Aryabhatta Information in Marathi भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांची माहिती माहितीवयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षांमध्ये “आर्यभट्टीय” नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे आर्यभट्ट यांनी जगाला शून्याची ओळख करून दिली. आर्यभट हे खूप महान व्यक्तिमत्व असणारे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व गणिततज्ञ होते. नेहमीच्या जीवनामध्ये साधा व्यवहार करण्यासाठी मूलभूत गणिती ज्ञान असणं गरजेचं असतं. आर्यभट यांनी संपूर्ण जगाला शून्याची ओळख करून दिली. आर्यभट यांनी लावलेल्या या शोधामुळे आज आपण गणित क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करू शकलो. आजच्या ब्लॉग मध्ये आपण आर्यभट्ट यांनी गणित व खगोलशास्त्र या दोन विषयांवर मांडलेल्या त्यांच्या विचारांवर सविस्तर माहिती घेणार आहोत.
गणितज्ञ आर्यभट्ट यांची माहिती – Aryabhatta Information in Marathi
पूर्ण नाव | आर्यभट्ट |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
ओळख | खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ |
जन्म
आर्यभट्ट हे प्राचीन काळात जन्माला आलेले सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. आर्यभट्ट यांच्या जन्माचा उल्लेख किंवा नोंद करण्यात आली नसून, आर्यभट्ट यांनी लिहलेल्या “आर्यभटीय” या ग्रंथांमध्ये त्यांच्या जन्माविषयी नोंद केली आहे. त्यांनी या ग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की ज्यावेळी कलियुगाचे ३६०० वर्ष संपले, त्यावेळी आर्यभट्ट यांचे वय २१ वर्ष होतं.
यावरून काही इतिहासकारांनी केलेल्या संशोधनावरून असं समजण्यात आलं की आर्यभट्ट यांचा जन्म इसवी सन ४७ मध्ये झाला असावा. आर्याभट्ट यांचा जन्म महाराष्ट्रातील अश्मक या प्रदेशात झाला होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या व्यक्तिमत्वाचे आर्याभट्ट होते.
शिक्षण
आर्यभट्ट हे प्राचीन काळात जन्माला आलेले महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती देणारे ठोस पुरावे उपलब्ध नाही आहेत. आर्यभट्ट यांना शैक्षणिक ज्ञान उत्तम होतं. आर्यभट्ट यांचा बालपण महाराष्ट्रामध्ये गेलं परंतु पुढील शिक्षणासाठी ते बिहार व पटना येथे गेले. नालंदा विश्वविद्यापीठ येथून आर्या भट यांनी त्यांच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
- नक्की वाचा: भारतीय शास्त्रज्ञांची माहिती
शोध
आर्यभट्ट यांनी जसा शून्याचा शोध लावला तसेच ते खगोल शास्त्रज्ञ असल्यामखूपच अनेक शोध त्यांनी लावले आहेत. तेही प्राचीन पुर्व काळात. निकोलस कोपर्निकस या नावाजलेल्या खगोल शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांमध्ये त्याने असं नोंदवलं होतं की पृथ्वी ही गोलाकार नसून ती अंडाकृती असते. व ती स्वतःच्या ध्रुवा भोवती फिरते.
ज्यामुळे आपण दिवस व रात्र पाहू शकतो. परंतु निकोलस कोपर्निकस याने हा शोध लावायच्या हजार वर्ष अगोदर आपले भारतीय आर्यभट्ट यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये हीच गोष्ट नोंदवली होती. प्राचीन काळामध्ये संशोधनासाठी काही यंत्र देखील उपलब्ध नव्हते. अशा वेळेस देखील आर्यभट्ट यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून हा शोध लावला.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या संकल्पनेवर देखील आर्याभट्ट यांनी संशोधन केलं होतं. त्यांच्या मते सूर्याचा प्रकाश जेव्हा दुसऱ्या ग्रहावर पडतो तेव्हा तो ग्रह प्रकाशित होतो आणि त्या कारणास्तव सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होतो. आर्यभट्ट यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. प्राचीन काळामध्ये संशोधनाच कुठलेही साधन उपलब्ध नसताना त्यांनी खगोलशास्त्रज्ञाचा इतका गाढा अभ्यास करून पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, यांच्याबद्दल काही नियम व आधुनिक माहिती त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये नोंदवून ठेवली आहे.
इतकंच नव्हे तर आर्यभट्ट हे महान गणितज्ञ पण होते, त्यामुळे त्यांनी सूत्र व नियम निर्माण केले. आणि त्या सूत्रांचा व नियमांचं योग्य मूल्यमापन केल्यावर आर्या भट्ट यांच्या लक्षात आलं की वर्षांमध्ये ३६५.२९५१ दिवस असतात. आर्याभट्ट यांना मिळालेली तल्लख बुद्धी ही देवाची देणगी होती. आर्याभटृ हे बीजगणित वापरणारे पहिले व्यक्ती होते.
आर्यभट्ट यांनी लिहिलेला “आर्यभट्टीय” हा प्राचीन ग्रंथ आहे. ज्यामध्ये आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्र, बीजगणित, त्रिकोणमिती या सगळ्या संकल्पनेवर बरीच माहिती देऊन ठेवली आहे. ज्याचा आपल्याला भविष्यामध्ये वापर होतोय. आर्यभट्ट यांनी बीजगणित, अंकगणितीय, त्रिकोणमिति यांचे ३३ नियम काढून ठेवलेत.
भारत आणि गणित यांचा एकमेकांशी प्राचीन काळापासून चा संबंध आहे. असं मानलं जातं भारतामधील ७५% लोक गणित या विषयांमध्ये हुशार आहेत. किंवा ७५ टक्के लोकांना गणितिज्ञान अगदी उत्तम प्रकारे माहीत आहे. या सगळ्यांचं खरं श्रेय आपल्या भारतात होऊन गेलेल्या महान गणितज्ञांना जातं.
आर्याभट्ट यांनी प्रत्येकाला गणिती ज्ञान अगदी सोप्यारित्या समजावं म्हणून गणित सूत्रे अगदी सोपी करून ग्रंथामध्ये लिहून ठेवली आहेत. आर्यभटीय या ग्रंथाचे दोन भाग आहेत पहिला म्हणजे दशगितिका आणि दुसरा भाग म्हणजे आर्याष्टशत. या ग्रंथामध्ये चार पाद असे असून १२१ श्लोक आहेत. या ग्रंथात असलेले चार पाच म्हणजेच, गीतिका पाद, गणितपाद, कालक्रियापाद, गोलपाद, असे आहेत.
गीतिका पाच मध्ये अक्षरांच्या द्वारे अंक समजून घेण्याची सोपी पद्धत अधोरेखित केली आहे. अक्षरांक ही नवीन स्वनिर्मित पद्धत या ग्रंथात मधील या पदांमध्ये लिहिली आहे. इतर बाजूला गणित पदांमध्ये अंकगणित, बीजगणित, रेखागणित यांचे फॉर्मुलाज व नियम ३३ श्लोकां द्वारे मांडले गेले आहेत.
आर्यभट्ट यांनी मांडलेले सिद्धांत आपल्या नेहमीच्या जीवनात उपयोगी पडतात. आर्याभट्ट यांच्या सिद्धांतांचा सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या गणित क्षेत्रावर पडतो. आर्यभट्ट यांनी पाईची संकल्पना अचूकपणे दर्शवली आहे. आर्याभट्ट यांनी जेव्हा पृथ्वी स्वतः भोवती फिरते हा शोध लावला तेव्हा त्यांनी अतिशय छान उदाहरण दिलं.
आर्याभट्ट यांच्या मते जेव्हा आपण नदीच्या पात्रातून नावे मध्ये बसून जात असताना आपल्याला घर, झाड, डोंगर उलट्या दिशेने पळताना दिसतात पण खरं तर ते स्वतः च्या जागी स्थिर उभी असतात. त्याच प्रकारे आपण रोज सूर्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बघतो परंतु, खरं तर आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते.
शून्याचा शोध लागण्यापूर्वी लोक अक्षरांक या पद्धतीचा वापर करायचे. अक्षर अंकाचा शोध आर्याभट्ट यांनी लावला नसला तरी, काही तज्ञांनी अक्षरांक या पद्धतीचा शोध लावला परंतु कधीकधी ही पद्धत वापरण्यात अपयश येत होतं. त्यावेळी आर्यभट्ट यांनी या संकल्पनेचा नीट अभ्यास करून स्वतःची अक्षरांक ही नवीन संकल्पना तयार केली.
ज्याचे त्यांनी स्वतःचे नियम तयार केले आणि त्यानंतर ही पद्धत त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये पण वापरून दाखवली तेही अगदी अचूक रित्या. आर्याभटीय हा ग्रंथ नामशेष झाला आहे. परंतु भारताच्या पाचव्या शतकामध्ये आर्याभट्ट यांच्यासारखे महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ भारताला लाभले याच्यापेक्षा अभिमानास्पद कोणतीही गोष्ट नाही.
गणिती क्षेत्रात किंवा खगोलशास्त्रज्ञ क्षेत्रांमध्ये आर्यभट्ट यांनी दिलेले योगदान खूपच मोठं आहे. आर्यभट्ट यांनी लावलेल्या शोधांमुळे व खगोल शास्त्रज्ञ क्षेत्रांमध्ये दिलेली काही भाकिते यांच्या जोरावर भारताने आज भरपूर प्रगती केली आहे. त्यांनी लिहिलेल्या आर्यभट्टीय या ग्रंथामधून संपूर्ण जगाला प्रेरणा मिळाली.
आर्यभट्टीय ही त्यांची प्रसिद्ध रचना असून त्यांनी काव्य स्वरूपात लिहिली आहे. आर्याभट्ट यांनी दासगीतिका, तंत्र आणि आर्यभट्ट सिद्धांत ही ग्रंथ लिहिली आहेत. आर्या भट्ट यांचा प्रभाव फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर पडला आहे. आर्या भट्ट यांचा संपूर्ण जगाच्या गणित क्षेत्रावर आणि ज्योतिषी सिद्धांतावर खूप मोठा प्रभाव पडला आहे.
आर्या भट्ट यांनी बीज गणितामध्ये चौकोनी तुकडे व वर्ग जोडण्यासाठी फॉर्मुले तयार केली. आर्याभट्ट यांचा भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे. भारत सरकारने जेव्हा १९ एप्रिल १९७५ साली भारताचा पहिला उपग्रह अंतराळात सोडला. तो उपग्रह आज आर्याभट्ट या नावाने ओळखला जातो. जगातील हुशार व सर्वात बुद्धिमान लोकांच्या यादीमध्ये आपले भारतीय आर्यभट्ट यांचा समावेश आहे.
मृत्यू
आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्रज्ञ व गाणित क्षेत्रात जी कामगिरी करून ठेवली आहे त्याचा फायदा आज संपूर्ण जगाला झाला आहे. आर्यभट्ट यांनी खगोल शास्त्रज्ञ व गणित क्षेत्रामध्ये लावलेला हातभार आज आपल्या संपूर्ण जगाच्या कामी आला. त्यासाठी आपण नेहमीच आभारी राहू. परंतु इतकै महान गणितज्ञ इसवी सन पूर्व ५५० मध्ये काळाच्या पडद्याआड झाले.
आर्यभट्ट हे भारताच्या पाचव्या शतकात जन्माला आलेले असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही आहे. या संपूर्ण जगाला लाभलेला आर्यभट्ट यांच्यासारखा महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने एकोणिसाव्या शतकामध्ये अंतराळात सोडलेला पहिला उपग्रहाला आर्याभट्ट असे नाव दिले. त्यासोबतच आर्यभट्ट यांच्या नावाने काही प्रयोग शाळा देखील सुरू केल्या आहेत.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये aryabhatta information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर information about aryabhatta in marathi म्हणजेच “भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांची माहिती” aryabhatta biography in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या aryabhatta mathematician information in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि aryabhatta in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट