संत नामदेवांविषयी माहिती Sant Namdev Information In Marathi

sant namdev information in Marathi  आपल्या महाराष्ट्र भूमिला संतांची पवित्र भूमी म्हंटलं जात. महाराष्ट्र खरच खूप भाग्यवान आहे जिथे एकाहून एक थोर संत होऊन गेले. याच संतांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणजे संत शिरोमणी नामदेव.  ज्यांनी एकाहून एक अभंग रचले.(sant namdev in Marathi)वारकरी संप्रदायचे थोर प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविध्येचे आद्य प्रणेते म्हणून संत नामदेवांनी भारतभ्रमण केले. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्थी सखा होता असे मानले जाते. संत नामदेवांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सुमारे २५०० अभंग लिहिले आहेत.

sant-namdev-information-in-marathi
sant namdev information in marathi

अनुक्रमणिका

संत नामदेव माहिती (sant namdev information in Marathi)

नाव  नामदेव दामाशेटी रेळेकर
जन्म  २६ ऑक्टोबर १२७० 
गाव  नरसी नामदेव जि. हिंगोली मराठवाडा
आई गोणाई रेळेकर
वडील दामाशेटी रेळेकर
पत्नी राजाई नामदेव रेळेकर
मुले महादेव, गोविंद, विठ्ठल, नारायण आणि मुलगी लींबाई
मृत्यू ३ जुलै १३५० शनिवार (शके १२७२)

संत नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. ज्ञानेश्वर माऊलीना समकालीन असणाऱ्या संत नामदेव महाराजांचं जन्म नाम संवस्तरात शके १९९२ मध्ये कार्तिक शुध्द एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी (इ.स.२६ ऑक्टोबर १२७०) रोजी नरशी नामदेव या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्यातील गावामध्ये झाला. संत नामदेवांचे पूर्ण नाव “नामदेव दामाशेटी रेळेकर” असे होते. त्यांच्या आईचे नाव गोणाई. त्यांचा व्यवसाय शिंपी होता. संत नामदेवांचा वयाच्या ११ व्या वर्षी सावकारांची मुलगी  राजाई हिच्याची लग्न झाला.

एक मोठी बहिण आऊबाई ,चार पुत्र नारा, विठा, गोंदा, महादा आणि एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्याच परिवारातील एक सदस्य होत्या. विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झालेल्या नामदेवांची संसाराची ओढ कमी होत गेली आणि ते विरक्त होत गेले. त्यांच्या विठ्ठलभक्तीला घरातून विरोध होऊ लागला पण नामदेव पांडुरंगामध्ये इतके लीन झाले होते कि ते माघारी फिरले नाहीत. पुढे त्यांचे अवघे कुटुंबच भाक्तीमार्गाशी एकरूप झाले. 

संत तुकाराम महाराज माहिती 

वारकरी संप्रदायचे थोर प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविध्येचे आद्य प्रणेते म्हणून संत नामदेवांनी भारतभ्रमण केले. संत नामदेवांच्या घराण्यात विठ्ठल भक्तीची परंपरा होती त्यामुळे संत शिरोमणी नामदेव अगदी लहानपणापासूनच विठ्ठलमय झाले होते. बालपण पंढरपुरात गेल्यामुळे पांडुरंगच त्यांचे सर्वकाही होता. पांडुरंगाशी ते संवाद साधत.

अमृताहुनी गोड नाम तुझें देवा ||

मन माझें केशवा कां बा नेघे ||

संत नामदेवांविषयी अख्यायिका अश्या सांगितल्या जातात कि त्यांच्या बालपणी वडिलांच्या आज्ञेनुसार नामदेव विठ्ठलाला नैवेद्य घेऊन देवळात गेले, आणि त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही तर देवापुढे वात बघत बसले कि केव्हा हा खाईल. बालभक्ताची भक्ती पाहून साक्षात विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. एकदा कुत्र्याने चपाती पळवली, त्याला ती कोरडी लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे धावू लागले. आपल्या कीर्तनकलेमुळे साक्षात पांडुरंगाला डोलायला भाग पाडणारे अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्थी सखा होता असे मानले जाते.

एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथांच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन कीर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्या विनंतीस मान देऊन नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले, नामदेवांची भक्ती बगून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर पश्चिमाभिमुख केले ते आजतागायत तसेच आहे.

संत नामदेव गाथा मराठी (information about sant namdev in Marathi)

मराठी भाषांमधील सर्वाधिक जूंन्या काळामधील कवींपैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज. प्रल्हाद बाळांचा अवतार संत शिरोमनी नामदेवांनी १०० कोटी अभंग लिहण्याचा संकल्प केला होता. त्यांनी वज्र भाषेमधेही काव्ये रचली. भागवत धर्माचा प्रचार थेट पंजाब पर्यंत करणारे संत नामदेव शीख धर्मियांचे देखील श्रद्धास्थान आहेत.  संत नामदेवांची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये सुमारे २५०० अभंग लिहिले आहेत. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना केली.

त्यातील सुमारे ६२ अभंग नामदेवजीकी मुखबानी नावाने शीख पंतांच्या गुरुग्रंथसाहेब मध्ये समाविष्ट आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी या ग्रंथातील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार संत श्रेष्ठ नामदेवांनी केला. प्रतिकूल परिस्तिथी मध्येही महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम संत नामदेवांनी केले. त्यांच्या कामातूनच पुढे रामानंद, कबीर, नानक, दादू दयाळ, मीरा, नरसी मेहेता, मलुकदास अश्या संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. महाराष्ट्र आणि पंजाब बरोबरच राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाना, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश मध्ये संत नामदेवांची मंदिरे आहेत.

जमला संतमेळा, अवघा रंग एक झाला.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदि संतांचा मेळा जमला होता. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरु झाली. माणसाला माणूस बनवण्याची त्यांची धडपड होती. १२९१ मध्ये संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांची भेट झाली. ज्ञानदेव नामदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला होता. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. संत नामदेव कीर्तन करत, चोखामेळा टाळकरी बनून त्यांना साथ देत आणि जनाबाई कीर्तनाचे संचलन करत. यानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले.

संत सामेलनामधील चर्चांमधून नामदेवांना भगव्द्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण-निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली.

            नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी

या भूमीकेशी समरस होत त्यांनी आयुष्य वेचलं. आषाढ कृष्ण त्रयोदशीला(शनिवार ३ जुलै १३५०) संत नामदेव महाराजांनी वयाच्या ऐशी व्या वर्षी अत्यंत समाधानाने देह ठेवल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांची इच्छा होती कि पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या संत सज्जनांची पायधूळ माझ्या मस्तकी लागावी. विठ्ठलाच्या मंदिरी ‘पायरीचा दगड’ होण्यात नामदेवांनी धन्यता मानली.त्यांच्या इच्छेनुसार विठ्ठल महाद्वाराच्या पायरीखाली नामदेव महाराजांची समाधी बांधण्यात आली. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे, तर दुसरी पंजाबमधील घुमान येते आहे.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर थोर वारकरी संत नामदेव महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about sant namdev in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant namdev maharaj information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant namdev information in marathi essay असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: