सौर ऊर्जा म्हणजे काय ? Solar Energy Information in Marathi

Solar Energy Information in Marathi – Saur Urja Mahatva in Marathi सौर ऊर्जा माहिती मराठी सौर ऊर्जा उद्दिष्ट मराठी मित्रहो, सौरऊर्जा या शब्दावरून अर्थ घ्यायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की सौरऊर्जा या शब्दातील सौर म्हणजे सूर्य होय आणि ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. एकंदरीत, सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून प्राप्त होणारी ऊर्जा होय. जेंव्हा सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अनेक किरणं एकत्रित आणून ऊर्जा निर्माण केली जाते, तेंव्हा त्या प्रक्रियेला ‘सौरऊर्जा उत्पादन’ असे म्हटले जाते. याखेरीज, सौरऊर्जा म्हणजे सूर्याच्या किरणांचे विद्युत रुपांतरण. जसे की, थेट पीव्ही किंवा सी. एस. द्वारे अप्रत्यक्षपणे पी. द्वारे केले जाते तसेच, सी. लेन्स किंवा मिरर आणि ट्रॅकिंग उपकरणांचा वापर पी मध्ये सौरऊर्जा उत्पादित करण्यासाठी निर्माण केला जातो.

या प्रक्रियेमध्ये, सूर्यप्रकाशाचा बराचसा भाग हा लहान तुळईवर एकत्रित केला जातो. खरंतर, आजकाल सगळीकडे जे अनेक सौरऊर्जा प्रकल्प कार्य करत आहेत. ते सर्व याच पद्धतीने कार्य करत असतात. सौरऊर्जा ज्याला इंग्लिशमध्ये ‘Solar Energy’ असे म्हटले जाते.

solar energy information in marathi
solar energy information in marathi

सौर ऊर्जा म्हणजे काय – Solar Energy Information in Marathi

सौर ऊर्जा निष्कर्ष मराठी

याठिकाणी, सौरऊर्जा म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेण्याआधी; आपल्याला ‘Non Conventional / Renewable’ ज्याला मराठीमध्ये ‘अपारंपरिक / नूतनीकरण’ असे म्हणतात, तर याबद्दलची माहिती जाणून घेतली पाहिजे. शिवाय, आपल्याला नूतनीकरण करण्यायोग्य स्त्रोतांविषयी माहित असणे देखील अत्यंत गरजेचे आहे.

हवा, पाणी, सौर आणि भू-औष्णिक या सर्व गोष्टी मानव नैसर्गिक स्त्रोतांकडून प्रत्यक्षपणे प्राप्त करत असतो. सरळ भाषेत सांगायचं झालं तर या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला अगदी मोफतमध्ये उपलब्ध असताना दिसतात.

म्हणजेच, ही सर्व नैसर्गिक साधने आपल्या कुणाकडून ही एकही रुपया मागत नाहीत. खरंतर, अशा सर्व साधनांना ‘अपारंपरिक/नूतनीकरण’ स्त्रोत असे म्हणतात. मित्रहो, नूतनीकरणक्षम ऊर्जा ही कधीही संपत नसते. त्यांचा साठा हा अमर्यादित स्वरूपात असतो.

त्यामुळे, या गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेल्या सौरऊर्जेसारख्या साधनांचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. परंतू, दुसऱ्या बाजूकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ऑईल, डीझेल, पेट्रोल किंवा रॉकेल या साधनांचा साठा कधीतरी नक्की  संपणार आहे.

कारण, ही साधने निसर्गामध्ये मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे, अशा साधनांचा उपयोग आपण योग्य पद्धतीने आणि कमीत कमी प्रमाणात केला पाहिजेत. नूतनीकरणक्षम ऊर्जांच्या सामग्रीचे देखभाल करणे अधिक आवश्यक नसते, म्हणजे समजा जर आपण ‘Solar Project’ आपल्या घराच्या छतावर बसवला तर हा ‘solar project’ अनेक वर्षे व्यवस्थितरीत्या आपले काम करत असतो.

मित्रहो, या साधनांचा उपयोग केल्यामुळे आपल्याला  खूप पैसे वाचवता तसेच, कमवता येऊ शकतात. सूर्य हा तारा पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या ऊर्जेचा एकमेव मूलभूत स्रोत आहे.

म्हणूनच, सौरऊर्जेला देखील तेजस्वी ऊर्जास्त्रोत असे म्हटले जाते. सूर्यापासून निघणाऱ्या किरणांपासून निरनिराळ्या प्रकारच्या अनेक तेजस्वी ऊर्जा पृथ्वीवर पोहचतात. यांतील तेजस्वी ऊर्जा स्त्रोतांमधील महत्वाची सूर्य किरणे पुढीलप्रमाणे आहेत; प्रकाश अवरक्त किरण (Infrared Rays), अल्ट्रा व्हायलेट (Ultraviolet) किरण आणि एक्स-किरण (X- Rays) इत्यादी.

परंतू, सूर्यापासून निघणारी बीम किरणे पृथ्वीच्या कक्षामध्ये  येत नाहीत. अशा प्रकारची किरणे आकाशामध्ये परत पाठवली जातात आणि ही किरणे अवकाशात परत पाठवण्याचे काम विविध वातावरणीय थर (Layer) व्यवस्थितरीत्या करत असतात. कारण, जर सूर्याची सर्व प्रकारची किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरली तर पृथ्वीवरील अनेक गोष्टी नष्ट होतील. शिवाय, या किरणांचा अभाव मानुषी जातीवर देखील होईल.

एकंदरीत, वातावरणात असणारे हे विविध थर सूर्यापासून निघणाऱ्या घातक किरणांपासून आपले संरक्षण करत असतात. खरंतर, साधारणतः १५% सौरऊर्जा ही पृथ्वीच्या वातावरणाद्वारे शोषली जाते आणि जी उर्वरीत ऊर्जा आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाद्वारे शोषली जाते.

अंदाजे जर एका मिनिटामध्ये आपल्या देशाच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या सूर्याच्या किरणांचा वापर आपण योग्य प्रकारे केला, तर सौरऊर्जेच्या माध्यमातून आपल्या देशाची एका दिवसासाठीची गरज सहजरीत्या भागवता येते. मित्रहो, सूर्य किरणांच्या उच्च तापमानामुळे सूर्य हा तारा विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करत असतो ज्याला ‘रेडिएशन एनर्जी’ (Radiation Energy) असे म्हटले जाते. 

सूर्यापासून निघणारी जास्तीत जास्त ऊर्जा पृथ्वीवरती फोटॉनच्या स्वरूपात प्राप्त केली जाते. त्याचबरोबर, फोटॉनद्वारे पृथ्वीवर उपलब्ध होणारी उष्णताऊर्जा ही पृथ्वीवरच्या वाढत्या तापमानास मुख्य जबाबदार असते.

सौर ऊर्जा फायदे आणि तोटे

याखेरीज, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात पोहोचणार्‍या सूर्याच्या किरणांचे प्रमाण सगळीकडे एकसारखे नसते. या कारणामुळेच वेगवेगळ्या देशांचे तापमान हे कमीजास्त प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येते. आपल्या देशात सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत, कारण भारताचा लँडमास हा अशा बरोबर ठिकाणी आहे ज्याठिकाणी सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात प्राप्त होतो.

दरवर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण हे सर्वांत प्रचंड असते. आपल्या पृथ्वीवर असणारे अनेक नूतनीकरणयोग्य पदार्थ, जसे की: कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आणि खाणकामातून उपलब्ध होणारी इतर युरेनियम सामग्री, एका वर्षामध्ये वापरल्या जाणाऱ्या दुप्पटीपेक्षा जास्त सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचतो आणि त्यामुळे तो अधिक प्रमाणात  वायादेखील जातो. मित्रांनो, आपला भारत देश हा उष्णकटिबंधीय देश आहे.

आपल्या भारताच्या स्थानामुळे आपल्या सर्वांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या फायद्यांपैकी सूर्यप्रकाशाच्या रूपात मिळणारा फायदा हा सगळ्यात जास्त प्रमाणात होणारा फायदा आहे. भारत देश हा उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे आपल्याला वर्षभर सूर्याची किरणे मिळतात, ज्यामध्ये जवळपास ३००० तास इतका सूर्यप्रकाशाचा समावेश असतो, जो की ५००० ट्रिलियन केडब्ल्यूएच एवढा समतुल्य आहे.

आपल्या देशातील बहुतेक सर्व क्षेत्रफळ हे प्रति चौरस मीटर चार ते सात केडब्ल्यूएच एवढे आहे. त्याची बरोबरी जर सूर्यप्रकाशाच्या प्रमाणात करायची झाली तर मात्र ती बरोबरी, प्रतिवर्षी २३०० ते ३२०० एवढ्या सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाच्या समान होईल.

भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे, भारतातील जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागांतील सौर ऊर्जेची उपयुक्तता ही शहरी भागांच्या तुलनेत अधिक आहे.

यामुळे, ग्रामीण भागांमध्ये विकासाची जास्त शक्यता आहे आणि जर सौरऊर्जेचा उपयोग योग्य प्रकारे सुरू झाला तर घरगुती कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाठ्या, काटके तसेच, लाकडांचा वापरही कमी होईल.

त्यामुळे, हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि लाकडांच्या उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या झाडांच्या तोडी देखील कमी होतील, ज्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होईल आणि निसर्गाचे चक्र व्यवस्थितरीत्या चालू राहील.

सौर ऊर्जा उपयोग मराठी

सध्याच्या काळात आपल्या भारतातील खेड्यांमध्ये व शहरांमध्ये सौरऊर्जेचा उपयोग अधिक प्रमाणात करणे शक्य झाले आहे. एकेकाळी, भारतात एक काळ असा होता की भारतातील बर्‍याच ग्रामीण भागांमध्ये वीज नसल्यामुळे अनेक लोक अंधारात आपले जीवन जगत होते. परंतु, तंत्रज्ञान विकास आणि सौरऊर्जेच्या मदतीने आज भारतातील जास्तीत जास्त गावांमध्ये वीज उपलब्ध आहे.

ज्यामुळे, तेथील लोक प्रकाशमय घरांमध्ये आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत. पण मित्रांनो, असे असले तरी आजसुद्धा आपल्या देशात बरीच गावे अशी आहेत जिथे वीज नाही.

परंतू, आजच्या एकविसाव्या शतकात सूर्यामुळे मिळणाऱ्या सौरऊर्जेच्या मदतीने खेड्यांमध्ये व शहरांमध्ये वीज निर्मिती करण्याची प्रक्रिया खूप वेगाने वाढली आहे आणि त्यामुळे, सौरऊर्जेच्या मदतीने अनेक लोक आपली घरे प्रकाशमय करण्यात यशस्वी झाले आहेत. सौरऊर्जा किंवा सौर पॅनेलसारख्या प्रोजेक्ट्साठी आपले भारत सरकार नागरिकांना बरीच मदत देखील करत आहे.

                   तेजल तानाजी पाटील

                      बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या solar energy information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या solar energy information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि saur urja mahatva in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये saururja mahiti marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!