ब्राम्हणासाठी शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे, गाढवाला गंगोदक पाजणे, पाषाणाच्या नंदीला गवताचा घास भरवणे यांसारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिका वरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ प्रत्यक्ष बाणलेला होता हे दिसून येते. संत एकनाथांनी मानवात देव पाहण्याची शिकवणूक प्रत्यक्ष आपल्या कृतीतून देणे, तत्कालीन जातीभेद नष्ट करण्यासाठी रंजल्या गांजल्यांच्या घरी जाऊन भोजन करणे,लोकसेवा करणे अशा लोकप्रबोधनाच्या कार्यासोबतच भाक्तीमार्गही समाजात रुजवला. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

संत तुकाराम महाराज माहिती 

संत एकनाथ महराज त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंड्याला म्हणाले होते “फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरुजींचा जन्मदिवस आणि निर्वाणदिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याच दिवशी होईल कारण माझे कार्य आता संपलेले आहे” आणि खरोखरच फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१( २५ फेब्रुवारी १६०० ) या दिवशी संत एकनाथ यांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

नाथांचा शेवटचा उपदेश आहे:

            एका जनार्दनी विनंती | येउनी मनुष्य देह प्रती ||

            करोनिया भगवद्भक्ती | निजात्मप्राप्ती साधावी ||

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थोर वारकरी संत एकनाथ महराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant eknath information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant eknath in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant eknath maharaj information in marathi essay language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “संत एकनाथ महाराजांची माहिती Sant Eknath Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!