संत गोरा कुंभार यांच्या विषयी माहिती Sant Gora Kumbhar Information In Marathi

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती”

sant gora kumbhar information in marathi असं संतांसाठी म्हंटलं गेलं ते सत्य असल्याची प्रचीती ठायी-ठायी येते. संत महात्मे हे चंदनासारखे भासतात, चंदन जसं स्वतः झिजून इतरांना सुगंध देतं अगदी त्याच प्रमाणे संत स्वतः झिजून जगाच्या कल्याणाचा मार्ग तयार करतात. संसार आणि परमार्थ वेगळा न मानता प्रपंच परमार्थमय करणारे संत गोरा कुंभार gora kumbhar देखील एक श्रेष्ठ संत या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले.

Sant-Gora-Kumbhar-information-in-marathi
sant gora kumbhar information in marathi in short/gora kumbhar/sant gora kumbhar abhang

संत गोरा कुंभार यांचा जीवन परिचय Sant Gora Kmbhar Iformation in Marathi

मूळ नाव संत गोरा कुंभार
जन्म शके 1189 ई.स. 1267
गाव तेरढोकी, पंढरपूर जवळ
पत्नीदोन पत्नी संती आणि रामी
आईरखुमाई 
वडीलमाधवबुवा
मृत्यू(समाधी)शके 1239 ई.स. 20 एप्रिल 1317 (तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद)

संत गोरा कुंभार यांचा जन्म (पुण्यतिथी) गाव

संत गोरोबा कुंभार यांचा जन्म ई.स १२६७ साली झाला, असे संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांचे मत आहे. त्यांच्या आईचे नाव रखुमाई आणि वडिलांचे नाव माधवबुवा. त्यांना संती आणि रामी नावाच्या दोन बायका होत्या. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील ते सर्वात वडील होते आणि सर्वजण त्यांना गोरोबाकाका म्हणत. संत गोरा कुंभार यांचे जीवन एका सर्वसाधारण कुटुंबात व्यतीत झाले. परंतु त्यांनी आपला भक्तीभाव जपला आणि आपला प्रपंच परमार्थमय करून टाकला. संत असल्याचे मानले जाते. गोरा कुंभार हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यांचे २० अभंग उपलब्ध आहेत.
तेर नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. त्यांचे घराणे ‘तेर’ येथील ‘काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे ‘तेर’ गावात माधव बुवांना ‘संत’ म्हणून ओळखत होते. त्यांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली आठही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. ती आठही मुले जिवंत कशी झाली. यासंबंधी एक आख्यायिका संत गोरोबा काका चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे.

संत गोरोबा काका चरित्र 

sant gora kumbhar information in marathi ते आपल्या चरित्रामध्ये म्हणतात, श्री माधवबुवा ‘तेर’ येथील काळेश्वराची उपासना करीत होते. त्यांना आठ पुत्र होते. परंतु ते सर्व एकामागून एक निर्वतले. पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा त्यांनी खिन्न मुद्रा पाहून देवांनी त्यांना विचारले की, तुम्ही दुःखी का? माधबुवांनी सांगितले की, आमची आठही मुले देवाने नेली, म्हणून दुःखी आहोत. नंतर देवाने आठ मुलांना जेथे मूठमाती दिली, ती जागा दाखविण्यास सागितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले, व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले, ‘तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले.’

संत गोरोबा कुंभार (gora kumbhar) यांचे कार्य

संत गोरोबानी भागवत धर्माची प्रतिज्ञा भक्तीचा प्रचार व भक्तीचा प्रसार करणे होती. त्यांनी भक्ती आणि नामस्मरण या साधनांच्याद्वारे ‘करणी करे तो नरका नारायण’ होईल म्हणजेच ‘विठ्ठल भक्तच विठ्ठल होऊन गेले’ अशी ही पंढरीच्या पांडुरंगाची किमया सर्वांना पटवून दिली. पंढरीच्या पांडुरंगाचे नाम महात्म्य सांगताना संत गोरोबा म्हणतात,

“तुझे रूप चित्ती राहो | मुखी तुझे नाम ||”
देह प्रपंचाचा दास | सुखे करी काम ||
देहधारी जो तो त्याचे | विहीत नित्यकर्म ||
तुझ्या परि वाहिला मी | देहभाव सारा ||
उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा ||
नाम तुझे गोरा | होऊनी निष्काम ||”

गोरोबांच्या ह्या अभंगातून कोणीही अनन्य भावांनी वारकरी पंथात यावे कापली अबीर बुक्का लावावा. गळ्यात माळ घालावी आणि पांडुरंगाच नामस्मरण करीत आपला जीवनक्रम चालू ठेवावा. शुद्ध अंतकरणात फक्त भाक्तीभावावरून कळी फुलून द्यावी. म्हणजेच त्या भक्तीचा परिमळ सर्वत्र दरवळतो. इतकेच नव्हे तर तो “देवाचा लाडका पुत्र म्हणून सन्मानित होतो” त्यापैकीच गोरोबाकाका होत. संत गोरोबा संसारात रहात होते. तरीही त्यांची पांडुरंग चरणी एकनिष्ठा होती.

“कासयासी बहु घालिसी मळण, तुज येनेविण काय काज, एकपणे एक एकपणे एक, एकाचे अनेक विस्तारले”

हा त्यांचा पारमार्थिक भाव होता. नुसतीच व्यर्थ बडबड करणाऱ्यांच्या निरर्थकतेला रामराम करून “देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो.” अशा ‘निश्चयाचा महामेरू’, ‘आवडता डिंगरु केशवाचा’ असे संत गोरोबा समाजाच्या खालच्या थरातला एक कुंभार आपण ब्राम्हांडाशी एकरूप झाल्याचा असा विलक्षण अनुभव घेतो कि, जो योग्यानासुद्धा दुर्मिळ असतो. “मौन सर्वार्थ साधनम” हे त्यांचे ब्रीद होते.
संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरडोकी येथे निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, संत चोखामेळा, विसोबा खेचर आदि संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी ‘कोणाचे मडके (डोके) किती पक्के’ अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली होती, असा प्रसंग सांगितला जातो.

संत गोरा कुंभार यांच्या विषयीच्या आख्यायिका

संत गोरा कुंभार हे आपलं नित्यकर्म करत असतांना देखील विठ्ठल नामात तल्लीन असत. कुंभारकाम करत असताना पांडुरंगाचे गुणगान सतत त्यांच्या मुखी असायचे. एकदा त्यांची पत्नी पाणी आणायला गेली असताना आपल्या रांगणाऱ्या मुलाला अंगणात ठेऊन गेली. त्यावेळी अंगणात गोरा कुंभार माती तुडवीत होते नामसंकीर्तनात ते इतके तल्लीन झाले की रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याने भान देखील त्यांना राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि गोरा कुंभार यांच्या पायाखाली तुडविले गेले याची जाणीव देखील त्यांना राहिली नाही.
विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेल्या गोरा कुंभार यांना तुडविताना मुल रडत असल्याचे देखील लक्षात आले नाही. पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले पण तो सापडला नाही. तिचे लक्ष गोरा कुंभार तुडवीत असलेल्या मातीकडे गेले, ती माती रक्ताने लाल झालेली तिला दिसली आणि तिने हंबरडा फोडला.. आकांत केला.. तिच्यावर आणि गोरा कुंभार यांच्यावर आभाळ कोसळले. परंतु पांडुरंगावरच्या निस्सीम भक्तीमुळे त्यांचे मुल जिवंत झाले.

संत गोरा कुंभार अभंग Sant Gora Kumbhar Abhang

“वरती करा कर दोन्ही | पताकाचे अनुसंधानी ||
सर्व हस्त करिती वारी | गोरा लाजला अंतरीं ||
नाम म्हणे गोरोबासी | वरती करावें हस्तासी ||
गोरा थोटा वरती करी | हस्त फुटले वरचेवरी ||”
“निर्गुणांचा संग धरिला जो आवडी | तेणे केलें देशधडी आपणासी ||”
“देवा तुझा मी कुंभार | नासीं पापाचें डोंगर ||”
“वंदावे कवनासी निंदावे कवनासी”
“निर्गुण रुपडे सगुणाचे बुंथी | विठ्ठल निवृत्ती प्रवृत्ती दिसे ||”
“रोहिदासा शिवराईसाठी | दिली पुंडलिका भेटी ||”
“श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी | हरिनामे सोहंकारी सर्व काम ||”
“अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वण”

संत गोरा कुंभार समाधी

शके १२३९ चैत्र कृष्ण त्रयोदशीला (२० एप्रिल १३१७) संत गोरा कुंभार यांनी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्याचं घर आणि मुल तुडवलेली जागा आज देखील भाविक दाखवितात.

आम्ही दिलेल्या sant gora kumbhar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संत गोरा कुंभार यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant gora kumbhar information in marathi short या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sant gora kumbhar information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant gora kumbhar abhang असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!