सोनोग्राफी माहिती मराठी Sonography Information in Marathi

sonography information in marathi – sonography meaning in marathi सोनोग्राफी माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये सोनोग्राफी म्हणजे काय, त्याचा कसा वापर केला जातो आणि ते मानवी उपचारामध्ये कसे उपयोगी ठरते या सर्व गोष्टींच्याविषयी माहिती घेणार आहोत. सोनोग्राफी हि एक निदानात्मक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी शरीरातील अवयव, ऊती किंवा रक्त प्रवाहाच्या गतिशील दृष्य प्रतिमा तयार करण्यासाठी उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी वापरते.

या प्रक्रियेमध्ये ट्रान्सड्यूसर नावाचे एक लहान आकाराचे उपकरण असते जे रुग्णाच्या शरीराच्या भागावर ठेवले जाते जेणे करून त्या भागाची प्रतिमा घेता येईल आणि मग संगणक अल्ट्रासाऊंड लहरींचे रुपांतर प्रतिमेमध्ये करतात. ट्रान्सड्यूसर हे लहान उपकरण मायक्रोफोन किंवा लाऊडस्पीकर सारखे कार्य करते म्हणजेच ते ध्वनी प्रसारित करू शकते किंवा प्राप्त करते.

सोनोग्राफी मार्फत घेतलेली प्रतिमेतील संरचना  प्रशिक्षित तंत्रज्ञ पाहू शकतात किंवा ओळखू शकतात. आणि हि प्रतिमा आरोग्य समस्येचे निदान करण्यासाठी काढलेले असते. सोनोग्राफी हि अनेक रोगांचे निदान करण्यासाठी वापरली जाणारी एक प्रक्रिया आहे जसे कि यकृत रोग, फायब्रॉइड, गर्भाशयाची वाढ या सारखे अनेक प्रकारचे निदान करण्यासाठी हि प्रक्रिया वापरली जाते.

sonography information in marathi
sonography information in marathi

सोनोग्राफी माहिती मराठी – Sonography Information in Marathi

सोनोग्राफी म्हणजे काय sonography meaning in marathi

सोनोग्राफी हि एक निदानात्मक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी शरीरातील अवयव, ऊती किंवा रक्त प्रवाहाच्या गतिशील दृष्य प्रतिमा तयार करण्यासाठी उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी वापरते. या प्रकारच्या प्रक्रियेला अनेकवेळा अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राम म्हणून ओळखले जाते.

सोनोग्राफर म्हणजे काय ?

सोनोग्राफर हा एक अत्यंत कुशल व्यावसायिक आहे जो मानवी शरीराच्या आतील रचनांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी विशेष उपकरणे वापरण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते ज्याचा वापर वैद्यकीय निदान करण्यासाठी डॉक्टर करतात.

सोनोग्राफी प्रक्रियेचा वापर – use

अनेक वेगवेगळ्या प्रकारे रोगाचे निदान केले जाते आणि तसेच अनेक रोगाचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी प्रक्रियेचा वापर केला जातो. खाली आपण कोणकोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी प्रक्रियेचा वापर केला जातो ते पाहूया.

  • कोणत्याही प्रकारचा किडनी रोग किंवा किडनी स्टोनवर निदान करण्यासाठी सोनोग्राफी प्रक्रियेचा वापर केला जातो.
  • यकृत रोग यावर निदान करण्यासाठी या पध्दतीचा वापर केला जातो.
  • गर्भाशयाची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे कि नाही तसेच त्यामध्ये काही अडचणी आहेत का या सर्व गोष्टींच्याविषयी निदान करण्यासाठी सोनोग्राफी प्रक्रिया वापरली जाते.
  • पित्ताशय रोग आणि पित्ताशय खडे या प्रकारचे निदान करणे.
  • स्थानभ्रष्ट गर्भधारणा या विषयी निदान करण्यासाठी सोनोग्राफी या प्रक्रियेचा वापर केला जातो.

सोनोग्राफरच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात – roles and responsibilities

सोनोग्राफी करताना सोनोग्राफरच्या रुग्णांच्या लेखी काही जबाबदाऱ्या असतात त्या काय काय असतात ते खाली आपण पाहूया.

  • इष्टतम प्रतिमा मिळवण्यासाठी सोनोग्राफी उपकरणे चांगल्या प्रकारे हाताळणे आणि चालवणे.
  • रुग्णांच्यासाठी प्रक्रिया तयार करणे आणि त्यांना प्रक्रीयेविषयी समजावून सांगणे.
  • प्रयोगशाळेतील निकालांचे आणि इतर इमेजिंग विश्लेषण आणि सहसंबधित करणे.
  • परीक्षेदरम्यान आढळलेल्या सामान्य शरीररचना, शारीरिक रूपे आणि पॅथॉलॉजिकल परिस्थिती ओळखणे तसेच डॉक्टरांच्या परीक्षेतील निष्कर्ष लिहिणे.
  • सुविधेच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी प्रणालीचे व्यवस्थापन.

सोनोग्राफीचे प्रकार – types

सोनोग्राफी हि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते जसे कि मुद्रपिंडाच्या रोगाच्या समस्येविषयी, गर्भाशयाची वाढ तपासण्यासाठी, यकृत रोगावर निदान करण्यासाठी, पित्ताशय रोगाचे निदान करण्यासाठी अश्या अनेक रोगांच्यावर निदान करण्यासाठी हि प्रक्रिया वापरली जाते आणि या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सोनोग्राफी प्रकार वापरले जातात ते कोणकोणते आहेत ते पाहूया.

गर्भाशय स्कॅन / सोनोग्राफी

गर्भाशय सोनोग्राफी हि एक प्रकारची सोनोग्राफी आहे जी गर्भाशयाची वाढ तपासण्यासाठी केली जाते तसेच गर्भाशयातील सानेक समस्या तपासण्यासाठी केली जाते. या प्रकाराला ट्रान्सव्हॅजीनल स्कॅन म्हणून देखील ओळखले जाते आणि या प्रकारच्या स्कॅन मध्ये अंडाशय आणि गर्भाशय तपासला जातो.

थायरॉईड स्कॅन

तुमच्या मानेमध्ये असणाऱ्या थायरॉईड ग्रंथींच्या वाढीवर निदान करण्यासाठी आणि ग्रंथींची वाढ किती झाली आहे ती तपासण्यासाठी या प्रकारच्या सोनोग्राफिचा वापर केला जातो.

टेस्टीक्युलर स्कॅन

टेस्टीक्युलर टॉर्शन किंवा कर्करोगासह वाढ यासारख्या समस्या तपासण्यासाठी या प्रकारच्या सोनोग्राफीचा वापर केला जातो.

इकोकार्डीओग्राम

तुमच्या हृदयाची स्थिती आणि हृदयविषयक समस्यांचे निदान करण्यासाठी या प्रकारच्या इकोकार्डीओग्राम स्कॅनचा वापर केला जातो.

ओटीपोटाचे स्कॅन

यकृत आणि मूत्रपिंडासारख्या ओटीपोटाच्या समस्या तपासण्यासाठी ओटीपोटाचे स्कॅन केले जाते.

सोनोग्राफी प्रक्रीयेविषयी महत्वाचे प्रश्न – questions

सोनोग्राफी प्रक्रिया काय आहे ?  

सोनोग्राफी प्रक्रियेला अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राम म्हणून देखील ओळखले जाते. सोनोग्राफी हि एक नॉन इनव्हेनसीव्ह इमेजिंग चाचणी आहे आणि अल्ट्रासाऊंड चित्राला सोनोग्राम म्हणतात. अल्ट्रासाऊंड हे अंतर्गत अवयव किंवा रक्तवाहिन्यांसारख्या इतर मऊ उत्तींचे रिअल टाइम चित्रे किंवा व्हिडीओ तयार करण्यासाठी उच्च फ्रेक्वेंसी ध्वनी लहरी वापरते.

सोनोग्राफीचा वापर सतत कश्यासाठी केला जातो ?

सोनोग्राफी या प्रक्रियेचा वापर हा सामान्यता गर्भाच्या विकासाची तपासणी करण्यासाठी केला जातो. यामुळे गर्भाचे स्थान, वय आणि संख्या आणि संभाव्य जन्मदोषाचे देखील निदान करू शकते. या ध्वनी लहरी रक्त किंवा द्रव प्रवाहाच्या प्रतिमा देखील तयर करू शकतात.  

सोनोग्राफी म्हणजे काय ?

सोनोग्राफी हि एक निदानात्मक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी शरीरातील अवयव, ऊती किंवा रक्त प्रवाहाच्या गतिशील दृष्य प्रतिमा तयार करण्यासाठी उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी वापरते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या sonography information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सोनोग्राफी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nt scan sonography information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि what is sonography in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!