Srinivasa Ramanujan Information in Marathi – Srinivasa Ramanujan Biography in Marathi श्रीनिवास रामानुजन यांची माहिती श्रीनिवास रामानुजन हे भारताचे महान गणितज्ञ होते. आपल्यापैकी बर्याच जणांना शाळेमध्ये गणित हा विषय अतिशय कठीण वाटतो परंतु श्रीनिवास रामानुजन यांच्या बाबतीत ही गोष्ट जरा उलटी होती. श्रीनिवास यांनी गणित या विषयाचा काही फारसा अभ्यास केला नाही आहे. तरीही श्रीनिवास रामानुजन यांना गणितातील कोडे, संख्या, सिद्धांत, प्रमेय एका चुटकी मध्ये सोडण्याची सवय होती. काही लोकांचं असं म्हणणं आहे श्रीनिवास रामानुजन जेव्हा झोपायचे तेव्हा झोपे मध्येच ते डोक्यामध्ये गणिताची कोडी सोडवायचे.
श्रीनिवास यांच्यासमोर कुठलेही गणिताचं कोडं आणून ठेवलं कितीही कठीण असलं तरी ते क्षणभरात सोडवून दाखवायचे. त्यांच्या याच गोष्टी मुळे शाळेतील सर्व शिक्षक देखील आश्चर्यचकीत झाले होते.
प्रत्येक वेळी श्रीनिवास रामानुजन यांना गणित या विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळायचे आणि दुसऱ्या बाजूला इतर विषयांमध्ये ते शून्यावर नापास व्हायचे. थोडसं शंकेत टाकणार आहे श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाच कोड जे आज आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर सोडवणार आहोत.
श्रीनिवास रामानुजन यांची माहिती – Srinivasa Ramanujan Information in Marathi
पूर्ण नाव | श्रीनिवास रामानुजन |
जन्म | २२ डिसेंबर १८८७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ओळख | गणितज्ञ |
जन्मगाव | तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथील इराड गावामध्ये |
मृत्यू | २६ एप्रिल १९२० |
जन्म
श्रीनिवास रामानुजन या थोर भारतीय गणितज्ञ यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला. भारतातील तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथील इराड गावामध्ये श्रीनिवास व त्यांचा परिवार स्थायिक होते. श्रीनिवास यांच्या घरची परिस्थिती थोडी हलाकीची होती. साड्यांच्या दुकानांमध्ये त्यांचे वडील यंगर हे अकाउंटंट म्हणून काम करायचे.
वडिलांच्या नोकरी मधून जेमतेम पैसे यायचे. घरचा कारभार सांभाळण्यासाठी श्रीनिवास यांची आईदेखील एका जवळच्या मंदिरामध्ये गायनाच काम करायची. श्रीनिवास यांचा त्यांच्या आईवर फार जीव होता.
- नक्की वाचा: गणितज्ञ आर्यभट्ट यांची माहिती
शिक्षण
श्रीनिवास यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती की त्यांच्या घरचे श्रीनिवास यांना शाळेत पाठवतील. परंतु श्रीनिवास अत्यंत लहान वयामध्ये कठीण कठीण गणिताची प्रमये सोडवून दाखवायचे. त्यांच्या या तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यांच्या आईवडिलांनी श्रीनिवास यांना शाळेत घातलं. श्रीनिवास यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभकोणम या त्यांच्या राहत्या गावातूनच केलं.
श्रीनिवास रामानुजन यांची बुद्धी इतकी तल्लख होती की ते सातवीमध्ये असतानाच पदवी मध्ये असलेल्या मुलांची गणिते सोडवून देत असत. गणित हा श्रीनिवास रामानुजन यांचा आवडीचा विषय होता. गणित शिवाय त्यांना दुसऱ्या कुठल्या विषयांमध्ये फारशी आवड नव्हती. त्यामुळे बहुतेक वेळा गणित विषय सोडला तर बाकीच्या विषयांमध्ये श्रीनिवास नापास व्हायचे.
श्रीनिवास यांच्या डोक्यामध्ये उठता-बसता फक्त गणित आणि गणित हाच विषय चालू असायचा. श्रीनिवास यांना गणित या विषयांमध्ये उच्च शेरा मिळायचा त्यामुळे श्रीनिवास यांना बऱ्याच शिष्यवृत्ती मिळाल्या परंतु श्रीनिवास गणितावर इतकं लक्ष केंद्रित करत होते की त्यांचं लक्ष बाकींच्या विषयांवर जात नव्हत आणि त्यामुळे अकरावी व बारावी दोन इयत्ता मध्ये श्रीनिवास नापास झाले आणि त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या देखील बंद झाल्या.
लहान वयातच गणितज्ञ म्हणून प्रसिद्धी
श्रीनिवास फक्त गणित या विषयांमध्ये अतिहुशार होते आणि त्यामुळे त्यांचं बाकीच्या विषयांवर कमी लक्ष पडायचं आणि ते नापास देखील व्हायचे. म्हणूनच श्रीनिवास यांच्या घरच्यांनी त्यांचे शिक्षण बंद केलं. शिक्षण बंद झाल्यावर श्रीनिवास यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता श्रीनिवास बहुतेक वेळा पाटीवर गणित सोडवायचे कारण त्याकाळी वही खूप महाग मिळायची आणि श्रीनिवास यांची परिस्थिती थोडी हालाखीची होती.
त्यात वेळी श्रीनिवास यांचं लग्न त्यांच्या आईने जानकी नावाच्या मुलीशी लावून दिलं. श्रीनिवास यांच्याकडे ना शिक्षण होत ना नोकरी त्यामुळे नोकरीच्या शोधासाठी ते इकडे तिकडे भटकू लागले. परंतु श्रीनिवास यांना एखादी गोष्ट चांगली जमत असेल तर ती म्हणजे एक गणितं. श्रीनिवास असेच एकदा नोकरीच्या शोधात असताना त्यांची ओळख मद्रास येथील श्री व्ही रामस्वामी अय्यर यांच्याशी झाली.
रामास्वामी यांना गणिताचा गाढा अनुभव होता. श्रीनिवास यांची एक सवय होती ते जिकडे पण जायचे तिकडे तिकडे सगळ्यांना ते आपण गणितामध्ये किती पारंगत आहोत हे दाखवून द्यायचे त्यांच्या याच सवयीमुळे रामास्वामी यांनी श्रीनिवास यांच्यामध्ये असलेले गणिताविषयी च कौशल्य जाणून घेऊन त्यांना प्रति महिने २५ रुपये पगाराची नोकरी दिली.
श्रीनिवास रामानुजन यांनी सोडवलेली गणिते पाहून रामस्वामी ओळखून गेले की ही व्यक्ती काही सर्वसामान्य नाही.एक वर्ष मद्रासमध्ये राहिल्यावर श्रीनिवास रामानुजन यांनी स्वतःच शोधपत्र प्रकाशित केलं त्या शोध पत्रकाचे नाव होतं जनरल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी. या शोध पत्रकाराने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
- नक्की वाचा: भारतीय शास्त्रज्ञांची माहिती
इतर माहिती
श्रीनिवास रामानुजन यांना गणिताविषयी मिळालेले ज्ञान ही एक प्रकारची देवकी देणगीच होती. श्रीनिवास हे केवळ सात वर्षाचे होते तेव्हा त्यांनी त्रिकोणमिती चे गणित सोडून दाखवलं. हे बघून श्रीनिवास यांचे शालेय शिक्षक चकित झाले.
त्रिकोण याच्यावर त्यांनी स्वतःचा नवीन सिद्धांत तयार केला फक्त सात वर्षाचा मुलगा गणित या विषयांमध्ये इतके कठीण कठीण प्रश्न सोडवतो आणि स्वतः त्याच्यामध्ये नवीन शोध लावतो हे पाहून त्याच्या शालेय शिक्षकांना माहिती पडलं होतं की हा मुलगा मोठा होऊन नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवणार.
शाळेत असताना श्रीनिवास यांना मित्रपरिवार फारसा नव्हता कारण ते नेहमी गणित सोडवण्यात व्यस्त असायचे. श्रीनिवास यांनी फारच कमी वयामध्ये गणित क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिलं आहे. श्रीनिवास गणित विषयांमध्ये अतिशय हुशार असून देखील ते फाईन आर्ट्स या परीक्षेमध्ये नापास झाले होते.
कोणालाही विश्वास बसणार नाही अशी ही गोष्ट आहे. श्रीनिवास हे प्रसिद्ध गणितज्ञ जी एच हार्डी यांच्या पुस्तकांचे वाचन करायचे.असंच एकदा जी एच हार्डी यांच्या ऑर्डरस ऑफ इन्फिनिटी या पुस्तकाचं वाचन करत असताना त्या पुस्तकांमधून रामानुजन यांना प्रोत्साहन मिळायला सुरुवात झाली आणि त्यातूनच प्रेरित होऊन रामानुजन यांनी जी एच हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला.
रामानुजन यांनी जी एच हार्डी या ना एक पत्र लिहिलं. १९१३ साली पाठवलेलं हे पत्र जी एच हार्डी जेव्हा भारतात आले तेव्हा ते श्रीनिवास रामानुजन यांना भेटले आणि त्यांना लंडनला घेऊन गेले. लंडनमध्ये मध्ये गेल्यावर श्रीनिवास रामानुजन यांना वातावरणात बदल झाल्यामुळे तब्येती मध्ये फरक जाणवू लागला.
त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत चालली होती. शेवटी एक दिवस त्यांना एका हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. तेव्हा हार्डी रामानुजन यांना भेट देण्यासाठी एका टॅक्सी ने गेले होते. रामानुजन आणि हार्डी यांच्यामध्ये गप्पागोष्टी चालू होत्या. ते दोघंही गणितज्ञ होते तर साहजिकच आहे त्यांच्या गप्पा देखील संख्या किंवा काही सिद्धांत या सगळ्या गोष्टींवरती चालू असणार.
तितक्यातच हार्डी यांनी रामानुजन यांना ते ज्या टॅक्सीतून आले त्या टॅक्सीचा नंबर सांगितला आणि तो नंबर होता १७२९. तेव्हा ते म्हणाले हा नंबर खूपच बोरिंग आहे. त्यावर एक सेकंदाच्या आत मध्ये रामानुजन म्हणाले हा नंबर अजिबात बोरींग नाही आहे. हा नंबर खरं तर खूप चांगला आहे कारण की ह्या नंबरची बेरीज दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घनांनी होते.
आणि तेव्हापासून या संख्येला हार्डी रामानुजन संख्या असं नाव पडलं. गणित क्षेत्रातील रामानुजन यांची कारकीर्द पाहता रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आणि रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून राहणारे ते पहिले तरुण व्यक्ती होते. इतकच नव्हे तर ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे रामानुजन हे पहिले भारतीय ठरले. रामानुजन यांची निवड केंब्रिज फिलाॅसाॅफिक फॅलो म्हणून निवड करण्यात आली होती.
मृत्यू
रामानुजन ज्यावेळी लंडनमध्ये होते त्याच वेळी त्यांची तब्येत खालावली होती. परत भारतात आल्यावर रामानुजन यांचे शेवटचं वर्ष अंथरुणातच गेलं. रामानुजन यांना टीबी हा आजार होता. अनेक उपचार करून देखील रामानुजन यांच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा दिसून येत नव्हती.
२६ एप्रिल १९२० रोजी रामानुजन यांचे निधन झालं. त्यावेळी ते फक्त ३३ वर्षांचे होते. श्रीनिवास यांनी एका वही मध्ये काही गणिताची प्रमेय आणि गणिताची सूत्र कोडी लिहून ठेवली होती. त्यातील काही पानांचा स्पष्टीकरण मिळाले, परंतु बहुतांश गणित इतकी कठीण होती की कोणालाच हे काय लिहिलंय हे कळत नव्हतं.
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ त्यांचा वाढदिवस भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये srinivasa ramanujan information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर srinivasa ramanujan scientist information in marathi म्हणजेच “श्रीनिवास रामानुजन यांची माहिती“ srinivasa ramanujan biography in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about srinivasa ramanujan in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि srinivasa ramanujan information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट