लता मंगेशकर माहिती Lata Mangeshkar Information in Marathi

Lata Mangeshkar Information in Marathi लता मंगेशकर माहिती मराठी लता मंगेशकर हे नाव भारतीय संगीत क्षेत्रांमध्ये गाजलेलं नाव आहे. मोठ-मोठ्या गायक गायिकांच्या यादीमध्ये लता मंगेशकर हे नाव येतं. लता मंगेशकर यांचा उल्लेख भारताच्या सर्वोत्कृष्ट गायिकांमध्ये येतो. लता मंगेशकर या एक महान गायिका आहेत. भारताची गानकोकिळा अशी लता मंगेशकर यांची विशेष ओळख आहे. लता मंगेशकर यांनी म्युझिक इंडस्ट्रीला एकोणिसाव्या तसेच विसाव्या शतकामध्ये एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलं. लता मंगेशकर यांनी एकोणिसाव्या शतकामध्ये गायलेली सगळी गाणी सुपरहिट होती.

लता मंगेशकर यांचे वय ९१ वर्ष आहे आणि अजूनही त्यांचा आवाज तितकाच मधुर आहे. अजूनही लताजी त्यांच्या मधुर आवाजाने त्यांच्या चाहत्यांना वेड लावतात. आजच्या ब्लॉग मध्ये आपण लता मंगेशकर यांचा जीवन परिचय घेणार आहोत. ‌

lata mangeshkar information in marathi
lata mangeshkar information in marathi

लता मंगेशकर माहिती मराठी – Lata Mangeshkar Information in Marathi

नाव (Name)लता मंगेशकर
जन्म (Birthday)२८ सप्टेंबर १९२९
जन्मस्थान (Birthplace)मध्य प्रदेशमधील इंदूर
वडील (Father Name)दीनानाथ मंगेशकर
आईचे नाव (Mother Name)शेवंती मंगेशकर
लोकांनी दिलेली पदवीगाणं कोकिळा
भावंडं (Siblings)आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, आणि सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर

जन्म

भारताला लता मंगेशकर यांच्या रूपाने एक मधुर आवाज लाभला आहे. लता मंगेशकर यांचं नाव नावाजलेल्या गायक आणि गायिकां मध्ये येतं. २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधील इंदूर येथे झाला. आणि मंगेशकर कुटुंबाला गाणं कोकिळा मिळाली. लता दिदी यांचे बालपण सुखात गेलं.

लहानपणापासूनच त्यांना गायनाचे धडे मिळत होते त्यांचे वडील स्वतः एक गायक होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे वडील त्यांना स्वरांची माहिती द्यायचे व लताजींन कडून गाण्यांचा सराव देखील करून घ्यायचे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण संगीत सृष्टी मध्ये सुप्रसिद्ध आहेत.

त्यामुळे घरामध्ये संगीतमय वातावरण ‌असत. खरंतर एकोणिसाव्या शतकामध्ये मुलींच घराबाहेर पडणं देखील अवघड होतं परंतु असं असतानादेखील लतादीदींना त्यांच्या घरच्यांनी मुख्य म्हणजे त्यांच्या वडिलांनी गाण्याचं प्रशिक्षण दिलं. आणि लताजींनी देखील मंगेशकर घराण्याचं नाव मोठं करून दाखवलं.

परंतु लतादीदी तेरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पण असे असताना देखील त्या खचल्या नाहीत त्यांनी गायनाचा सराव सुरू ठेवला त्यानंतर मास्टर विनायक यांनी लतादीदी आणि त्यांच्या भावंडांची काळजी घेऊन त्यांचं पालनपोषण केलं. त्यांनी लताजींवर चांगले संस्कार देऊन त्यांना गाण्या सोबतच अभिनयाचं प्रशिक्षण दिलं.

कारकीर्द 

लता ताईंचा आवाज आजही सर्व रसिकजनांच्या मनावर राज्य करत आहे. विसाव्या शतकामध्ये लताजींनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. लताजी अगदी पाच वर्षाच्या असल्यापासून त्या आपल्या वडिलांसोबत नाटकांमध्ये अभिनय करायच्या. लताजींच्या वडिलांनी त्यांना संगीताचे धडे कसे गिरवायचे हे शिकवलं.

लता दीदी यांची कारकीर्द एका पार्श्वसंगीता पासून सुरु झाली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल गायन इसवी सन १९४२ मध्ये मंगळागौर या चित्रपटासाठी केलं. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी पार्श्वसंगीत गायलं आहे. नटली चैत्राची हे गाणं लता यांनी गायलं होतं. या चित्रपटांमध्ये त्यांना एक छोटी भूमिका देखील मिळाली होती.

विनायक हे नवयुग चित्रपट कंपनीचे मालक देखील होते. त्यामुळे विनायक यांनी लतादीदी यांच्या आयुष्याची सुरुवात एक गायिका आणी अभिनेत्री म्हणून करून दिली. १९४५ मध्ये विनायक यांच्या कार्यालयाचे स्थलांतर मुंबईमध्ये झाले. आणि लतादीदी या देखील मुंबईमध्ये आल्या. भेंडीबाजारवाले हे संगीतातील प्रसिद्ध घराणं आहे.

यांच्या इथे लता मंगेशकर यांनी हिंदुस्तानी शास्त्रोत्क्त संगीत शिकलं. १९४६ मध्ये वसंत जवळेकर यांचा आपकी सेवा में हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटांमध्ये लतादीदींनी पा लागू कर जोरी हे गाणं गायलं होतं. मुंबईमध्ये आल्यावर लतादीदींची ओळख वेगवेगळ्या गायक-गायिकांशी आणि संगीत दिग्दर्शकांशी झाली.

लताजी या मराठी गायिका आहेत. परंतु त्यांच्या मधुर आवाजामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये देखील गायनाची संधी मिळाली. आणि बघता बघता त्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये इतक्या प्रसिद्ध झाल्या की आज लताजी असं नाव काढलं की लोकांना आधी हिंदी चित्रपट सृष्टी आठवते. लताजींची हिंदी चित्रपट सृष्टीतील वाढती प्रसिद्धी पाहून पुढे जाऊन त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत “लतादीदी” असं नाव पडलं.

लताजींना त्यांच्या मधुर गोड आवाजामुळे संगीत सृष्टीतील मोठमोठे दिग्दर्शक म्हणजेच अनिल विश्वास, शंकर जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, रवी सज्जाद हुसेन, वसंत देसाई, सुधीर फडके या सगळ्या नावाजलेल्या संगीत दिग्दर्शकांसोबत लताजींना काम करण्याची संधी मिळाली.

लताजींनी त्यांच्या संगीत कारकीर्द मध्ये एक वेगळं वळण घेतलं जेव्हा त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असा सर्वप्रथम फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. १९५८ मध्ये मधुमती हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये सलील चौधरी यांनी आजा रे परदेसी हे गीत स्वरबद्ध केलं होतं. लताजींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा अवॉर्ड मधुमती चित्रपटातील हे गीत गायला मुळे भेटला.

लताजींनी गायलेली अनेक हिंदी व मराठी गाणी अजरामर झाली. त्या मधीलच काही गाणी म्हणजे प्यार किया तो डरना क्या हे नौशाद यांनी स्वरबद्ध केलेलं गाणं आहे. १९६२ मध्ये लताजींना दुसरा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. बीस साल बाद हा चित्रपट त्या साली प्रदर्शित झाला होता. कहीं दीप जले कहीं दिल या गाण्यासाठी लताजींनी हा पुरस्कार जाहीर झाला होता.

१९६३ मध्ये ए मेरे वतन के लोगो कवी प्रदीप यांनी लिहिलेल व सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लताजींनी आपल्या भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थित गायलं होतं. हे देशभक्‍तीवर आधारित गीत असून लताजींनी त्यांच्या आवाजात या गीताला अशी काही स्वरांची जादू दिली की देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहताना पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले.

एकोणीसाव्या शतकामधील लोकप्रिय झालेली आज फिर जीने की तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल ही सर्व गाणी लताजींच्या मधुर आवाजातून गायली गेली आहेत. लताजींनी गायलेले प्रत्येक गाणं आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. १९६० च्या दशकामध्ये लताजींनी गायलेली सर्व गाणी सुपर डुपर हिट झाली.

त्यातीलच काही लोकप्रिय झालेली गाणी म्हणजे आपकी नजरोने समझा, लग जा गले, नैना बरसे, तू जहा जहा चलेगा, इत्यादी. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांसारखे महान संगीतकार यांच्यासोबत लताजींनी काम केलं आहे. त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि लताजी यांची जोडी सुपरहिट झाली होती.

या दोघांनी ज्या गाण्यांवर काम करून जी गाणे प्रदर्शित केली ती लोकांमध्ये खूपच गाजली. लतादीदींनी मराठी भाषेमध्ये देखील अनेक गाणी गायली आहेत. त्यासोबतच बंगाली भाषा. या भाषेमध्ये देखील लतादीदींची अनेक गाणी अजरामर झाली आहेत.

लता मंगेशकर फॅमिली 

लताजींचे वडील दीनानाथ मंगेशकर आणि आई शेवंती मंगेशकर. लताजींच्या जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यामुळे त्यांचे वडील पंडित असून ते शास्त्रीय गायक होते. मंगेशकर यांच संपूर्ण कुटुंब गायनासाठी प्रसिद्ध आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर हि चारी लता मंगेशकर यांची सख्खी भावंडं आहेत. याशिवाय लता मंगेशकर यांचे वडिल दिनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीता मधील प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर वय 

लता मंगेशकर यांची संगीत विश्वातील कारकीर्द खूप मोठी आहे. लता मंगेशकर यांनी नुकतीच नव्वदी पार केली आहे. हिंदी संगीत विश्वामध्ये लता मंगेशकर यांना लतादीदी असं संबोधलं जातं. लता मंगेशकर यांची गायनातील कारकीर्द सहा दशकां पेक्षा पण जास्त आहे.

लता मंगेशकर यांनी आतापर्यंत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हजार पेक्षा पण जास्त हिंदी गाणी चित्रपटांसाठी गायली आहेत. लता मंगेशकर यांना वेगवेगळ्या भारतीय भाषा देखील येतात त्यामुळे लता दीदींनी ३७ हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

इतर माहिती

लताजींना २००१ साली भारतातील सर्वोच्च नागरीक पुरस्कार म्हणजेच “भारतरत्न” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. संगीत क्षेत्रातील त्यांचं मोठं योगदान असून, भारताला संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळं नाव दिलं. यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इतकच नव्हे तर लतादीदींचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदवलं गेलं होतं.

लताजींनी सन १९७४ ते १९९१ या कालावधीदरम्यान सर्वात जास्त रेकॉर्डिंग केल्या होत्या. त्यामुळे लता मंगेशकर हे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ध्वनिमुद्रणांच्या उच्चांकासाठी नोंदवले गेले आहे. लताजींच्या मधुर आवाजामुळे लता मंगेशकर यांना भारताची ग्यान कोकिळा अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे.

आम्ही दिलेल्या lata mangeshkar information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “लता मंगेशकर” यांच्या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about lata mangeshkar in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि singer lata mangeshkar information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर lata mangeshkar biography in marathi pdf असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “लता मंगेशकर माहिती Lata Mangeshkar Information in Marathi”

  1. एकोणिसाव्या शतकात ऐवजी विसाव्या शतकात असे पाहिजे होते. आपल्याकडून अजाणतेपणे चूक झाली असावी ते दुरुस्त करून टाका.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!