ताराबाई शिंदे यांच्या बद्दल माहिती मराठी – Tarabai Shinde Information in Marathi
पूर्ण नाव (Name) | ताराबाई शिंदे |
जन्म (Birthday) | इसवी सन १८५० |
जन्म गाव (Birth Place) | बुलढाणा |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | एक स्त्रीवादी लेखिका |
जन्म व वैयक्तिक आयुष्य
बापूजी हरी शिंदे या बुलढाण्याच्या जमीनदाराच्या घरी ताराबाई शिंदे यांच्यासारखे कन्यारत्न जन्माला आलं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच इसवी सन १८५० मध्ये ताराबाई शिंदे यांचा जन्म झाला. ताराबाई यांचे वडील सत्यशोधक समाजाचे सभासद होते. शिवाय प्रगत विचारांचे होते ताराबाई यांना मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले.
त्यामुळे स्त्री-पुरुष असा भेदभाव ताराबाई शिंदे यांच्या घरामध्ये कधीच चालला नाही. ताराबाईंचे शिक्षण झालं. ताराबाईंनी घोडा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं. वडील जमीनदार होते त्यामुळे शेतीचा कारभारामध्ये ताराबाई यांचं लक्ष होतं. असं कुठलंच क्षेत्र बाकी राहिलं नव्हतं जिथे ताराबाई यांनी काम केलं नसेल. कोर्टाचेही कामं ताराबाईंनी केली.
ताराबाई यांचा विवाह करण्यास विरोध होता परंतु त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून ताराबाई यांना विवाह करावा लागला शिवाय तरणीताठी पोर घरामध्ये ठेवणं त्या वेळी समाजाला काही मान्य नव्हतं. अशा वेगवेगळ्या बाबींमुळे ताराबाईंना विवाह करावा लागला तर त्यांचा विवाह एका सर्वसामान्य माणसाबरोबर झाला त्यांना मूलबाळ देखील झालं परंतु ताराबाई यांच मन या सगळ्या गोष्टींमध्ये कधी मूरलंच नाही.
वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे ताराबाई यांच पालन-पोषण करण्यात त्यांच्या वडिलांनी कोणतीही कमतरता भासू दिली नाही. ताराबाई यांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांत सोबत अन्य सहा भाषांवर प्रभुत्व मिळवलं होतं. शिवाय त्यांना वाचनाची फार आवड होती त्यामुळे वाचनामध्ये त्यांचा दांडगा अनुभव होता.
वडील सत्यशोधक समाजाचे सभासद असल्यामुळे घरांमध्ये कार्यकर्त्यांची गरदळ पहायला मिळायची शिवाय त्यातील काही मुद्दे कानावर देखील पडायचे. सत्यशोधकी ग्रंथ, पुस्तके ताराबाईंनी वाचली त्यांच्या मनामध्ये बालपणापासून सत्यशोधक विचारांचे संस्कार मूरले गेले.
ताराबाई एक स्त्रीवादी लेखिका
ताराबाई या एक स्त्रीवादी होत्या. म्हणजे आत्ताच्या शब्दात सांगायचं झालं तर फेमिनिझम. ताराबाई शिंदे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्त्री आणि पुरुष यांना समाजामध्ये भिन्न वागणूक का दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आणि हा प्रश्न समाजाला कणखरपणे विचारण्यात घालवल. अठराव्या शतकामध्ये मुलींना फारसे काही अधिकार नव्हते, तरीही बऱ्याच समाजसेविका समाज प्रबोधन करण्यासाठी पुढे येऊन स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता या सगळ्या गोष्टींच समर्थन करत होत्या.
त्यातीलच एक ताराबाई शिंदे. अठराव्या शतकामध्ये स्त्रियांना डोक्यावरून पदर वर उचलण्यास देखील परवानगी नव्हती, मुलींना तुच्छ वागणूक दिली जायची, त्यांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार नव्हता तर त्या पुरुषांपेक्षा बळ, बुद्धिमत्ता आणि वैचारिक दृष्ट्या कशा कमी आहेत हे नेहमी दाखवून दिलं जायचं.
परंतु ताराबाई शिंदे यांच्यासारख व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं ज्यांच्यामध्ये समाजापुढे ताठ मानेने आपले विचार मांडण्याची हिंमत होती. शिवाय समाजामध्ये स्त्री पुरुष तुलना का केली जाते? याचा जाब समजला विचारण्याची क्षमता ठेवणाऱ्या स्त्रिरत्न ताराबाई शिंदे. कणखर आवाज, तापट स्वभाव, अतिशय चपळ, बुद्धिमान, स्त्रियांच्या दुःखा विषयी आस्था बाळगणारऱ्या आणि त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अशा ताराबाई शिंदे.
- नक्की वाचा: ताराबाई मोडक यांची माहिती
प्रतिष्ठित घरात वाढलेल्या ताराबाई शिंदे या पुरोगामी विचाराच्या होत्या. वडील महसूल खात्यात उपयुक्त पदावर कार्यरत होते. शिस्त, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा, कामाच्या पद्धती, स्वरूप, जेष्ठ माणसांची वागणूक त्यांचे हावभाव, खरे-खोटेपणा, लोभ, मत्सर अशा समाजात घडणाऱ्या गोष्टी ताराबाई स्वतःच्या डोळ्याने बघत होत्या.
अशाच काही बाबींच चित्र ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या लेखणी द्वारे उमटवलं. ताराबाई ह्या एक अशा स्त्री होत्या ज्यांनी स्वतः एक स्त्री मनं असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुष जे जे काम करतील, पुरुषाच ज्या ज्या क्षेत्रांमध्ये वर्चस्व आहे तिथे स्त्रिया देखील तितक्यात जोशाने व कलेने काम करू शकतात हे ताराबाई शिंदे यांनी करून दाखवलं.
शेतीची कामं म्हणू नका, कोर्टकचेरीची कामं म्हणू नका, शेत जमिनीचे व्यवहारात लक्ष ठेवणे, घोडा चालवायला शिकणे ही सगळी कामं ताराबाई शिंदे यांनी करून दाखवली. या सगळ्यातून त्या समाजाला एकच संदेश देऊ इच्छित होत्या ते म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता. ताराबाई शिंदे यांनी समाजपरिवर्तनाची मशाल हाती घेतली होती.
सर्वप्रथम विधवा स्त्रियांना पुनर्विवाहासाठी केली जाणारी मनाई, शिवाय स्त्रियांचा केला जाणारा छळ, शिक्षणासाठी परवानगी नसणं त्यामुळे अशिक्षित म्हणून त्यांची कुचंबणा व हसं केलं जायचं. वेगवेगळ्या अटी नियम रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी स्त्रियांवरच का लादल्या जातात? हा प्रश्न ताराबाई शिंदे यांनी समाजाला विचारला तर दुसऱ्या हातावर पुरुषांना अनेक लग्न करण्यासाठी असलेली मुभा, त्यांना दिले जाणारे अधिकार, पुरुषांना गरजेपेक्षा दिले जाणारे महत्त्व, समाजामध्ये होणारी स्त्री व पुरुषांची तुलना या गोष्टी ताराबाई शिंदे यांना पटणाऱ्या नव्हत्या.
या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या निबंधा मधून केलं. हा निबंध लिहिण्याचा खरं कारण म्हणजे १८८१ साली टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली बातमी ती म्हणजे सुरत मधील एका विधवा महिलेने समाजाला घाबरून तिच्या मुलाची हत्या केल्याने तिच्याविरोधात खटला दाखल झाल्याची बातमी.
ही बातमी पाहताच ताराबाई यांना प्रेरणा मिळाली त्या बातमीवर पुणे वैभव या तत्कालीन सनातनी वृत्तपत्रात एक लेख आला होता त्या लेखाला प्रतिसाद म्हणून ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली स्त्री पुरुष तुलना हा निबंध लिहिला. या निबंधा मध्ये ताराबाई यांनी समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि समाजाने लादलेल्या वेगवेगळ्या अटी, परंपरा, नियम या सगळ्यामुळे स्त्रियांची होणारी गोची यावर आपलं मत मांडलं होतं.
त्यावेळी स्त्री-पुरुष तुलना हा निबंध अतिशय लोकप्रिय ठरला. या निबंधाच्या जवळपास पाचशे प्रती पुण्याच्या शिवाजी प्रेस मध्ये छापून आल्या होत्या. ताराबाईने घेतलेली ही उंच झेप समाजाच्या डोळ्यात खुपणारी होती त्यामुळे या निबंधाची दुसरी आवृत्ती येऊ नये म्हणून समाजाकडून प्रतिगामी लोकांमधून मोठ्या प्रतिक्रिया व दबाव आणण्यात आला. त्यावेळी ताराबाई शिंदे यांनी समाजाविरुद्ध उचललेला आवाज व स्त्रियांच्या हक्कासाठी लढताना त्यांनी केलेली कृती ही उल्लेखनीय आहे.
- नक्की वाचा: महाराणी ताराबाई यांची माहिती
त्यावेळी एक स्त्री समाज सुधारक म्हणून ताराबाई शिंदे यांचा उल्लेख केला जातो. खरंतर त्या वेळची परिस्थिती तशी फारशी नाजूक होती अशा वेळेतही ताराबाई यांनी आपलं मन खंबीर ठेऊन आपलं मत समाजाच्या बुरसटलेल्या विचारानं पुढे मांडलं हीच खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या निबंधाचा प्रभाव समाजावर पडला.
स्त्री पुरुष तुलना हे लिहिण्याच मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचं मानसिक व शारीरिक रीत्या होणारं शोषण, विवाहित स्त्रियांवर होणारे अत्याचार, लहान वयातच मुलींना लग्न करण्यासाठी जबरदस्ती करणं, मुलींना शिक्षणाचा अधिकार न देणे, आपले हक्क मांडण्याचा मानवी अधिकार मुलींकडून काढून घेणं, अगदी मूलभूत गरजांसाठी स्त्रियांची हेळसांड करणे, सगळीच दुःख, यातना, भोग, शोषण स्त्रियांच्याच वाटेला का? आणि पुरुषांना सगळे अधिकार का? असे प्रश्न ताराबाई यांना पडले आणि त्यांनी ते समाजासमोर मांडले.
स्त्री व पुरुष यांना समाजामध्ये समान अधिकार असावेत तर त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन देखील समान असावा. आज समाज स्त्रियांच्या बाबतीत बराच पुढे गेला आहे आज प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे तर त्यासोबतच आपले हक्क आपलं मत जगासमोर मांडण्याचा देखील अधिकार आहे.
समाजात परिवर्तन घडवण्यासाठी ताराबाई शिंदे यांनी घेतलेले अथक परिश्रम व त्यांचा सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रामध्ये असलेलं योगदान हे भरपूर मोलाचं आहे. परंतु अजूनही कुठेतरी ताराबाई शिंदे यांच्या सारखे स्त्रीरत्न पुन्हा या समाजाला लाभावं अशी इच्छा सदोदित राहिली.
आम्ही दिलेल्या tarabai shinde information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर ताराबाई शिंदे यांच्या बद्दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tarabai shinde information in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tarabai shinde information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about tarabai shinde in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट