सुनील छेत्री मराठी माहिती Sunil Chhetri Information in Marathi

sunil chhetri information in marathi सुनील छेत्री मराठी माहिती, भारतामध्ये अनेक असे खेळ आहेत जे खूप आवडीने खेळले जातात जसे कि क्रिकेट, टेनिस, फुटबॉल आणि इतर असे अनेक खेळ आहेत जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात आणि या खेळांच्यामध्ये चांगली कामगिरी करून अनेकांनी आपली नाव देशामध्ये उंचावले आहे आणि असे एक भारतीय खेळाडू सुनील छेत्री हे देखील आहेत. ज्यांनी फुटबॉल खेळामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि आपले आणि देशाचे नाव उंचावले आहे आणि आज आपण या लेखामध्ये त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

सुनील छेत्री हे फुटबॉल खेळामध्ये एक प्रसिध्द खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि ते भारतीय संघामध्ये स्ट्रायकर आणि विंगर म्हणून खेळतात. सुनील छेत्री यांचा जन्म सिकंदराबाद या ठिकाणी ३ ऑगस्ट १९८४ मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव केबी छेत्री आणि आईचे नाव सुशीला छेत्री असे होते.

सुनील छेत्री यांचे वडील हे भारतीय सैन्याच्या इएमइ कॉर्प्समध्ये अधिकारी होते आणि त्याचबरोबर त्यांची आई सुशीला छेत्री ह्या त्यांचा बहिणीसोबत नेपाळ राष्ट्रीय संघातून खेळल्या होत्या.

आणि अश्या प्रकारे त्यांच्या घरामधील वातावरण हे खेळाचे असल्यामुळे त्यांना देखील खेळाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी देखील फुटबॉल खेळामध्ये पुढे चांगली कामगिरी केली.

sunil chhetri information in marathi
sunil chhetri information in marathi

सुनील छेत्री मराठी माहिती – Sunil Chhetri Information in Marathi

नावसुनील छेत्री
जन्म३ ऑगस्ट १९८४
जन्म ठिकाणसिकंदराबाद (भारत)
पालककेबी छेत्री (वडील) आणि सुशीला छेत्री (आई)
शिक्षणस्कूलचे शिक्षण बहाई स्कूलमधून केले आणि पदवीचे शिक्षण आशुतोष कॉलेज (कोलकत्ता) मधून पूर्ण केले
ओळखभारतीय फुटबॉल खेळाडू

सुनील छेत्री यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – early life and education

सुनील छेत्री यांचा जन्म सिकंदराबाद या ठिकाणी ३ ऑगस्ट १९८४ मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव केबी छेत्री आणि आईचे नाव सुशीला छेत्री असे होते आणि सुनील छेत्री यांना एक सखी बहिण देखील आहे तिचे नाव बंदना असे आहे.

सुनील छेत्री यांनी त्यांचे शालेय शिक्षण बहाई स्कूलमधून म्हणजेच सिक्कीममधून पूर्ण केले आणि मग त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण कोलकत्ता या ठिकाणी असणाऱ्या आशुतोष या कॉलेजमधून पूर्ण केले.

सुनील छेत्री यांचे फुटबॉल मधील कारकीर्द – career

 • सुनील छेत्री यांच्या घराचे वातवरन हे खेळाचे असल्यामुळे त्यांना देखील लहान वयातच खेळाची आवड होती आणि म्हणून त्यांनी फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण घेतले आणि सर्वप्रथम त्यांनी नवी दिल्ली सिटीच्या एफसी बरोबर खेळले.
 • नंतर नॅशनल फुटबॉल लीगच्या मोहन बागान या अॅथलेटीक क्लबकडून त्यांच्या फुटबॉल खेळाची खरी सुरुवात झाली.
 • २००२ – २००३ या वर्षी त्यांनी फुटबॉलचा पहिला खेळ खेळला आणि त्यावेळी त्यांनी ४ गोल केले आणि त्या खेळामध्ये त्यांचा क्लब हा ७ व्या स्थानावर राहिला होता.
 • २००३ – २००४ मध्ये सुनील छेत्री यांनी दोन गोल केले त्यामुळे त्यांचा क्लब ९ स्थानावर राहिला आणि त्यांनी शेवटच्या मोसमात मोहन बगानसोबत देखील दोन गोल केले आणि त्यावेळी क्लब ९ व्या स्थानावरून ८ व्या स्थानावर आला.
 • २००५ मध्ये ससुनील छेत्री यांनी जगथिट कॉटन आणि टेक्सटाईल फुटबॉल क्लब मध्ये सामील झाले आणि ते त्या क्लबकडून २००५ – २००६ मध्ये खेळले आणि यामध्ये त्यांनी ३ गोल केले आणि त्यामुळे ते खेळत असलेला क्लब हा ६ व्या स्थानावर येण्यास मदत झाली
 • त्यानंतर २००६ – २००७  मध्ये या खेळाडूने ११ गोल केले आणि यामुळे क्लब दुसऱ्या स्थानावर जाण्यास यशवी ठरला.
 • त्याचबरोबर ते आय लीगमध्ये देखील खेळले आणि त्यांनी आय लीगच्या पहिल्या सत्रामध्ये त्यांनी ७ गोल बनवले आणि त्यांचा क्लब जेसीटी हा तिसऱ्या स्थानावर येण्यासाठी मदत झाली.
 • २००९ मध्ये छेत्री यांनी दुसर्या सहकारी आय लीग संघ डेपोसोबत दोन वर्षाचा करार केला आणि त्यावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये त्याला भविष्यामध्ये त्याला चाचणीसाठी परदेशामध्ये जाण्याची परवानगी मिळाली.
 • २०१० मध्ये त्यांनी मेजर लीग सॉकर सोबर करार केला आणि ते मेजर लीग सॉकर सोबत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आणि  तो आशियाबाहेर खेळणारा देखील पहिला खेळाडू बनला.
 • २०२० या वर्षामध्ये त्यांनी मॅन्चेस्टर युनायटेड विरुध्द टील बनबरिचा पर्याय म्हणून खेळला आणि त्यावेळी कॅन्सस सिटी संघाने २-१ असा सामना जिंकला.

सुनील छेत्री यांच्याविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

 • सुनील छेत्री यांनी सर्वकाळातील महान फुटबॉलपटूपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.
 • सुनील छेत्री यांनी भारताचा दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान पदमश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार त्यांच्या खेळामधील चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी दिलेले आहेत.
 • या खेळाडूने सलग तीन वेळा हॅट्रीक करणारा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्यांनी पहिला सामना ताजीकीस्तान विरुध्द २००८ मध्ये खेळला होता त्याचबरोबर २०१० मध्ये व्हीएतनाम विरुध्द आणि तुसरा चायनीज तैपेविरुध्द २०१८ मध्ये खेळला होता.
 • सुनील छेत्री हे भारत, उत्तर अमेरिका आणि युरोपा अश्या तीन वेगवेगळ्या खंडावर खेळणारा खेळाडू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
 • ते आय लीगमध्ये देखील खेळले आणि त्यांनी आय लीगच्या पहिल्या सत्रामध्ये त्यांनी ७ गोल बनवले आणि त्यांचा क्लब जेसीटी हा तिसऱ्या स्थानावर येण्यासाठी मदत झाली. आय लीगमध्ये सर्वोच्च भारतीय गोल करणार खेळाडून म्हणून त्यांना ओळखले जाते आणि त्यांच्या नंतर बायचुंग भुतिया यांनी गोल केले होते.
 • नॅशनल फुटबॉल लीगच्या मोहन बागान या अॅथलेटीक क्लबकडून त्यांच्या फुटबॉल खेळाची खरी सुरुवात झाली.
 • सुनील चित्री यांनी त्यांचे प्रशिक्षक सुब्रता भटाचार्य यांची मुलगी सोनम भटाचार्य हिच्याशी लागण केले. त्यांनी १० वर्षाहून अधिक काळ एकमेकांना डेट केले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि ते सध्या बंगलोर मध्ये राहतात.
 • त्यांची आई सुशीला छेत्री ह्या त्यांचा बहिणीसोबत नेपाळ राष्ट्रीय संघातून खेळल्या होत्या त्यामुळे घरातील वातावरण देखील खेळाचे असल्यामुळे त्यांना या खेळामध्ये चांगले खेळण्यासाठी लवकर यश मिळाले.

आम्ही दिलेल्या sunil chhetri information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सुनील छेत्री मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sunil chhetri football player information in marathi या sunil chhetri biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sunil chhetri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sunil chhetri in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!