Tamhini Ghat Information in Marathi ताम्हिणी घाट आज-काल ताम्हिणी घाट सर्वांनाच परिचयाचा आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट होय. इथे मुळशी धरणाचा निसर्गरम्य देखावा पाहायला मिळतो. मुंबई गोवा मार्गाने कोलाड पर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरण याच्या मधल्या भागात तामिनी घाट आहे. माणगाव वरून पुण्याकडे जाताना लागतो तो ताम्हिणी घाट. पावसाळ्यात या ताम्हिनी घाटात निसर्ग आपल्या सौंदर्यायाचे अप्रतिम प्रदर्शन घडवतो.
सर्वत्र हिरवगार पसरलेला गवताचा गालिचा, डोंगर माथ्याला टेकलेले ढग आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या गाड्या. नागमोडी वळणे आणि बाजूलाच असलेले मुळशी धरण पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. चिंब पावसात भिजायच असेल तर तामिनी घाटात यावं आणि स्वर्गीय आनंद घ्यावा हा अनुभव फार चांगला आहे. या घाटात पावसाळ्यात अनेक लोक पर्यटक म्हणून येतात.
ताम्हिणी घाट माहिती – Tamhini Ghat Information in Marathi
ताम्हिणी घाट | माहिती |
श्रेणी | पश्चिम घाट |
लांबी | मुंबईपासून तामिनी घाट 140 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. |
कोठे आहे | महाराष्ट्रातील पुणे-गोवा मार्गावर |
पाहण्यासारखी ठिकाणे | देवकुंड धबधबा |
रस्ता | ताम्हिणी घाट रस्ता |
घाटाच्या सुरुवातीस एक सुंदर लहान धबधबा पाहायला मिळतो. हिरव्यागार डोंगर नाळेतून अवखळपणे वाहणारा तो धबधबा पर्यटकांना आकर्षित करून सोडतो. सर्वत्र धबधबे आणि त्यात मजा लुटणारे पर्यटक. मुंबईपासून तामिनी घाट 140 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. तामिनी घाट निसर्ग सौंदर्याचा जणू साक्षात्कार. येथील वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. लांबच लांब पसरलेले हिरवे गालिचे, ओथंबून खाली आलेले ढग, खळखळणारे धबधबे हे सर्व पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. बहरलेला निसर्ग आणि हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेल्या घाटाचे वर्णन कसे करावे हेच समजत नाही.
- नक्की वाचा: माळशेज घाट माहिती
येथील असंख्य धबधबे, ढगांमध्ये हरवलेल्या टेकड्या, बाजूला असलेला जलाशय निसर्गप्रेमींना भारावून टाकतात. जसजसे आपण घाट चढत वरती जाऊ त्याचप्रमाणे आपण स्वप्नांच्या दुनियेत जात आहे असा भास होतो. याच भागात 2013 पासून पन्नास स्क्वेअर फुटापर्यंत असलेल्या जागेत अभयारण्यची घोषणा केली. कारण दुर्मिळ पशुपक्ष्यांच्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती या ठिकाणी आहे. तसेच या भागात दुर्मिळ वस्ती देखील आहे. तसेच खूप देवराया या तामिनी घाट आहेत. तामिनी घाटाचे सौंदर्य जेवढे पहावे तेवढे कमीच.
कडा कडा धबधबा
खोल खोल पडे
ओतलेत जणू कोणी
दुधाचे घडे
धडाधड कोसळती
दरीमध्ये धारा
खाली खडकात
जणू मोत्याचाच चुरा
ताम्हिणी घाटात कसे जाल ?
मुंबईपासून तामिनी घाट 140 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. असं म्हणतात इथे आधी घाटात रस्ता होण्यापूर्वी जंगलाची पायवाट होती. तिथले आदिवासी लोक पायीच पुण्याला जायचे. पण हे जंगल खूप दाट असल्यामुळे गावातले लोक या रस्त्याने जायला घाबरायचे.अनेक आदिवासींना वाघाने किंवा काही जंगली प्राणी खाल्ल्याच्या गोष्टी ते खूप प्रचलित आहेत.पण आता सरकारने मोठा रस्ता बनवला आहे. सतत गाड्यांची रेलचेल असते. पुण्याहून मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव किंवा कोलाजला जोडण्यासाठी व कोकणात जाण्यासाठी नवीन मार्ग बांधण्यात आला. त्यामुळे श्रीवर्धन, दापोली, दिवेआगर, माणगाव, इंदापूर, रायगड किल्ला, महाड, रोहा, कोलाड, म्हसळा इत्यादी ठिकाणी जाण्याची सोय झाली.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात तासून बसवलेले या घाटात असंख्य धबधबे आणि रमणीय ठिकाणी बघायला मिळतात.त्यामुळे दिवसा येथे नेहमीच पर्यटकांची झुंबड उडालेली असते.जसजसे आम्ही या घाटाजवळ पोहोचतो तसे या घाटाचे सौंदर्य खुलून दिसत जाते. घाटात आल्यानंतर आजूबाजूचे दृश्य हे डोळ्यांच्या डीएसएलआर कॅप्चर करायला आव्हान देत. प्लास्टिक आणि सिमेंट काँक्रिटच्या जगातून वेगळ्या ग्रहावर आलोय असं वाटायला लागतं. भागाड एमआयडीसी पार केल्यानंतर या घाटाची अवघड वळणे सुरू होतात.
जस जसा घाट चढत जाऊ तस तसे चित्र बदलायला सुरुवात होते. संध्याकाळ होता होता संपूर्ण घाटात धुक पसरतं. इतका दाट की रस्त्याने जाणाऱ्या गाड्या पण कमी होतात. घाटात दूर दूर नजर टाकली की जाणवायला लागतं, अनेक गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या आहेत कारण त्यांची लाईट हालेनासे होतात. धुकंच एवढं दाट असत.समोर एवढंच धुक वाढलेला असतं की पाच फुटावर काहीच दिसायला तयार होत नाही.पावसाळी धुक्यात शिखर हरवलेले डोंगर, आकाशात उंच झेपावत आहेत असे वाटते.
- नक्की वाचा: आंबोली घाट माहिती
पर्वतरांगांच्या या भिंतीवर अलगद उतरणारे हे ढग वातावरण भारावून टाकते. डाव्या बाजूला तीन हजार फूट खोल दरी आणि उजव्या बाजूला सह्याद्रिचा तासलेला अंगावर येणारा कातळ कडा धडकी भरवणारा आहे. ताम्हिणी घाट पार करून पुढे गेल्यानंतर आपल्याला देवकुंड धबधबा पाहायला मिळतो.
ताम्हिणी घाट फोटो
देवकुंड धबधबा
देवकुंड या शब्दातच सगळं काही आलं. मंत्रमुग्ध करून ठेवण्याची ताकद या धबधब्यात आहे. या कुंडाचे सौंदर्य अप्रतिम आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. कुंडाकडे जाताना धारणा जलाशय दिसते. या जलाशयाच्या शेजारून जंगलामध्ये वाट आहे.तिथून पाच किलोमीटर पायी चालून कुंडाजवळ जाता येते. झाडांच्या विखुरलेल्या फांद्यापलीकडे दडलेले अद्भुत काही तरी दृष्टीस पडते.थोडे पुढे जाऊन पाहिले तर आपण स्तब्ध होऊन जातो समोर विशाल रौद्ररूप वरून कोसळणारा धबधबा पाहायला मिळतो.अगदी डोक्यावर दिसणारे दुभंगलेले डोंगरकपारीतून धबधबा कोसळतो. तो डोळ्यात न मावणारा इतका मोठा आहे.
या धबधब्याच्या पायथ्याशी दर्शन होते ते निळसर हिरव्या जलाने वाहत असणारे आणि वाहतच राहणारे विशाल जलकुंडाचे. त्या जल कुंडाच्या थोड वर पाण्याच्या माऱ्याने काळ्याशार खडकांनी निर्माण झालेली गुफेची कपार आहे.त्याला जोडून वर उसळी घेत डोंगरापलीकडे झेपावणारे आकाशाला गवसणी घालणारे दोन उंच उंच डोंगरकडे आहे. त्या कपारीतून थेट आकाशात विशाल रौद्ररूप धारण करून बरस्नारा दुधाळ पाण्याचा स्रोत आहे.डोंगर कड्यांच्या चहुबाजूंनी नजर फिरवली असता वेगात येणाऱ्या जलधारा पाहायला मिळतात. या जल धारा कपारी वर येऊन मोठ्याने आपटतात असे वाटते जणू मोत्याची माळ तुटून खाली पडली आहे.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, ताम्हिणी घाट tamhini ghat information in marathi wikipedia हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. tamhini information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about tamhini ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही ताम्हिणी घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या pune ghat माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही tamhini ghat in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट