संत तुलसीदास माहिती Sant Tulsidas Information In Marathi

sant Tulsidas information in marathi उत्तर भारतातील थोर संत, हिंदू संत कवी ज्यांनी आईच्या उदरातून बाहेर निघताच ‘राम’ या नामाचा उच्चार केला असे संत तुलसीदास. तुलसीदासांनी आपल्या काव्यांद्वारे जनजागृती करून जनतेला मानवताधर्म शिकवला आणि आपल्या रसाळ लेखनामुळे ४०० वर्षे अनेक पिढ्यांचे गुरु ठरले. संत तुलसीदास sant tulsidas mahiti हे पिता, माता, भाऊ, यांच्यासाठी आयुष्यभर एखाद्या वैरागी योग्याचे जीवन जगलेल्या प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त होत.

sant tulsidas information in marathi
sant tulsidas information in marathi/sant tulsidas mahiti

संत तुलसीदास जीवन परिचय sant tulsidas information in marathi

नावसंत श्री तुलसीदास
जन्मई.स. १४९७ राजापूर, उत्तरप्रदेश
भाषाअवधी
साहित्यरचनारामचरितमानस, हनुमान चालीसा, दोहावली, इ.
आईहुलसी दुबे
वडीलआत्माराम दुबे
पत्नीरत्नावली
निर्वाणई.स. १६२३वाराणसी

संत तुलसीदास यांचा जन्म श्रावण शुक्ल सप्तमीला इ.स. १४९७ या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम दुबे आणि आईचे नाव हुलसी दुबे. तुलसीदासांचे बालपण फारच कष्टात गेले. त्यांचा जन्म मूळनक्षत्रावर झाला असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा जन्मताच त्याग केला व त्यांना नरहरिदास यांनी वाढविले अशा कथा प्रचलित आहेत. त्यांच्या जन्माबद्दल खालील दोहा प्रसिद्ध आहे.

“पन्द्रह सौ चौवन वीसे कालिन्दी के तीर, श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी धरयो शरीर”

त्यांना आईवडिलांचे सुख फारसे मिळाले नाही. लहानपणी त्यांना एका हनुमानमंदिरात आश्रय मिळाला. त्या दैवताची पूजा ते करू लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांना भिक्षांदेही करावी लागली.

संत तुलसीदास यांची जीवनकथा sant tulsidas mahiti

तुलसीदास यांचा जन्म हा फार अद्भुत असा झाला होता. तुलसीदास हे आपल्या आईच्या गर्भात जवळपास १२ महिने राहिल्यानंतर जन्माला आले. विशेष म्हणजे जन्मताच त्यांना पूर्ण दात देखील होते. जन्माला आल्या आल्या त्यांच्या मुखातून प्रथम शब्द “राम” हा निघाला होता. त्यामुळे त्यांचे नाव रामबोला असे ठेवण्यात आले होते.

तुलसीदास यांच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. तिच्यावर ते इतके प्रेम करत होते कि, ते एक क्षण सुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नव्हते. एके दिवशी रत्नावली माहेरी गेली असता तिला भेटण्याकरिता व्याकूळ झालेले तुलसीदास रात्रीच्या घनदाट काळोखात नदी पार करून गेले. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला आवडली नाही व दोघांमध्ये वाद निर्माण झाला. रत्नावलीने त्यांना खालील दोह्यामधून फटकारले.

“अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रिती,

नेकू जो होती राम से, तो काहे भव-भीत”

या दोह्यामुळे रामबोला चे मनपरिवर्तन झाले व यातूनच तुलसीदास यांचा जन्म झाला.

तुलसीदास लहान असताना नरहरिदास यांनी त्यांना सांभाळले. त्यांनी तुलसीदास यांना आपल्या आश्रमात राहायला जागा दिली. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमता असलेले तुलसीदास यांनी वेदांचे ज्ञान वाराणसी येथून प्राप्त केले. त्यांना हिंदी साहित्य आणि दर्शनशास्त्राचे धडे प्रसिद्ध गुरु शेषा यांच्याकडून मिळाले होते. नंतर ते आपल्या मुळगावी परतले.

संत तुकडोजी महाराज माहिती 

गुरुकडून मिळालेली शिक्षा ते लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत लघुकथा आणि दोहे यांद्वारे सांगत होते. तुलसीदास यांनी संपूर्ण भारतभर यात्रा केली. परंतु त्यांनी जास्तीत जास्त वेळ हा काशी, अयोध्या आणि चित्रकूट येथेच व्यतीत केला. येथूनच त्यांच्या रामभक्तीची सुरुवात झाली. रामभक्तीमध्ये ते इतके तल्लीन होते कि त्यांना राम नामाशिवाय काहीच सुचत नव्हते. श्रीराम प्रती असलेल्या निस्सीम भक्तीमुळेच त्यांना श्रीरामांनी चित्रकूट मधील अस्सी घाट येथे प्रकट होऊन दर्शन सुद्धा दिले होते, असे सांगितले जाते. चित्रकूट घाटावर संतांची गर्दी झाली असताना सर्वांना लावण्यासाठी ते जेव्हा चंदन उगाळत तेव्हा भगवान राम ते घेऊन संतांच्या कपाळावर तिलक लावीत असत..

“चित्रकूट के घाट पै, भई संतान के भीर

 तुलसीदास चंदन घीसे, तिलक देत रघुबीर”   

समाजकार्य

तुलसीदास यांनी भारतभ्रमण केले. सामान्य लोकांमध्ये त्यांनी जनजागृती केली. हिंदू धर्म एक आहे त्याला पंथात विभागू नका असे त्यांनी सांगितले. संत तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.

तुलसीदासांनी आपल्या काव्याद्वारे लोकांना मानवताधर्म शिकवला. लोकांनी आपली संकुचित विचारसरणी सोडून विशाल दृष्टीने जगाकडे पाहावे, असा उपदेश केला.

संत कबीरदास माहिती 

साहित्यरचना

संत तुलसीदास यांनी काशी आणि अयोध्या येथे श्रीरामचरीतमानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या.

श्रीरामचरीतमानस मध्ये त्यांनी चार वक्ते आणि चार श्रोते ह्यांच्यामधील संवादातून रामकथा सांगितली आहे. त्यांनी संस्कृतमधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेत रुपांतर करून त्याचे नाव ‘रामचरीतमानस’ असे ठेवले. ज्ञान, भक्ती आणि स्वार्थातून परमार्थ ह्यांचा सुंदर मेळ यामध्ये साधला आहे. भाषासौंदर्य, प्रभावी प्रसंगचित्रण, उत्तम स्वभावचित्रण आणि संस्कार ह्या सर्वच दृष्टीनी हे काव्य उत्तम मानले जाते.

विनयपत्रिका ह्या गीतस्वरुपातील ग्रंथातून त्यांनी आत्मनिरीक्षण आणि आपल्या अपराधांची कबुली मांडली आहे

आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालीसा ही तुलसीदास यांची रचना आहे.

तुलसीदासांच्या चौपाया भारतीय भावजीवनाचा अविभाज्य भाग बनल्या, कारण त्यात उदात्त आदर्शाबरोबरच रोजच्या जीवनासाठी आवश्यक असलेले शहाणपणही सामावलेले आहे. पावसाळी दिवसात रानात नाचणारा मोर बघून ते लिहितात,

“तुलसी देखि सुबेषु भूलही मूढम् न चतुर नर

सुंदर केकिही पेखु बचन सुधा सम असन अहि”

सुंदर वेशभूषा पाहून केवळ मूर्ख लोकच फसतात असं नाही तर चतुर लोकही बाह्यरूपाने मोहित होतात. त्यांची विचारशक्ती कुंठीत होते. मोराचेच दिसायला सुंदर, त्याचे गाणे ऐकायला गोड वाटते, पण त्याचा आहार विषारी साप हाच असतो.

बरवै रामायण, पार्वतीमंगल, जानकी मंगल हे अवधी भाषेमधील तर विनय पत्रिका, वैराग्य संदिपनी, कृष्ण गीतावली, दोहावली, साहित्य रत्न इत्यादी ब्रज भाषेतील रचना प्रसिद्ध आहेत.

संत तुलसीदास यांचे सुविचार

  • विश्वासाशिवाय भक्ती होत नाही. भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंतांच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही.
  • जेव्हा संतोषरूपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात.
  • विद्यारूपी अंगठीमध्ये विनयरूपी रत्न चमकत असते.
  • परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधी ठेवीत नाहीत.
  • नशिबात जे लिहिलेले आहे, ते विधिलिखित कोणी बदलवू शकत नाही.
  • दुष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले. त्याच्याबरोबर मैत्री ण ठेवलेलीच बरी.
  • दया हाच मानवांचा धर्म आहे.
  • दया करणे म्हणजे उच्चतेप्रत जाणे; परंतु दयापात्र बनणे म्हणजे स्वतःचा तेजोभंग करणे.   

संत तुलसीदास यांचा मृत्यू

आयुष्याच्या शेवटी त्यांना आजारपणाने ग्रासले होते. ई. स. १६२३ मध्ये गंगा नदीच्या किनारी अस्सी घाट येथे त्यांचा मृत्यू झाला. याचा उल्लेख खालील दोह्यात मिळतो,

      “संवत सोलह सौ अस्सी, असी गंग के तीर, श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी तज्यो शरीर”

आम्ही दिलेल्या sant tulsidas information in marathi in short माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री संत तुलसीदास महाराज sant tulsidas mahiti  यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant tulsidas information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tulsidas maharaj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about sant tulsidas in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!