कम्प्युटर म्हणजे काय? Computer Meaning in Marathi

computer meaning in marathi – computer definition in marathi कम्प्युटर म्हणजे काय? आज आपण या लेखामध्ये कम्प्युटर म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. सध्याच्या च्या मॉडर्ण म्हणजेच आधुनिक जगामध्ये संगणकाचा वापर हा अनेक क्षेत्रामध्ये केला जात आहे आणि सध्या संगणकाला अनन्य साधारण महत्व लाभले आहे. कम्प्युटर मराठी मध्ये संगणक असे म्हणतात आणि संगणकाचा शोध इ.स १८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज यांनी लावला आणि त्यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते.

संगणक हे आपले काम खूप वेगामध्ये करू शकते तसेच एका वेळी अनेक कामे आपल्याला संगनकावर करता येतात, त्याचबरोबर आपण संगणकामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवू शकतो तसेच आपण संगणकामध्ये महत्वाच्या नोंदी देखील खूप मोठ्या काळासाठी जतन करून ठेवू शकतो अश्या प्रकारे आपण संगणकाचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करू शकतो आणि संगणक हे आपल्याला मिळालेले एक वरदानच आहे असे मी मानतो.

इ.स १८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज याने पहिल्या यांत्रिकी संगणकाचा शोध लावला होता संगणक हे १९४० मध्ये विकसित झाले होते मग त्याचा वापर झपाट्याने वाढत गेला आणि संगणकाचा वापर शाळा, महाविद्यालय, हॉटेल, दुकान, घरी वापरला जातो आणि आता लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना संगणक कसा वापरायचा ते माहित आहे.

जगामध्ये जसजसा संगणकाचा वापर वाढला तसतसे प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाची गरज भासू लागली आणि कामकाजासाठी संगणक वापरले जावू लागले. चला तर आता आपण खाली आपण संगणक विषयी सविस्तर माहिती घेवूया.

Computer Meaning in Marathi
Computer Meaning in Marathi

कम्प्युटर म्हणजे काय – Computer Meaning in Marathi

नावसंगणक
इंग्रजी नावकम्प्युटर (computer)
शोधइ.स १८२२
संगणकाचे जनकचार्ल्स बॅबेज

संगणक म्हणजे काय – computer definition in marathi

  • संगणक हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याने दिलेल्या सूचना प्राप्त करते आणि प्रोग्रॅम वापरून वापरकर्त्याला संख्यात्मक माहिती किंवा महत्वाची माहिती देते.
  • संगणक हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा पूर्वी उपयोग फक्त मोजण्याचे यंत्र म्हणून केले जायचे पण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा वेगवेगळ्या कामासाठी वापर केला जात आहे. संगणकामुळे कामाचा वेग वाढला तसेच कामामध्ये अचूकता मिळू लागली त्यामुळे लोक त्यावर अवलंबून राहू लागले.

संगणकाचा इतिहास – history of computer 

इ.स १८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज याने पहिल्या यांत्रिकी संगणकाचा शोध लावला होता आणि म्हणूनच त्यांना संगणकाचा जनक असे मानले जाते. त्याचबरोबर जगातील पहिले संगणक चिन्ह हे इ.स १९४४ मध्ये हॉवर्ड विद्यापीठा मध्ये झाले. मग इ.स १९४५ मध्ये डॉ फॉन न्यूमन यांनी संगणक क्रांतीला योग्य दिशा दिली.

तसेच त्यांनी एक कीबोर्ड देखील डिझाईन केला आणि त्यामध्ये इनपुट, आऊटपुट, अंकगणित, तर्क एकके होती. मग १९४५ मध्ये जगातील पहिला पूर्णपणे जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक बनवला गेला आणि अश्या प्रकारे जस जसे दिवस जातील तसतसा संगणक विकसित होत गेला.

संगणक कसा कार्य करतो – process of computer 

संगणक हा इनपुट, प्रक्रिया आणि आऊटपुट या तीन चक्रामध्ये आपले कार्य करत असतो म्हणजेच आपण दिलेल्या माहितीची प्रक्रिया करतो आणि मग त्याचे रुपांतर आऊटपुट मध्ये देतो किंवा त्यांचे परिणाम देतो. इनपुट उपकरणे ही अशी उपकरणे आहेत जी सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये माहिती प्रविष्ट करण्यासाठी वापरली जातात.

आणि त्याची काही उदाहरण म्हणजे कीबोर्ड, माउस, डॉक्युमेंट रीडर, बारकोड रीडर, मॅग्नेटिक रीडर हि काही संगणकाला इनपुट देण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे आहेत. त्याचबरोबर आउटपुट उपकरणे ही अशी उपकरणे आहेत जी प्रक्रिया केलेली माहिती मानवाला वाचता येतील अश्या स्वरूपात प्रदान करतात.

संगणक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी त्याच्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर वर अवलंबून असतो. हार्डवेयर म्हणजे संगणकाचे जे भाग ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो तसेच त्यांना स्पर्श करू शकतो आणि सॉफ्टवेयर म्हणजे संगणक चांगल्या रीतीने काम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचनांचा किंवा प्रोग्रॅमचा संच ज्याला आपण डोळ्याने पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही तसेच सॉफ्टवेयर हा एक प्रोग्रॅम असून हे संगणकाला कसे काम करायचे याबद्दल सूचना देते. सीपियू, मॉनीटर, कि बोर्ड, माऊस, प्रिंटर, आणि युपीयस हे संगणकाला जीडलेले काही उपकरणे आहेत.

संगणकाचे कार्य करण्याचे चक्र

  • इनपुट (input).
  • प्रक्रिया (process).
  • आऊटपुट (output).

संगणकाचे फायदे – benefits of computer 

संगणक हा आधुनिक जगातील लोकांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे आणि संगणकामुळे आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. अश्या प्रकारे संगणकाचे अनेक फायदे लोकांना झाले आहेत म्हणून सध्या संगणका शिवाय कोणतेही काम करणे मनुष्याला अवघड झाले आहे. चला तर आता आपण संगणकाचे फायदे पाहूया.

  • संगणक हे खूप वेगाने काम करण्यास ओळखले जाते.
  • तसेच ते आपला वेळ वाचवते.
  • संगणकामुळे लोकांची कामे सोपी झाली आहेत.
  • संगणकामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवू शकतो.
  • तसेच आपण संगणकामध्ये महत्वाच्या नोंदी देखील खूप मोठ्या काळासाठी जतन करून ठेवू शकतो.
  • संगणक हे आपल्याला बरोबर माहिती पुरवतो.

संगणकाचा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो ?

सध्या संगणकाचा वापर हा अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी केला जात आहे आणि यामुळे लोकांची अनेक कामे खूप सोपी आणि सुलभ झालेली आहेत. चला तर खाली आपण संगणकाचा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो ते पाहूया.

  • शाळा क्षेत्रामध्ये.
  • कॉलेज क्षेत्रामध्ये.
  • मनोरंजन क्षेत्रामध्ये.
  • आय टी क्षेत्रामध्ये.
  • वाणिज्य क्षेत्रामध्ये.
  • विज्ञान क्षेत्रामध्ये.
  • वैमानिक क्षेत्रामध्ये.
  • कला क्षेत्रामध्ये.

संगणकाचा वापर – uses of computer 

  • संगणकचा वापर संशोधन क्षेत्रामध्ये केला जातो आणि यामुळे अंतराळ संशोधन, वैज्ञानिक संशोधन आणि सामाजिक संशोधन करणे खूप सोपे झाले आणि संशोधनाला वेग आला.
  • तसेच शाळेमध्ये ऑनलाइन वर्ग, ऑनलाइन शिकवणी, ऑनलाइन परीक्षा तसेच मुले अनेक प्रकारचे प्रकल्प बनवण्यासाठी देखील संगणकाचा वापर केला जातो
  • संगणकाचा उपयोग रोगाचे निदान करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो.
  • तसेच सरकारी क्षेत्रातील संगणकांचा वापर विविध कार्ये करण्यासाठी आणि त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी केला जातो. सरकारी क्षेत्रामध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये डेटा प्रोसेसिंग कार्ये, नागरिकांच्या डेटाबेसची देखभाल करणे आणि पेपरलेस वातावरणाचा प्रचार करणे हे संगणक वापरण्याचे प्राथमिक हेतू सरकारी क्षेत्राचा असतो.
  • संगणकाचा वापर वाणिज्य क्षेत्रामध्ये अनेक हिशोब ठेवण्यासाठी केला जातो.

संगणक विषयी तथ्ये – facts about computer 

  • संगणक हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याने दिलेल्या सूचना प्राप्त करते आणि प्रोग्रॅम वापरून वापरकर्त्याला संख्यात्मक माहिती किंवा महत्वाची माहिती देते.
  • संगणकाचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो.
  • संगणक हा इनपुट, प्रक्रिया आणि आऊटपुट या तीन चक्रामध्ये आपले कार्य करत असतो म्हणजेच आपण दिलेल्या माहितीची प्रक्रिया करतो आणि मग त्याचे रुपांतर आऊटपुट मध्ये देतो किंवा त्यांचे परिणाम देतो.
  • संगणक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी त्याच्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर वर अवलंबून असतो.
  • इ.स १८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज याने पहिल्या यांत्रिकी संगणकाचा शोध लावला होता आणि म्हणूनच त्यांना संगणकाचा जनक असे मानले जाते.

आम्ही दिलेल्या computer meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कम्प्युटर म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या computer definition in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि definition of computer in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!