शलभासन मराठी माहिती Shalabhasana Information in Marathi

shalabhasana information in marathi शलभासन मराठी माहिती, सध्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे आणि ते अनेक कारणांच्यामुळे आहे आणि ह्या प्रदुषणामुळे लोकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे, परंतु जर आपल्याला या समस्यांच्यापासून वंचित राहायचे असेल, तर त्या व्यक्तीला आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली मजबूत करणे आवश्यक आहे आणि जर लोकांना आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असल्यास त्या व्यक्तीला नियमितपणे व्यायाम आणि योग करणे आवश्यक आहे.

कारण योग हि एक अशी क्रिया आहे कि ज्यामुळे आपले आरोग्य तर सुधारण्यास मदत होतेच परंतु आपल्या मनाचा देखील चांगला व्यायाम होण्यास मदत होते. योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो.

नियमितपणे योगाचा अभ्यास करणे म्हणजे आपल्या निरीगी आरोग्याकडे वाटचाल करणे आणि म्हणून जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या चांगल्या आरोग्यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारची योगासने केली पाहिजेत आणि म्हणून आज आपण या लेखामध्ये योगासनाचा एक प्रकार म्हणजे ‘शलाभासण’ विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शलभासन हे एक प्रकारचे योग आसन आहे जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी एक चांगली मुद्रा आहे आणि हे आसन पाठीच्या आणि मणक्याच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे तसेच या आसनाच्या नियमित सरावाने रक्त प्रवाह देखील चांगला होण्यास आणि वाढ होण्यास मदत होते. चला तर खाली आपण शलभासनाविषयी आणखीन माहिती घेवूया. 

shalabhasana information in marathi
shalabhasana information in marathi

शलभासन मराठी माहिती – Shalabhasana Information in Marathi

योग म्हणजे काय ?

योग ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.

शलभासन म्हणजे काय आणि माहिती – meaning and information

शलभासन हे प्रणव योगासन आहे आणि १९६० मध्ये एक पुस्तकामध्ये या असणाविषयी माहिती होती आणि शलभासन हे दोन अक्षरांनी बनलेले आहे. शलभ म्हणजे टोळ आणि आसन म्हणजे मुद्रा आणि असे नाव देण्यास कारण कि हे शेवटच्या स्थितीत टोळ सारखे दिसते. शलभासन या आसनाचे नाव संस्कृत भाषेमधून आले आहे आणि या आसनाला इंग्रजी मध्ये लोकस्ट पोझ (locust pose) म्हणून ओळखले जाते.

शलभासन कसे करावे – method

शलभासन करत असताना काही प्रक्रिया करायची असते आणि ती प्रक्रिया काय आहे आणि शलभासन कसे करायचे या विषयी खाली आपण माहिती घेवूया.

  • तुम्ही शलभासन करत असताना सर्वप्रथम जमिनीवर एक चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
  • आता तुम्ही त्या चटईवर तुमच्या पोटावर झोपा आणि तुमचे पाय सरळ रेषेमध्ये जवळ ठेवा आणि तुमच्या पायाचे तळवे देखील सरळ करा.
  • आता तुमचे दोन्ही हात मागे घ्या म्हणजेच ते हात तुमच्या मांडी पर्यंत येऊ द्या आणि मग पुढे तुमच्या दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवा.
  • आता खोल श्वास घ्या आणि तुमचे डोके आणि छाती वर हळू हळू उचला तसेच तुमचे पाय देखील एका सरळ रेषेत उचला आणि काही वेळ तसेच ठेवा.
  • आता पुढे असणातून आराम घेताना हळुवार श्वास सोडा आणि हळू हळू तुमचे डोके आणि पाय खाली घ्या.

शलभासन फायदे मराठी – benefits of shalabhasana

अनेकजण असे आहेत कि जे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करतात आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची असणे असतात आणि त्याचे काही वेगवेगळे फायदे देखील असतात आणि तसेच शलभासन हे आसन नियमित करण्याचे काही आरोग्य फायदे आहेत ते खाली आपण पाहूया.

  • शलभासन करण्याचा मुख्य फायदा म्हणजे यामुळे आपल्या पाठीचे आणि पाठीच्या कण्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते आणि आपले शरीर देखील लवचिक होण्यास मदत होते.
  • काहींना इतकी भूक लागते कि त्यांना ती भूक नियंत्रण करणे अशक्य असते त्यावेळी अश्या व्यक्तींनी नियमितपणे शलभासन केले तर अश्या व्यक्ती आपली भूक नियंत्रित करू शकतात.
  • या आसनाच्या नियामितपणामुळे शरीरातील स्नायूंना चांगला रक्त पुरवठा होण्यास मदत होते.
  • हे आसन नियमितपणे केल्याने माज्जासंस्थेसाठी ते चांगले असते त्याचबरोबर याच्या नियमित सरावाने आतड्यांच्या संबधित रोग दूर होण्यास किंवा बरे होण्यास मदत होते.
  • शलभासन हे आसन आतंरिक अवयवांना उत्तेजन देते आणि रक्त परीसंचरण वाढवून संपूर्ण शरीराला आराम देते.
  • या आसनाच्या नियमित सरावामुळे छाती, पोट, हात, पाय, नितंब आणि मांड्या या अवयवांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
  • या आसनाच्या नियमित सरावामुळे मन उत्साही राहण्यास मदत होते आणि हे आपले चयापचन सुलभ करण्यासाठी मदत करते.
  • ज्या लोकांना लांब अंतर चालण्यास आवडते अश्या लोकांनी हे आसन नियमित करावे कारण हे लांब अंतर चालण्यासाठी उपयोगी ठरू शकते म्हणजेच हे आसन आपल्या पायांना मजबूत बनवते.

शलभासन हे आसन कोणी करू नये

  • ज्या लोकांना हर्निया किंवा डीजेनेरेटड डिस्क या सारख्या अनेक समस्या आहेत अश्या व्यक्तींनी हे आसन करणे टाळले पाहिजे.
  • हे आसन करत असताना पोटावर ताण पडतो आणि त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी देखील हे आसन करू नये.
  • स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळामध्ये देखील हे आसन करू नये.

शलभासन करण्यासाठी काही टिप्स – tips

  • जर तुम्हाला हे आसन करायचे असेल तर तुम्ही हे आसन करण्याअगोदर एखाद्या व्यावसायिक योग शिक्षकाकडून हे कसे करावे याचे मार्गदर्शन घेवून हे आसन केले तर तुम्हाला हे आसन करण्यास सोपे जाईल.
  • हे आसन करताना करताना या आसन मुद्रेत राहण्याचा कमीत कमी ३० सेकंद प्रयत्न करावा.
  • शलभासन करत असताना तुम्ही तुमचे पाय आणि डोके एकदम उचलू नका तर तुम्ही तुमचे पाय आणि डोके हळू हळू उचला.
  • शलभासन जर तुम्ही नियमित करत असाल तर हे आसन केंव्हाही पहाटेच्यावेळी करा.
  • पाठीच्या समस्या असणाऱ्या व्यक्तीने हे करताना सावधगिरीने केले पाहिजे किंवा त्या संबधित व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे आसन केले पाहिजे.

आम्ही दिलेल्या shalabhasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शलभासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shalabhasana yoga information in marathi या salabhasana information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about shalabhasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!