स्टीफन हॉकिंग यांची माहिती Stephen Hawking Information in Marathi

Stephen Hawking Information in Marathi – Stephen Hawking Biography in Marathi स्टीफन हॉकिंग यांची माहिती इच्छा तिथे मार्ग! हे वाक्य ज्येष्ठ व सुप्रसिद्ध महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना तंतोतंत लागू होतं. मित्रांनो स्टीफन हॉकिंग यांच्या काही प्रसिद्ध संशोधनाविषयी माहिती आपण लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये पाहिलीच असेल परंतु आजच्या लेखामध्ये आपण स्टीफन हॉकिंग यांच्या संपूर्ण जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया या महान व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाविषयी.

stephen hawking information in marathi
stephen hawking information in marathi

स्टीफन हॉकिंग यांची माहिती – Stephen Hawking Information in Marathi

पूर्ण नाव (Name)स्टीफन हॉकिंग
जन्म (Birthday)८ जानेवारी १९४२
जन्म गाव (Birth Place)इंग्लंडमधील ऑक्सफर्ड
ओळख (Identity)शास्त्रज्ञ

जन्म

८ जानेवारी १९४२ रोजी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील एका गरीब आणि साध्या कुटुंबामध्ये झाला. परंतु त्यांच्या घरचं वातावरण शिस्तीचं आणि सुशिक्षित होतं. वडील डॉक्टर फ्रांक हॉकिंग संशोधक होते तर, आई इजाबेल ऑक्सफर्डच्या वैदिक संशोधन सचिव होत्या. स्टीफन हॉकिंग यांना लहान दोन बहिणी देखील होत्या त्यांच्या छोट्या बहिणीचे नाव फिलिप आणि दुसऱ्या बहिणीचे नाव मेरी असं होतं.

आणि एक दत्तक भाऊ देखील होता. दुसऱ्या महायुद्धाचा काळ सुरू होता त्यामुळे स्टीफन हॉकिंग यांच्या घरची परिस्थिती खालावलेली होती. लहानग्या स्टीफन हॉकिंगना संगीताची, वाचनाची, गणित आणि भौतिकशास्त्रची आवड होती. अगदी लहान वया मध्येच स्टीफन हॉकिंग यांच्या मधला चंचलपणा त्यांची असामान्य बुद्धिमत्ता सर्वांनाच थक्क करणारी व त्यांच्या उज्वल भवितव्याची साक्ष देणारी होती.

शिक्षण

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म होण्याआधी त्यांच संपूर्ण कुटुंब लंडन वरून ऑक्सफर्डला स्थलांतरित झाले होते परंतु त्यांच्या वडिलांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पर्सीथोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाल्यावर त्यांनी पुन्हा लंडनला स्थलांतर केलं.

इसवीसन १९५० मध्ये हॉकिंग कुटुंब सेंट अलबान्स येथे स्थलांतरित झाले आणि स्टीफन हॉकिंग यांच्या शिक्षणाची सुरुवात सुरू झाली. इसवी सन १९५० ते १९५३ या कालावधीमध्ये स्टीफन हॉकिंग यांनी सेंट अलबन्स स्कूल या शाळेमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विज्ञान विषय हा हॉकिंग यांच्या आवडीचा विषय होता. शिवाय गणिताची देखील स्टीफन हॉकिंग यांना प्रचंड आवड होती.

इसवी सन १९५९ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांनी ऑक्सफर्डच्या युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड येथे कॉस्मोलॉजी या विषया वर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप सुद्धा जाहीर झाली होती. इसवी सन १९६२ मध्ये स्टीफन हॉकिंग यांना त्यांनी निवडलेल्या विषयामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे पदवी मिळाली आणि स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठाची निवड केली.

स्टीफन हॉकिंग यांचा प्रेरणादायी प्रवास

स्टीफन हॉकिंग हे असं व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार बघितले त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आले जे कल्पनेच्या बाहेर आहेत. तरीही या सर्व प्रसंगांवर मात करत स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या कलेवर विश्वास ठेवत स्वतःचा आत्मविश्वास हरवू न देता इतिहासामध्ये स्वतःचं नाव सोनेरी अक्षरांमध्ये कोरलं.

स्टीफन हॉकिंग यांना मोटर न्यूराॅन डिसीज नावाचा आजार होता. ज्यावेळी स्टीफन हॉकिंग यांच्या विद्यार्थी दशेत होते त्यावेळी दिवाळीच्या सुट्टी दरम्यान ते घरी आले होते आणि घरी आल्यावर जिन्यावर पायरी चढताना स्टीफन हॉकिंग यांना त्रास होऊ लागला आणि अचानक त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले.

घरच्यांनी त्वरित स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले की स्टीफन हॉकिंग यांना साधारण अशक्तपणा आला आहे परंतु कालांतराने स्टीफन हॉकिंग यांचा हा त्रास वाढू लागला आणि नंतर स्टीफन हॉकिंग यांना मोटर न्यूरॉन नावाचा आजार आहे असं जाहीर झालं.

या आजारांमध्ये शरीरातील स्त्रायुं वरचे नियंत्रण संपून जाते या रोगामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला अशक्‍तपणा जाणवतो आणि मग अडखळत बोलणे नंतर अन्न गिळताना त्रास होऊ लागतो हळू हळू चालणे फिरणे अशक्य होऊ लागते आणि कालांतराने बोलणे देखील बंद होतं. या आजारामध्ये हळूहळू आपल्या शरीराचे एक एक भाग निकामी होत जातात आणि शेवटला श्वसन नलिका निकामी होते आणि माणूस मरतो. स्टीफन हॉकिंग पुढील फक्त दोन वर्ष जगतील अशी माहिती डॉक्‍टरांनी स्टीफन हॉकिंग यांच्या घरच्यांना दिली.

त्यावेळी स्टीफन हॉकिंग हे २१ वर्षाचे होते. परंतु स्टीफन हॉकिंग यांनी आशा न सोडता हार न मानता स्वतावर विश्वास ठेवला आणि सर्वांना ठामपणे सांगितले की मी फक्त पुढील दोन वर्ष नाही तर पन्नास वर्ष जगेल आणि स्टीफन हॉकिंग यांनी त्यांचा अखेरचा श्वास वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला.

त्यावेळी स्टीफन हॉकिंग यांच्या मानसिकतेवर त्यांनी त्यांच्या आजारपणाचा कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. आणि स्वतःच्या अभ्यासावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. स्टीफन हॉकिंग चालण्यासाठी व्हीलचेअरचा आधार घ्यायचे परंतु नंतर त्यांचे पाय निकामी झाले म्हणून त्यांनी व्हीलचेअरलाच संगणक जोडला आणि ते फक्त एक बोट वापरून देखील या संगणकाचा वापर करू शकत होते.

पुढे स्टीफन हॉकिंग यांना निमोनिया देखील झाला. ज्यामुळे त्यांच्या श्वास नलिकेला छिद्र करून शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ज्यामुळे त्यांना त्यांचा आवाज देखील कायमचा गमवावा लागला होता.

स्टीफन हॉकिंग यांनी लावलेले संशोधन

स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोठे मोठे संशोधन केले आहेत. त्यांच्या संशोधनामुळे विज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती संपूर्ण जगाला मिळाली. स्टीफन हॉकिंग यांनी लंडनमधील गणितज्ञ रॉजर पेनरोज यांच्या एका भाषणाला हजेरी लावली होती त्या भाषणांमध्ये पेनरोज यांचा विषय होता तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो. पेनरोज यांचं हे निष्कर्ष ऐकल्यावर स्टीफन हॉकिंग यांनी स्वतःचा या विषयावर अभ्यास सुरू केला.

स्टीफन हॉकिंग हे सामान्य व्यक्ती नव्हते त्यांच्यामध्ये असणारी अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवायची ताकद अद्भुत होती. त्यांचा विज्ञान विषयामध्ये असणारा गाडा अभ्यास दांडगा अनुभव अकाल्पनिक आहे. पेनरोज यांच्या निष्कर्षावरून स्टीफन हॉकिंग यांनी असा निष्कर्ष काढला की फक्त ताराच नाही तर संपूर्ण विश्वाचा देखील अंत होऊ शकतो.

या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट पदवी जाहीर झाली. सिंगुलारिटी अंड दि जिओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा या प्रबंधाचा पुढील भाग स्टीफन यांनी लिहिला आणि यासाठी स्टीफन हॉकिंग यांना १९६६ मध्ये ॲडम्स प्राईज प्रदान करण्यात आलं. स्टीफन यांना त्यांचं हे काम अतिशय आवडायचं संशोधनासाठीचा स्टीफन हॉकिंग यांचा पुढचा विषय कृष्णविवर होता.

या संशोधनासाठी स्टीफन हॉकिंग यांनी आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांत वापरून स्वतःची मतं मांडण्यास सुरुवात केली या काळामध्ये स्टीफन हॉकिंग यांना त्यांच्या आजारामुळे हालचाल करणं अशक्य झालं होतं परंतु, स्टीफन हॉकिंग यांची बुद्धिमत्ता व अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची त्यांची असणारी क्षमता अमानवीय आहे.

त्यांनी इतकी कठीणातून कठीण गणितं केवळ स्वतःच्या मनामध्ये सोडवली. स्टीफन हॉकिंग यांनी पुंज यामीक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांत या दोघांच्या जोडीने या दोन सिद्धांतांचा एकत्रीकरण करून नवीन सिद्धांत तयार केला आणि पुढे त्यांनी मांडलेल्या या निष्कर्षाप्रमाणे किरणोत्सर्जनाला हॉकींग उत्सर्जन असं नाव दिलं.

स्टीफन हॉकिंग यांचं हे प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालं आणि या प्रबंधामुळे स्टीफन हॉकिंग यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली. स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये दिलेले योगदान सर्वात मोठं आहे. त्यांच्या कौशल्यांची, बुद्धिमत्तेची त्यांच्या क्षमतेची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.

ते स्वतः वैयक्तिक रित्या त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करत होते. शारीरिकदृष्ट्या हतबल असून देखील त्यांनी त्यांची मानसिकता कधीच बदलली नाही नेहमीच स्वतः प्रेरित राहिले आणि स्वतः सोबतच दुसऱ्यांना देखील प्रेरणा देण्याचा काम केलं. बर्‍याच विज्ञान क्षेत्रातील तरुणांसाठी स्टीफन हॉकिंग हे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत.

स्टीफन हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लॅंकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठातर्फे इसवी सन १९८० मध्ये डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली. स्टीफन हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात याच्यासाठी बरेच प्रयत्न केले.

हॉकिंग हे एकाच वेळी विज्ञान क्षेत्रामध्ये स्वतःचे योगदान देत होते तर दुसर्‍या बाजूला त्यांचा स्वतःचाच लढा सुरू होता आणि ते दुसऱ्यांसाठी ही झटत होते. अपंग लोकांसाठी स्टीफन हॉकिंग यांनी केलेली मदत म्हणून हॉकिंग यांना इसवी सन १९७९ मध्ये रॉयल असोसिएशन फोर दिसाबिलिटी अँड रेहाबिलिटेशन या संस्थेकडून मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

आम्ही दिलेल्या dr stephen hawking information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्टीफन हॉकिंग यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या stephen hawking biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about stephen hawking in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये stephen hawking death in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “स्टीफन हॉकिंग यांची माहिती Stephen Hawking Information in Marathi”

  1. आप बहुत ही अच्छा प्रयास कर रहे है इसी प्रकार के काम करते रहे एक दिन सफलता के ऊंची आसमान में जायेंगे ।
    धन्यवाद !

    उत्तर
  2. तुमचे प्रयत्न अप्रतिम आहेत.
    मी नेहमी माहिती मिळविण्यासाठी या वेबसाइटचा वापर केला आहे.

    तसेच मी फक्त 12 वर्षांची मुलगी आहे.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!