नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती Subhash Chandra Bose Information in Marathi

Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती भारताला  पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. भारतीय जनता भारतातून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनात सहभागी होती. मात्र भारताच्या बाहेर जाऊन एका सहस्त्र सेनेसह भारतावर आक्रमण करून भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्याचा एक धाडसी प्रयत्न एका महान योजने केला त्याचे नाव म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस. भारताचा इतिहास त्यांच्या पराक्रमा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सदरच्या लेखामध्ये आपल्याला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, यामुळे सुभाष चंद्र बोस Subhash Chandra Bose in Marathi हे व्यक्तिमत्व कसे होते हि कल्पना आपल्याला येईल.   

netaji subhash chandra bose information in marathi
netaji subhash chandra bose information in marathi / subhash chandra bose in marathi

सुभाष चंद्र बोस माहिती – Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

नाव (Name)सुभाषचंद्र बोस
जन्म (Birthday)23 जानेवारी 1897
जन्मस्थान (Birthplace)ओडिसा मधील कटक शहर
वडील (Father Name)जानकीनाथ बोस (जानकी नाथ बोस)
आई (Mother Name)प्रभावती दत्त
पत्नी (Wife Name)एमिली शेन्कल
मुले (Children Name)अनिता बोस फफाफ

जन्म:

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसा मधील कटक शहरात झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. लहानपणापासूनच ते बंडखोर वृत्तीचे होते सुभाष चंद्रावर स्वामी रामचंद्र आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता विवेकानंद रामकृष्णांच्या ग्रंथामुळे त्यांना अत्यंत धार्मिक गोड वाटू लागली विवेकानंदांच्या शिकवणीने त्यांची  मानवाच्या समानतेवरील श्रद्धा दृढ झाली.

शिक्षण:

सुभाष चंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले आणि आय सी एस ची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्र सेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे आयसीएस चे उच्च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. शेवटी सेवेचा भाव जिंकला  आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉटेग्यू यांच्याकडे सोपाविला.

भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्युक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठीविली. वडिलांनी उत्तर पाठवले, ” मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय”. विल्यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्यांनी सुभाष चंद्र यांना विचारले,” तरुणा,तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस? ” सुभाष बापू पटकन उत्तरले,” मला लहानपणापासून दोन आण्यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळविन. ” विल्यम ड्युक अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागले.

आझाद हिंद सेनेची स्थापना :

दुसरे महायुद्ध चालू असताना सुभाष चंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कोलकत्ता येते नजरकैदेत ठेवले होते. तेथून ते 17 जानेवारी 1941 रोजी धाडसाने निसटून अनेक अडचणींचा सामना करून जर्मनी पोहोचले. जर्मनीत भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून स्वतंत्र सेना उभी करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यासाठी त्यांनी हिटलरची भेट घेऊन जर्मन सरकारची सहानुभूती मिळवली. त्यांनी जर्मनीला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे संघटन केले. सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणाने हिंदी सैनिक भारावून गेले.

तिकडे जपानने सिंगापूरचा ब्रिटिशांचा आरमारी तळ काबीज केला.रासबिहारी बोस यांनी तेथे जपानच्या ताब्यातील हिंदी सैनिकांची सेना बनवली होती. या सैनिकांची भेट घेण्यासाठी नेताजी 90 दिवसाच्या पानबुटीतील प्रवासाने जुलै 1943 रोजी मृत्यूशी झुंज देत जपानची राजधानी टोकियो येथे पोचले. रासबिहारी बोस यांच्या विनंतीवरून त्या सेनेचे नेतृत्व नेताजींनी स्वीकारले. 5 जुलै 1943 ला सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ‘चलो दिल्ली’ ही घोषणा दिली. जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, भारतीय नागरिक, आणि स्त्रिया देखील स्वच्छेने या सेनेत दाखल झाल्या. सुभाष चंद्र बोस या सेनेचे सरसेनापती बनले.

पूर्व आशियातील लाखो हिंदी जनतेचा भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा मिळाल्यावर 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र हिंदुस्तानचे आझाद हिंद सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारला जपान, जर्मनी,इटली,चीन,ब्रह्मदेश या देशाने तात्काळ मान्यता  दिली. या हंगामी सरकारचे आझाद हिंद सेना हे प्रमुख लष्कर होते. लष्करी संघटने बरोबरच आजाद हिंदच्या हंगामी सरकारने नागरी शासनव्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले. काही मुलकी खाती उघडली.त्यातील अर्थ, प्रसिद्धी, लष्कर भरती,आरोग्य व समाज कल्याण, पुरवठा ,गृहबांधणी, वाहतूक इत्यादी महत्वाची खाती होती. नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या. ‘कदम कदम बढाये जा’ या गीताशी समरस होऊन नेताजी आणि त्यांचे लष्कर यांनी आजाद हिंदुस्तानचे स्वप्न साकारण्यासाठी विजयी घोडदौड सुरू केली.

जपानचे सत्ताधीश जनरल तोजो यांनी इंग्लंडकडून जिंकलेली अंदबार व निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेला सुपूर्त केली. सुभाष चंद्र बोस यांनी  अंदमानला भेट दिली आणि स्वतंत्र हिंदुस्थानचे प्रमुख म्हणून आपला स्वतंत्र ध्वज फडकवला. आझाद हिंद सेनेने भारतात प्रवेश करून इंफाळ, कोहीमा इत्यादी ठिकाणी ब्रिटिश फौंजावर विजय मिळवला.

नेताजींनी “दिल्ली के लाल किल्ले पर तिरंगा लहराने के लिए तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा “ ही भारताच्या इतिहासातील अजरामर घोषणा केली.

आजाद हिंद सेनेची आगेकूच जोरात चालू असताना तिकडे जपानची मित्रराष्ट्रांच्या ताकदीसमोर  समोर पीछेहाट होऊ लागली. त्याचबरोबर आजाद हिंद सेनेची मदत, रसद थांबली. लढाई थांबवल्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.यातच ब्रिटिशांनी विमानातून पदके टाकून ब्रिटिश सैन्यात परत या अशी लालच आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना दाखवली.

पण एकाही सैनिकांनी त्यास भीक घातली नाही आणि आझाद हिंद सेनेशी बेईमानी केली नाही. तिकडे जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आले त्यामुळे जपानने शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान येथील विमानतळावर विमानाचा अपघात होऊन सुभाष चंद्र बोस यांचे निधन झाले असे सांगण्यात आले.

भारतरत्न पुरस्कार :

1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. परंतु नेताजींच्या मृत्युचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करत त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला.

राष्ट्रगीत :

दूरदृष्टी,आत्मविश्‍वास, धडाडी आणि निर्भयता यामुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. लोकांसाठी ते कायमच  लाडके ‘नेताजी’ म्हणून स्मरणात राहतील. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले. यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी आज परिवर्तन करून राष्ट्रगीत बनवले.

शुभ सुख चैन की बरखा बरसे

भारत भाग्य हे जागा

पंजाब,सिंधु, गुजरात, मराठा

द्राविड,उत्कल,बंगा,

चंचल सागर,विंध्य हिमालय,

नीला, यमुना,गंगा

तेरे नीत गुण गाए

तुझसे जीवन पाये

सब तन पाय आशा

सुरज बनकर जगपर चमके

भारत नाम सुभागा

जय हो, जय हो,जय हो,जय जय जय जय हो

भारत नाम सुभागा

आम्ही दिलेल्या netaji subhash chandra bose information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नेताजी सुभाष चंद्र बोस information about subhash chandra bose in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या subhash chandra bose mahiti marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि subhash chandra bose in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनराठी.नेट

2 thoughts on “नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती Subhash Chandra Bose Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!