Shanta Shelke Essay in Marathi शांता शेळके निबंध आज आपण या लेखामध्ये शांता शेळके यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. एक प्रसिध्द कवी आणि लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक कविता, बालसाहित्य, कथा आणि भाषांतरे याचा समावेश त्यांच्या साहित्यामध्ये आहे आणि त्यांनी भारतीय साहित्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, कथा लिहून मोलाची भर पाडली आहे. शांता शेळके यांनी रचलेल्या कविता किंवा गाणी हि लता मंगेशकर, किशोर अमानकर आणि श भोसले या सारख्या प्रसिध्द गायकांनी यांची गाणी गायली आहेत त्यामुळे त्यांच्या गाण्यांच्या रचनांना विशेष महत्व आहे.

शांता शेळके निबंध मराठी – Shanta Shelke Essay in Marathi
Essay on Shanta Shelke in Marathi
शांता शेळके यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावामध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव शांता जनादर्न शेळके असे आहे. त्यांनी शांता शेळके यांनी आपले शिक्षण महात्मा गांधी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि उच्च माध्यमिक विद्यालय हुजूरपागा या दिकाणी त्यांनी हायस्कूल चे शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यामधील सर परशुराम कॉलेज ( एसपी कॉलेज) मध्ये त्यांचे कॉलेज चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमए हि पदवी मराठी आणि संस्कृत मधून पूर्ण केली.
शांता शेळके यांनी त्यांचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नागपूर मध्ये असणाऱ्या हिस्लोप कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी ना. ची. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या नवयुग ह्या साप्ताहिकच्या सहाय्यक संपादक म्हणून शांता शेळके यांनी जवळ जवळ पाच वर्ष काम केले. त्यांनी नागपूर येथे दयानंद महाविद्यालयामध्ये खूप दिवस नोकरी केली आणि मग त्यांनी प्रदीर्घ सेवे नंतर निवृत्ती घेतली.
त्या सेवा निवृत्त झाल्यानंतर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या आणि त्या मुंबई मध्ये आल्यानंतर चित्रपट सेन्सॉर बोर्ड, सरकार पुस्तक पुरस्कार आणि थिएटर परीक्षा मंडळ या ठिकाणी आपली कामगिरी बजावली किंवा आपली सेवा बजावली.
शांता शेळके यांच्या कविता
शांता शेळके ह्या एक प्रसिध्द साहित्यिक होत्या आणि त्यांनी वेगेगल्या प्रकारच्या कथा, कविता, भाषांतरे, कादंबरी, बालसाहित्य यासारखी वेगवेगळ्या लेखन क्षेत्रामध्ये आपली मोलाची कामगिरी केली. शांताा शेळके यांनी अनेक ललित साहित्य लिहिली त्यामधील काही प्रसिध्द ललित साहित्य म्हणजे पावासाधीचा पाऊस, मदारंगी, आनंदाचे झाड, धूलपाटी, संस्मरण या सारखी अनेक ललित संग्रहे त्यांनी लिहिली तसेच त्यांनी अनेक कथा संग्रह देखील तयार केले होते आणि ते कथा संग्रह म्हणजे काचकमळ, कावेरी, गुलमोहर, जहाज, अनुबंध, प्रेमिका आणि सवाष्ण यासारख्या अनेक कथा त्यांनी लिहिल्या.
त्यांनी गोदन, पूर्वसंध्या, कळ्यांचे दिवस फुलांच्या राती, वर्षा, जन्म जाणव्ही, तोच चंद्रमा, रूपासी यासारखे काव्य संग्रह आणि गाणी संग्रह देखील त्यांनी लिहिले. प्रसिध्द साहित्यिक शांता शेळके यांनी अनेक वेगवेगळ्या कादंबऱ्या देखील लिहिल्या आणि त्या म्हणजे माझा खेळ मांडू दे, ओढ, पुनर्जन्म, चिखलदर्याचा मांत्रिक, भीषण छाया, धर्म या सारख्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आणि या सर्व साहित्यावरून समजते कि शांता शेळके या प्रसिध्द कवयित्रीला आणि लेखिकेला लेखनाची किती आवड होती.
शांता शेळके यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातील स्थंभाचे रुपांतर हे हे पुस्तकांमध्ये केले आणी त्यामध्ये एक पाणी आणि जाणता अजाणता हे समाविष्ट होते. मी लेखाची सुरुवात करतानाच सांगितले होते कि त्यांनी लिहिलेली किंवा रचलेली गाणी हि अनेक मोठ मोठ्या गायकांनी गायली आहेत. त्यांनी मराठी साहित्यामध्ये तर मोलाची कामगिरी केलीच आहे पण त्यांनी या योगदानासोबत शांता शेळके यांनी मराठी चित्रपटामध्ये देखील गीत दिले आहे आणि त्या चित्रपटांच्यासाठी गीत देण्यासाठी देखील प्रसिध्द होत्या.
त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरी बद्दल जर सांगायचे म्हंटले तर त्यांनी ३०० हून अधिक चीत्राप्तन्च्यासाठी गाणी लिहिली आहेत. त्यांनी इ.स १९५० मध्ये राम राम पावन या चित्रपटासाठी पहिले गाणे लिहिले होते आणि अश्या प्रकारे त्यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली आणि प्रेक्षकांच्या मनावर कब्जा केला.
शांता शेळके यांची गाणी
त्यांनी काही लोकप्रिय गाणी म्हणजे गणराज रंगी नाचतो, जे वेड लागले मला, रेशमाच्या रेघानी, ऋतू हिरवा ऋतू बरवा, हि वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, पवनेर ग मायेला करू, काटा रुते कुणाला, वादळ वारं सुटलं ग, मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा यासारखी त्यांनी लिहिलेली अनेक चित्रपटातील गाणी प्रसिध्द झाली. तसेच त्यांनी भटाचार्य यांच्या लोकांचे राज्य आचे संस्कृतमधील मराठीमध्ये भाषांतर केले तसेच त्यांनी संस्कृत मध्ये कालिदासांनी लिहिलेले मेघदूत मराठीमध्ये भाषांतर केले आणि अश्याप्रकारे अनेक भाषांतरे केली.
शांताा शेळके यांची मराठी साहित्यातील कामगिरी हि मोलाची होती त्यामुळे त्यांना त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. त्यांनी रचलेल्या मागे उभा मंगेश या गाण्याच्या रचनेसाठी त्यांना पुरस्कार आणि माण्यातासुर सिंगर हा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना इ.स १९९६ मध्ये ग. दि. माडगुळकर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
तसेच त्यांना इ.स १९९६ मधेच परत भृजंग या चित्रपटाच्या गीत लेखनासाठी त्यांना उत्कृष्ट भारताचा पुरस्कार मिळाला होता तसेच त्यंना २००१ मध्ये त्यांच्या मराठी साहित्यातील मोलाच्या कामगिरीसाठी आणि योगदानासाठी देखील यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार मिळाला होता. अश्या प्रकारे शांता शेळके यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची लेखन करून मराठी साहित्यामध्ये मोलाची कामगिरी केली होती.
आम्ही दिलेल्या Shanta Shelke Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शांता शेळके निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते Essay on Shanta Shelke in Marathi या या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट