Sev Puri Recipe in Marathi – Shev Puri Recipe in Marathi शेवपुरी रेसिपी मराठी शेव पुरी आणि पाणी पुरी म्हटले कि कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही कारण सर्वांना शेव पुरी आणि पाणी पुरी हा पदार्थ आवडतो आणि कित्येक लोक या पदार्थाचे वेढे आहेत. आज आपण या लेखामध्ये स्वादिष्ट, आंबट गोड आणि तिखट शेव पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. शेव पुरी हा पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ला जाणारा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे आणि हा पदार्थ बनवताना यामध्ये छोट्या छोट्या तळलेल्या कुरकुरीत पुऱ्यांचा मधला भाग तोडला जातो आणि त्यामध्ये बटाट्याचे मिश्रण भरले जाते आणि मग त्यावर तिखट चटणी किंवा गोड चिंच चटणी घालून त्यावर भरपूर बारीक शेव घातली जाते.
आणि सर्व्ह जाते. शेव पुरी हे एक चाट स्नॅक आहे जे खूप लोकांचे प्रिय आहे. शेव पुरी या पदार्थाची विशेषता म्हणजे याला तिखट, गोड आणि आंबट चव देखील असते आणि या तिन्ही चवीमुळे शेव पुरी तोंडात टाकताच एक वेगळेच भाव आपल्या चेहऱ्यावर येतात. शेव पुरी घरी बनवणे खूप सोपे आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग शेव पुरी कशी बनवायची ते पाहूयात.
शेवपुरी रेसिपी मराठी – Sev Puri Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
छोट्या छोट्या तळलेल्या कुरकुरीत पुऱ्यांचा मधला भाग तोडला जातो आणि त्यामध्ये बटाट्याचे मिश्रण भरले जाते आणि मग त्यावर तिखट चटणी किंवा गोड चिंच चटणी घालून त्यावर भरपूर बारीक शेव घातली जाते आणि सर्व्ह जाते.
शेव पुरी रेसिपी – shev puri recipe in marathi
शेव पुरी हि एक भारतीय स्ट्रीट फूड रेसिपी आहे जी लोक खूप आवडीने चाट स्नॅक म्हणून खातात. शेव पुरी घरी बनवणे खूप सोपे आहे आणि कमी वेळेमध्ये बनते परंतु शेव पुरी बनवण्यासाठी साहित्य जास्त लागते. चला तर मग शेव पुरी कशी बनवली जाते आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: दही वडा रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
शेव बनवण्यासाठी भरपूर साहित्य लागते आणि त्यामधील काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग शेव पुरी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- १ वाटी रवा.
- ३ चमचे मैदा
- १/४ चमचा बेकिंग सोडा.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
- अर्धी वाटी चिंच कोळ.
- २ वाटी पाणी.
- २ चमचे हिरवी मिरची पेस्ट.
- २ चमचे जीरा पावडर.
- २ चमचे गुळ.
- १/२ वाटी पुदिन्याचा रस.
- मीठ चवीनुसार.
पुरी मध्ये भरण्यासाठी लागणारे साहित्य
- २ उकडलेल बटाटे.
- १ चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
- १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
- १ वाटी चिंच गुळ चटणी.
- १ वाटी शेव.
- कांदा ( बारीक चिरलेला ).
- सर्वप्रथम एक भांडे घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला आणि मग त्यामध्ये मिरची पेस्ट, पुदिना पेस्ट, चिंच कोळ, जीरा पावडर, गुळ आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून हे तिखट पाणी बाजूला ठेवा.
- आता उकडलेले बटाटे मॅश करून घ्या आणि त्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ घाला आणि ते सारण बनवून ठेवा.
- आता पुरी बनवण्यासाठी सर्व प्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा, रवा, सोडा आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि त्यानंतर त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले घट्ट मळून घ्या.
- मग त्यावर झाकण घालून ते पीठ २५ ते ३० मिनिटे चांगले भिजू द्या.
- २५ ते ३० मिनिटाने ते पीठ परत चांगले मळून घ्या आणि त्याचे चपाती बनवण्यासाठी जेवढे आपण गोळे बनवतो त्या आकाराचे गोळे बनवा आणि ते कोरडा मैदा वापरून चपातीच्या आकारा एवढी लाटून घ्या.
- आणि मग पाणी पुरीच्या आकाराच्या पुऱ्या छोट्या वाटीने किंवा टोपनाणे पाडून घ्या.
- आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करा आणि एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये पुऱ्या लालसर रंगावर तळून घ्या.
- पुऱ्या थोड्या गार झाल्या कि त्यांना एका बाजूने हलक्या हाताने छिद्र पाडा आणि मग त्यामध्ये बटाट्याचे सारण आणि थोडासा कांदा घाला आणि ते एका प्लेटमध्ये ठेवा अश्या प्रकारे ५ ते ६ पुऱ्या बनवा आणि त्या एका प्लेटमध्ये ठेवा.
- आता त्यामध्ये तिखट पाणी घाला मग त्यावर चिंच गुळ चटणी आणि शेव घाला आणि सर्व्ह करा.
टिप्स (Tips)
- पुऱ्या तळतेवेळी तेल चांगले गरम झालेले असावे त्यामुळे पुऱ्या चांगले तळल्या जातील आणि फुगतील.
- शेव पुरी बनवण्याची आणि पाणी पुरी बनवण्याची प्रक्रिया एकाच असते पण शेव पुरी मध्ये जास्त प्रमाणात शेव वापरली जाते
आम्ही दिलेल्या sev puri recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शेवपुरी रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dahi sev batata puri recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sev batata puri recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pani puri sev Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट