Sevai Kheer Recipe in Marathi – Shevayachi Kheer शेवयाची खीर रेसिपी शेवयाची खीर हि एक लोकप्रिय भारतीय डिश आहे. जी भारतातील बहुतेक घरांमध्ये काही खास क्षणांसाठी किंवा आनंदाच्या वेळी किंवा खावू वाटल्यास बनवली जाणारी डिश आहे. शेवयाची खीर बनवताना शेवया सर्वप्रथम तुपामध्ये चांगले गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतल्या जातात आणि मग त्या बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये दुध गरम करून त्यामध्ये भाजलेल्या शेवया, साखर, वेलची पावडर आणि काही ड्राय फ्रुट्स घातले जातात आणि ते शिजवले जातात, अश्या प्रकारे हि खीर बनवली जाते.
शेवयाची खीर हि भारतामध्ये बहुतक भागामध्ये बनवली जाते आणि हि लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडू शकतो. शेवयाची खीर हि बनवण्यासाठी खूप सोपी आणि आणि झटपट म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्या आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून बनते म्हणून आपण जर आपल्या घरी अचानक पाहुणे आले.
आणि त्याच्यासाठी जेवण बनवायचे असेल आणि जेवणामध्ये गोड बनवायाचे असेल तर आपण शेवयाची खीर बनवू शकतो कारण ती झटपट बनते. चला तर आता आपण झटपट आणि चवीला स्वादिष्ट लागणारी शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहूयात.
शेवयाची खीर रेसिपी मराठी – Sevai Kheer Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
शेवयाची खीर म्हणजे काय ?
शेवयाची खीर बनवताना शेवया सर्वप्रथम तुपामध्ये चांगले गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतल्या जातात आणि मग त्या बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये दुध गरम करून त्यामध्ये भाजलेल्या शेवया, साखर, वेलची पावडर आणि काही ड्राय फ्रुट्स घातले जातात आणि ते शिजवले जातात, अश्या प्रकारे हि खीर बनवली जाते.
- शेवया : शेवया हे हि रेसिपी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे जे आपण बाजारातून विकत अनु शकतो. ह्या शेवया तुपामध्ये भाजल्या जातात आणि त्यामध्ये दुध आणि इतर साहित्य घातले जाते आणि शिजवले जाते.
- साखर : शेवयाच्या खिरीमध्ये साखर घातल्यामुळे खिरीला गोडपणा येतो. आपण खिरीमध्ये आपल्या आवडीनुसार म्हणजेच जर कमी गोड आवडत असल्यास कमी आणि जास्त गोड आवडत असल्यास जास्त साखर घालू शकतो.
- वेलची पावडर : वेलची पावडर खिरीमध्ये घातल्यामुळे खिरीला खमंग वास येतो.
शेवयाची खीर हि एक गोड रेसिपी आहे जी एक पारंपारिक रेसिपी आहे म्हणजेच हि खूप पूर्वीपासून बनवली जाणारी रेसिपी आहे. शेवयाची खीर हि भारतामध्ये बहुतक भागामध्ये बनवली जाते आणि हि लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडू शकतो. शेवयाची खीर हि बनवण्यासाठी खूप सोपी आणि आणि झटपट म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्या आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून बनते. चला तर आता पारंपारिक रेसिपी म्हणून ओळखली जाणारी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
शेवया हे हि रेसिपी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे जे आपण बाजारातून विकत अनु शकतो. तसेच जे खीर बनवण्यासाठी इतर साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. चला आता आपण शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ वाटी दुध.
- २ मोठे चमचे शेवया.
- दीड मोठा चमचा साखर.
- ३ ते ४ चमचे तूप.
- २ ते ३ चमचे गव्हाचे पीठ.
- १/२ चमचा वेलची पावडर.
- २ ते ३ चमचे काजू, पिस्ता, बदाम तुकडे.
शेवयाची खीर हि रेसिपी गडबडीच्या वेळी बनवण्यासाठी एक उत्तम रेसिपी आहे आणि हि रेसिपी आपण अगदी सहजपणे आणि कमी वेळेमध्ये बनवू शकतो. चला तर आपण वर दिलेले साहित्य वापरून शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहूयात.
- शेवयाची खीर बनवताना सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि तूप वितळले कि त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे घाला आणि ते तुपामध्ये ३ ते ४ मिनिटे चांगले भाजून घ्या.
- आणि ते भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवा.
- आता त्यामध्ये ३ चमचे तूप घाला तूप गरम झाले कि त्यामध्ये शेवया घाला आणि शेवया मंद आचेवर गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजा त्या चांगल्या भाजल्या कि त्यामध्ये थोडे गव्हाचे पीठ घाला आणि ते देखील २ मिनिटे भाजा आणि शेवया बाजूला काढा. ( टीप : शेवया चांगल्या भाजा नाही तर खीर चांगली होत नाही ).
- आता तेच भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये दुध घाला आणि दुध थोडे गरम होऊ द्या मग त्यामध्ये गव्हाच्या पिठासोबत तुपामध्ये भाजलेल्या शेवया, साखर, वेलची पावडर आणि तुपामध्ये परतून घेतलेले ड्राय फ्रुट्स घाला आणि ते चांगले मिक्स करून खीर ६ ते ७ मिनिटे चांगली शिजू द्या.
- ६ ते ७ मिनिटे खीर मध्यम आचेवर चांगली शिजली कि गॅस बंद करा.
- शेवयाची खीर सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
शेवयाची खीर कश्यासोबत सर्व्ह करावी – serving suggestions
- शेवयाची खीर आपण चपाती किंवा पुरी सोबत खावू शकतो किंवा मग तशीच देखील छान लागते.
आम्ही दिलेल्या sevai kheer recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शेवयाची खीर रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shevayachi kheer या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make sevai kheer माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये seviyan kheer recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट