शेळी पालन माहिती Sheli Palan Project Information in Marathi

sheli palan project information in marathi शेळी पालन माहिती मराठी, सध्या शेतकरी शेती सोबत शेतीच्या संबधित अनेक व्यवसाय करत आहेत, जसे कि दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन व्यवसाय, मत्स्यपालन व्यवसाय, शेळी पालन व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय आणि आज आपण या लेखामध्ये शेळी पालन व्यवसायाविषयी किंवा प्रकल्पाविषयी माहिती घेणार आहोत. शेळी पालन हा एक छोटासा व्यवसाय आहे. जो शेतकरी त्यांच्या शेती सोबत करू शकतात आणि हा व्यवसाय चांगला नफा किंवा फायदा मिळवून देणारा व्यासाय ठरू शकतो.

त्यामुळे अनेक शेतकरी लोक शेती करता करता हा व्यवसाय देखील चालवतात. भारतामधील शेळी पालन व्यवसाय हा एक पुरातन प्रकार आणि विशेषता हा व्यवसाय अश्या ठिकाणी केला जातो जेथे कोरडवाहू शेती पध्दत वापरली जाते. ज्या शेतकऱ्यांच्याकडे शेतीसाठी खूपच कमी क्षेत्रफळ आहे.

असे लोक शेळी पालन प्रकल सुरु करू शकतात आणि त्यामधून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकतात. चला तर खाली आपण शेळी पालन प्रकल्पाविषयी आणखीन सविस्तर माहिती घेवूया.

sheli palan project information in marathi
sheli palan project information in marathi

शेळी पालन माहिती मराठी – Sheli Palan Project Information in Marathi

शेळी पालन व्यवसाय प्रकल्प करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेळ्या

शेळी पालन हे वेगवेगळ्या उत्पादनांच्यासाठी केले जाते आणि वेगवेगळ्या उत्पादनांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या वापरल्या जातात आणि त्या कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

दुग्धव्यवसायसाठी शेळ्या

काही शेतकरी दुध उत्पादनासाठी शेळ्यांचे पालन करतात आणि त्यांच्या शेळी पालन या व्यवसायाचे मुख्य उदिष्ट हे शेळीचे दुध बाजारामध्ये चांगल्या दरामध्ये विकणे. या व्यवसायातून जर मोठ्या प्रमाणत दुध मिळवायचे असेल तर त्या संबधी व्यवसायकाने न्युबियन आणि अल्पाइन या जातींच्या शेळ्या बाळगणे गरजेचे असते कारण या जातीच्या शेळ्या दुधासाठी चांगल्या असतात.

लोकरीसाठीच्या शेळ्या

अनेकदा आपण पाहतो कि लोकर हि शेळी पासून मोठ्या प्रमाणात मिळते आणि म्हणून अनेक शेतकरी लोकर हे उत्पादन मिळवण्यासाठी देखील शेळी पालन या व्यवसाय सुरु करतात. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेळी पालन व्यवसायातून लोकर हे मुख्य उत्पादन काढायचे असेल तर त्याने काश्मिरी शेळ्या किंवा मोहायर ह्या जातीच्या शेळ्या पाळल्या पाहिजेत.

मांसासाठीच्या शेळ्या

सध्या आपण पाहतो कि लोकांच्या आहारामध्ये अनेक प्राण्यांच्या मांस समाविष्ट असते आणि त्यामध्ये शेळीच्या किंवा बकरीच्या मांसाला बाजारामध्ये खूप मागणी आहे त्यामुळे काही शेतकरी शेळीचे मांस विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेळी पालन करतात.

जर एखाद्या व्यावसायिकाला शेळी पालन हे मांस उत्पादनासाठी करायचे असेल तर अश्या व्यावसायिकांनी किको किंवा बोअर या प्रकारच्या शेळ्या पाळल्या तर ते फायद्याचे ठरेल.

शेळी पालनाचे फायदे – benefits

  • शेळी पालन हा असा व्यवसाय आहे जो शेतकरी अगदी सोप्या पध्दतीने आणि कमी खर्चामध्ये करू शकतात आणि हा व्यवसाय त्या संबधित घरातील पुरुष किंवा स्त्रिया देखील अगदी सहजपणे करू शकतात.
  • शेळी पालन हा व्यवसाय म्हशी, गाई किंवा इतर पशु पालानांच्या पेक्षा फायादेशीर आणि सोयीस्कर आहे.
  • शेळीपालन यासाठी आवश्यक असलेली प्रारंभिक गुंतवणूक हि दुग्धव्यवसायापेक्षा खूपच कमी असते.
  • शेळीचे दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामुळे हे दुध लोकांना पिण्यासाठी चांगले असते.
  • शेळी पालन केल्यामुळे शेळीचे दुध, लोकर, खत आणि मांस या सारखी उत्पादने व्यवसायकाला बाजारामध्ये विकता येतात.
  • जर तुम्हाला शेळी पालन करायचे असल्यास तुम्हाला  ७ ते ८ शेळ्यांची गरज नाहीत तर तुम्ही एक शेळी पासून देखील शेळी पालन सुरु करू शकता.
  • शेळी पालन हे फायदेशीर आहे कारण शेळी हि जवळजवळ सर्व प्रकारच्या हवामानामध्ये अनुकूल राहू शकतात.
  • शेळ्याचे एक मुख्य फायदा म्हणजे १६ ते १७ महिन्यांच्या वयात दुध देण्यास सुरुवात करतात.

शेळी पालन करण्यासाठी गृहनिर्माण सुविधा – housing facilities

  • शेळी पालनासाठी गृहनिर्माण करणे आवश्यक असते कारण यामुळे प्राण्यांचे वारा, ऊन आणि पाऊस या पासून संरक्षण होते.
  • ज्यावेळी शेळी पालनासाठी गृहनिर्मिती केली जाते त्यावेळी ते निर्मिती थोड्या उंचावर असली तर ते फायद्याचे ठरू शकते कारण यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याच्या समस्येपासून त्रास होणार नाही.
  • काही ठिकाणी या साठीची गृहनिर्मिती हि सिमेंट वाळू आणि विटांच्यापासून तयार केली जाते आणि हि आधुनिक निर्मिती आहे परंतु पूर्वी आणि सध्या देखील काही ठिकाणी शेळी पालनाच्या गृहनिर्मितीसाठी वाळलेले हत्ती गवत, बांबू, लाकूड आणि वाळलेला भाताचा पेंडा या पासून केली जात होती.
  • गृह्निर्मितीचे क्षेत्रफळ हे शेळ्यांच्या संख्येवर आधारित करावे.
  • शेळ्यांच्या शेडमध्ये चांगल्या प्रकारे वायूविजन असणे आवश्यक असते.
  • कुंपण घातल्यामुळे किंवा गृहनिर्माण केल्यामुळे शेळ्यांचे भक्षक प्राण्यांच्यापासून संरक्षण होते.

शेळी पालन काळजी आणि व्यवस्थापन

जर एखाद्या व्यक्तीने शेळी पालन हा व्यवसाय सुरु केला तर त्या शेळ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते.

  • शेळ्यांची जर चांगल्या प्रकारे वाढ व्हावी असे वाटत असेल तर शेळ्यांना रोजच्या रोज संतुलित आणि पोषक आहार देणे आवश्यक असते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्ये असणे आवश्यक असते.
  • अस्वच्छतेमुळे प्राण्यांना आणि त्यांच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांच्या राहण्याचे ठिकाण आणि कुंपण हे स्वच्छ ठेवा.
  • शेळ्यांचे जास्त वाढलेल्या नखांच्यामुळे होणारे संक्रमण आणि जखम टाळण्यासाठी त्यांचे खुर नियमितपाने छाटा.
  • शेळ्यांना एका ठिकाणी बांधून ठेवण्याऐवजी त्यांना बाहेर चरण्यासाठी ठेवा त्यामुळे देखील शेळ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल.
  • शेळ्यांना वेळोवेळी आहार आणि पाणी द्या.

आम्ही दिलेल्या sheli palan project information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शेळी पालन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Sheli palan project information in marathi wikipedia या Sheli palan project information in marathi ppt article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sheli palan project in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Sheli palan project information in marathi pdf download Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!