सुरेश रैना मराठी माहिती Suresh Raina Information in Marathi

Suresh Raina Information in Marathi सुरेश रैना एक लढवैय्या खेळाडू मित्रहो, भारतीय क्रिकेट संघातील एक लढवैय्या, आक्रमक, डावखुरा, फिरकीपटू, फलंदाज,  उत्कृष्ठ आणि सर्वगुणसंपन्न खेळाडू म्हणून सुरेश रैना या क्रिकेटपटूकडे पाहिले जाते. त्याच्या मध्यम गतीच्या फलंदाजीमुळे आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीमुळे या क्रिकेटपटूला प्रचंड यश मिळाले होते. सुरेश रैना हा भारतीय खेळाडू जगामधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षम म्हणून नावारूपाला आलेला आहे. याचबरोबर, रैनाने काही कालावधीसाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वदेखील केले आहे.

क्रिकेट या क्षेत्रात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा एक तरुण कर्णधार म्हणून विशेष असा मान मिळविला आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटच्या सामन्यात तिन्ही स्वरूपात आपले शतक पूर्ण करणारा तो पहिला भारतीय उत्तम फलंदाज आहे. अशा या सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादनगर याठिकाणी इसवी सन २७ नोव्हेंबर १९८६ मध्ये झाला.

suresh raina information in marathi
suresh raina information in marathi

सुरेश रैना मराठी माहिती – Suresh Raina Information in Marathi

पूर्ण नाव सुरेश रैना
जन्म२७ नोव्हेंबर १९८६
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलतिर्लोकचंद रैना
आईपरवेझ रैना
जन्मगावउत्तर प्रदेशातील मुरादनगर

कुटुंब

रैनाचे घराणे जन्मू आणि काश्मीर या प्रदेशातील रैनावारी मधील काश्मिरी पंडितांचे आहे. सध्याच्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद नावाच्या शहरातील राजनगर याठिकाणी सुरेश रैना राहतात. सुरेश रैना यांना एकूण तीन लहान भाऊ आहेत, ज्यांची नावे दिनेश रैना, नरेश रैना आणि मुकेश रैना अशी आहेत. या तीन भावंडांशिवाय त्यांना एक सर्वांत मोठी बहीण देखील आहे.

करिअर

आपल्या भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ठ फलंदाज क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा एक लेख इसवी सन २०१२ मध्ये “राहुल द्रविड : टाईमलेस स्टील” या पुस्तकामध्ये प्रकाशित केला गेला आहे. सुरेश रैना साधारणतः इसवी सन २००५ साली आपल्या वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आपल्या भारत देशाचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता.

तसेच, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये इसवी सन २०१० म्हणजे जवळपास पाच वर्षानंतर याच संघाविरुद्ध प्रवेश केला होता आणि विशेष म्हणजे याच सामन्यात रैना यांनी आपले पहिले शतक झळकावले होते.

यानंतर, इसवी सन २०११ मध्ये झालेल्या विश्व कपच्या क्रिकेट सामन्यात ते आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख सदस्य होते आणि याच विश्व कप स्पर्धेत आपल्या भारताचा दणदणीत विजय देखील झाला होता. मित्रहो, सुरेश रैना यांचे वडील उत्तर प्रदेशमधील मुर्दानगर येथील आयुधनिर्माण नावाच्या एका कारखान्यात उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांच्या मातोश्री परवेश रैना या गृहिणी आहेत.

सुरेश रैना हे खेळाडू आपल्या डाव्या हाताचे मध्यमक्रमाचे उत्तम फटकेबाज आहेत. त्याचबरोबर, ते ऑफ स्पिनर बॉलर म्हणून हि व्यवस्थितरीत्या आपली जबाबदारी पूर्ण करतात. याशिवाय, सुरेश रैना क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर्स मधून प्रसिध्द आहेत.

त्यासोबतच, सध्याच्या आयपीएलमध्ये सुरेश रैना गुजरात या संघाचे कर्णधार म्हणू कार्यरत आहेत. शिवाय, त्यांनी भारतीय ब संघाचे व मुख्य अ संघाचे देखील नेतृत्व केले आहे.

आपल्या भारतीय क्रिकेट संघातील सर्वात कमी वयात नेतृत्व करणारे दुसरे कप्तान म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती आहे. याचबरोबर, सुरेश रैना तिन्हीही आंतरराष्ट्रीय प्रकारात क्रिकेट खेळतात आणि यामध्ये शतक पटकावणाऱ्या भारतीयांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि जलदगतीचा प्रकार म्हणजे T20 चे सुरेश रैना हे दर्जेदार व विलेक्षणीय फलंदाज मानले जातात.

त्यांच्या आक्रमक अंदाजामुळे सुरेश रैना यांचे कसोटी क्रिकेटमधील करियर जास्त काळापर्यंत टिकू शकले नाही. खरंतर, इसवी सन २००० मध्ये रैनाने क्रिकेट खेळण्याचे ठरविले होते.

त्यानुसार, ते गाझियाबाद येथील विशेष गव्हर्नमेन्ट स्पोर्ट कॉलेज मध्ये दाखल झाले. क्रिकेटच्या क्षेत्रात प्रवेश घेतल्यावर मात्र त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात कधीच मागे वळून बघितले नाही. यानंतर, उत्तर प्रदेश अंडर १६ संघाचे ते कप्तान बनले आणि इसवी सन २००२ मध्ये ज्यावेळी क्रिकेट सदस्यांची चाचणी चालली होती, त्यावेळी ते मुख्य निवडकर्त्याच्या नजरेत पडले.

तिथूनच, म्हणजे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच त्यांनी अंडर १९ संघात आपले विशेष स्थान बनवले. अंडर १९ साठी त्यांनी श्रीलंका या देशाच्या विरुद्ध दोन अर्धशतकिय डाव खेळले होते आणि त्यावेळी, मित्रहो हा टूर आपल्या भारत देशाने जिंकला होता. त्यानंतर, इसवी सन २००३ मध्ये सुरेश रैना क्रिकेट या खेळामध्ये आसाम विरुद्ध आपला पहिला खेळ खेळले होते.

त्यावेळी सुद्धा ते अवघ्या १६ वर्षांचेच होते. त्यानंतर, पाकिस्तान टूर मध्ये त्यांनी विलक्षणिय आणि मन मोहून टाकणारी कामगिरी केली. ज्यावेळी की त्यांच्या खेळावर एका मुख्य निवडकर्त्याची नजर होती आणि अशा प्रकारे, अखेर त्यांची निवड अंडर १९ च्या वर्ल्ड कप संघासाठी करण्यात आली.

खरंतर, याच वर्ल्ड कपमध्ये सुरेश रैना यांनी जवळपास तीन अर्धशतके पटकावली होती आणि यामध्ये त्यांनी केवळ ३८ चेंडूत ९० धावा असा सामना पूर्ण करून सर्वोत्तम खेळी खेळली.

हा सामना खेळून भारतात परत आल्यानंतर सुरेश रैना यांना भारतीय चयन नावाच्या समितीद्वारा प्रशिक्षणासाठी बोर्डर-गावस्कर स्कॉलरशिप मिळाली होती. यानंतर इसवी सन २००५ मध्ये एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या खेळीत त्यांनी प्रवेश केला. श्रीलंका या देशाच्या विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यांच्या सिरीज मध्ये त्यांनी तीन अर्धशतकीय डाव पूर्ण करत, साधारणतः ५३.७५ च्या सरासरीने ६४५ धावा काढल्या होत्या.

मित्रहो, आंतरराष्ट्रीय स्तरावर  T20 मध्ये शतक प्राप्त करणारे तिसरे फटकेबाज फलंदाज म्हणून सुरेश रैना यांच्याकडे पाहिले जाते. याशिवाय, क्रिकेटमधील तिन्ही प्रकारांमध्ये शतक झळकावणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत.

त्याचबरोबर, कसोटी या क्रिकेट प्रकारात अगदी  पहिल्या सामन्यामध्येच शतक पटकवणारे बारावे  भारतीय फलंदाज म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. T20 करियर मध्ये सुरेश रैना यांनी जवळपास ६००० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या आणि ६००० धावा काढणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते.

विवाह

दिनांक ३ एप्रिल २०१५ मध्ये भारतीय सर्वोत्तम क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी आपली बालवयीन मैत्रीण प्रियांका चौधरी हिच्याशी खूप उत्साहाने विवाह केला. त्यांचा हा विवाहसोहळा जल्लोषाने पार पडला होता. लग्नानंतर सुरेश रैना आणि प्रियांका चौधरी यांना एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले.

त्यांच्या मुलीचा जन्म दिनांक १४ मे २०१६ रोजी एमस्टरडम, नेदरलंड याठिकाणी झाला होता. सुरेश रैना यांनी मिरुथीया गेंगस्टर या एका कन्नड चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे. याशिवाय, IPL मध्ये सर्वाधिक म्हणजे जवळजवळ ३००० धावा पटकावणारे सुरेश रैना हे  पहिले भारतीय खेळाडू होत. त्याचबरोबर, IPL मध्ये सगळ्यात जास्त झेल पकडण्याचं रेकॉर्ड सुरेश रैना यांच्याच नावे आपल्याला पहायला मिळेल. 

कामगिरी

तसेच, IPL मध्येच १०० पेक्षा जास्त षटकार मारणारे पहिले भारतीय फलंदाज आणि जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे फलंदाज म्हणून सुरेश रैना यांची अजुन एक ओळख प्रसिध्द आहे.

याशिवाय मित्रहो, IPL सीजनमध्ये ४००० पेक्षा जास्त धावा प्राप्त करणारे पहिले आणि एकमात्र फलंदाज म्हणजे सुरेश रैना हे भारतीय क्रिकेटपटू होय. IPL सोबतच CLT20 आणि टी20 यामध्ये देखील उल्लेखनीय शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज म्हणून सुरेश रैना यांच्याकडे पाहिले जाते.

शिवाय, IPL च्या अजूनपर्यंतच्या इतिहासामध्ये  आतापर्यंत सर्वाधिक फलंदाजीमधील सरासरीचा रेकॉर्ड त्यांच्याच नावे लिखित आहे. इसवी सन ४ ऑक्टोबर २०१४ मध्ये CLT20 मध्ये सर्वाधिक धावा हासिल करणारे पहिले फलंदाज सुरेश रैना हेच  आहेत आणि विशेष म्हणजे IPL संघ चेन्नई सुपरकिंग कडील सर्व सामने अजूनपर्यंत सुरेश रैना हेच खेळले होते.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या Suresh Raina Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सुरेश रैना एक लढवैय्या खेळाडू माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Suresh Raina Biography in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about suresh raina in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of suresh raina in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!