“मुलगी शिकली आणि प्रगती झाली”
Tarabai Modak Information in Marathi ताराबाई मोडक माहिती मराठी हि मराठीमधली म्हण ताराबाई मोडक यांनी खऱ्या आयुष्य मध्ये लागू केली. अशीच प्रगती ताराबाई मोडक यांनी करून दाखवली ताराबाई मोडक एकोणिसाव्या शतकाच्या प्रगत आणि शिक्षित स्त्री होत्या. ताराबाई मोडक या एक मराठीभाषिक आणि भारतातील पहिल्या बाल शिक्षणतज्ज्ञ होत्या. आपल्या शिक्षणाचा वापर त्यांनी समाजसेवेसाठी केला. आजच्या लेखामध्ये आपण समाजसेविका ज्यांनी बाल शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले अशा ताराबाई मोडक यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ताराबाई मोडक माहिती मराठी – Tarabai Modak Information in Marathi
पूर्ण नाव | ताराबाई मोडक |
जन्म | १९ एप्रिल १८९२ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वडील | सदाशिव पांडुरंग केळकर |
आई | उमाबाई सदाशिव केळकर |
जन्मगाव | मध्यप्रदेश येथील इंदूर |
मृत्यू | ३१ ऑगस्ट १९७३ |
जन्म
१९ एप्रिल १८९२ रोजी ताराबाई मोडक यांचा जन्म झाला. ताराबाई यांचा जन्म मध्यप्रदेश येथील इंदूर ठिकाणाचा आहे. आई उमाबाई सदाशिव केळकर आणि वडील सदाशिव पांडुरंग केळकर हे प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. वडील सदाशिव यांचा एकोणिसाव्या शतकामध्ये ठरवून विधवेशी पुनर्विवाह झाला होता त्यामुळे एकूणच घरामध्ये आधुनिक आणि प्रगत माहोल होता याच वातावरणामध्ये ताराबाई यांचा बालपण गेलं.
- नक्की वाचा: अहिल्याबाई होळकर यांची माहिती
शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्य
काही काळानंतर ताराबाई मोडक यांचं संपूर्ण कुटुंब मुंबई येथे स्थानबद्ध झालं. परंतु ताराबाई आणि त्यांच्या बहिणी पुण्यामधील हुजूरपागेत राहण्यासाठी गेल्या. शाळेमध्ये ऍडमिशन घेताना ताराबाई यांना पुनर्विवाहित आईची मुलगी असल्यामुळे ऍडमिशन नाकारल गेलं. परंतु ताराबाई यांनी हार मानली नाही.
समाजाकडून ताराबाई यांना थोडे हाल सोसावे लागले. इसवी सन १९०६ मध्ये ताराबाई यांच्या वडिलांचे निधन झाले. ताराबाई यांचे वडील मुंबईमध्ये राहायचे त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर ताराबाईंना पुन्हा मुंबईमध्ये यावे लागले. मुंबईमध्ये आल्यावर त्या इथेच स्थायिक झाल्या. मुंबईमधील अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल मध्ये ताराबाईंनी प्रवेश घेतला.
या शाळेतल्या रीती-रिवाज पाश्चात्य संस्कृतीशी एक जुळते होते. त्यामुळे ताराबाई सुरुवातीला नाराज होत्या परंतु हळूहळू त्या या वातावरणात रुळल्या आणि या शाळेतून ताराबाईंना खूप काही शिकण्यासारखे मिळाले. वडिलांच्या निधनानंतर दोन वर्षांनी ताराबाई यांच्या आईदेखील वारल्या ज्यामुळे ताराबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
वडील आणि आईचा आधार गेल्यामुळे ताराबाई यांना त्यांचे पुढील आयुष्य अंधकारमय वाटू लागलं. परंतु या प्रसंगावर मात करून देखील ताराबाईंनी पुढील आयुष्याची वाटचाल सुरू केली. इसवी सन १९०९ मध्ये ताराबाईं मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. ताराबाईंनी तिथेच न थांबता पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
- नक्की वाचा: सावित्रीबाई फुले यांची माहिती
आधी ताराबाईंनी मुंबई च्या एल्फिमस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल नंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल. २१ जून १९१४ मध्ये फिलोसोफी या विषयातून बी.ए ची पदवी मिळवली नंतर त्या एम.ए या परीक्षेसाठी बसल्या होत्या परंतु उत्तीर्ण होऊ शकल्या नाही. त्या प्रगत विचारांच्या होत्या.
कॉलेजमध्ये असताना के. व्ही. मोडक या तरुणाशी ताराबाई यांचा संबंध आला आणि पुढे जाऊन त्यांनी एकमेकांशी विवाह देखील केला. के.व्ही.मोडक हे अमरावती मध्ये राहण्यास होते आणि एक प्रसिद्ध वकील होते त्यामुळे १९१५ मध्ये ताराबाई यांनादेखील अमरावती येथे शिफ्ट व्हाव लागलं. ताराबाई यांचा संसार अतिशय चांगला चालू होता ताराबाई आणि त्यांचे पती हे दोघेही आधुनिक विचाराचे होते.
शिवाय अमरावती येथे शिक्षित समाजामध्ये त्यांचा समावेश असल्यामुळे अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता. इसवी सन १९२० मध्ये ताराबाईंना प्रभा नावाची मुलगी झाली. पुढे जाऊन काही कारणास्तव त्यांचं व त्यांच्या नवऱ्याचं नातं टिकू शकलं नाही त्यामुळे दोघांना घटस्फोट घ्यावा लागला.
ताराबाई यांच्या जीवनाचा कायापालट
इसवी सन १९१५ मध्ये ताराबाई यांनी अमरावती येथील सरकारी हायस्कूल मध्ये सेवा दिली. त्यानंतर इसवी सन १९१८ पर्यंत त्यांनी ती नोकरी केली. पुढे घटस्फोट झाल्यावर अमरावती सोडून त्या त्यांच्या चिमुकलीला प्रतिभाला घेऊन मुंबईकडे येण्यास निघाल्या. इसवी सन १९२१ मध्ये ताराबाई यांना राजकोट च्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य पदासाठी नोकरी चालून आली.
ती नोकरी त्यांनी जेमतेम दोन तीन वर्ष केली. त्यानंतर मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली. गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षण प्रयोगाविषयी ताराबाई यांना माहिती पडली. शिवाय गिजुभाई बधेका यांनादेखील सहकारी हवाच होता आणि या पदासाठी ताराबाई अगदी उत्तम होत्या कारण की, त्या स्वतःदेखील उच्चशिक्षित होत्या आणि शिवाय त्यांच्यामध्ये शिकवण्याची कला होती.
एखादं काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करून दाखवणे ताराबाईंचे कौशल्य होते. त्यामुळे ताराबाईंनी या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणावर बंदी होती आणि पुरुषांना प्राथमिक शिक्षण घ्यायचं असेल तर ते सहा वर्षाच्या नंतर, अशा परिस्थितीमध्ये ताराबाई आणि गिजुभाई यांनी बाल शिक्षण देण्याचा प्रयोग राबवला होता.
शिवाय लोकांना बाल शिक्षणाचे महत्त्व जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं होतं परंतु त्यावेळी लोकांची शिक्षणा बद्दलची मनस्थिती थोडी वेगळी होती. त्यामुळे हे कार्य जरा कठीणच ठरणार होतं. हा प्रकल्प यशस्वी ठरावा म्हणून ताराबाई आणि गिजुभाई यांनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
आज बाल शिक्षणाला देखील महत्त्व दिलं जातं याचं खरं श्रेय गिजुभाई आणि ताराबाई यांना जातं. ताराबाई लेखिका देखील होत्या. नूतन बाल संघाची १९२६ साली स्थापना करण्यात आली. आणि यांच्यातर्फे शिक्षणपत्रिका ही मासीका प्रकाशित केली जाऊ लागली. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले होते. बाल शिक्षण हे ताराबाई यांचे कार्यक्षेत्र बनून गेले होते. भावनगर येथे त्यांनी नऊ वर्षे काढली.
या नऊ वर्षांमध्ये ताराबाईंनी मोन्टेसोंरि च्या तत्त्वांचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यामध्ये अदलाबदल घडवून आणली. पुढे त्या मुंबईतील दादर येथे आल्या. तिकडे त्यांनी शिशुविहार सुरू केले. महाराष्ट्रासाठी बालशिक्षण आणि ताराबाई हे दोन्ही नवे चेहरे होते. इसवी सन १९३६ मध्ये ताराबाईंनी शिशुविहाराची स्थापना केली.
- नक्की वाचा: आनंदीबाई जोशी यांची माहिती
जसं बाल शाळा वाढत जातील तसं शिक्षक वर्ग देखील लागेल या विचाराने त्यांनी शिशु विहाराची बाल अध्यापक मंदिराची देखील स्थापना केली. पुढे ताराबाईंनी खेड्या मध्ये जाऊन बाल शिक्षण ही योजना राबवण्याचं ठरवलं. इसवी सन १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर ताराबाईंनी आपल्या संपूर्ण लक्ष बाल शिक्षणावर एकवटवलं बाल शिक्षण हे ग्रामीण भागांमध्ये सुरू करण्याचा त्यांचा विचार होता.
बोर्डी आणि कसंबाड इथल्या आपल्या २८ वर्षांच्या वास्तव्यामध्ये आदिवासी शिक्षणाचा डोलारा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. त्यांना सहकारी म्हणून अनुताई मिळाल्या या दोघींनी मिळून हिरजण वाडा पासून सुरुवात केली. त्यानंतर कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असे वेगवेगळे प्रकल्प राबवले. ताराबाई यांच्या या कार्यामुळे आदिवासी समाजामध्ये देखील शिक्षणाचा प्रसार झाला.
पुरस्कार
ताराबाईंनी शिक्षणाचा प्रसार करण्याचं ठरवलं त्यांनी बालशिक्षण काय असत हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळेच संपूर्ण देशभरामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. इतकच नव्हे तर ग्रामीण भागात आणि आदिवासी जमाती मध्ये देखील शिक्षणाचं महत्त्व समजलं त्यांच्या कार्यामुळे सरकारने त्यांना इसवी सन १९६२ साली “पद्मभूषण” पुरस्काराचे मानकरी ठरवले.
इसवी सन १९४६ व १९५१ पर्यंत ताराबाई मुंबई राज्याच्या विधानसभेच्या सदस्य होत्या. अखिल भारतीय बाल शिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्ष होत्या. इतकच नव्हे तर महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा बनवण्याचे काम ताराबाई यांच्यावर सोपवले. इसवी सन १९४९ मध्ये इटली मधील आंतरराष्ट्रीय दादरला येथे भाषण करण्याची संधी ताराबाई यांना मिळाली होती. अनेक राज्य आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर ताराबाई यांची नेमणूक करण्यात आली होती.
- नक्की वाचा: बिरसा मुंडा यांची माहिती
मृत्यू
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकामध्ये शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जायचं नाही. आणि स्त्री शिक्षणावर तर बंदीच होती. याशिवाय ताराबाई यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी आधुनिक होती शिवाय ताराबाई ह्या प्रगत विचारांच्या होत्या. त्यांच्या विचारांमुळे त्यांनी स्वतः सोबतच देशाचा फायदा देखील करून दिला.
देशातील प्रत्येक प्रांतांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात आणि आदिवासी जमाती मध्ये देखील शिक्षण कल्पना पोहचवली. बाल शिक्षणामध्ये त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा महान ताराबाई मोडक यांचे निधन ३१ ऑगस्ट १९७३ साली मुंबई येथे झाले.
आम्ही दिलेल्या tarabai modak information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर ताराबाई मोडक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tarabai modak full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about tarabai modak in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये adivasi samaj sudharak tarabai modak information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट